Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३२

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 03/05/2018 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

वाचने 67353
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

चिकनगुनिया या विषाणूजन्य आजारावर प्रतिविषाणू ठरू शकेल असा रेणू शोधण्यात भारतीय संशोधिकेला यश आले आहे. सध्या तरी प्री-क्लिनिकल फेजमध्ये असले तरी ह्या संशोधनाचा उपयोग करून या आजारावर औषध शोधले गेल्यास ती फार मोलाची घटना ठरू शकेल. https://www.news18.com/news/india/iit-roorkee-researchers-discover-mole… मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा मुख्यत्वे विकसनशील देशांत जास्त आढळणाऱ्या आजारांवर प्रतिबंधक लशी लवकरात लवकर शोधल्या गेल्या पाहिजेत. परंतु औषधनिर्मिती कंपन्यांना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी उच्छ आणि मध्यम उत्पन्न गटांना जास्त भेडसावणाऱ्या आजारांवर लक्ष केंद्रित करून नफा मिळवण्यात जास्त रस आहे असे दिसते.

माईसाहेब,
खरोखर पोर्ट्रेट ,चित्र पाहून देश तोडायची प्रेरणा मिळते?
हाहाहा! याविषयी माहित नाही. पण क्वेट्टानजीकचं जिनाचं घर बघून बलुची मुस्लिमांना ते पेटवून द्यायची प्रेरणा नक्की झाली. आस्वाद घ्यावा म्हणतो मी : https://www.youtube.com/watch?v=hsy2La6tpi4 आ.न., -गा.पै.

Old video of PM Modi rally in Varanasi shared as Udupi rally ahead of Karnataka elections. Desperate BJP tries to influence voters with old videos. https://www.altnews.in/old-video-of-pm-modi-rally-in-varanasi-shared-as… कर्नाटकातील जनता मोदी व भाजपला नाकारत असल्याने भेदरलेली भक्त मंडळी आता वाराणसी मधील मोदीजींच्या रॅलीचा जुना व्हिडिओ पोस्ट करुन तो कर्नाटकातील उडुपी येथील रॅलीचा असल्याचे भासवत आहेत. असे खोटे व्हिडिओ पसरवून लोकांची दिशाभूल करुन मते मागण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर यावी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

In reply to by manguu@mail.com

मंगूसाहेब, घोडामैदान लै लांब नाय, जनता कुणाला नाकारतेय ते कळेलच. शिवाय कोण भेदरलेले आहे तेही कळेलच. उडुपी मध्ये मोदींना खूप सपोर्ट मिळाला, हा बघा विडिओ इंटरनेटवर, आता भाजप ला मतदान करा. लैच मज्जा! ------------------------------ उगाचच इकडचे तिकडचे तथाकथित भक्तांचे फॉर्वर्डस पाहण्यापेक्षा उडुपीच्या सभेचा ओरिजिनल विडिओ पण पहा. स्वतः बघितलेलं बरं असतं. ----------------------------- उत्तरे देता येत नाहीत म्हणून जोडून तोडून विडिओ बनवायच्या शोकांतिकेपेक्षा हि शोकांतिका बरीच म्हणायची.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय तसातसा प्रचारही आक्रमक होत चालला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमाकुरू येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस गेल्या अनेकवर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे पण त्यांना गरीबांसाठी काहीही करता आलेले नाही. काँग्रेस पक्ष भारतातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता त्यांनी गरीब बोलणे बंद केले आहे कारण आता लोकांनीच गरीब कुटुंबातून पंतप्रधान निवडला आहे असे मोदी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले.

