पोरगी एके दिवशी म्हणाली, "मम्मा मला सुमीतशी लग्न करायचे आहे"..
मी उडालोच !!
कारण पोरीची अजून वय वर्षे चार पुर्ण व्हायची होती. सध्या नर्सरीमध्ये शिकते.
तसे या फ्रेंडबद्दल थोडी कल्पना होतीच. कारण गेले काही दिवस घरातल्या भिंती आणि वह्यापुस्तके या सुमीतच्या नावाने रंगत होती. आधी आम्हाला वाटले, असेल एखादा फ्रेंड. लिहायला सोपे म्हणून लिहितेय. तसेही पोरगी न शिकवता स्वत:च्या मनाने काहीतरी लिहीतेय याचेच आम्हाला फार कौतुक. पण प्रकरण ईथवर गेले असावे याची कल्पना नव्हती :)
मम्माने समजूतदारपणे आधुनिक पालकांच्या भुमिकेत शिरून विचारले,
"का बेटा? का लग्न करायचेय त्याच्याशी?"
"अग्ग मम्मा, मला तो फार आवडतो. माझे त्याच्यावर प्रेम आहे" ..
आता आम्ही दोघेही एकत्रच उडालो.
तरी पुढच्याच क्षणी सावरून मम्माचा पुढचा प्रश्न,
"तुला तो का आवडतो?"
(प्रेम हा शब्द आम्ही मुद्दामहून टाळला)
"तो माझा फ्रेंड आहे. तो माझ्याशी टिफिन शेअर करतो" ... हे ऐकून थोडासा जीवात जीव आला. मी चक्क मोठ्याने हुश्श केले.
"तुझे बाकीचे फ्रेंड नाहीत का?"
"हो, आहेत ना.. आर्या, अपूर्वा, मनाली"
"मग ते तुझ्याशी टिफिन शेअर नाही करत का?"
"हो, करतात ना"
"मग ते तुला आवडत नाहीत का?"
"हो आवडतात ना.."
"मग तुला त्यांच्याशी लग्न नाही करायचे का?"
"अग्ग मम्मा, त्या सर्व गर्ल आहेत ना. मग गर्ल आणि गर्ल कसे लग्न करणार :)
आम्ही पुन्हा कपाळाला हात लावला.
---------------------------------------------------------------------
आमच्या संभाषणातील शब्दन शब्द जसाच्या तसा आठवून लिहीला आहे.
फक्त मुलाचे नाव तेवढे बदलले आहे.
क्या करे, खानदान के ईज्जत का सवाल है :)
पण स्मार्ट जनरेशन म्हणत हा किस्सा हसण्यावारी न्यावा असे वाटत नाही. दुर्लक्ष करून सोडून द्यावे अशी तर जराही ईच्छा नाही. हल्ली सभोवताली काय चालू आहे याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. चार वर्षांच्या कोवळ्या जीवांसोबतही ज्या संतापजनक घटना घडत आहेत, खरे तर लिहावेसेही वाटत नाही, पण या परिस्थितीपासून पळूनही जाता येत नाही. तर ईतर सुरक्षिततेसोबत आपल्या मुलामुलींच्या अज्ञानाचा कोणी फायदा उचलू नये याची काळजीही आहे.
तर प्रश्न असे पडलेत, या वयाच्या मुलांना काय समजवावे? कितपत ज्ञान द्यावे? कुठल्या वयात द्यावे? कसे द्यावे?
सध्या शाळेत याबाबत काहीच सांगितले जात नाहीये. बॅड टच, गुड टच हे मागे सत्यमेव जयतेमध्ये पाहिले होते. ते कोणत्या वयात समजावले जाते? शाळेत शिकवतात का आपण घरीच समजवायचे असते? त्याव्यतिरीक्त तिच्या डोक्यात बसलेले हे गर्ल-बॉय लग्न कन्सेप्ट कसे काढावेत? वा तशी गरज आहे का?
खरे तर ईथे प्रश्नही काय विचारावेत हा देखील माझ्यासाठी प्रश्नच आहे. त्यामुळे स्वत:तर्फे काही काळजीचे मुद्दे मांडलेत तरी आवडेल.
ईथे जर जुनी काही चर्चा झाली असेल, काही उपयुक्त माहितीचे धागे असतील, तर त्या धाग्यांच्या लिंक मिळाल्या तरी आवडेल.
