Skip to main content

ताज्या घडामोडी- भाग ३४

लेखक खेडूत यांनी सोमवार, 21/05/2018 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे पुन्हा एक नवा धागा काढत आहे! आधीच्या धाग्यावर कर्नाटक निवडणूक याच एकमेव विषयावर मुख्यत्वे चर्चा झाली. त्यासाठी वेगळा धागा आला नाही याचा परिणाम झाला. असो!

वाचने 33981
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by जेम्स वांड

हे ऐकले नव्हते. मी म. प्रदेशात कधी गेलेलो नाही पण साधारण भारतीय रस्त्यांचा अंदाज घेतला तर अत्यंत फोल वक्तव्य आहे त्यांचे. ---------------------------------- रस्त्यांची तुलना आणि कॅलिफोर्निया करतो म्हणणे हे वेगळे मुद्दे आहेत साधारणपणे असे माझे मत आहे. म्हणजे मुंबईचे शांघाय करतो, अमेठीचे सिंगापूर करतो असे म्हणणे म्हणजे तिथल्यासारखे रस्ते करतो असे अपेक्षित होते का? मी समजत होतो कि एकूण सर्वांगीण विकास या अर्थाने असेल. ---------------------------------- मी गांधीनगर आणि टेक्सासला गेलेलो आहे. वरील अर्थाने गांधीनगरचे ह्यूस्टन झालेले आहे असे गृहीत धरायला हरकत नसावी. ---------------------------------- वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, जर भाजपचे म. प्र. मधले विकासाचे दावे फोल असतील आणि आधीच्या सरकारांनी चांगली कामे केली असतील तर येत्या निवडणुकीत जनतेने हे सरकार घालवणे योग्य ठरेल.

In reply to by बिटाकाका

अमेठीचं सिंगापूर सोडा, मुंबई झाली तरी परप्रांतीय आणि बांगलादेशी घुसखोर तिथे जाऊन वाट लावतील. त्यामुळे अशी स्वप्ने न पहाणे चांगले!

महाराट्र टाईम्स : NDAच्या जागा घटणार पण, २०१९मध्ये पुन्हा मोदी सरकार! लोकसत्ता : आज निवडणुका झाल्यास नरेंद्र मोदी स्वबळावर सरकार नाही बनवू शकणार

In reply to by अर्जुन

मोदीमय पेपर - मटा मोदी पाहता पोटशूळ उठणारा पेपर - लोकसत्ता

In reply to by जेम्स वांड

मोदीमय पेपर - मटा
याच्याशी पूर्णपणे असहमत. अत्यंत बेजबाबदारपणे सतत नकारात्मक बातम्या देण्याची उदाहरणे सतत दिसतात तिथे.

In reply to by अर्जुन

दोन्ही वाक्ये तेच सांगत आहेत की! मोदी स्वबळावर येणार नाहीत म्हणजे भाजप बहुमतात नाही असे म्हणायचे असेल! एनडीए बहुमतात असेल टाइम्स नाऊचा पण सर्वे सांगतोय.

The Varanasi Police on Tuesday arrested a Bharatiya Janata Party leader for allegedly raping a woman at a lodge, the Hindustan Times reported. In her complaint, the woman claimed that Kanhaiya Lal Mishra had called her to the lodge with the promise to coordinate a meeting with a woman government officer who would offer her a job. https://scroll.in/latest/879960/varanasi-bjp-leader-arrested-for-allege… मंदिर वही बनायएंगे चळवळीतील ते एक अग्रगण्य नेते आहेत

कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्यापही संपलेलं नाहीये. बहुमत सिद्ध करण्यापुर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बहुमत चाचणी होण्यापुर्वी झालेली ही निवड जेडीएस-काँग्रेससाठी मोठा विजय असल्याचं म्हटलं जात आहे.

In reply to by manguu@mail.com

अरेरेरे! सत्तालास काय लपून नाय बगा. कालपरवा व्यासपीठावर दिसलीच ती! या न्यायाने आता काल विधानपरिषदेला हरणारे सगळे जण सत्तालालसेपोटीच उभे राहिले होते. वास्तविक ती निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती. द्वेषापायी लॉजिकला रामराम! -------------------------------- बाकी लै नैतिक विजय अजून येणे बाकी आहेत.