In reply to by manguu@mail.com

इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले. मोदीजी अगदी बरोबर बोलत आहेत. देशातल्या जनतेने निर्धार करुन धर्मावर, जातीवर समाजाला वेगवेगळ्या गटात वाटणार्या राजकीय पक्षाला सत्तेच्या स्पर्धेतुन बाद करावे व मोदीजींचे हात बळकट करावेत, तसेच कोणत्याही छोट्या व्यवसाय करणार्यां उद्योजकांनी पुढे येऊन सरकारला लागु असलेले वेगवेगळे कर देऊन सहकार्य करावे व देश उभारणीत आपला वाटा उचलावा !! मोदीजींनी आधार कार्डला असलेला सर्व विरोध मोडुन काढून सर्व स्तरावर आधार कार्ड सक्तीचे केले पाहीजे. प्रत्येक काम, व्यवहार आधार कार्डला संलग्न झाला पाहीजे , कॅश पैश्याचे व्यवहार कमीत कमी करुन जे कोण कॅश मध्ये काम करतात त्यांच्यावर कडक नजर ठेवायला पाहीजे.

In reply to by manguu@mail.com

काँग्रेसने गरीब केले म्हणे. १९४७ साली आपला पणजोबा , २००० सालच्या पणतवापेक्षा जास्त उत्पन्न मिळवत होता, याचे प्रुफ देणारा एकही गरीब मला तरी दिसलेला नाही. १९४७ पासून चार पिढ्या झाल्या , तरी एखादा माणूस , तोही गुजरातेतला गरीबच ! चूक कुणाची काँग्र्सची ! आणि मग इतर काही लोक श्रीमंत झाले, ते कशाच्या जिवावर ?

चला म्हणजे आता कर्नाटक निवडणुका जिंकण्याच काँग्रेसचे स्वप्न स्वप्नच रहाणार आता ! बेंगळुरू कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ सातच दिवस उरले असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १२० कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात सोने, दारू आणि इतर साहित्याचा समावेश आहे. येत्या १२ मार्चला कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ५ लाख लीटर दारू जप्त निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ६७.२७ कोटी रुपयांची रोकड, २३.३६ कोटी रुपयांची पाच लाख लीटर दारू आणि ४३.१७ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. या व्यतिरिक्त या कारवाईत आता पर्यंत १८.५७ कोटी रुपयांचे प्रेशर कुकर, साड्या, शिलाई मशीन्स, गुटखा, लॅपटॉप आणि गाड्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

In reply to by manguu@mail.com

'सारे एका माळेचे मणी' नावाचा वाक्प्रचार माहिती आहे का ? जो पर्यंत दोनच्यावर वेळा निवडून येण्यावर बंधन घातले जात नै तो पर्यंत गोंधळ संपणार नाही. (राजकारणावर टिका करताना रंगांचा अनमान होऊ नये म्हणून काही रंगवाचक शब्द टाळले - )

कर्नाटक विधानसभा निवडणुकीला फक्त आठवड्याचा कालावधी उरला असताना भाजप आणि काँग्रेस अधिकच आक्रमकपणे प्रचार करू लागले आहेत. शिमोगाच्या गडम येथील आजच्या धडाकेबाज प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत वातावरण अधिकच तापवले. 'देशभरात झालेल्या पराभवामुळे काँग्रसला चिंता नव्हती, मात्र कर्नाटकात आपला पराभव होणार हे लक्षात आल्याने काँग्रेसला चिंता सतावू लागली आहे. याचे कारण म्हणजे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने इथे एक टँक बनवला आहे. या टँकद्वारे जनतेचा पैसा लुटला जातो. हा पैसा थेट पाइपने दिल्लीत पोचतो. जर सरकारचा पराभव झाला, तर काँग्रेससाठी पैसा कुठून येणार, हीच चिंता काँग्रेसला सतावत आहे', अशी गंभीर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेस पक्षावर केली आहे. काँग्रेसला वसुली माफियांची चिंता करप्शनचा टँक भरण्यासाठी काँग्रेसने राज्यात वसुली माफियांचे एक नेटवर्कच तयार केल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला. इथले सरकार गेल्यास या माफियांचे काय होईल, याचीही चिंता काँग्रेसला सतावत आहे. २०१४ पूर्वी कोळसा, हेलिकॉप्टर, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा झाले आणि याच पैशातून काँग्रेसचे काळी कृत्ये सुरू असल्याचा आरोप करत मोदींनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

निवडणूकीपूर्वी कुठलाही पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री गोष्टी जाहीर करतो जसे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, १ रूपयात तांदूळ वगैरे ...हे सगळे भ्रष्टाचारात का मोडत नाही ? ईलेक्षन कमिशनला यात काही चुकीचे वाटत नाही का पावर नाही.

