Skip to main content

हिरव्या/ कच्च्या टोमॅटोची चटणी

लेखक श्वेता२४ यांनी शुक्रवार, 01/06/2018 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- 2 चमचे तेल 7-8 छोटे हिरवे टोमॅटो 4 चमचे तीळ भाजून 3 चमचे शेंगदाणे भाजून 2 लसूण पाकळ्या 1 चमचा मीठ 2 चमचे गुळ पावडर 2-3 तिखट हिरव्या मिरच्या फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, मोहरी,जिरे,हिंग कृती- 2-3 चमचे तेलामध्ये हिरव्या मिरच्या व लसूण घाला. मग टोमॅटोच्या फोडी घालून एक वाफ आणा. तेलात टोमॅटो मिरची व लसूण घालणे आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा. गूळ व मीठ घाला पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो. 3-4 मिनिटात टोमॅटो मऊ होईल. गॅस बंद करून मिश्रण गार करत ठेवा. मिश्रण गार झाल्यावर मिक्सर मध्ये तीळ फिरवून घ्या. फोटो मग शेंगदाणे व मिश्रण घालून फिरवून घ्या. फोटो चटणी आता तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालून खमंग फोडणी करून घ्या आणि चटणीवर ओता. फोटो नीट कालवून घ्या. हि चटणी अत्यंत चविष्ट लागते. चपाती, पराठयासोबत खाता येईल किंवा याचे सँडविच सुद्धा बनवता येतील.

वाचने 8749
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

खूप आवडते आणि अशीच करते

प्रतिसाद देणाऱया सर्वांचे धन्यवाद. एस यांनी एकदा खाऊन बघायला हरकत नाही कदाचित त्यांचे मत बदलेल असे वाटते हि चटणी खरंच माझी खूप आवडती आहे आणि मीही भाजी ऐवजी हि चटणीच खाते

पिंगु आणि स्नेहांकिता☺️