साहित्य
३ ते ४ मध्यम आकाराचे पापलेट, अख्खे, साफ करून, चिरा मारून
१/२ वाटी अमूल बटर
१५ ते २० लसूण पाकळ्या
२ चमचे मीठ
२ चमचे काळीमिरी पावडर
१ चमचा मिक्स्ड हर्ब्स/ओरेगॅनो सीझनिंग
१ चमचा रेड चिल्ली फ्लेक्स
एका लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
पापलेटला काळीमिरी आणि मीठ, आतून बाहेरून लावून साधारण १५ ते २० मिनिटे ठेवावे. तो पर्येंत लेमन गार्लिक बटर बनवून घेणे.
एका छोट्या कढईत, बटर घालावे. गॅस मंद ठेवून त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. मंद आचेवर लसणीचा छान वास सुटेस्तोवर हलवत राहावे (लसूण जळता कामा नये). लसूण शिजला, कि त्यात मिक्स्ड हेर्ब्स, चिल्ली फ्लेक्स घालून अजून १ ते २ मिनिटे बटर हलवून घेणे. गॅस बंद करून त्यात एका लिंबाचा रस घालावा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मिश्रणाची चव घेऊन मीठ घालावे.
ग्रिल पॅन मोठ्या गॅस वर चांगला तापू द्यावा. ब्रश ने थोडंसं तेल लावून, पॅन वर पापलेट भाजायला घ्यावा. एका बाजूला साधारण ३ ते ५ मिनिटे भाजून मग पापलेट दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावा.. दोन्ही बाजूने भाजून झाला कि वरून ब्रशने लेमन गार्लिक बटर दोन्ही बाजूने लावून गरम गरम पापलेट सलाड सोबत सर्वे करावा!
बटर, लसूण, आणि लिंबा मुळे एक अप्रतिम चव येते. अर्थातच पापलेट जितका ताजा तितकी जास्ती ह्याची मज्जा!
मंद आचेवर बटर क्युब्स घोळवत घोळवत मेल्ट करायचे.
‘मंद आच‘ हा की पाॅईंट आहे.
https://youtu.be/l9XtQ4bGb_s
https://youtu.be/84zkT4FIaOk
हे दोन व्हिडीयो रेफरंससाठी.
- (खवय्या) सोकाजी
आता माशाच्या आकाराचे वांगे शोधावे लागेल.
वांगी भेटली तर द्या वानवळा
In reply to आता माशाच्या आकाराचे वांगे शोधावे लागेल. by manguu@mail.com
सुंदर
प्रोत्साहाना बद्दल आभारी आहे.
In reply to सुंदर by कपिलमुनी
खूप सहमत.
In reply to सुंदर by कपिलमुनी
फोटो मस्त
जबरदस्त!!
सुख !
केडी, भीषण भालो.
धन्याबादा....
In reply to केडी, भीषण भालो. by नूतन सावंत
जलचारांची विशेष आवड नाही
फोटो मस्तच!
मिपावरच्या अश्या पाकृ पाहुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing part 2प्रेझेंटेशन दिमाखदार आहे.
करणार!
बटर पार वितळून गेलंय, गार्लिक
साॅस क्रिमी कसा करायचा जरा
In reply to बटर पार वितळून गेलंय, गार्लिक by सोत्रि
मंद आचेवर बटर क्युब्स घोळवत
In reply to साॅस क्रिमी कसा करायचा जरा by केडी
मंद का, बरं बरं...
In reply to मंद आचेवर बटर क्युब्स घोळवत by सोत्रि
ह्म्म...
In reply to मंद आचेवर बटर क्युब्स घोळवत by सोत्रि
जबराट !!!
लय भारी.
वॉव!
नवनीत अवगुंठीत लसुण अन लिंबू
मस्त रेसिपी. जबरदस्त सादरीकरण