काँग्रेसच्या 'भक्कम' पाठिंब्यावर जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी, कर्नाटकच्या राजकीय रंगमंचावरील नाट्यावर अद्याप पडदा पडलेला नाही. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं या नाट्याचा पुढचा 'प्रयोग' सुरू झाला आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामींना ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी समर्थन देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं सांगून परमेश्वर यांनी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ------------------------------------ हि सत्तालालसा गणली जात नाही हे वेगळे सांगणे न लगे!

In reply to by बिटाकाका

कर्नाटकात भाजपला जनतेचा कौल नव्हताच, असं सांगत कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज कर्नाटक विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांच्या बाजूने ११७ सदस्यांनी मतदान केले. मात्र मतदान होण्यापूर्वीच भाजपने सभात्याग करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून कर्नाटक बंदची हाक दिली आहे. ----- सभात्याग , राज्यबन्दीची हाक ... वा वा छान छान . किती ही विधायक कृती .

In reply to by manguu@mail.com

भाजपचे आमदार शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार ?? इथे मिपावर काथ्या कुटून पार त्याचा चोथा झाला होता. जिओ..

In reply to by विशुमित

राज्यराज्यानुसार याबाबतीत धोरण असेल असे भाजपने आधीच सांगितले आहे. उतर प्रदेशात सत्तेत येताच दिली होती ना. शिवाय मिपावर भाजपचे आमदार असतील असे वाटत नाही. ------------------ कर्जमाफी हा संपूर्ण राजकारणाशी निगडित विषय असून त्याचा शेतकऱ्यांशी काही संबंध नाही असे मत (दुर्दैवाने) झाले आहे.

In reply to by बिटाकाका

अधिकृत निर्णय घेतला गेला नसेल त्यापूर्वीच तो जाहीर करणे उचित वाटले नसेल कदाचित. मीडियावाले पराचा कावळा बनवण्यात वाकबदार आहेत.

तरुणीसोबत हॉटेलमध्ये जाण्याच्या घटनेमुळे वादात सापडलेले मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात लष्कराने शुक्रवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून काय समोर येते त्यावर पुढची कारवाई अवलंबून असेल असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. मेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममतामध्ये एक रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. ओळखपत्र तपासले असता ती बडगामची रहिवासी असल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितले. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. शेवटी हा वाद चिघळला आणि प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी गोगोई, ती तरुणी आणि एका तरुणाला पोलीस ठाण्यात नेले.चौकशीनंतर त्या तिघांचीही सुटका करण्यात आली. ती तरुणी सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोगोई ज्या तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेलेले त्या तरुणीच्या आईने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत गोगोईंवर गंभीर आरोप केले. गोगोई यांनी यापूर्वीही दोन वेळा रात्री उशिरा आमच्या घरात आले होते. या छाप्याबाबत बाहेर भाष्य करु नका, असे गोगोईंनी आम्हाला सांगितले होते, असे मुलीच्या आईने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील जैवविविधता, पिकांचे दुर्मिळ वाण, वनस्पती, लोकसहभाग इत्यादींची माहिती देणारा महाराष्ट्र जनुक कोश हा प्रकल्प आणि संपूर्ण माहिती www.gotul.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. अवश्य भेट द्या.

काँग्रेसची 60 वर्ष झाली म्हणे, मोदीजींची चारच . मग वाजपेयींची 5 कुणाच्या हिशोबात धरायची ? नेपाळच्या ?

In reply to by manguu@mail.com

गडबड केलीत की... मोदीजींची खरंच ४ वर्ष झाली आहेत. तुम्हाला भाजपाची किती वर्ष झाली असं म्हणायचं असेल तर ठीक आहे. तरीही ६० वर्ष विरुद्ध ९ वर्ष असं होईल, वरचे १३ दिवसही धरायचे असतील तर धरून टाका.

