काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली. लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली.
रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठी माणसाला रस्सा भुरकण्याचा प्राचीन काळापासून नाद !
रस्सा म्हटलं की पयलेछूट आठवतो तांबडा-पांढरा ! तांबडा रस्सा म्हणजे रश्श्यांचा राजा आणि पांढरा त्याचे धाकटे भावंड ! तांबडा तुम्हाला कुटंबी भेटंल खरं पण तांबडा पांढऱ्याची जोडी पाहिजे असंल तर कोल्लापूरला यावं लागंल. तांबड्याची तर्री आणि पांढऱ्याचा साजूक तोरा मिरवावा तर कोल्हापुरी थाळीनंच.

ताटाच्या वरल्या अंगाला दोन मोठाल्या वाट्या एकीत लालभडक कटवाला तांबडा आणि त्याला खेटून दुसरीत नाजूक मिजाजवाला मिरे-वेलची-तमालपत्रीचा स्वाद मिरवणारा पांढरा. मधे सुक्क्या मटनाची प्लेट, डावीकडं वाफा निघतेली जोंधळ्याची भाकरी, तिला लागून दहीकांदा आणि लिंबाची फोड आणि त्याच्याजवळ खेम्याची बारकी प्लेट ! यवडं झालं की लागली कोल्लापुरी थाळी ! बसा आनी हाणा !!
...आनी रस्सा मागून घ्याला लाजू नका बरं का पावनं ! तांबडा म्हणु नका, पांढरा म्हणू नका, लागंल तेवढा वरपा !
खरा रस्साप्रेमी कधी रश्श्यात तुकडे शोधत बसणार नाही आणि चमच्याने नाजूकपणे रश्श्याचे चहासारखे घुटकेही घेणार नाही. रस्सा खायचा तो भुरकून आणि ओरपून, वाटी तोंडाला लावूनच.
महाराष्ट्राच्या प्रांतागणिक तांबड्याचा नूर बदलत जातो. खानदेशी, मालवणी, वऱ्हाडी, नागपुरी. त्यांची आणि वेगवेगळी तऱ्हा. पण रंग तांबडाच.
तांबडा आणि पांढरा झाला की नंबर लागतो खेकड्याचा रस्सा !
ह्याला लैच निगुतीनं करायला लागतंय आणि खाणारापण दर्दी लागतोय. उगं माशाचा वास येतोय म्हणून नाकं मुरडणारा चालत न्हाय. खेकडे आणून त्यांच्या नांग्या काढून, आबदार ठेचून शिजवून दबदबीत रस्सा करायचा. बारक्या नांग्या असल्या तर मिक्सरात फिरवून रस गाळून घ्याचा आणि रश्श्यात घालायचा. सगळं घर दरवळायला लागतंय बघा !
तेचाच एक भाऊ कोळंबीचा रस्सा. हे जरा करायला सोपं आणि कमी त्रासात ! कोळंबी मार्केटातूनच साफ करून आणली की फार कटकट नाही. धुतली की टाकली फोडणी. कोळंबीला मसाला बिसाल्याची नाटकं नाहीत. आलंलसूण ठेचून घातलं आणि धणे-जिरे पूड टाकली की झालं काम. पण चव काय नामी ! स्लर्प !!

जातीचे मटनखाऊ आणखी एका रश्श्याचे पंखे असतात. मुंडी रस्सा ! याचा वास आणि उग्रपणा सहन करायला मर्दाचं काळीज आणि पोट बाळगावं लागतं.
आमची आजी अंड्याचा रस्सा करायची. म्हणजे अंडा करी नव्हे. मसालारहित, नुसतं तिखट मीठ घालून. अंडं फोडून फेसायचं आणि कांदा भाजून त्यात तिखट-मीठ, लसूण आणि पाणी घालून पातळ पिठलं करतो तसं त्यात फेसलेलं अंडं घालून रस्सा करायचा. त्या लालभडक तर्रीदार रश्श्याच्या तोडीची अंडा करी आजवर भेटली नाही.
माझी एक दूरची बहिण अंडे फोडून डायरेक्ट उकळत्या रश्श्यात घालून शिजवून रस्सा करते. त्याचं नाव डुबुकरस्सा ! त्याची एक वेगळीच टेस्ट.
नॉनव्हेजमध्ये आहेत त्यापेक्षा जास्त व्हरायटी व्हेज रश्श्याची. बटाट्याचाच एक रस्सा घेतला तरी त्यात शंभर नमुने. बटाटा रस्सा हा एक ऑल टाईम फेवरीट रिझर्व्ह आयटम आहे. पाहुणे आले, फ्रिजमधली भाजी संपलीय, बाजारात जायला वेळ नाही, आले बटाटाभाऊ मदतीला. शिवाय याच्या जोडीला कुणीही खपून जाते.
कांदे-बटाटे रस्सा , टोमॅटो-बटाटा रस्सा, गोड बटाटा रस्सा, बटाट्याचा काळा रस्सा, फ्लॉवरवाटाणे-बटाटा रस्सा (याला काही जण कुर्मा म्हणतात.), वांगी-बटाटा रस्सा, ढब्बू मिरची आणि बटाटा रस्सा मासळीप्रेमी त्यात सोडे-बांगडे इ. मिसळून घालतात. बटाटा हा सर्वसमावेशक असल्याने या सर्वांच्या रंगात आपला रस-रंग मिसळून रश्श्याला वेगळीच गोडी आणतो.

मटकीचा रस्सा मिसळीसाठी जास्त फेमस आहे. तरीपण नुसता ओरपायला पण भारीच. थोडा मटणाचा मसाला लावला तर तांबड्याच्या तोंडात मारेल. मात्र याच्या पाकृला ओले खोबरे मस्ट. आणि वरती तरंगायला कोथिंबीर.

