✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी भाषा शिकणाऱ्यांना थेट व्हिडिओ चॅटद्वारे सरावाची सोय

क
कौशिक लेले यांनी
Sat, 05/05/2018 - 18:17  ·  लेख
लेख
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या सेवेत अजून एक उपक्रम. आता मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन व्हिडिओ चॅटद्वारे माझ्याशी बोलून मराठी बोलण्याचा सराव आणि शंका निरसन करता येईल. परस्परांच्या सोयीने वेळ ठरवून बोलता येईल. प्रायोगिक तत्त्वावर असल्याने सध्या हा उपक्रम मोफत ठेवत आहे. Practice Marathi through live chat संवादसत्रांची सुरुवात आजपासून झाली. दोन जणांशी बोललो. अजून दोन-तीन जण सरावासाठी उत्सुक आहेत. पुढच्या वीकेंडपासून एका अमेरिकन व्यक्तीशीही सराव सुरू करायचा आहे. माझ्या ब्लॉगच्या द्वारे मी गेल्या ६ वर्षांपासून मराठी शिकवत आहे. पण थेट संवादातून शिकवण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतो आहे. जर तुम्हाला अशाप्रकारे भाषा शिकण्या-शिकवण्याचा अनुभव असेल तर माझ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी या माध्यमाबद्दल काही विशेष टिप्स असतील तरी सांगा . मराठी शिकू इच्छिणारे तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहकारी यांना याबद्दल जरूर माहिती द्या. धन्यवाद, कौशिक लेले
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6838 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

काय काय नवनवीन प्रयोग करत

कंजूस
Sat, 05/05/2018 - 19:56 नवीन
काय काय नवनवीन प्रयोग करत असता तुम्ही!!! भाषा शिकण्याचे चे व्हिडिओ आहेत युट्युबवर त्यामध्ये " learn ***** while you sleep" फार चांगली पद्धत वाटली. ते ४/५/६/७/८/१० तासांचेही असतात. त्या व्हिडिओंचे mp3 करून घेतलेत. लॅाक स्क्रीनमध्येही ऐकता येतात.
  • Log in or register to post comments

"काय काय नवनवीन प्रयोग करत

कौशिक लेले
Sun, 05/06/2018 - 10:24 नवीन
"काय काय नवनवीन प्रयोग करत असता तुम्ही!!!" ... आवडली ही प्रतिक्रिया आपल्याला. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अभिनन्दन! काही काळानन्तर आपला

शेखरमोघे
Sat, 05/05/2018 - 21:29 नवीन
अभिनन्दन! काही काळानन्तर आपला अनुभव इतराना मि पा वर सान्गालच!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद. हो नक्की सांगेन.

कौशिक लेले
Sun, 05/06/2018 - 10:24 नवीन
धन्यवाद. हो नक्की सांगेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

तुमच्या धडपडीचे कौतुक करावे

एस
Sun, 05/06/2018 - 01:08 नवीन
तुमच्या धडपडीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आपण केलेले कौतुक बघून आनंद

कौशिक लेले
Sun, 05/06/2018 - 10:25 नवीन
आपण केलेले कौतुक बघून आनंद झाला. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मराठी भाषेच्या विस्तारासाठी

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/06/2018 - 10:31 नवीन
मराठी भाषेच्या विस्तारासाठी तुमचे सतत चाललेले नवनवीन प्रयत्न अत्यंत स्पृहणिय आहेत यात संशय नाही ! त्यासाठी तुमचे आभार व अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

कौशिक लेले
गुरुवार, 05/17/2018 - 22:12 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या कल्पकतेस अभिवादन

गामा पैलवान
Wed, 05/23/2018 - 01:51 नवीन
कौशिक लेले, तुमच्या कल्पकतेस अभिवादन. तुम्ही जो ध्यास घेतला आहे त्यामुळेच तुम्हांस हे सगळं सुचतं. तुमच्यासारखे लोकं मराठीस परत ऊर्जितावस्था आणणार आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. अशा कौतुकामुळे अजून

कौशिक लेले
Fri, 05/25/2018 - 16:15 नवीन
धन्यवाद. अशा कौतुकामुळे अजून हुरूप येतो नवनवीन काम करायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत

निरंजन._.
गुरुवार, 05/24/2018 - 18:49 नवीन
छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत हवी असल्यास मला विद्यार्थ्यांना सराव द्यायला आवडेल... माझा नंबर - ९८५०८३१८३१
  • Log in or register to post comments

छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत

निरंजन._.
गुरुवार, 05/24/2018 - 18:49 नवीन
छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत हवी असल्यास मला विद्यार्थ्यांना सराव द्यायला आवडेल... माझा नंबर - ९८५०८३१८३१
  • Log in or register to post comments

अरे वा. छानच. आपला सक्रीय

कौशिक लेले
Fri, 05/25/2018 - 16:20 नवीन
अरे वा. छानच. आपला सक्रीय पाठिंबा बघून आनंद झाला. https://www.facebook.com/groups/learnmarathi.wid.bk कृपया या फेसबुक ग्रुप जॉइन करता का? तिथे नवशिक्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन तुम्ही या कामात सुरुवात करू शकता. फेसबुक वर आपलं नाव काय आहे? म्हान्जे तुम्ही जॉइन केलात की कळेलच. तुमचा नंबर मी लिहून घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरंजन._.

तुमच्या विद्यार्थ्यांना मदत

सूड
Fri, 05/25/2018 - 12:06 नवीन
तुमच्या विद्यार्थ्यांना मदत हवी असल्यास मलाही याचा एक भाग व्हायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मलाही आवडेल जास्तीत जास्त

कौशिक लेले
Fri, 05/25/2018 - 16:23 नवीन
मलाही आवडेल जास्तीत जास्त मराठी लोक शिकणाऱ्यांच्या मदतीला पुढे आले तर. https://www.facebook.com/groups/learnmarathi.wid.bk कृपया या फेसबुक ग्रुप जॉइन करता का? तिथे नवशिक्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन तुम्ही या कामात सुरुवात करू शकता. फेसबुक वर आपलं नाव काय आहे? म्हणजे तुम्ही जॉइन केलात की कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा