Skip to main content

[शशक' १९] - गलका

सोमवार, 11/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
तो आज चालतच निघाला. ऑफिस आगदीच हाकेच्या अंतरावर नसलं तरी वेळेत निघालं तर बॉसच्या शिव्या खायच्या आत पोहोचण्या एवढ्या अंतरावर होतं. दोन चौक ओलांडून पुढच्या वळणावर तो वळला. शेजारच्या वेड्यांच्या इस्पितळाच्या दहा फुटी लाकडी कुंपणा पलीकडून एकाच गलका झाला. ‘’१२..१२..१२............’’ तसा तो रोज या रस्त्याने येत नसला तरी जेव्हा या रस्त्याने जायचा तेव्हा नेहमीच असे वेगवेगळ्या आकड्यांचे कोरस त्याच्या कानी यायचे. नाही म्हटलं तरी आज मात्र त्याचं कुतूहल चाळवलंच. शेवटी त्याने भिंतीतल्या एका छिद्राला डोळा लावला आणि एक आकाश भेदून जाणारी किंचाळी त्या परिसरात दुमदुमली. पुन्हा गलका झाला ‘’१३..१३..१३............’’ आणि त्याचा चेहरा रक्ताने पूर्ण माखला होता.

वाचने 11401
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

+१

+1

खतरनाक

+१

+१

+१

+१

लैच डेंजरस पैजारबुवा,

हे त्या एका चित्रपटातल्या सीनसारखं आहे. एक दारुडा एका सिवेजच्या उघड्या होलकडे उभा राहुन पच्चीस!! पच्चीस!! अस बोंबलत असतो. एक जण येतो अन त्याला विचारतो काय झालय, तर हा त्याला आत ढकलतो ओरडतो छब्बीस !!

In reply to by प्रीत-मोहर

हेच म्हणणार होतो. कथा दुसर्‍या कथेवर आधारित आहे असं वाटतंय. कदाचित त्यांनी मूळ विपुमध्ये हा उल्लेख केलेला असावा.

+१

मस्त!!

चेहरा ऐवजी डोळा रक्ताने माखला होता असे असते तर शशक सह्ज कळण्यासारखी झाली असती.

+१

बापरे

+१


+१