मध्य प्रदेशचे भाजपा आमदार गोपाल परमार यांनी लव्ह जिहाद आणि बालविवाह याबाबत विचित्र विधान केलं आहे. बालविवाहांमुळे लव्ह जिहादच्या घटनांवर आळा बसेल असा अजब दावा त्यांनी केला आहे. उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच लव्ह जिहादला बळ मिळतं, उशिरा होणारे विवाह लव्ह जिहादला जबाबदार असल्याचं परमार म्हणाले. पूर्वी कमी वयातच मुलामुलींची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुलं-मुली चुकीच्या मार्गावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच लग्न ठरवलं जायचं. मात्र आता मुलं कोचिंग क्लासला जातात. तिकडे ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात,’ असं गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. ‘मुली अतिशय संवेदनशील असतात. त्यांना कोणी मदत करत असेल, तर त्या सहज फसतात. मग त्या त्यांचं नाव आणि त्यांची ओळख बदलण्यासाठी तयार होतात,’ असं परमार म्हणाले.

कर्नाटकात भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांची प्रचारादरम्यान एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना येडियुरप्पा म्हणाले, की जे मतदार मतदान करणार नाहीत अशांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रांवर आणा आणि भाजपाला मत देण्यासाठी भाग पाडा, हे विधान येडियुरप्पांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत.

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे तो जोशात केलेले विधान असणार. मागे शरद पवारांनीही सभेत "एकदा गावात मतदान केलेत के मग शाई पुसा व मग परत येऊन मुंबईत मतदान करा.." असे आवाहन केले होते. http://www.dnaindia.com/mumbai/report-sharad-pawar-asks-voters-to-erase…

अलिबाग: इंटिरियर डिझायनर अन्वय मधुकर नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 'रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णब यांनी पैसे थकविल्यामुळे नाईक निराश होते त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं.  अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी आहे. शुक्रवारी ते अलिबाग जवळील कावीर येथे आपल्या घरी आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या नोकरांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं. नाईक यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा आदींनी पैसे थकविल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी या तिघांविरोधात नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाईक यांच्या ७३ वर्षीय आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

'शुक्रतारा' या गाजलेल्या भावगीताने मराठी रसिकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे दुःखद निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली!

रात्री ९.३० ला कलर्स वर "आपल मराठी बीग बॉस' नामक कार्यक्रम पाहण्यात आला. आतापर्यंत हिंदी बीग बॉस हा सर्वात भीकार कार्यक्रम आहे अशी समजून होती ती खोटी ठरली. उषा नाडकर्णी,अनिल थत्ते हे दोन सोडले तर बाकी सर्व नविन कलाकार दिसत होते. आपण एक सेलिब्रिटी आहोत व आपणास लाखो लोक ओळखतात अशी सर्वांची समजून असावी. हा अनिल थत्ते माझ्या आठवणीप्रमाणे पूर्वी गगनभेदी नामक साप्ताहिक की मासिक चालवायचा. रंगीबेरंगी कपडे,वेशभूषेत तो विदूषकासारखा न दिसतो तर नवल. ७२ वर्षीय दमा,डायबेटीसने त्रस्त असणार्या उषा नाडकर्णी नक्की येथे का आल्या हा प्रश्न पडतो. एकेमेकांच्या अंगावर धावून्,लाथा मारेपर्यंत ही मंडळी गेली. कोणत्याच चॅनेलवर काहीच पाहण्यासारखे नसेल तर हा कार्यक्रम पहावा. thatte