In reply to by ट्रेड मार्क

राहूल गांधींना उद्देशून तुमच्या काँग्रेसने 60 वर्ष असे मोदीजी बोलतात ना ? मग स्वतःचे वय असे का चोरायचे अन चारच सांगायचे ? वाजपेयींची ५ वर्षही भाजपाच्या / अप्रत्यक्सारीत्या मोदींच्या मागेही जमा करावे लागतील ना ? भाजपाची आता 10 वर्षांची होणार.

In reply to by manguu@mail.com

लॉजिक गंडलंय!! ----------------------- १. भाजप जसं मोदींचे चार साल म्हणतं तसं काँग्रेस यूपीए के दस साल असंच म्हणतं. अर्थात बरोबर आहे म्हणा त्यांचं. हमारे साठ साल म्हणणं पथ्यावर नाही पडणार. २. आता मोदी जसे काँग्रेसवर टीका करताना ६० साल म्हणतात तसं काँग्रेसने टीका भाजपके ९ साल असं म्हणायला हवं ना? पण ते स्वतःच मोदीके ४ साल म्हणून ओरडतात आणि तुम्ही भाजपलाच ९ साल म्हणा म्हणताय. अवघडंय!! तुमचा मेसेज काँग्रेसपर्यंत कसा पोहोचवता येईल हे बघायला हवे ना!!

बालभारतीच्या पुस्तकांवर आधारित कोणतीही पुस्तके किंवा मजकूर प्रकाशित करण्यापूर्वी आता प्रकाशकांना बालभारतीची परवानगी घेऊन लाखो रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. परवानगी न घेता मार्गदर्शक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थांविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे बालभारतीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारात ‘बालभारती परवानाधारक गाईड्स’ किंवा ‘बालभारती मान्यताप्राप्त’ गाईड्स उपलब्ध होतील. तर परवाना नसलेल्या प्रकाशकांना आपली गाईड्स विक्री बंद करावी लागेल. असे आहे धोरण.. बालभारतीने जाहीर केलेल्या धोरणानुसार पुस्तके छापील स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी प्रत्येक इयत्तेच्या, प्रत्येक माध्यमाच्या प्रत्येक पुस्तकासाठी दरवर्षी ६३ हजार रुपये शुल्क प्रकाशकांना द्यावे लागेल. प्रश्नावली प्रकाशित करण्यासाठी हे शुल्क दरवर्षी प्रत्येक पुस्तकासाठी ३१ हजार रुपये असेल तर डिजिटल साहित्यासाठी हे मूल्य दरवर्षी प्रत्येक पुस्तकासाठी ३५ हजार रुपये असेल. https://www.loksatta.com/mumbai-news/balbharati-book-crises-1686640/

In reply to by manguu@mail.com

१) वार्षिक उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रकाशकांना शुल्क भरावे लागणार नाही बातमीत वरील वाक्याकडे दुर्लक्ष होत आहे का ? अर्थात ही टेक्स कलेक्शन मध्ये सवलत स्टाईल सरकारी बाबूगिरीतून आलेली पॉलीसी वळसा घालण्यास सोपी ठरेल असे वाटते. २) प्रथितयश प्रकाशकाच्या एका छापिल गाईडच्या ३० रुपायाच्या दराने २५००० प्रति विकल्या गेल्या तर किमान ७,५०,०००/- उलाढाल होते. त्याच्या दहा टक्क्या पेक्षा कमी असलेली लायसन्स फीस बालभारतीस देण्यास हरकत नाही. तो बाल भारबालभारतआधिकार असू शकतो. अर्थात भाषा विषयाच्या पुसकात वापरलेल्या छोट्या मोठ्या लेखकांना बालभारती ने अधिक मानधन देणे सुरु करावयास हरकत नसावी

In reply to by माहितगार

वार्षिक उलाढाल २० लाख असेल आणि त्याने त्याच्या आणि बायकोच्या नावाने बिझनेस स्प्लिट केला तर पर हेड दहा लाखच होईल.

रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) 'शून्य शिल्लक, शून्य शुल्क' खाती उघडण्यासाठी जोरदार प्रचार आणि प्रसार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शून्य शिल्लक राशी असलेल्या जन-धन खात्यांचा आणि त्या योजनेला मिळालेल्या प्रतिसादाचा अनेकदा आपल्या भाषणांत उल्लेख केला. मात्र, या जन-धन खात्यांशी संबंधित एक धक्कादायक माहिती मुंबई आयआयटीच्या अहवालातून समोर आली आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खात्यांचा समावेश असलेली कोट्यवधी मूलभूत बचत बँक ठेव खाती बँकांमार्फत गोठवण्यात येण्याची शक्यता आहे. या खात्यांमधून महिनाभरात चार व्यवहार विनाशुल्क करण्यात येतात. त्यावर बँकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, त्यानंतरच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाते. मात्र, आता चार व्यवहार पूर्ण झाल्यास अशी खाती बँकांकडून गोठवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे एचडीएफसी, सिटीसारख्या बँका चार व्यवहारांनंतर संबंधित खाती नियमित खात्यांमध्ये रुपांतरित करतात. परिणामी, त्या खात्यांमध्ये किमान जमा राशी शिल्लक नसल्यास इतर ग्राहकांप्रमाणे या खातेधारकांनाही दंड आकारला जातो.  इतकेच नाही तर बँकांनी या व्यवहारांमध्ये एटीएममधून पैसे काढण्याशिवाय आरटीजीएस, एनईएफटी, ईएमआय, बँक शाखेतून पैसै काढणे आदींचाही समावेश केला आहे. तर खाते गोठवल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत या खात्यातून चार व्यवहार पूर्ण झाले असल्यास या खात्यातून उर्वरित पैसे काढायचे असतील तर संबंधित खातेधारकाला पुढच्या महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

लोकसभेच्या ४ आणि विधानसभेच्या १० जागांसाठी मतदान सुरु; अनेक ठिकाणी इव्हीएमच्या तक्रारी... ७० वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना निवडणूक आयोग एवढे घाळ काम का खपून घेतंय ? एक तर उन्हाचा पारा चढत आहे, लोक मतदान केंद्रावर येऊन ताटकळत असतील किंवा परत माघारी जात असतील. (मी तर एकदाच चक्कर टाकली असती केंद्रावर, चालू असते तर मतदान केले असते बंद असते तर 'मन की बात' से मतदान केले असते) === अवघड आहे..! http://www.thehindu.com/news/national/voting-on-for-bypolls-in-10-assem…

In reply to by विशुमित

b https://www.loksatta.com/desh-videsh-news/rld-candidate-tabassum-hasan-… शामली जिल्ह्यातील १७५ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. सध्या सुरु असलेल्या पवित्र रमझानच्या महिन्यांतही मुस्लिम जनता घरांमधून बाहेर पडत मतदान करीत आहेत, हेच भाजपाला अपेक्षित नव्हते. त्यामुळे येथील मतदान थांबवून त्यांना मतदानापासून रोखण्याचा भाजपाचा डाव असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांनी केला आहे. त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या बिघाडाबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रारही दाखल केली आहे.

In reply to by manguu@mail.com

मुंबई मध्ये पूर्वी सेनेचे पदाधिकारी संभावित विरोधी मतदान करणाऱ्या लोकांना मतदानासाठी घरातूनच बाहेर पडून देत नसायचे. सातत्याने मुंबई काबीज करण्याचे हेच रहस्य असायचे असे तोंडी ऐकून आहे. === जर इथे राजकारणी आणि निवडणूक आयोग हातात हात घालून काम करत असतील अशी पुसटशी शंका जरी असेल तर खरंच अवघड आहे.

लोकसत्तामध्ये आज आलेली ही बातमी सकारात्मक आहे. माजी राष्ट्रपती काय बोलतात पहावे लागेल! माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ६०० स्वयंसेवकांशी नागपूरमध्ये संवाद साधणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सात जून रोजी हा कार्यक्रम होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मुखर्जी यांच्या कार्यालयानं याबाबत अद्याप काही सांगितलेले नाही. भारताच्या माजी राष्ट्रपतींना आम्ही नागपूरमध्ये संघ स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यांना मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. “माजी राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारणं म्हणजे महत्त्वाच्या मुद्यांवर संवाद साधण्याचा देशाला दिलेला संदेश आहे. आणि मतं विरोधी असणं म्हणजे शत्रू असणं असं नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांना हे निमंत्रण स्वीकारणं हे उत्तर आहे,” असं मत संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.

