करी ऑफ कॉन्स्पीरसी.
करी ऑफ कॉन्स्पीरसी उर्फ कटाची आमटी
कटाची आमटी ही नाजूक पाककृती आहे.सरावानी जमते.बिघडली तर गुळवणी होते.या आमटीचा किचनमधून येणारा सुगंध आणि दरवळ हेच या आमटीचे आयएसओ ४१००० प्रमाणपत्र आहे.सौ.रामदास यांच्या सौजन्याने ही पाककृती येथे देत आहे.
साहीत्य : मसाल्यासाठी-जीरं ,लवंग ,दालचिनी,तेजपत्ता.
भिजवलेले कच्चे शेंगदाणे, खोबर्याचे पातळ काप खोबर्याचा तुकडा (भाजण्यासाठी)
काजू तुकडा (ऐपतीप्रमाणे),कढीपत्ता, तेजपत्ता, हिरव्या मिर्चीचे तुकडे,कोथींबीर, लिंबाएव्हढी चिंच,थोडासा गूळ.
कृती :
कट काढणे : पुरणासाठी चण्याची डाळ शिजवून घेताना त्यावर पांढरा फेस येतो.तो काढून फेकून देणे.त्यानंतर डाळ शिजल्यावर डाळ चाळणीत ओतून पातेल्यात पाणी काढून घेणे.हा झाला कट.
थोडी शिजलेली डावभर डाळ बारीक करून कटात घालावी. या कटात चिंचेचा कोळ ,गूळ ,मिठ आणि थोडेसे लाल तिखट घालून ढवळून घेणे.
मसाला तयार करणे: जीरं ,लवंग ,दालचिनी,तेजपत्ता मद आचेवर खमंग भाजून घ्यावे.एक खोबर्याचा तुकडा गॅसवर व्यवस्थीत वरवर काळा होईस्तो खमंग भाजणे.हा तुकडा आणि वर भाजून घेतलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणे.
फोडणीची तयारी: फोडणी तेलाची असते. रोजच्यापेक्षा थोडे जास्त तेल वापरावे.फोडणीत मोहोरी ,जिरं हिंग ,हळद कढीपत्ता,तिळ, हिरव्या मिर्चांचे तुकडे घालून फोडणी झाली की त्यातच शेंगदाणे,काजू, खोबर्याचे काप घातल्यावर कट त्यात ओतावा . बारीक केलेला मसाला घालून दहा मिनीटे उकळू द्यावे.बारीक चिरलेली कोथींबीर घालून गॅस बंद करावा.
पुरुषवर्गासाठी काही सूचना :कटाची आमटी तयार झाली की सुगंध येतो.तोपर्यंत किचन मध्ये ये जा करू नये.डाळ शिजली का हे बघण्यासाठी बोटचेपेपणा करू नये. कट काढल्याशिवाय डाळ शिजणार नाही.
वाचने
6077
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
आता
In reply to आता by विसोबा खेचर
हाहाहा!!!
In reply to आता by विसोबा खेचर
वा!
झकास!!!
In reply to झकास!!! by बिपिन कार्यकर्ते
असच म्हणतो.
उद्या पुरणपोळीबरोबर
समयोचित.
आस हाय व्हय
कट
वावा..
फुर्र्र.................
.
ह्म्म 'कट' शिजवण्यात
येत्या
सुंदर रेसिपी