सोसायटी - अतिरेकी सुविधा आणि त्याचा मेंटेनन्स
अनेक ठिकाणी लक्सरी सोसायटी होत आहेत आणि त्यात भन्नाट सोइ सुविधा दिल्या जात आहेत . स्विमिंग पूल अनेक ठिकाणी कॉमन आहेत . आता एक क्लब हि असतो ज्यात जिम बरोबर सॉना आणि जाकुझी हि असते. चाक चकित लॉबी असते. अनेक लोकांची सेक्युरिटी असते. काही ठिकाणी छान ग्राउंड , टेनिस कोर्ट , बास्केटबॉल कोर्ट आणि अगदो छोटा गोल्फ कोर्स असलेली घरे येत आहेत .
आता एक लक्षात घ्या कि "फुकट काही हि नसते" आणि या सर्व सुविधा तर नक्कीच नाही . याना प्रचंड मेंटेनन्स कोस्ट असू शकते. तसेच अनेक सुविधा काही वर्षात प्रचंड खर्च काढू शकतात . काही उपकरणे नियमित वापरली नाहीत किंवा मेंटेन केली नाहीत तर प्रचंड खर्च काढतात किंवा नवीन च घ्यावी
आणि महागाई वाढत असल्याने कधी कधी अशा सोसायटी चा मेंटेनन्स काही वर्षाततच प्रचंड वाढू शकतो . काही पटीत सुद्धा . आता ज्यांना परवडत नाही त्या बाबतीत दोन गोष्टी होऊ शकतात - अनेक श्रीमंत लोकांना हे परवडते आणि ज्यांना परवडत नाही त्या वर दबाव येतो . काही वेळा लोकांनी घरे विकली हि आहेत , आणि ते योग्य हि असू शकते.
किंवा जिकडे बहुसंख्य लोकांना परवडत नाही तिकडे या असुविधा पडून रहातात . एके काळी घर शोधत असताना अशा अनेक सोसायटी पहिल्या होत्या ज्यात स्विनींग पुल कोरडे होते , जिम गन्जत पडल्या होत्या , सोसायटी घाण झाली होती !
तेंव्हा
१) जर परवडत असतील आणि वापरणार असाल तर अशा ठिकाणी घर घ्या
२) खूप मेंटेनन्स पडत असेल याची तयारी ठेवलं , आणि तो वाढणार याची तयारी ठेवा
३) फार त्रास होत असेल तर घर बदलणे हा पर्याय असू शकतो
४) अशा सुविधा वाल्या सोसायटीत पूर्ण बनल्यावर घर घेत असाल आणि सुविधा पाहिजे असेल तर या सुविधा कशा मेंटेन केल्या आहेत ते बघा . कोरडा स्विमिंग पूल , घाणेरडे आवार , गांजलेली जिम हे या सुविधा बिलकुल मेंटेन होत नाही याची लक्षणे आहेत . आणि त्या लवकर परत सुरु होतील या वर विश्वास ठेवू नका .. बंद सुविधा कधीरी फार घाण दिसतात किंवा धोकादायक ठरू शकतात ( कोरडा स्विमिंग पूल)
मेंटेनन्स एव्हडा वाढला आहे कि मुंबई काही ठिकाणी १५ ते ३० हजार मेंटेनन्स येऊ शकतो !!
याद्या
3531
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
खरं आहे पण सुटका नाही.
घर घेताना जर स्विमिन्ग पूल
दिल्ली-मुंबईत अनेक मोठ्या
In reply to घर घेताना जर स्विमिन्ग पूल by खटपट्या
सहमत.
सोसायटीत स्विमिंग पूल असावा
In reply to सहमत. by मराठी कथालेखक
सहमत
In reply to सोसायटीत स्विमिंग पूल असावा by विशुमित
१५ % ऍमेनिटी स्पेस ठेवणे