सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं.
चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा?
माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं.
हीमोग्लोबिन कमी + कसल्याशा पेशी खूप जास्त म्हणालेत. गोळ्या सुरु केल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटाचा त्रास. मग सलाईन लावायचं ठरलं. ते सुरु होतंच तोवर मागच्या आठवड्यात ओटीपोटात जीवघेणी कळ आली.... टेस्ट केल्या.
आज रिपोर्ट आलेत. खूप हलकं वाटतंय.
शिकणार्या मुलाची तजवीज लागली की झालं.
.
.
.
.
.
ब्लड कॅन्सर आहे. अॅड्व्हान्स्ड स्टेजचा. आटपेल लवकरच.
------------&&&&--------------
सुरुवातीचे धक्क्यांचे, निराशेचे, त्राग्याचे आणि प्रारब्धाला दोष देण्याचे दिवस सरत नव्हते.
हॉस्पिटलला गेले आणि चित्रच पालटलं.
माणसाला स्वत:चं दु:ख दुसऱ्याच्या दु:खाशी तोलून पहायची सवय असते. माझ्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती असलेले लोक पाहिले आणि वाटलं आपण एकटे नाही, एवढंच नाही तर फारच सुदैवी आहोत. नेमकं काय झालंय हे ठाऊक आहे. चांगल्या हॉस्पिटलला आलो आहे. इथल्या अनेकांना सांगितलं जात नाही कारण सांगून समजत नाही आणि डॉक्टर म्हणालेत हा वाईटातला चांगला कॅन्सर आहे. योग्य उपचारांनी नक्की बरा होतो. प्रयत्न १००℅ करूया.
मोठ्या खर्चाची सोय व्हायलाही गरीबी कामी आली. कमी उत्पन्न असल्यानं सरकारकडं आणि वेगवेगळ्या संस्थांकडं मदत मागितली. मिळाली देखील.
आता होईल सुटका. कॅन्सरपासून.
वाचने
3113
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्पर्धेत नाहीये. चुकून टाकलं
सकारात्मक. छान आहे उत्तरार्ध.
हं सहमत!
In reply to सकारात्मक. छान आहे उत्तरार्ध. by एस
+१
सकारात्मक. छान आहे उत्तरार्ध. आवडला....सहमत.मस्त
जास्त आवडला
सुरेख
चांगलीय आवडली.
+१ आवडली
पुर्वार्ध वाचुनही काही लिहावं
पूर्वार्ध मुद्दाम तसाच लिहिला
In reply to पुर्वार्ध वाचुनही काही लिहावं by स्पंदना
सहमत प्यारेजी! एकदम छान वाटलं
In reply to पूर्वार्ध मुद्दाम तसाच लिहिला by प्यारे१
+१
In reply to पूर्वार्ध मुद्दाम तसाच लिहिला by प्यारे१
उत्तरार्धाची मांडणी आनखी
आयडी हॅक झाला काय गो?
In reply to उत्तरार्धाची मांडणी आनखी by जेनी...
ओ काका वोळीतली टिंबं नै का
In reply to आयडी हॅक झाला काय गो? by प्यारे१
खिक्क्क्!
In reply to ओ काका वोळीतली टिंबं नै का by जेनी...
बरी आहे . पण 'कथा' म्हणून
जर सत्य घटना असेल तर
In reply to बरी आहे . पण 'कथा' म्हणून by तुडतुडी
प्रत्येक
In reply to जर सत्य घटना असेल तर by gogglya
आपल्या मताचा आदर आहे. कथा
In reply to बरी आहे . पण 'कथा' म्हणून by तुडतुडी
+१
सकारात्मक...