- आभारी आहे,
याद्या
14219
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
@ भन्नाट भास्कर,
धन्यवाद, एखाद्या संकेतस्थळावर
In reply to @ भन्नाट भास्कर, by अनिंद्य
हाहा
बरीच चांगली पुस्तके अाहेत या विषयावर
मुलांना लैंगिक बाबी कश्या,
मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?याबाबतीत हा व्हिडिओ उपयोगी सुरुवात होऊ शकेल... युट्यूबवर अजून खूप आहेत. ते पाहून योग्य वाटेल ते व्हिडिओ मुलांना दाखवणे ही उपयोगी सुरुवात होऊ शकेल.जे जसं समोर येईल तसं त्याला
माझे मत
In reply to जे जसं समोर येईल तसं त्याला by पिलीयन रायडर
काहि मुद्द्यांशी असहमत
In reply to जे जसं समोर येईल तसं त्याला by पिलीयन रायडर
मुलींनी मारलं तर माझा मुलगा
In reply to काहि मुद्द्यांशी असहमत by मराठी कथालेखक
आणि नातेवाईक, मित्र वगैरे
In reply to जे जसं समोर येईल तसं त्याला by पिलीयन रायडर
मुलांच्या हितासाठी थोडा
In reply to आणि नातेवाईक, मित्र वगैरे by भन्नाट भास्कर
हमम, ईथे नातेवाईकांचे आणि
In reply to मुलांच्या हितासाठी थोडा by मराठी कथालेखक
तुम्हाला स्वतःला लैंगिक बाबी
मुलांना कसे सांगायचे ते
In reply to तुम्हाला स्वतःला लैंगिक बाबी by श्रीगुरुजी
समजा नाही समजावल्या तरी हरकत नाही. मुले ते स्वतःच शिकून घेतील.
In reply to तुम्हाला स्वतःला लैंगिक बाबी by श्रीगुरुजी
ह्म्म
काळ बदलला आहे
मागील शेकडो पिढ्यांनी
In reply to काळ बदलला आहे by कपिलमुनी
आपल्याला कोणी माहिती दिली व त्याचा काही तोटा झाला का?
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी by श्रीगुरुजी
मागील शेकडो पिढ्यांनी कधी
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी by श्रीगुरुजी
LLRC
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी कधी by टवाळ कार्टा
पुस्तकी शिक्षण आणि लैंगिक
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी कधी by टवाळ कार्टा
त्याच हिशोबाने आधीच्या लाखो
In reply to पुस्तकी शिक्षण आणि लैंगिक by श्रीगुरुजी
कामप्रेरणेप्रमाणेच अन्नसेवन
In reply to त्याच हिशोबाने आधीच्या लाखो by टवाळ कार्टा
कामप्रेरणा निर्माण होण्याआधी
In reply to कामप्रेरणेप्रमाणेच अन्नसेवन by श्रीगुरुजी
तत्वतः सहमत
In reply to पुस्तकी शिक्षण आणि लैंगिक by श्रीगुरुजी
धन्यवाद!
बरोबर
In reply to धन्यवाद! by लई भारी
धाक
मला वाटते प्रायमरी पर्यंतची
In reply to धाक by श्वेता२४
हल्ली मुलांच्या लैंगिक शोषण
In reply to मला वाटते प्रायमरी पर्यंतची by माहितगार
उसगावात तर शाळेच्या बाहेर '
In reply to धाक by श्वेता२४
लग्न
आणि हो, माझाही मुलगा त्याच्या
अगदी सौ टके की बात.
In reply to आणि हो, माझाही मुलगा त्याच्या by पिलीयन रायडर
हो, ज्या अर्थी त्या मुलाने
In reply to अगदी सौ टके की बात. by आनन्दा
मानस / वैद्यकांनी मार्गदर्शन करावे
In reply to अगदी सौ टके की बात. by आनन्दा
४ वर्षाच्या मुलाला त्या
In reply to अगदी सौ टके की बात. by आनन्दा
बरोब्बर!
In reply to आणि हो, माझाही मुलगा त्याच्या by पिलीयन रायडर
मुलांना लैंगिक बाबी कश्या,
मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?कधी सांगाव्यात हा अवघड प्रश्न आहे असे वाटते पण कश्या आणि किती हे बर्यापैकी सेप्पे आहे. ह्या विषयावरील म्हाग्रुंची वेबसीरीज अतिषय उत्तम होती >+१
In reply to मुलांना लैंगिक बाबी कश्या, by प्रसाद गोडबोले
मस्त आहे ही वेबसिरीज. मागे
In reply to मुलांना लैंगिक बाबी कश्या, by प्रसाद गोडबोले
माझ्या मुलाला
भावंडाचा फायदा
उत्तम चर्चा.