   मुखपृष्ठ »देश-विदेश टेलिकॉम क्षेत्रात पतंजलीचा प्रवेश; समृद्धी सिमकार्ड बाजारात दाखल हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 28, 2018 7:39 PM  NEXT  बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आता टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आहे. विविध बिस्कीटपासून मॅगीपर्यंत अनेक खाद्यपदार्थ, किराणा मालातील पदार्थ, औषधी उत्पादने यानंतर आता पतंजलीने आपली सिमकार्ड बाजारात आणली आहेत. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलशी करार केला आहे. आज हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण करण्यात आले. या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिमकार्ड असे नाव देण्यात आले आहे. आता सुरुवातीच्या टप्प्यात या सिमकार्डचा वापर पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारी यांना करता येणार आहे. त्यानंतर हे कार्ड सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. यातील आणखी एक खास बाब म्हणजे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या इतर उत्पादनांवर १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. या सिमकार्डसाठी आकर्षक प्लॅनही तयार करण्यात आला आहे. १४४ रुपयांच्या रिचार्जवर देशभर अनलिमिटेड कॉल्सबरोबरच २ जीबी डेटा देण्यात येणार आहे. याशिवाय १०० मेसेज मोफत मिळू शकतील. पतंजलीकडून आपल्या युजर्सना आरोग्य, अपघात आणि जीवन विमा मिळणार आहे. 

निवडणुका ही भ्रष्टाचाराची गंगोत्री. ती साफ करायची तर राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीस वळण लावले पाहिजे, त्यात पारदर्शकता असली पाहिजे. त्या धनविधेयकात निवडणूक रोख्यांच्या योजनेचा समावेश करून आपण हेच करीत असल्याचे त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले होते. त्याच वेळी त्यांनी आणखीही काही बदल केले होते. त्यातील एक म्हणजे यापूर्वी कोणत्याही उद्योगांना त्यांच्या गेल्या तीन वर्षांच्या निव्वळ नफ्याच्या साडेसात टक्के एवढीच रक्कम राजकीय पक्षांना देणगीदाखल देता येत होती. जेटली यांनी ती मर्यादा हटवली. केवळ एवढेच नाही, तर देणगी कोणत्या राजकीय पक्षाला दिली हे जाहीर करण्याची आवश्यकताही त्यांनी दूर केली. यामुळे कोणत्याही उद्योगांना हवी तेवढी देणगी राजकीय पक्षांना देण्याचा मार्ग खुला झाला. निवडणूक रोख्यांमुळे कंपन्यांना वा व्यक्तींना परदेशातून निधी पाठवणे सोपे झाले. कारण गोपनीयता आणि अनामिकता ही या रोखे पद्धतीची वैशिष्टय़े. अर्थात ही गोपनीयता फक्त लोकांपुरतीच. सरकारला मात्र ही माहिती उपलब्ध होणारच आहे. या सर्वात एक अडचण होती ती विदेशी देणगी नियंत्रण कायद्याची. हा मूळचा कायदा १९७६ मधला. २०१० मध्ये तो रद्द करून त्याजागी नवा कायदा आणण्यात आला. त्यानुसार २६ सप्टेंबर २०१६ पूर्वी राजकीय पक्षांना विदेशातून मिळालेल्या निधीची चौकशी करणे शक्य होते. धनविधेयकाने या कायद्यात एक छोटासा बदल केला. २६ सप्टेंबर २०१६ ही तारीख बदलून तेथे ५ ऑगस्ट १९७६ ही तारीख घातली. यामुळे झाले काय? तर १९७६ पासून राजकीय पक्षांना विदेशातून मिळालेला निधी चौकशीच्या फेऱ्यातून मुक्त झाला. https://www.loksatta.com/agralekh-news/political-party-right-to-informa…

