खाजगी क्लासेस , tution , coaching class याबाबत चर्चेसाठी हा धागा आहे
1. क्लासेस , ट्युशन , ट्युटोरियल यात काय फरक असतो ? की सगळे एकच ?
2. क्लास सुरू करताना कोणत्या सरकारी परवानग्या लागतात ? व्यवसाय कर , दुकान नोंदणी ( bombay shop act ) , GST इ इ काय लागेल ?
3. इतर सरकारी नियम काय आहेत ? महाराष्ट्र शासनाचे काही कठोर नियम येणार होते , अद्याप आलेले नसावेत
4. याबाबतचे आपले अनुभव .
वाचने
1855
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुकानांच्या रांगेत अथवा अशा
दुकानांच्या रांगेत अथवा अशा व्यापारी तत्वाच्या जागेत सगळे अॅक्ट लागू होतील. कर लागतील. सोसाइट्यांच्या वसुल्या वेगळ्या.
ट्युइशन उर्फ राहत्या घरात त्यातील व्यक्तिने घेतलेल्या शिकवण्या इमारतीचा मालक/सोसाइटी /शेजारी यांच्या तक्रारी सोडल्यास इतर गोष्टींपासून मुक्त असतात.
ट्युटॅरिइल म्हणजे जागा उपलब्ध करून देणे, प्रश्नपत्रिका सोडवायला देणे परंतू शिकवणे नाही.