अवहेलनेचे बकासूर टाचा झिजवताय्त..
अन् मी उन्मुक्त रंगबावरी
भिरभिरतेय ध्येयवेड्या रूपरेषा धुंडाळत
त्याच त्या साजणगहिर्या रंगहाका
पिंपळरसिकांचा अत्तरटाहो
रक्तसूज्ञांचा दंभपराभव
अन् प्रतिबिंबांचा जादूटोणा
यक्
अन् असल्याच शब्दांना कंपूबाजांच्या
"छान गं, मस्त गं, पाणी आलं गं, सुंदर कल्पना गं, कसं सुचतं गं.."
असल्या छप्परतोड प्रतिक्रिया
काहिली काहिली जिवाची
वाटते सांगावे मी कोण या सार्यांना ..
की या तेजतर्रार शून्यमनस्कतेचा
उकळत्या तेलात टाकून
एक मेदूवडा बनवून खावा खुसखुशीत??...
वाचने
8763
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच नवीन शब्द आज कळाले.
कविता आवडली.
वाहवा ..
+१
In reply to वाहवा .. by लिखाळ
लै भारी! पन
मराठीप्रचूर संस्कृत
संधी
In reply to मराठीप्रचूर संस्कृत by विंजिनेर
क्या बात
मला
असेच म्हणतो ...
In reply to मला by बिपिन कार्यकर्ते
छप्परतोड
भयभीषण!!
आ हा हा ज
खल्लास...
असेच
In reply to खल्लास... by श्रावण मोडक
वाटते
भारी !!
भारी !!
ह्याचे
विदीर्णचित्त