चावट रश्श्याच्या धाग्यात बर्याच लोकांनी माझ्या आजीची ही रेसिपी देण्याचा आग्रह केला सो काल केला अंड्याचा रस्सा !
जमवाजमव एकदम सिंपल. हा एक झटपट रस्साच आहे म्हणा ना :)
तर एक (च) अंडे, बोटाच्या पेराएवढं आलं, ४-५ लसूण पाकळ्या, ४-५ चमचे ओले खोबरे, १ चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे, एक मध्यम कांदा बारीक चिरून. कोथिंबीर बारीक चिरून.
१ चमचा कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, आणि थोडी हळद. फोडणीसाठी तेल, जिरे मोहरी. झाले साहित्य. सगळी मापे आजीच्या हिशेबाने दिलीत बरं ;)
आता पहिले अंडं भरपूर फेसून ठेवायचं.
मग आले, खोबरे तीळ आणि जिरं यांचं बारीक वाटण करून घ्यायचं. लसूण भरड ठेचून बाजूला ठेवायचा. वाटणात नाही घालायचा. नाही तर खमंगपणा जातो.
मग भांड्यात अंमळ सढळ हाताने तेल सोडून ते तापल्यावर चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या यचा. मग ठेचलेला लसूण घालून लगेच हळद व वाटण घालून परतावे. मग कांदा-लसूण मसाला घालायचा, त्यातच चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दीड फुलपात्र भरुन पाणी घालायचं.
पाण्याला उकळी आली की मीठ घालून झाकण ठेवून २ मिनिटे ठेवावे. मसाला मुरला की झाकण काढून फेसलेल्या अंड्याची बारीक धार एका हाताने त्यात सोडावी आणि दुसर्या हाताने एकसारखे ढवळत रहावे. पूर्ण अंडे घालून झाल्यावर ढवळणे बंद करून झाकण न ठेवता २ मिनिटे उकळू द्यावे.
गरमागरम अंड्याचा रस्सा तय्यार आहे ! शक्यतो भाकरी बरोबरच खावा.
संध्याकाळी गडबडीत केल्यामुळे स्टेपवाईज फोटो काढायला जमले नाही. या एकावरच समाधान मानून घ्यावे :D


वाचने
23562
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंड कुणी बनवून दिलं तरच खाऊ
झाक हाय!
झकास. धन्यवाद.. आणखी रस्से
अहो हे असं दुपारच्या वेळेला
करून बघतो. धन्यवाद.
आली का पाकृ? धन्यवाद. करून
एक अंड्याचा अदमासे तीन जणांना
In reply to आली का पाकृ? धन्यवाद. करून by यशोधरा
ओके, करून सांगते.
In reply to एक अंड्याचा अदमासे तीन जणांना by सस्नेह
चविष्ट दिसतय. भाताबरोबरही छान
छान
मग ते पीठलेच होईल
In reply to छान by manguu@mail.com
हम्म
In reply to मग ते पीठलेच होईल by श्वेता२४
छान...!
खायला कधी येऊ ते बोल. बाकी
आज च करते! वाट च पाहत होते.
वाह छान ...ह्यातच उकडलेली
मस्तय!
हा अंडा-बुर्जी रस्सा आहे का?
नाही.
In reply to हा अंडा-बुर्जी रस्सा आहे का? by चामुंडराय
एक प्रश्न
चालेल की हो !
In reply to एक प्रश्न by जेम्स वांड
बेस्ट
मस्त..
हे जबर !!!!!!!
मस्त झाला होता रस्सा.. thank you स्नेहा ताई
जबऱ्या फोटू !!
In reply to मस्त झाला होता रस्सा.. thank you स्नेहा ताई by मीता
लिटरभर लाळ गळली! (जुन्या
In reply to मस्त झाला होता रस्सा.. thank you स्नेहा ताई by मीता
वाव ! कलर भारी आलाय :)
In reply to मस्त झाला होता रस्सा.. thank you स्नेहा ताई by मीता
मस्त पाककृती!
मस्त,स्नेहांकिता,वेगळाच
अंडी, असे वाचावे.
आज मुहूर्त लागला
लोखंडाच्या कढईत केल्याने चव अजून खुलून आली, ओले खोबरे नव्हते पण सुक्या खोबऱ्याचा किस घातला होता
भाकरी नव्हती म्हणून चपाती बरंच वरपला
मस्त !
In reply to आज मुहूर्त लागला by जेम्स वांड
मस्त झालतं की हो ताई प्रकरण
In reply to मस्त ! by सस्नेह
माझा आणि एक प्रश्न होता.