लेबलं
सरकारच्या बाजूने बोललो तर भक्त.
सरकार विरोधात बोललो तर देशद्रोही.
हिंदू धर्मविरोधात बोललो तर बुबुडाउविपुमाधवि*.
हिंदू धर्माच्या बाजूने बोललो तर सनातनी, हिंदुत्ववादी, प्रतिगामी.
जातीव्यवस्थेविषयी बोललो तर बामणी, मनुवादी.
जातीव्यवस्थेविरोधात बोललो तर आंबेडकरवादी, फुलेवादी.
खर्चाच्या बाजूने बोललो तर भांडवलशाही.
काटकसरीच्या बाजूने बोललो तर समाजवादी.
स्त्रियांना विशेष अधिकार असावेत बोललो तर फेमिनाझी.
स्त्रियांना विशेष अधिकार नसावेत बोललो तर एमसीपी.
प्रार्थनेच्या बाजूने बोललो तर आस्तिक.
कर्मकांडाविरोधात बोललो तर नास्तिक.
आठवणीतून एखादा किस्सा सांगितला तर खोटारडा, फेकू.
मुद्द्याच्या समर्थनार्थ संदर्भ दिले तर लिंकपिसाट**.
संयतपणे चर्चा केली तर भित्रट, नामर्द, षंढ.
वैतागून शिवी हासडली तर असंस्कृत, शिवराळ.
भारतीय म्हणवून घेण्यासाठी काय करू?
माणूस म्हणवून घेण्यासाठी काय करू?
===================================================
*बुबुडाउविपुमाधवि: बुद्धीवादी बुद्धीप्रामाण्यवादी डावे उदारमतवादी विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत
सौजन्य: गॅरी ट्रुमन आणि सचिन७३८
**लिंकपिसाट: सौजन्य: गामा पैलवान
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे हे हे
बुबुडाउविपुमाधवि*याचा विस्तारअर्थ सांगितल्याबद्दल धन्यवादएखादी बाजू घेऊन बोललेच पाहिजे का?
तुमच्या लेखापेक्षा तुमच नावंच
कापडी सर प्रोफाइल ला जाऊन फटू
बुबुडाउविपुमाधवि हे एक नाहीत
हे हे हे भारीय
हे म्हणजे असे झाले
भारीच लिहिलंय !
उत्तम प्रतिसाद!
पवित्र्याची गडबड
+१११