https://m.maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/sambhaji-bhide-… जळगावः  राष्ट्रीयतेच्या मुद्द्यावर श्री शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी हिंदू धर्मातील स्त्री-पुरुषांवर जळजळीत टीका केली. हिंदू स्त्री-पुरुष हे राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक असल्याचं धक्कादायक वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्या जळगाव आणि नंदुरबारमध्ये धर्मसभा झाल्या. या सभांमध्ये भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीर समर्थन केले. पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रू देशांविरोधात एकजुटीने उभं राहण्याची आवश्यकता आहे. पण तसं होत नाही. पाकिस्तानच्या गोळीबारत एकीकडे भारतीय जवान शहीद होत असताना दुसरीकडे आपण पाकशी क्रिकेट सामने खेळतो. त्यांना सणासुदीला मिठाई देतो, हे चुकीचं आहे, असं भिडे म्हणाले. चीनने आपल्यावर ६२ मध्ये युद्ध लादले. त्यात हजारो जवान शहीद झाले. असं असतानाही आताची तरुण पिढी चायनीज फूड चवीने खाते? असा सवाल करत भिडे यांनी संताप व्यक्त केला.  मनूनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनूच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही, असं म्हणत भिडे गुरूजी यांनी मनुस्मृतीचं समर्थन केलं. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याची टीका संभाजी भिडे यांनी केली. नंदुरबारमधील धर्मसभेत ते बोलत होते. अवघ्या ब्रह्मांडाला ताब्यात घेण्याची शक्ती हिंदू धर्मात आहे, असं भिडे गुरुजी म्हणाले. 

In reply to by manguu@mail.com

@ manguu@mail.com केवळ चार दिवसा पुर्वीच्या याच धाग्यावरील चर्चेत, धार्मीक व्यासपीठाचे राजकीय उपयोग योग्य नसल्याची सुस्पष्ट भूमिका घेण्याचे आपणास खणखणीत आव्हान "आता वळसा न घालता 'धर्मसंस्थेची राजकारणातील अनावश्यक लुडबुड' तत्वतः नाकारणार का ? " या शब्दात केले. त्यास आपले अद्याप उत्तर आलेले नाही. हे केवळ आपल्या बद्दल म्हणून नव्हे, आपल्यासारख्या सर्वच तथाकथित धर्म निरपेक्षतावाद्यांबद्दल एकाच समुहगटास धर्मनिरपेक्षता सोईने सांगणार्‍यां दांभिकते बद्दल आहे ! संभाजी भिडे असोत वा गापै असोत त्यांच्या कडे बोट दाखवण्यासाठी नैतीकता असण्यासाठी आपल्याकडे (तथाकथित धर्म-निरपेक्षता वाद्यांकडे) 'निरपेक्षता' असावी की नको ? आपल्याच दृष्टीकोणांच्या आधारांना सापेक्ष /एकेरी आणि म्हणून ढिसाळ भूमिका बाळगू शकण्याचे कौतुक वाटते.

In reply to by माहितगार

दांभिकता सर्वत्र असते. राजकारणी , धर्मपीठे, उद्योजक , भुमिगतवाले ... सर्वांचे साटेलोटे त्यांच्या स्वार्थासाठी असतात.

In reply to by manguu@mail.com

मंगूश्री, साधारणत: सहमत आहे. फक्त तुम्ही आणि मी अपवाद आहोत. आ.न., -गा.पै.

