Skip to main content

ताज्या घडामोडी- भाग ३३

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 15/05/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

वाचने 108904
प्रतिक्रिया 279

प्रतिक्रिया

देणाऱ्या पोरांना 'तलाठी भरती' चे फॉर्म सुटायची आस लागणे दुर्दैवी होय

इव्हीएम मशीन, खोटे/बनावट मतदार यांची कंबक्ती भरली म्हणायची. (त्याला नका जावु द्या रे प्रचाराला जिथे निवडणुक असते तिथे.......दरवेळेस असच कायतरी रिझल्ट आणतयं तोंडावर पाडुन)

भाजप काठावर पास. सहिष्णू पक्षांचा नैतिक विजय. २०१९ ला भाजप चा पराभव निश्चित. === 2019 ला कॉंग्रेस निश्चित !!

भाजपचे अभिनंदन ! विजय हा विजय असतो. काँग्रेसने नेतृत्वाबद्दल गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे किंवा हा २०१९ काँग्रेसचा अंत असेल . असे झाले तर भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष) तसा काल्खंड येइल .

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी, या विधानात गडबड झालेली वाटते. काँग्रेस जर २०१९ साली नामशेष झाली तर सबळ विरोधी पक्ष कोणता? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल . असे वाचावे.

भारतात १९५२ - ७७ जसा कालखंड होता ( सबळ राष्ट्रीय विरोधी पक्ष नसलेला) तसा कालखंड येइल . अश्या कालखंडाच स्वागत च होईल !! धर्माधारीत , जातीमध्ये देशाला वाटण्या ऐवजी देशाला विकासच्या दिशेला नेण्यासाठी ह्याची नितांत गरज आहे. श्री मोदीजी अजुन १५ वर्ष पं प्र असु देत, भारताची विजय पताका जगात फडकु दे !!

. चुरशीच्या लढ्यात, मतमोजणीच्या जितक्या फेऱ्या होतात तितक्या क्लीन स्वीप मध्ये होत नाहीत. ११६ वरून ११२ (लेटेस्ट १०८) वर उतरली आहे भाजप. घटलेल्या सीट्स वरील आघाडी काँग्रेसच्या पारड्यात पडून त्यांची आघाडी ६८ सीट्सची झाली आहे. जेडी/एस गाळात जात असून त्यांची पीछेहाट ४३ वरून, ३९ झाली आहे. भाजपने लवकरच परत मॅजिक फिगर गाठून ती लीड किमान अडीच-पावणे तीन वाजेपर्यंत मेंटेन ठेवायला हवी. म्हणजे सगळं कसं नीट होईल, हँग असेंम्बली मध्ये मजा नाय राव काहीच.

कर्नाटकातल्या लिंगायत, मुस्लिम व दलित या तीन समूहाचा कल निश्चित कोणाकडे झुकेल ते माहित नव्हतं. मात्र या तिघांनी भाजपला दिलेला कौल स्पष्ट आहे : https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-elections-… लिंगायतांना अल्पसंख्य म्हणून वेगळा दर्जा द्यायचा काँग्रेसी विभाजनवादी बनाव कुणाच्यातरी थोबाडावर सणकून आपटून पार फुटला आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लिंगायत सामाज्याने आपल्या "येडियुरप्पासाठी काही पण" हे ट्रम्प कार्ड खेळलेले दिसतंय. आणि लिंगायत समाजाची भीती दाखवून 'हिंदू खतरे मे' ही भाजपची चाल यशस्वी ठरली आहे असा माझा प्राथमिक अंदाज आहे. (बेळगावच्या एका मित्राकडून साभार). बाकी सविस्तर विश्लेषण उद्या पेप्रात वाचायला मिळेलच.

कर्नाटकात भाजपाच सत्तेवर येणार असे दिसते आहे. राहूल गांधीनी कर्नाटकात जेथे जेथे सभा घेतल्या तेथे काँग्रेस पिछडीवर आहे.. राज ठाकरे ह्यांनी 'ई.व्ही.एम.' चा विजय असो असे म्हंटले आहे. मग जिकडे काँग्रेस जिंकत आहे व्व जिंकणार आहे, त्या मतदारसंघांबद्दल काय? की तिकडे विजय काँग्रेचा? .

एकदा विश्वेश्वरैया नाय बोलता आलं म्हणुन कोणी असं करत व्हय ??............(नाव सांगायची गरज आहे का?)