काँग्रेसने किमान कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी कर्नाटकच्या जामखंडी येथे काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर कर्नाटकात आढळणा-या मुधोल कुत्र्यांकडून काँग्रेसने देशभक्ती शिकावी असा सल्ला मोदींनी दिला. उत्तर कर्नाटकमध्ये आढळणा-या मुधोल कुत्र्यांचा नुकताच भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुधोल कुत्रे म्हणजे शिकारी कुत्र्यांची एक जात आहे. भारतीय लष्करामध्ये सामील होणारी मुधोल ही भारतीय कुत्र्यांची पहिली प्रजाती आहे. उत्तर कर्नाटकच्या जामखंडी येथील बागलकोटमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत मोदी बोलत होते. ”ज्यांना देशभक्तीच्या नावाने त्रास होतो, देशभक्तीच्या चर्चेविरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, अशा सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला दुसऱ्याकडून शिकायचं नाही तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. मात्र, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा”. मोदी पुढे म्हणाले, ”मला माहितीये की त्यांना (काँग्रेस) खूप अहंकार आहे. देशातील लोकांनी त्यांना नाकारलंय. त्यामुळे मुधोल कुत्र्यांकडूनही ते काही शिकतील अशीही मला अपेक्षा नाही”. काँग्रेसचा दर्जा इतका खालावला आहे की, पक्षाचा एक नेता ‘भारत के टुकडे होंगे’ अशी नारेबाजी करणा-यांमध्ये गेला आणि त्यांना समर्थन दिलं असं मोदी म्हणाले. जेएनयूमधील देशविरोधी नारेबाजीच्या प्रकरणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जेएनयूच्या परिसरात गेले होते, त्यावरुन मोदींनी राहुल यांना हे खडेबोल सुनावले.

In reply to by manguu@mail.com

विरोधी पक्षाला कुत्रा म्हणणे निषेधास्पद आहे. भारतविरोधी घोषणा jnu , up त दिल्या अशा वावड्या भाजप उठवत असते, पण ऑडिओ , व्हिडीओ फेक का निघतात ? एकालाही अटक का होत नाही ?

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे ते त्यांना देशभक्ती शिकायला सांगत आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसचे माजी नेते एस.एम.कृष्णा भाजपात डेरेदाखल झाले. त्यांनी कोणाकडून देशभक्तीचे ट्रेनिंग घेतले हे मोदी/शहांनी सांगायला हवे. गेल्या महिन्यात अफझलपूर(कर्नाटक)चे आमदार मलिकय्या गुत्तेदार हे देखील काँग्रेसमधून भाजपात सामील झाले. त्याना कोठून ट्रेनिंग मिळाले हे देखील स्पष्ट व्हावे. guttedar https://en.wikipedia.org/wiki/Malikayya_Venkayya_Guttedar

कर्नाटकात पाच दिवसांनंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. आपल्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, आता हेच आरोप त्यांच्या अंगलट आले आहेत. कारण, सिद्धरामय्या यांनी भाजपाच्या या तीनही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. माफी मागा किंवा १०० कोटींची नुकसान भरपाई द्या असे सिद्धरामय्या यांनी नोटिशीत म्हटले आहे. अ

In reply to by manguu@mail.com

ते स्वामी म्हणाले की मी असल्या नोटिसा फाडून कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतो, मोदी शहांनी पण असेच करावे.

ताज्या घडामोडी धाग्यावर टेनिस सोडून स्क्वॅश खेळणे सुरू झालेले दिसते आहे, ते ही सिंगल्स, उचलली रॅकेट का हाणला भिंतीवर टोला !!!

In reply to by जेम्स वांड

याचे कारण म्हणजे फक्त एका पक्षाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांवर कारवाई होणार आहे, विरोधात बोलणाऱ्यांवर नाही. त्यामुळे मंगुजींची (आदराने उल्लेख करायला पाहिजे! उगाच कारवाई व्हायची) काळजी मिटली.

