Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by क्लिंटन on Mon, 03/09/2009 - 13:21
  • Log in or register to post comments
  • 5026 views

प्रतिक्रिया

Submitted by विसुनाना on Mon, 03/09/2009 - 14:59

Permalink

स्पष्ट विश्लेषण

लेखमाला वाचली. गेस्टिमेट असले तरी आजच्या चित्राप्रमाणे आपले अंदाज फारसे चुकणार नाहीत असे वाटते. आडवाणी पंतप्रधान व्हावेत असे वाटत असले तरी ती अपेक्षा फोल आहे हे जाणवले होतेच. या लेखामुळे ते अधिक स्पष्ट झाले. :( लोकशाही आहे. तेव्हा जनादेशापुढे नतमस्तक व्हावेच लागणार.
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on Tue, 03/10/2009 - 06:58

In reply to स्पष्ट विश्लेषण by विसुनाना

Permalink

हेच म्हणतो

लेखमाला आवडली! निवडणुक एकदम तोंडावर आल्यावर, चालू असताना आणि संपल्यावर आपल्याकडून असेच चांगले लेख वाचायला मिळावेत ही अपेक्षा. आपला, (१० वर्षांपासून मतदान न करता आलेला करंटा मतदार) भास्कर अवांतर - असे ऐकून आहे की आमच्या गावचे पुढारी आमच्या नावाने कुणाकडूनही मतदान करुन घेतात... तसेही ५०-१०० रुपयाला एक अशी मताची किंमत स्वस्त असल्याने फार काही मोठी गोष्ट आम्ही गमावली असे वाटत नाही. सुटी घेऊन, दोन दिवस प्रवास करुन कोणत्या तरी चोराला मतदान करायला का जावे हा प्रश्न आहे. I)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 03/09/2009 - 15:04

Permalink

लेखमाला आवडली

यु.पी.ए अजुन नवे समर्थक घेउन येईल असे वाटते बघु काय होते :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 03/09/2009 - 15:16

Permalink

सुरेख

सुरेख लेखमाला. अभिनंदन... :) -- अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 03/09/2009 - 15:16

Permalink

लेखमाला चांगली आहे...

विश्लेषणाच्या मापदंडांविषयी मतभिन्नता असू शकेल, पण एकूण चित्र तुम्ही मांडता तसेच असेल असे मला वाटते. अर्थात, चित्र म्हणजे जागांविषयीचा अंदाज. त्यानंतरच्या शक्यतांमध्ये मात्र माझ्या मते यूपीए मनमोहनांसह हीच शक्यता अधिक आहे. त्यातल्या काही कारणांपैकी वजनदार कारण म्हणजे गांधी घराण्याला सध्या तेच परवडणारे आहेत. राहूलसाठी पाया तयार करण्याचे काम त्यांच्याइतके चांगले कोणीही करू शकत नाही. आणि अशा प्रसंगात इतर काही पक्षांना खेचून नेण्याची ताकद कॉंग्रेसकडे अधिक असेल. कारण, त्यात खुद्द मनमोहन यांच्यात दडलेला राजकारणी बरेच काही करू शकेल. नव्हे ते आत्ताही ते करत असतील. अणूकराराच्या वेळी याच गृहस्थाने सपाशी बॅकचॅनल खुला ठेवला होता, हे विसरून चालणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Mon, 03/09/2009 - 22:59

Permalink

शरद पवार ?

शरद पवार ? कोठे जाणार..............................
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Mon, 03/09/2009 - 23:01

In reply to शरद पवार ? by १.५ शहाणा

Permalink

आम्हाला

आम्हाला कोणीबी चालेल फक्त त्याने थोडे म्हणजे एखादे कामजरी ५ वर्षात शिक्षण क्षेत्रात केले की आमच्यासाठी तो लय भारी छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 03/10/2009 - 10:26