मोडिविरोधी हुकमी एक्के नाही आले अजून ! विश्लेषण करत असतील बहुतेक

In reply to by भंकस बाबा

मोदी विरोधकांना नथीतून तीर मारणे? का आपली भाजप जिंकते आहे त्याचा आनंद साजरा करणे? का निव्वळ मोदींविरोधक म्हणून कोणाला किंवा कोण्या समूहाला वैयक्तिक टार्गेट करणे? काहीतरी सकारात्मक काँट्रिब्युट करा की राव. असल्या वैयक्तिक होण्यानेच भाजप अन पर्यायाने मोदींजींना कमीपणा येतो हे समजायला काही रॉकेट सायन्स शिकायला लागत नाही. (डोळस भाजप चाहता) वांडो

. ह्या आकड्यांनुसार, भाजपचे 'लीड टू विन कन्व्हर्जन ऑफ सीट्स' जवळपास ८०% आहे, काँग्रेसच्या ६८ लीड्स पैकी फक्त वीस कन्व्हर्ट झालेल्या आहेत, एकंदरीत लीड टू विन कन्व्हर्जन ऑफ सीट्स ३३.३३% वगैरे म्हणता येईल ढोबळमानाने. भाजपचा लीड कांसोलिडेशन स्पीड असाच राहिला तर मजाच आहे, खराखुरा जनादेश!. अर्थात आत्ता १३४० वाजलेत, ही पेस किमान अडीच पावणेतीन पर्यंत मेंटेन ठेऊन भाजपच्या लीड्स सीट्स मध्ये कन्व्हर्ट झाल्या की बेस्ट काम होईल.

सुंभ जळला तरी पीळ जात नाहीए.:;)

ऑल इंडिया रेडिओ आणि आयोगाच्या आकडेवारीत इतका फरक कसा आला असेल?

भाजप अर्ध्या हळकुंडाने पिवळी होताना दिसतेय. नंबर्स फेवर मध्ये नसताना उगाच का गोंधळ घालत आहेत? सगळे निकाल निघेपर्यंत पण दम निघत नसेल का? ---------------------------- १०५- १०६ च्या आसपास राहण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे काय पर्याय राहतात? मलातरी वैयक्तिकरित्या कुमारस्वामींना लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

In reply to by बिटाकाका

कन्व्हर्जन फॅक्टर वर भाजप मजबूत वाटत होती, तोवर प्रसाद भाऊ आयोगाचे आकडे घेऊन आले. आता माझा बेंबट्या झालाय कारण दोन सरकारी संस्थांच्याच आकडेवारीत जबरी तफावत दिसते आहे. कुमारस्वामींकडे जर किंगमेकर रोल आला तर ते आपले उपद्रवमूल्य पणाला लावून किमान उपमुख्यमंत्री पद तरी पदरात पाडून घेतीलच. अर्थात जेडी-एसची लीड पूर्ण कन्व्हर्ट झाली तर त्यांच्याकडे हाच पाट काँग्रेस सोबत लावायचा पर्याय असेलच. आता आपण २०१९ चा विचार करू, ह्यात मला एक मूलभूत माहिती नाहीये, ती म्हणजे जेडी-एसच्या केंद्रात काय इच्छाआकांक्षा आहेत? कारण तिसरी आघाडी नाव असलेली मोट बांधायची झाली तर जेडी-एस त्या आघाडीची कन्नड फ्रेंचाईजी असेल, अश्या परिस्थितीत ते आत्ता राज्यात सत्ता स्थापन करायला काँग्रेसला सोबत घेण्यात झुकते माप देतील. कारण कर्नाटकात जर भाजपशी संग केला तर तिसऱ्या आघाडीत पत उरणार नाही, पण जर केंद्रातील इच्छाआकांक्षा नसल्या तर ही युती शक्य होऊ शकेल, त्यांना केंद्रातही एनडीए घटकपक्ष व्हायला जर मोदी शहांनी आमंत्रण दिले तर काय ही शक्यता मी अजून विचारात घेतलेली नाहीये हे स्पष्ट करतो

In reply to by जेम्स वांड

मला वाटते निवडणुक आयोगाची http://eciresults.nic.in/ ही साईट, ऑल इंडीया रेडीओच्या तुलनेत खुपच स्लो असावी, म्हणुन दोन्ही सरकारी एजन्सीच्या आकड्यात तफावत दिसत असावी. --- सध्याचे आकडे खालील प्रमाणे आहेत. -- a