In reply to by ट्रेड मार्क

एका पक्षाच्या बाजूने बोलणे आणि विरोधी पक्षाच्या आयडी ना अपमानास्पद बोलणे सुचनेतील महत्वाचा भाग हा असेल असे वाटते

In reply to by manguu@mail.com

मंगुल्या वर्मावर बोट ठेऊन जातंय असं! म्हणून खूपसे वर्माजी लोक चिडून असतात त्याच्यावर

In reply to by ट्रेड मार्क

कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन बोलायलाही मनाई हुकूम बजावण्यात आलेला नाहीये, तर हिरीरीने बाजू लढवल्यावर जर प्रश्न शंका वगैरे आल्या तर त्यांना शांतपणे प्रश्नकर्त्याची हुर्यो न उडवता उत्तरे न देणाऱ्याकरता ती सूचना आहे, संबंधितांना मंगुचा सतत पाणउतारा करणे, त्याला काहीबाही बोलणे हा धंदा थोडक्यात बंद पडलाय जणू. मंगुल्या आहे थोडा डॅम्बीस , पण पक्षीय राजकारणावर बोलतो, मुसलमानांची बाजू लढवतो, कोणावर वैयक्तिक झालेला दिसला तर दाखवा मंगुल्याचा पण उद्धार करून टाकू, हाकानाका तेवढं विकटीम कार्ड खेळून मिपा मालक अन चालकांवर अन्याय करीत भलते सलते आरोप करू नका, ही नम्र विनंती. आजवर जे वाटेल ते बोलायचा पास मिळाल्यावाणी बडबडत असत त्यांना फक्त आपण बोलतो त्याची उत्तरे द्यावी लागतील, अन कोणावरही हेटाळणी युक्त कॉमेंट्स करता येणार नाही इतकं फक्त सूचना म्हणते, वैयक्तिक बोलणाऱ्या कुठल्याही पार्टी समर्थकांस ते समसमान लागू होतंय. मिपा प्रशासन आम्ही तुमच्या मताला सहमत आहोत अन तुमच्या अभिनंदनीय कार्याचे आम्हाला कौतुक वाटते (रामशास्त्री मोड ऑन) वांडो

In reply to by जेम्स वांड

संपादक मंडळाला पण त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये एवढा अर्थ आहे हे पण आत्ताच कळाले असेल.अर्थ लावणारे सोईस्कररित्या पाहिजे तो अर्थ लाऊन विरोधी बाजूला टोमणे (!) मारायची संधी साधून घेत आहे.

In reply to by lakhu risbud

मिस्टर रिसबुड (पुलंचा चाहता) वांडो सोईस्कर अर्थ लावून मालकांना अन संपादक मंडळाला कोण बोल लावतोय ते वर नीट दिसतंय, तुम्हाला पण मालकच चूक वाटतायत का?

In reply to by डँबिस००७

तुमचे नाही आले आजवर इतके लक्षात राहण्यालायक, स्वतःला इतकं महत्वाचं समजू नये बुआ :D

In reply to by अभ्या..

हा उपप्रतिसाद व्यापारचिन्हरावांसाठी आहे. बाकी मंगुल्याचे कौतुक करावे तितके थोडेच. भांडावे लागते एकडाव. ;)

In reply to by अभ्या..

स्वतःला जनरल सर्वात उठबस असणारे अन मिपा मालकांच्या शब्दाबाहेर नसलेले मानतो. बाकी "आपल्या गटाचा" शेम्बुड गोड म्हणत मालकांनाच नाक मुरडायचा प्रताप करायला खासे धारिष्ट्य लागते बुआ, आपल्यात ते नाही, काळ सोकावतो म्हणतात न बेंबट्या तो हा असा!

In reply to by manguu@mail.com

https://en.wikipedia.org/wiki/Syed_Ahmad_Khan १० वी पर्यंतची इतिहासाची पुस्तके परत वाचून घ्या.
Suppose that the English community and the army were to leave India, taking with them all their cannons and their splendid weapons and all else, who then would be the rulers of India?.... Is it possible that under these circumstances two nations—the Mohammedans and the Hindus—could sit on the same throne and remain equal in power? Most certainly not. It is necessary that one of them should conquer the other. To hope that both could remain equal is to desire the impossible and the inconceivable. But until one nation has conquered the other and made it obedient, peace cannot reign in the land - Syed_Ahmad_Khan , March १८८८ (सावरकरांचे वय : ५ वर्षे,जीनांचे वय : १२ वर्षे)

In reply to by manguu@mail.com

कैच्या कै! संदर्भ देता का? १९२३ पासून मुस्लिम नेत्यांनी द्विराष्ट्र संकल्पनेसाठी भारतातील सगळ्या नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरु केल्या होत्या असे दाखले आढळतात. १९३८ तर खूप उशिरा येतं आणि ज्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या त्यातील एक सावरकर होते. त्या बैठकीत काय निष्कर्ष काढण्यात आला याचा संदर्भ देता का? १९२४ साली लाला लजपत राय यांनी द्विराष्ट्र संकल्पनेला पाठिंबा दिला होता याचे संदर्भ खोटे आहेत का?

In reply to by manguu@mail.com

मंगू तो काँग्रेस पक्षाचा मंगू आहे म्हणून तू त्याची बाजू घेऊ नको गडे, द्विराष्ट्रवाद संबंधी १९३८ मध्ये 'सावरकर - जिन्हा' भेट झाली होती तिलाच 'जिन्हा सावरकर' भेट पण म्हणता येईल, मणिशंकर शंख म्हणतोय की तुम्ही (पक्षी पाकिस्तानी) चुकीचे शिकवतायत अन द्विराष्ट्रवादाचे जनक सावरकर होत, पण जर तुझे विधान ग्राह्य धरले तर जिन्हा अन सावरकर दोघेही जनक होत द्विराष्ट्रवादाचे! असे किमान पाकिस्तानी लोकांनी म्हणायला हरकत नाही, त्यामुळे मणी चूक बोलला त्याने तिथल्या त्याच्या चेल्याचपाट्यानां 'तुम्ही अर्धवट शिकवताय' म्हणायला हवे होते. रच्याकने द्विरष्ट्रवादी विचार जर खरेच सावरकरांचे होते तर आजवर बिलं गांधींच्या नावे का फाटतायत? अन त्यांना जीव का द्यावा लागला? म्हातारबाबा उगाच खाया पिया कुछ नही ग्लास फोडा बाराना झालेत काय?

In reply to by manguu@mail.com

कृपया त्या बैठकीच्या निष्कर्षांचा असेल तर संदर्भ द्या! त्या एकाच बैठकीत हा निर्णय घेऊन फाळणी करण्यात आली असा चुकीचा अर्थ आपल्या वाक्यातून निघत आहे.

In reply to by manguu@mail.com

या बोटावर्ची थ्युंकी त्या बोटावर कर्न्याच्या कलेत मंगूसाय्बांचा हात धर्नारा आक्क्या दुनियेत घावनार नाय. त्यात्लं नोबेल बकशीश मंगूला यक्दम नक्की बर्का ! ;) =)) =)) =))

In reply to by गब्रिएल

तुमचा मूळ आयडी शोधण्यात कोणालाच रस नाहीये हो, कश्याला ओळख लपवायला व्याकरण आणि शुद्धलेखनाची आयमाय करताय, म्हणायचं ते नीट लिहून मांडा की!

In reply to by जेम्स वांड

बक्षीस म्हणून २१/- देता येतीलच, नाही नाही द्याच थुंकी बोटे वगैरे करण्यासाठी, पण त्याने मांडलेल्या मुद्द्यावर प्रतीमुद्दाही द्या (असला तर), नाहीतर व्यक्तिगत टीका गणली जाऊ शकेल बहुदा ही. मुद्दे देने बिटाकाकांकडून शिकू शकता. (शिकायची इच्छा असली तर), काकांशी वादविवाद म्हणजे मजा असते एकदम रिफ्रेशिंग अन बुद्धिवर्धक प्रकार. :)

In reply to by जेम्स वांड

मिपावर संपादक मंडळाने भरारी पथक चालू केले पाहिजे, असे वाटते. सापडला की फाड पावती, ते पण सगळे कलम वगैरे व्यवस्थित लावून. म्हणजे सर्वाना मिपा वाहतुकीचे नियम व्यवस्थित समजतील आणि सिग्नल तोडणार नाहीत.