नॉनव्हेज रश्श्याच्या तोडीस तोड म्हणजे पावटा किंवा वालाच्या मोडाचा रस्सा. आमच्या कोल्हापूरकडे त्याला वरणे म्हणतात. वाल किंवा वरणे रात्रभर भिजत घालावे , दुसरे दिवशी कपड्यात बांधून झाकून ठेवावे. बारा तासांनी मोड आले की कांदा, आले-लसूण तिखट-मीठ इतके मोजकेच घटक घालून असली चाबरट चव येते की ज्याचं नाव ते !

पावट्याचा रस्सा म्हटलं की आमच्या घरी इतर काही कालवण करावं लागत नाही. रस्सा एके रस्सा. चपाती-भाकरीबरोबर आणि भाताबरोबरपण !
आणखीही बरेच रश्श्याचे नमुने असतील महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात बनणारे. त्यांची वर्णने इथे देऊन मिपाकरांनी रस्सा-महोत्सव करावा ही आग्रहाची इणंती ! __/\__
(फोटो आंजावरून साभार )
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी..
खल्लास स्नेहाताई
रस्सा
गणपाचा बघायला हवा, पण पाया
In reply to रस्सा by कपिलमुनी
आमची आजी अंड्याचा रस्सा
+१
In reply to आमची आजी अंड्याचा रस्सा by एस
ऑफकोर्स, कानडा-लसूण तिखट ! :)
In reply to +१ by कपिलमुनी
सॉरी, कांदा-लसूण तिखट !
In reply to ऑफकोर्स, कानडा-लसूण तिखट ! :) by सस्नेह
मी म्हटले रश्शामध्ये काय
चवीने खाण्याचा प्रकार = चावट
In reply to मी म्हटले रश्शामध्ये काय by यशोधरा
ते अंडा रश्शाच्या पाककृतीचे
In reply to मी म्हटले रश्शामध्ये काय by यशोधरा
वीकांताला करून पाकृ टाकणेत
In reply to ते अंडा रश्शाच्या पाककृतीचे by उगा काहितरीच
ते अंडा रश्शाच्या पाककृतीचे
In reply to मी म्हटले रश्शामध्ये काय by यशोधरा
कहर धागा!
सर्व प्रकार
चिंबोरीचा रस्सा
चिंबोरीच्या रश्श्याने सर्दी
In reply to चिंबोरीचा रस्सा by गामा पैलवान
आभार
In reply to चिंबोरीच्या रश्श्याने सर्दी by अमेरिकन त्रिशंकू
मी
आवडले. करून बघणार.
रस्सादार... आपलं... रसदार लेख
छान
क्या बात है. एकदम चविष्ट लेख.
रसदार लेख.
मस्त....
चणोला म्हणजे काय ?
In reply to मस्त.... by संजय पाटिल
कपिलतिर्थमधे चवकशी करा! सध्या
In reply to चणोला म्हणजे काय ? by सस्नेह
बायदवे.. पावट्यासारखाच असतो,
In reply to कपिलतिर्थमधे चवकशी करा! सध्या by संजय पाटिल
उद्या जाईन कपिलतीर्थात.
In reply to बायदवे.. पावट्यासारखाच असतो, by संजय पाटिल
मोडंवाल्यांकडे मिळतात का ?
In reply to उद्या जाईन कपिलतीर्थात. by सस्नेह
मोडंवाल्यांकडे मिळतात का ?ओल्या शेंगा असतात.ओ तै
अर्र हो,
In reply to ओ तै by इरसाल
गव्हाच नाही डाळीच पीठ असत ते
In reply to ओ तै by इरसाल
ते वेगळं
In reply to गव्हाच नाही डाळीच पीठ असत ते by त्रिवेणी
रसोई
In reply to ते वेगळं by इरसाल
कशाला हा धागा उघडला?
भरून पावलो....
या कोल्हापूर ला
In reply to भरून पावलो.... by नीलकांत
नक्कीच
In reply to या कोल्हापूर ला by सस्नेह
काय राव सगळ्या मानाच्या
कटाची आमटी हा रस्सा म्हटला तर
In reply to काय राव सगळ्या मानाच्या by भीमराव
आयच्या गावात. ते
अगदी अगदी !
In reply to आयच्या गावात. ते by बॅटमॅन
रुचकर लेख आवडला!
मस्त
कालच कडव्या वालांची वर्षभराची
चावट रश्श्यांची दुनिया !
असले भारी वाचल्यावर घरात कोण
असे लेख म्हणजे उगा जीवाचा छळ.
काटा किर्रर्र
ही घ्या:
सुंदर लेख!
मस्त लेख.
चमचमीत लेख,मोडाच्या
हे कोल्हापुरी 'तांबडा-पांढरा'
कोल्हापुरात गेलात तर परख
In reply to हे कोल्हापुरी 'तांबडा-पांढरा' by तिरफळ
कोल्हापुरातच आहे. पारख आणि
In reply to कोल्हापुरात गेलात तर परख by संजय पाटिल
देहाती
In reply to कोल्हापुरातच आहे. पारख आणि by सस्नेह
आता आता अलीकडे टिकटॅक कॉर्नर,
In reply to देहाती by कपिलमुनी
पद्मा टॉकिज जवळ श्रीकॄष्ण
In reply to आता आता अलीकडे टिकटॅक कॉर्नर, by सस्नेह
वरचा प्रतिसाद तिरफाळ यांना
In reply to कोल्हापुरातच आहे. पारख आणि by सस्नेह