In reply to by बिटाकाका

तो येडाअप्पा तर मुख्यमंत्रीपदाचे बाशींग, घुढग्याला बांधून दिल्लीकडे यायला निघालाय. शिवाय दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे, अशी बातमी सध्या सुरु आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यास तयारी दाखवल्याची बातम्या येत आहेत. तिकडे निर्मला सीतारामन म्हणत आहेत कि काँग्रेसने कितीही लास्ट मिनिट हालचाली केल्या तरी सरकार आम्हीच बनवू. मघाशी राम माधव म्हणाले कि चिंता नसावी, आपल्याकडे अमित शाह आहेत. अवघडंय!

In reply to by बिटाकाका

पाहिल्यापासूनच राम माधव ह्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटत नाही. उगा एक हात लाकूड चार हात ढलपी बोलणे!. प्रत्येक ठिकाणी काय अमित शहा आहेतचा जप करायचा राव!

In reply to by जेम्स वांड

बीजेपी तोंडावर पडणार नक्की. जेडीएस ने काँग्रेसचा प्रस्ताव स्विकारल्याच्या बातम्या आहेत. कुमारस्वामी मुख्यमंत्री, काँग्रेस-जेडीएस उद्या राज्यपालांना भेटणार.

In reply to by बिटाकाका

सध्याची परिस्थिती पाहाता कॉंग्रेस-जेडी(एस) एकत्र सत्ता स्थापन करणे सहज शक्य वाटतेय. येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईलच. -- भाजपा : ३९-६७-१०६ कॉंग्रेस : १०-६३-७४ जेडी(एस) : ०४-३५-३९ अशी सध्याची स्थिती आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

फक्त चार सीट्स कांसोलिडेट? च्यायला हे लैच हाय टेन्शन इलेक्शन होतंय! मजा आली, लोकशाहीचा विजय असो, ह्याला म्हणतात अस्सल निवडणूक!

In reply to by प्रसाद_१९८२

हा हा हा !! ईव्हीएम चा निर्णय आपल्याच हातात असल्याने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन, भाजपा स्वत:ला विजयी घोषीत करणार आहे अस दिसतय !

टाईम्स ऑफ इंडीयावरील हा कर्नाटक निवडणूक मॅप वेगवेगळ्या भूमिकांवर कन्नड जनतेने कल कसा दिला याचे रोचक प्रेझेंटेशन देतो . वेगवेगळ्या ड्रॉपडाऊन मेनुतील पर्याय निवडून अवश्य पहावे .

कल बघून आनंद / दु:ख व्यक्त करणे व्यर्थ आहे . अजूनही कल येत आहेत , ते कधीही फिरू शकतात. त्यामुळे निकाल पुर्ण किती वाजता येणार आहे ? त्यावर अवलंबून आहे . मागच्या दोन निवडणूकीतून धडा घेत काँग्रेसने युतीच्या हालचालि लौकर चालू केल्या आहेत.

In reply to by manguu@mail.com

फायनल स्कोर आता सांगणे कठीण आहे. कारण मत मोजणी अजून सुरु आहे. --- सध्याची स्थिती. भाजपा :७५-२९-१०४ कॉंग्रेस : ४५-३३-७८ जेडी(एस) : २०-१७-३७ एकुण १४२-८०-२२२

In reply to by manguu@mail.com

भा ७५- २९ -१०४ काॅ ४५ - ३३ - ७८ ज २० - १७ - ३७

गोव्यातून धडा घेऊन काँग्रेसने जनता दलाला ऑफर दिली आहे अशी बातमी आहे. जेडी(एस)आमदाराचा भाव प्रत्येकी ४० कोटी असल्याचे बोलले जाते. आता अपक्ष/जेडी(एस्)चे आमदार कुठल्या रिसॉर्टवर जातात ते बघुया.