In reply to by जेम्स वांड

द्विराष्ट्र संकल्पना आणि फाळणीचा परिणाम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण यापैकी कशालाही फक्त गांधींना दोष लावणे बेजबाब्दारपणाचे आणि बेसलेस आहे असे मला वाटते. त्या वेळची परिस्थिती कदाचित द्विराष्ट्र संकल्पनेला रोखू शकली नसती. पण फाळणीची अंमलबजावणी, कदाचित इंग्रजांच्या दबावाखाली, अत्यंत घाईघाईने करण्यात आली असावी. अगदी सीमाही ठरल्या नसताना फाळणीची आणि स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करण्यात आली आणि हिंसेला सुरुवात झाली. त्या काळाच्या नेत्यांचा जनतेवरील प्रभाव बघता हे आधी परिपकवपणे हाताळता आले असते का?

In reply to by sagarpdy

We need better statesmanship than Mr. Gandhi and Mr. Jinnah have shown
बाकी मांडणी काय आहे माहित नाही, पण आंबेडकरांशी या वाक्या पुरता सहमत आहे, जीनांनी स्वतःच्या आणि समुह स्वार्था पोटी अख्खे उपमहाद्वीप आज अण्वस्त्र युद्धाच्या कगारीवर जाऊन उभे आहे हे जीनांच्या स्टेटमनशीपचे -म्हणजे त्यांनी दाखवलेल्या उत्पात मुल्याचे- चांगले उदाहरण ठरत नाही. आणि गांधींनी जीना आणि समुदायाने दाखवलेल्या उत्पातमुल्यापुढे बोटचेपेपणा करावा हे हाती गीता ठेऊन फिरणार्‍याने नेतृत्व म्हणून श्रेयस केले का ? यात त्याम्ची स्टेटमनशीप कुठे दिसली ? या बद्दलची साशंकता वाटते. नथुरामचे कृत्य स्पृहणीय नव्हते , पण आंबेडकर म्हणतात तसे गांधींनी स्वतःच्या व्यक्ती पुजेस कुठेतरी आवार घालण्याची, काँग्रेस विसर्जनाचा विचार केला तसा स्वतःच्या व्यक्तिपुजेच्या विसर्जनाचा विचार करणे वावगे ठरले नसते म्हणजे , इतर नेत्यांना स्टेटमनशीप मध्ये सहभागाची अधिक संधी मिळाली असती.

In reply to by बिटाकाका

ब्रिटीशांनी १८५७ अनुभवानंतर हिंदू - मुस्लीम फूट पाडण्याचा विडा उचलला आणि यशस्वी केला - तत्कालीन अँग्लो इंडीयन वृत्तपत्रे आता सहज उपलब्ध होत नाहीत म्हणून त्यांचा नतद्रश्टपणा ठळकपणे पुढे येत नाही , दुसरे असेकी १९ व्या शतका पासूनच रशिया व्ह्याया सेंट्रल एशिया अफगाणिस्तानातून येऊन आपल्या आर्थीक साम्राज्यास धक्का लावेल हि सातत्याची भिती पुढे कम्युनीझमच्या भितीत परावर्तीत झालेली होती, त्यामुळे ब्रिटीशांना अफगाणीस्तानापर्यंत वेळ प्रसंगी हस्तक्षेप करता येईल एवढा इलाका भारता पासून वेगळा ठेवण्यात रस होता , त्या दृष्टीने अगदी राष्ट्रभक्त मुसलमांनानाही प्रलोभने दाखवून फुटतील याची काळजी ब्रिटीश घेत होते यात जीना आलामा इक्बाल इत्यादी मडंळींनी संधी साधली, अर्थात ब्रिटीशाम्नी तोडा आणि फोडा केले म्हणून स्वतःचे राष्ट्र प्रेम विसरुन देशद्रोह करणार्‍या जीना आणि आलामा इकबालांची आरती ओवाळता येत नाही. असो.