In reply to शरद पवार ? by १.५ शहाणा

Permalink

जिथे सरशि तेथे

ते जाणार.एकदा सोनियान्बरोबर त्यान्ची भेट होइल आणि मग 'आता आपले साहेब ह्यावेळी नक्कि' असे महाराष्ट्रात काही जण म्हणतिल. साहेब मग 'मी पन्त्प्रधान्च्या स्पर्धेत नाही' असे विधान, चार दिवसानी 'मी बोललोच नव्हतो' वगैरे शेवटि मग 'क्रिडा मन्त्रि/उद्योग मन्त्री' वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 03/10/2009 - 10:41

Permalink

राजकारण - बेरजेचे आणि वजाबाकीचे

देशभरच्या परिस्थितीचा अतिशय उत्तम असा आढावा. विश्लेषण बहुतांशी मान्य होण्यासारखेच तसेच श्रावणसरांनी दिलेला निष्कर्षही मान्य होण्यासारखाच. मधल्या काळात फार काही चमत्कार घडले नाहीत तर, पुन्हा मनमोहन सिंग यांचेच सरकार येण्याची शक्यता दिसते. देशाचे नक्की ठाऊक नाही पण निदान महाराष्ट्रात तरी बेरजेचे राजकारण कसे करावे याचा वस्तुपाठ प्रथम यशवंतरावांनी घालून दिला. आधी प्रजासमाजवादी आणि नंतर शेकाप यांतील बडी धेंडे आपल्याकडे वळवणे आणि नंतर ते पक्षच नामशेष करणे, हा याच रणनीतीचा भाग. पुढे वसंतरावांनी शिवसेनेला हाताशी धरून लाल बावट्याला हद्दपार केले, हाही बेरजेच्या राजकारणाचाच एक दुसरा प्रकार. याउलट समाजाच्या धृवीकरणावर आधारीत राजकारण म्हणजे वजाबाकीचे राजकारण. यात सुरुवातीची सरशी ही स्तिमित करणारी असते हे खरे, पण तीच त्याची मर्यादादेखिल असते. वाजपेयींच्या काळात असलेली एनडीएच्या मित्रपक्षांची संख्या रोडावत गेली, हे दिसतेच आहे. कारण ह्यातील बर्‍याच मित्रपक्षांना आपापल्या राज्यात हे धृवीकरण परवडणारे नव्हते. असो, आता घोडामैदान फार लांब नाही. तोवर बोटावर बोट ठेऊन बघत बसूया, कसे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Tue, 03/10/2009 - 13:20

Permalink

धन्यवाद

नमस्कार मंडळी, माझ्या पाच भागातील लेखमालेवर आणि खरडेतून अनेक मिपा सदस्यांच्या प्रतिक्रिया आल्या. त्याबद्द्ल सर्वांना धन्यवाद.सर्वांची नावे घेत नाही पण स्वत: तात्या आणि विकास, सुनील, पिडांकाका, प्रा.बिरूटे यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी लेखमालेवर अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे हुरूप वाढला. बाकी श्रावणसरांनी म्हटल्याप्रमाणे मनमोहन सिंहांना ’अंडर एस्टिमेट’ करून चालणार नाहीच. जर का काँग्रेस पक्षाचेच सरकार येणार असेल तर त्यातल्या त्यात मनमोहन सिंह हेच सर्वात चांगले नेते बनू शकतील असे वाटते.एक तर ते स्वच्छ चारित्र्याचे आणि निस्पृह आहेत. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात मनमोहन सिंहांसारखे अर्थशास्त्र जाणणारे पंतप्रधान असणे फायद्याचे ठरेल.तसेच जागतिक मंचावर मनमोहन सिंह हे मायावती किंवा राहुल गांधींपेक्षा भारताची बाजू अधिक चांगल्या पध्दतीने मांडतील यात दुमत नाही. वेळ मिळेल तसे आणि वेळ काढूनही निवडणुकांवर अधिकाधिक लिहायला आवडेलच. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 03/12/2009 - 08:21