In reply to by manguu@mail.com

दांभिकता सर्वत्र असते. राजकारणी , धर्मपीठे, उद्योजक , भुमिगतवाले ... सर्वांचे साटेलोटे त्यांच्या स्वार्थासाठी असतात.
तीन बोटे! दुसरी कडे बोट दाखवताना तीन बोटांची दिशा आपल्याकडे असते असे आपण कधी ऐकले आहे का ;) मी प्रश्न 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांबद्दल केला आहे ! आणि आपण आपले बोट इतरत्र सर्वत्र दाखवत आहात पण इतर एकाच्या किंवा इतर अनेकांच्या चुकांनी आपल्यातल्या ( 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांच्या) चुकांचे समर्थन होत नसावे. एकाच धर्माच्या लोकांकडे नाव घेऊन बोट दाखवणे आणि जिथे दांभिकता सुस्प्ष्टपणे समोर आणली तरी नाव घेऊन 'अयोग्य' हा शब्द वापरण्याचे टाळून गावाला वळसा घालणे, हे नेमके कसे जमते ? तुर्तास असो , 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद्यांच्या निरपेक्षतेस जेव्हा जेव्हा ग्लानी येईल आणि दांभिक होईल तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीमागे लागण्यासाठी आम्ही आहोतच :)

In reply to by माहितगार

आम्ही वळसे फेरे घालत नाही जे अयोग्य आहे , ते अयोग्यच असते

In reply to by manguu@mail.com

भारत-पाक सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये मंगळवारी फोनवरुन संध्याकाळी तातडीची महत्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत दोन्हींकडील सैन्याद्वारे २००३ च्या शस्त्रसंधी सहमती कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे यापुढे सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही तसेच यात आपले जवान शहीद होणार नाहीत अशी आशा आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/dgmos-of-india-and-pakistan-h…

सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणाचे गूढ लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हैसूरू येथील प्रा. के एस भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असून हे चौघेही एका हिंदूत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येते. दि. ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. हे चारही संशयित हे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. या सर्वांचे के टी नवीन कुमार (वय ३७) या हिंदू युवा सेनेच्या कार्यकर्त्याशी संबंध असल्याचा संशय एसआयटीला आहे. या सर्वांच्या पूर्वी अनेकवेळा बैठका झालेल्या आहेत. नवीन कुमारला गौरी लंकेश हत्येप्रकरणी मार्च २०१८ मध्ये अटक करण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय ३९, महाराष्ट्र), सनातन संस्थेचा कार्यकर्ता अमित देगवेकर उर्फ प्रदीप (वय ३९, गावा) कर्नाटकातील विजयपूर येथील मनोहर इडवे (वय २८), हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा कार्यकर्ता सुजीत कुमार उर्फ प्रवीण (वय ३७, मंगळुरू) या चौघांना प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुरूवातीला सुजीत कुमारला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला एक जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुजीत कुमारकडे केलेल्या चौकशीनुसार एसआयटीने रात्रीतूनच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ८ ठिकाणी धाडी घातल्या. यात अनेक महत्वाचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागले आहेत. देगवेकर हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता मलगोंडा पाटील याच्याबरोबर राहत होता. वर्ष २००९ मध्ये मडगाव येथील स्फोटात मलगोंडा पाटलाचा मृत्यू झाला होता. बॉम्ब लावण्याचा प्रयत्न करताना असताना झालेल्या स्फोटात मलगोंडा मृत्यूमुखी पडला होता. मडगाव स्फोटाप्रकरणी गोवा पोलिसांनी देगवेकरला ताब्यात घेतले होते. पण चौकशी करून नंतर त्याला सोडून देण्यात आले होते. अमोल काळे हा पुणे येथे हिंदू जनजागृती समितीत काही वर्षांपूर्वी कार्यरत होता. https://www.loksatta.com/desh-videsh-news/gauri-lankesh-murder-case-cop…

In reply to by manguu@mail.com

ऑर्किड्स या दुसर्‍या झाडांवर वाढणार्‍या (Epiphytes) वनस्पती आहेत. त्या फक्त झाडांचा आधार घेतात, त्यांचे अन्न चोरत नाहीत व त्यांना इतर कोणताही धोका उत्पन्न करत नाहीत (non-parasitic). तसेच त्यांचे त्या झाडांशी परस्परपूरक (symbiotic) संबंधही असत नाहीत. बांडगूळ इतर झाडांवर वाढणारी parasitic वनस्पती असते.

ऑर्किड म्हणजे बांडगुळ ना ? नुसतेच दिसते चांगले पण अनननिर्मिती करू शकत नाही, तेच ना ? हो, शोषण करून चमकोगीरी करतं.