आंतरजाल ( अप्लिकेशनस ) विरुद्ध कुटुंब
मित्रानो आज आपण स्वतःहून कुटुंबासाठी किती वेळ देतो ? आपण जरी द्यायचा ठरवलं तरी आपल्या कुटुंबीयांपैकी कुणीतरी एक सदस्य हातात मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसलेला असतो , अगदी नाही म्हंटल तर दूरदर्शनासमोर बसलेला आढळतो .
हे सर्व बघून मला तर आपण पुढारलेले नसून मागासलेलं वाटू लागलोय . आज माझी मुलं लहान आहेत म्हणून मी त्यांना या सर्व गोष्टींचे नकारात्मक परिणाम पटवून देत आहे . पुढे ते त्यांचे निर्णय घेतीलच . पण एक मात्र नक्की कि ते मी आल्यावर माझ्यासोबत घरात धिंगाणा घालतात . कुणीही दुर्दर्शनसमोर बसत नाही .
वरील सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मी स्वतः काही गोष्टी तंतोतंत पाळत आहे . सुरुवातीला थोडं चुकल्यासारखं वाटलं पण आता अगदी नाही म्हटलं तरी आमच्या "सौ " ला मी कुटुंबासाठी वेळ देणारा नवरा म्हणून वाटू लागलोय . त्या गोष्टी खाली देत आहे
१) मागची दीड एक वर्ष मी स्वतः साधा फोन वापरत आहे . अर्थात सुरुवातीला फार चुकल्यासारखं वाटलं पण आता स्वतःला आणि कुटुंबाला खूप वेळ मिळतो . याचा आनंदच आहे .
२) माझा लॅपटॉप मी माझ्या लॅबमध्येच ठेवतो . घरात कम्प्युटर मुद्दाम घेतला नाही आहे . असं नाही कि मी घेऊ शकत नाही . मुद्दाम या सर्व गोष्टी टाळलेल्या आहेत . अर्थात या गोष्टींचा मला सध्यातरी फायदाच होतोय . मोठ्या मुलाने बऱ्याचदा हट्ट केला , लॅपटॉप आणा म्हणून . मी त्याला सांगितलं कि मी तुला पॉकेटमनी देत जाईन ते साठवत जा . लॅपटॉपएव्हढे पैसे जमले कि तू स्वतःच घे . तोही खुश आणि मीही वेळ मारून नेली . मागील चार महिने तो मनापासून साठवतोय आणि जपतोयसुद्धा . हा एक अवांतर फायदा .
मी आवर्जून हा धागा काढतोय कारण मला माहित आहे , मला तरी वाटतं कि हि सर्व आप्लिकेशन्स भलेही आपल्याला ज्ञान देत असतील पण आपला बहुमूल्य वेळही खातात . आणि मला वाटतं आपण आपला वेळ जर कुटुंबासाठी गुंतवला तर पुढे म्हातारपणी तो कामाला येऊ शकतो .. आपलं मत अनिवार्य नसलं तरी या विषयांवर बहुमूल्यं आहे .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
याद्या
5342
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
स्क्युज मी
=)) =)) =))
In reply to स्क्युज मी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हात्रे सर
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
योग्य वेळी जागे केलाव बघा
In reply to स्क्युज मी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ख्या ख्या ख्या
In reply to योग्य वेळी जागे केलाव बघा by अभ्या..