In reply to धन्यवाद by क्लिंटन

Permalink

त्यातल्या

त्यातल्या त्यात मनमोहन सिंह हेच सर्वात चांगले नेते बनू शकतील असे वाटते.एक तर ते स्वच्छ चारित्र्याचे आणि निस्पृह आहेत. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात मनमोहन सिंहांसारखे अर्थशास्त्र जाणणारे पंतप्रधान असणे फायद्याचे ठरेल. त्यांचे अस्तीत्व जाणवते का ? :?
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Tue, 03/10/2009 - 13:45

Permalink

अतिशय उत्तम लेखमाला

गेस्टीमेट म्हटलं तरी बरंच विचारपूर्वक आहे त्यामुळे चित्र याच्या जवळपास येइल असं वाटतंय. - जर भाजपाला स्पष्ट अगदी काठावरचंही बहुमत नसेल तर मनमोहनच पंतप्रधान राहणं चांगलं. - डाव्यांची बाजू कमकुवत होणं महत्त्वाचं आहे. - अमरसिंग आणि मायावती हे म्हणजे रावण चांगला की शूर्पणखा अशातला प्रकार आहे. त्यांचं काहीच सख्य नसलं तरी दोन्ही पक्ष भारतीय राजकारणातली दांभिकतेची, संधिसाधूपणाची आणि तत्त्वहीनतेची परिसीमा आहेत. पण उ. प्र. वर त्यांचंच अधिराज्य दुर्दैवाने राहील. - तिसरी आघाडी शक्य तितकी कमकुवत व लहान व्हावी असं वाटतं. कसलाही संदर्भ नसलेले, संपूर्ण वेगळ्या विचारांनी बनलेले, वेगवेगळे राज्य पातळीवरचे पक्ष एकत्र येणं हे देशाच्या भविष्यकाळासाठी प्रचंड त्रासदायक आहे. ते जितकं टळेल ते आपलं भाग्य. - प्रजाराज्यम बरेच चमत्कार दाखवेल अशी शक्यता आहे. - भाजपा कडे बहुमत ही नाही आणि खरं तर सबळ नेतृत्व आणि मजबूत मंत्रिमंडळही नाही. - सद्य परिस्थितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणं हेच देशाच्या हिताचं आहे. इतक्या तपशीलवार आणि मुद्देसूद लेखमालेबद्दल अनेक धन्यवाद. अजून लिहा प्रचाराची रणधुमाळी आणि चिखलफेक सुरु झाल्यावर. आपल्या आरोग्यासाठी शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 03/10/2009 - 15:55

Permalink

डावे

तिसरी आघाडी शक्य तितकी कमकुवत व लहान व्हावी असं वाटतं. कसलाही संदर्भ नसलेले, संपूर्ण वेगळ्या विचारांनी बनलेले, वेगवेगळे राज्य पातळीवरचे पक्ष एकत्र येणं हे देशाच्या भविष्यकाळासाठी प्रचंड त्रासदायक आहे. ते जितकं टळेल ते आपलं भाग्य. गेले १२/१३ वर्षे आपण अश्या आघाड्या बघत आहोत्.आणि भविष्यातपण अनुभव्णार आहोत.!!राष्त्रिय पक्ष फार दिवे लावत नाहित तर उलट प्रत्येक राज्यात कम्पुशाही तयार करतात असा समज झाल्यानेच लोक राज्य पातळिवरिल पक्षान्कडे वळले. सध्ध्याच्या काळात पन्तप्रधान म्हणुन मनमोहन सिहच योग्य वाटतात .मात्र निवड्णुकीनन्तरच (आणि घोडेबाजारानन्तर) सगळे कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 03/10/2009 - 16:55

Permalink

क्लिंटन,

क्लिंटन, तुमची लेखमाला आणि मैत्र यांचा प्रतिसाद आवडले. तसेच जागतिक मंचावर मनमोहन सिंह हे मायावती किंवा राहुल गांधींपेक्षा भारताची बाजू अधिक चांगल्या पध्दतीने मांडतील यात दुमत नाही. अगदी सहमत. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 03/11/2009 - 22:43

Permalink

लेख खुप

लेख खुप अभ्यास पुर्ण आहे..पण हिंदु समाजाचे काय? त्यांचा वालि कोण?..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com