In reply to by manguu@mail.com

ब्रिटिशांनी अफगाण बाजूला केला , 1880 ते 1900 सालात जिनांचा जन्म 1876 आणि इकबालाचा 1877

In reply to by manguu@mail.com

ब्रिटीशांना रशियाच्या वाटणार्‍या परंपरागत भितीचा इतिहास , त्या भितीने ते किती ग्रासलेले असत आणि आताही असतात, हा मोठ्या अभ्यासाचा विषय असावा.

In reply to by माहितगार

1880 साली 3 - 4 वर्षाचे असलेले जिना व इकबाल रांगत रांगत गेले ब्रिटिशांना बोलले अफगाण वेगळा करा ! असे चित्र डोळ्यापुढे आले

In reply to by manguu@mail.com

जिना, सावरकर वगैरे मंडळी कुठे, कोणाला भेटल्या मला नाहि माहित. गुजरात इलेक्शनच्यावेळी मणीभाऊ काहितरी बरळला आणि भाजपला निसटता फायदा झाला (हे एक गृहीतक). तसच काहितरी आता होईल अशी शक्यता जाणवली.

Senior advocate Kapil Sibal on Tuesday withdrew the petition challenging vice-president and Rajya Sabha chairman Venkaiah's Naidu decision to reject the notice of removal motion against CJI Dipak Misra from the Supreme Court. या वेळेस, न्यायालयाकडून, अजून एकदा थोबाडीत बसण्याअगोदर गाल काढून घेऊन काँग्रेस+ ने, कर्नाटक निवडणुकीकडे पाहत, आपल्या नाटकाचा अजून एक अंक आटपता घेतला ! गेल्या चार-सहा महिन्यांचा आलेख पाहता २०१९ च्या मध्यवर्ती निवडणूकीअगोदर या नाटकाचे अजून किती अंक पहायला लागतील ते सांगता येणार नाही. देशाच्या सगळ्या वैधानिक संस्था-पदांवर विनापुरावा शिंतोडे उडवत बसण्याचे उद्योग करण्याऐवजी, "स्वतःचे चार गुण आणि भविष्यात करायची इच्छा असलेले दोन प्रकल्प" जनतेसमोर मांडले असते तरीसुद्धा जनतेची जराशी सहानुभूती त्यांना मिळाली असती. स्वतःला घटनातज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातले वरीष्ठ वकील म्हणवणार्‍या लोकांचे असे सर्व नियम-पायंडे सोडून चाललेले वर्तन केवळ खुद्द त्यांच्यासाठीच नामुष्कीचे नाही तर त्यांच्या पक्षांची जनमानसातली पत दिवसेदिवस खालीखाली नेत आहे. हे इतक्या विद्वान समजल्या जाणार्‍या मंडळींच्या ध्यानात येत नाही हे अगम्य आहे !!! (कपाळावर हात मारणारी स्मायली) की, सर्वस्वी अगतिक होऊन ते "विनाशकाले... " या न्यायाने सतत असे वागत आहेत ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत.. काही गरज नव्हती एवढे ताणायची.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कसलं नीट लिहिलंय काका, आवडलं अन पटलं ही, मणिशंकर पाकिस्तानात अन सिब्बल कोर्टात जबरी काम करत आहेत असेच म्हणावे लागेल

धाग्यात ताज्याच घडामोडी असाव्यात ही अपेक्षा.! पूर्वी मराठी मंडळी गप्पांना बसली की गप्पांच्या ओघात नेहमी नेहरू/गांधी/आंबेडकर्/सावर्कर्/जिना येत. गप्पांचा शेवट "सगळे गांधींमुळे झाले' म्हणायची पद्धत होती. काळ बदलला पण ढाचा तोच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गांधी आडवा येतो .या नावाचे एक नाटक आहे म्हणे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नेहरू/गांधी/आंबेडकर्/सावर्कर्/जिना
सध्या तरी चिरंजिवी आहेत . गौतम बुद्ध अपेक्षांना कमी ठेवले म्हणजे अपेक्षा भंगाचे दुख्ख येण्याची शक्यता कमी होते असे म्हणाले असावेत (चुभूदेघे)