Skip to main content

सुटका -२

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 24/08/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं. चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा? माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं. हीमोग्लोबिन कमी + कसल्याशा पेशी खूप जास्त म्हणालेत. गोळ्या सुरु केल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटाचा त्रास. मग सलाईन लावायचं ठरलं. ते सुरु होतंच तोवर मागच्या आठवड्यात ओटीपोटात जीवघेणी कळ आली.... टेस्ट केल्या. आज रिपोर्ट आलेत. खूप हलकं वाटतंय. शिकणार्‍या मुलाची तजवीज लागली की झालं. . . . . . ब्लड कॅन्सर आहे. अ‍ॅड्व्हान्स्ड स्टेजचा. आटपेल लवकरच. ------------&&&&-------------- सुरुवातीचे धक्क्यांचे, निराशेचे, त्राग्याचे आणि प्रारब्धाला दोष देण्याचे दिवस सरत नव्हते. हॉस्पिटलला गेले आणि चित्रच पालटलं. माणसाला स्वत:चं दु:ख दुसऱ्याच्या दु:खाशी तोलून पहायची सवय असते. माझ्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती असलेले लोक पाहिले आणि वाटलं आपण एकटे नाही, एवढंच नाही तर फारच सुदैवी आहोत. नेमकं काय झालंय हे ठाऊक आहे. चांगल्या हॉस्पिटलला आलो आहे. इथल्या अनेकांना सांगितलं जात नाही कारण सांगून समजत नाही आणि डॉक्टर म्हणालेत हा वाईटातला चांगला कॅन्सर आहे. योग्य उपचारांनी नक्की बरा होतो. प्रयत्न १००℅ करूया. मोठ्या खर्चाची सोय व्हायलाही गरीबी कामी आली. कमी उत्पन्न असल्यानं सरकारकडं आणि वेगवेगळ्या संस्थांकडं मदत मागितली. मिळाली देखील. आता होईल सुटका. कॅन्सरपासून.

वाचने 3113
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सकारात्मक. छान आहे उत्तरार्ध. आवडला. ...सहमत.

प्यारे काका, उत्त्तरार्ध जास्त आवडला..

पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध जास्त आवडला!

सकारात्मक शेवट.

In reply to by स्पंदना

पूर्वार्ध मुद्दाम तसाच लिहिला होता. आपल्यावर एखादं मोठं संकट चालून आलं की आयुष्यात आलेल्या सगळ्या बऱ्या वाईट आठवणींचा चित्रपट डोळ्यापुढून सरकतो, आत्यंतिक निराशा मन घर करते, हे सगळं माझ्याच नशिबी का असा विचार प्रकर्षानं जाणवतो. आपल्याला काही झालंय समजल्यानंतर पेशेंट च्या मनात आलेल्या भावना पहिल्या भागात होत्या. दुसरा भाग सुद्धा पेशंटचीच बदललेली मनस्थिति दाखवतोय.

In reply to by तुडतुडी

कथा म्हणुन न भावणे समजु शकतो. मुळात सत्य घटनांना कथेच्या स्वरूपात लिहिणे आणी ती वाचकांना भावणे ह्या अपेक्षा वाचक सापेक्ष असू शकतात!

In reply to by gogglya

सिनेमात कथा असतेच असे नाही पण विषय-मत-मांडण्यासारख काही असतंच!
कथेपेक्षा आशय शोधणारा टुकार नाखुस
आणि हो उत्तरार्ध प्रेर्णादायी म्हणून जासीच भावला.

In reply to by तुडतुडी

आपल्या मताचा आदर आहे. कथा म्हणून सादर करायला कमी पडलो असण्याची शक्यता आहे. (कथेचं बीज म्हणून एक घटना असणं वेगळं आणि तिला दृश्य रूप आणून समोर ठेवणं वेगळं. याबरोबर लेखक आणि लेखन हे सुद्धा वेगवेगलं आहे. असायला हवं.)

+१