*ब्रेकिंग न्युज* *कॉंग्रेस - जेडीएस देणार भाजपच्या हातावर तुरी* *कौल कर्नाटकचा* ▪ *सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप राहणार सत्तेपासून दुर* ▪ *५ वाजता राज्यपालाना भेटुन जेडीएस करणार सत्तास्थापनेचा दावा* ▪ *जनता दलाचे कुमारस्वामी मुख्यमंत्री होण्याची शक्यता* पक्षीय बलाबल *भाजप = १०४* *कॉंग्रेस =७७* *जनतादल(s)= ३९* *इतर = ०२*

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे पण सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला आधी आमंत्रित केले जाते असे काहीतरी आहे ना? त्यांनी 'नाही' म्हंटले तर मग दुसरे ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

जो आधी जातो, त्याला पहिला चान्स गोव्यात दुसर्या नंबरवर असूनही भाजपवाले आधी गेले

ऑफिस मध्ये सगळे जण बीजेपीला शिव्या घालत आहेत! त्यातल्या बऱ्याच लोकांना खरतर बीजेपी यावे असे वाटत होते पण सकाळपासून बीजेपीवाल्यांच्या ज्या हालचाली सुरु होत्या त्या बघून यांचं पण डोकं फिरलं... इतका ओव्हर कॉन्फिडन्स का करायचा? तो 'येडी'(सगळे असेच हाक मारतात, बऱ्याच लोकांना त्याचा राग आहे खरतर, जरी मोदींना समर्थन देत असले तरी) शपथ घ्यायलाच बसला होता, आम्हाला कोणाचं समर्थन लागणार नाही आणि घेणारही नाही असली वक्तव्य आधीच करून बसलेत! आता काही जणांना असेही वाटतंय की बर झालं! सिध्धु बाहेर जाणार, येडी ला पण चान्स नाही मिळायचा आणि कुमारस्वामी सीएम बनू शकतो. एका अर्थाने मोठया पक्षांना धडा मिळाला आणि तिसराच पुढे आला... बघूया काय होतंय, चांगलेच ट्विस्ट आलेत! अवांतर: या निमित्ताने प्रसारमाध्यमांची घिसाडघाई पुन्हा दिसून आलीच!

आजघडीला मतदान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर होत असून सुद्धा संपूर्ण निकाल लागायला संध्याकाळचे पाच का वाजावे लागतात हेच कळत नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

मतदान मशीनवर असले तरी फायनल प्रिंट पेपरवर होऊन ती स्वाक्षरी झाली की प्रोसेस कायदेशीर होते, निकाल आधीच लागला तरी डिग्रीचे सर्टिफिकेट उशीराच भेटते ना

आगामी २०१९ चा रिझल्ट डोक्यात ठेवून बीजेपी क्लेम करायला जाणार का? म्हनजे ते कैतरी समीकरण वगैरे आहे ना? आम्हाला मोदीकाका पायजेत बाबा २०१९ ला पण. कारण म्हणजे कर्नाटकात असले काही तरंगते राजकारण झाले की सोलापूराचा बाजार वधारतो.

नवी दिल्ली: मणिपूर आणि गोव्यात आघाडी करून सत्ता स्थापनेची खेळी करणाऱ्या भाजपवर त्यांचचं तंत्र उलटलं आहे. काँग्रेसने भाजपच्या याच तंत्राचा वापर करत कर्नाटकात जेडीएससोबत आघाडी केली असून आजच हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करणार आहेत. त्यामुळे कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं असून भाजपला हा मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपनं प्रादेशिक पक्षांना आपल्या बाजूला वळवून दोन्ही राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्याचंच उट्टं आता काँग्रेसने काढलं आहे. कर्नाटकमध्ये बहुमतासाठी ११३ जागा हव्या आहेत. मात्र कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही. कर्नाटकमध्ये भाजप १०६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७३ आणि जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सोनिया गांधी आणि आझाद यांच्यात चर्चा झाली असून सोनिया यांनी त्याला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आझाद यांनी देवगौडा यांच्याशी चर्चा करून जेडीेएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. जेडीेएसनेही ही ऑफर स्वीकारली असून काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचं जाहीर केलं आहे. आज सायंकाळी काँग्रेस आणि जेडीेेएसचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. तर येत्या १८ मे रोजी जेडीएस नेते कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जेडीएसने स्पष्ट केलं आहे. गोव्याच्या धर्तीवरच राज्यपालांनी आम्हालाही सरकार स्थापनेसाठी पाचारण करावं, अशी मागणीही जेडीएसने केली आहे.

In reply to by manguu@mail.com

तुम्ही एक विसरताय, गोवा व मणिपूर ह्या दोन्ही राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री आहे. कॉंग्रेससारखी जागा जास्त असूनही मुख्यमंत्री पद, एका कमी जागा असलेल्या पक्षाकडे द्यायची नामुष्की भाजपावर ओढवली नव्हती. -- या घटनेने एक सिद्ध झाले की कॉंग्रेस सत्ता हव्यासी होतीच पण आता लाचार देखील झालेय .