अगदी अगदी
:D:D:D:D
नवीन साधन/विकास हे दुधारी
म्हात्रे सर
तुमची उदाहरणे चुकीची किंवा
हॉटेलात खाण्यासाठी कुटुंबासोबत गेलो आणि ऑर्डर देऊन जर मी मोबाईलमध्ये तोंड खुपसून राहिलो तरयात चूक मोबाईलची की तुमची ? तोच मोबाईल तुम्हाला महत्वाचा आणि / किंवा तातडीचा संदेश २४ X ७ देऊ शकतो, आणि ते मोबाईलशिवाय शक्य नसते... हा फायदा की तोटा ? मी वर दिलेले गाडीचे उदाहरण नीट वाचले असतेत तर मोबाईलचे उदाहरण तुमच्या मनात आले नसते. तंत्रज्ञान (तसे पाहिले तर कोणतेही ज्ञान/साधन) दुधारी शस्त्र असते. शस्त्र वापरण्याची बुद्धी असलेल्याच्या हातात ते फायदेशीर संरक्षणाची व बलवर्धक गोष्ट होते... ती बुद्धी नसलेला ते शस्त्र स्वतःच्या पायावर मारून जायबंदी करून घेतो. शस्त्र तेच असते... वापरकर्त्याच्या बुद्धीत फरक असल्यामुळे परिणाम वेगळा होतो.एखाद्याला कर्करोगाची गाठ असेल तर ती कापूनच बाहेर काढली पाहिजे , औषध करून नाही .तुमच्या उदाहरणात कर्करोगाची गाठ म्हणजे, तुम्ही मोबाईलचा केलेला अवेळी व अविचारी उपयोग, आहे... मोबाईल नाही ! 'माझ्यात सतत तोंड खूपसून बसा' असा हट्ट तुमचा मोबाईल करत नसावा असा माझा अंदाज आहे ! या उदाहरणात मोबाईलला दोष देणे म्हणजे भिंतीवर डोके आपटून मग भिंतीला दोष देण्यासारखे आहे ! :) शिवाय, जर मोबाईल कर्करोग असेल तर, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, (हे वाचत असतानाच) त्याचा आत्ताच्या आत्ता हतोडीने चुराडा करून, ती कर्करोगाची गाठ पूर्णपणे नष्ट करणेच योग्य होईल, नाही का ?!! =)) बघा बुवा, तुमचाच निर्णय, तुम्हीच अमलात आणा ! मानवाने तंत्रज्ञानाला फुकाचा दोष देत बसण्यापेक्षा, तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करण्याच्या स्वतःच्या बुद्धीचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले तर तंत्रज्ञान वरदान शाबीत होईल... मग अर्थातच, तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला जाऊन जीवन जास्त सुकर होईल. हे जमत नाही त्यांनी, सर्व तंत्रज्ञानाच्या कर्करोगाला आपल्या जीवनातून हद्दपार करून, जंगलात जाऊन (सद्या पृथ्वीवरचा तिथलाच काही भाग तंत्रज्ञानापासून मुक्त असेल) हंटर-गॅदरर बनून सुखाने कालक्रमणा करावी... काय म्हणता ?!म्हात्रे सर , कितीही म्हंटले
In reply to तुमची उदाहरणे चुकीची किंवा by डॉ सुहास म्हात्रे
@डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुमची उदाहरणे चुकीची किंवा by डॉ सुहास म्हात्रे
पण.. पण.. पण.. तुमचा आदर्श
मी इथवर ज्या मार्गाने आलो आहे
तेव्हा तंत्रज्ञानाला टाटा बाय
तेव्हा तंत्रज्ञानाला टाटा बाय बाय , आपण बोलू त्येच खरं , दुसरं काय नाय ... ह्ही ह्ही ह्हीसर्व तंत्रज्ञानाच्या कर्करोगाला आपल्या जीवनातून हद्दपार करून, कोणत्या जंगलात जाऊन (सद्या पृथ्वीवरचा तिथलाच काही भाग तंत्रज्ञानापासून मुक्त असला तर असेल) हंटर-गॅदरर बनून सुखाने कालक्रमणा करावी म्हणताय ते पण सांगा, तुमच्या मताच्या इतरांना पण त्याचा फायदा होईल आणि तुमचे एकटेपणही दूर होईल... ख्या ख्या ख्या ! बादवे, तुमचे मिपावरचे प्रतिसाद तंत्रज्ञान वापरून देत आहात की ते करण्यासाठी अजून काही तंत्रज्ञानमुक्त प्रणाली आहे तुमच्याकडे ?! =)) =))नाही बा नाही पटलं ! अर्थात
अहो म्हात्रे सर , कदाचित मी
आंतरजाल व माझा अनुभव
मिपाहोलिक्स अॅनॉनिमस
=))
In reply to मिपाहोलिक्स अॅनॉनिमस by पिवळा डांबिस
काही गोष्टी पटल्या.
दुर्गविहारी साहेब ,