In reply to by प्रसाद_१९८२

लहान भावाला सत्ता देण्यात किती आनंद असतो हे आता सेक्युलर लोकांनी रामभक्तांना शिकवायचे ?

In reply to by manguu@mail.com

निवडणुक प्रचारात ह्याच(जेडी-एस) लहान भावाला कॉंग्रेसने कश्या प्रकारच्या शिव्या घातल्या होत्या, हे सर्व जनतेने पाहीले आहेच.

In reply to by manguu@mail.com

दुसऱ्याला सत्तेचा आनंद देता देता आपल्याला वनवासात पाठवण्यात आले आहे याची जाणीव झाली हेही नसे थोडके. -------------------------- बाकी सेक्युलर लोकं रामभक्त नसतात?

In reply to by manguu@mail.com

घाई होतेय हो मंगूसाहेब! उतावळ्या मेडियासारखं लगेच निष्कर्षाला कशाला पोहोचायचं? गोवा आणि मणिपूर मध्ये काँगेसने आपला प्रस्ताव पाठवायच्या आधी भाजपने प्रस्ताव पाठवला होता. ढिलाई काँगेसची होती, त्याचं समर्थन भाजपची खेळी, तंत्रने नाही होऊ शकत. कुठलाही चाणाक्ष, जुना/मुरलेला पक्ष करू शकला असता ते काँग्रेसला करता आलं नाही हि वस्तुस्थिती आहे. ------------------------------------- इथे भाजपनेही तितक्याच तत्परतेने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आताच काहीही निष्कर्ष काढणे अवघड आहे. राज्यपाल कुणाला आमंत्रण देतात यावर सगळं आहे. ------------------------------------ भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावून बहुमत सिद्ध करायला वेळ दिला गेला तर मात्र कर्नाटकात पुढचे पंधरा दिवस राजकारण उतू जाणार आहे एवढे नक्की.

In reply to by manguu@mail.com

ती तर सिद्धरामैय्यापण घेणार होते, त्याचे काय झाले ते नाही विचारले? भाजपला जनतेने नाकारल्यामुळे वगैरे जड वाक्य फार जुनी नाहीत मंगूसाहेब! ------------------------------- बाकी वरील वाक्य बघून, जेडीएस चे सरकार आले कि तो तो काँग्रेसचा नैतिक विजय ठरणार आहे यात काही शंका उरलेली नाही :):).

In reply to by manguu@mail.com

निवडून आलेल्या उमेदवारानी कुमारस्वामीच्या नावाला आक्षेप घेतला आहे , आता जर कोंग्रेसचा बार फुसका ठरला तर वदनि कवल घेता म्हणून झाल्यावर ताटावरुन उठवल्यासारखे होईल , ते राहुलबाबा कुठे दिसले नाही? बघा आमच्यात परिवर्तन झाले , पप्पू नाही म्हटले , आता खरोखरच दया येते बिच्यार्याची!

In reply to by manguu@mail.com

मंगूश्रीपंत, उत्तम विवेचन आहे. (बघा, माझ्या सहवासाने तुमच्या प्रतिभेस कसे धुमारे फुटू लागलेत ते) माझ्या मते येदियुरप्पांचा पत्ता कट करायला भाजप सरकार बनवत नाहीये. हिमाचलात धूमलांचा वापर करून भाजपने निवडणूक जिंकली, पण स्वत: धूमल हरले (संदर्भ व अधिक माहिती : http://jagatapahara.blogspot.co.uk/2018/05/blog-post_5.html ). याचा अर्थ असा की भ्रष्ट चेहऱ्याचा वापर करून निवडणूक खुशाल जिंकायची, पण त्यात असा काही मोडता घालायचा की भ्रष्ट व्यक्तीस विजयाची फळं चाखता येऊ नयेत. असाच काहीसा प्रकार कर्नाटकात घडलेला दिसतो. मात्र येदि सावध असल्याने पराभूत झाले नाहीत. अशा वेळेस सरकार न स्थापायचा डावपेच भाजप श्रेष्ठींनी खेळला असावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इतका अफाट खर्च करायचा आणि सत्त सोडायची ते कुणाला तरी धडा द्यावा म्हणुन ! भाजपावाले सत्ता स्थापायला जात नाहीत कारण त्यांच्याकडे सध्या तितके मनुष्यबळ नाही