मिणमिणता दिवा ..
मरगळलेल्या मनाला आशेची चाहूल लागली .
कंटाळलेल्या वर्तमानाला भविष्याची पालवी फुटली.
असाच कोणीतरी देवदूत पहाटे पहाटे समोर आला….
“तुला काही प्रश्न असतील तर उत्तरे मनात फुलवीन” म्हणाला .
जीवनाचे रहस्य काय ?संघर्षाचे बीज काय ?
आनंदाचे आणि वेदनेचे प्रयोजन काय ?
श्री कृष्ण ,मोहम्मद आणि येशूचे साध्य काय ?
त्यांना काय करायचे होते ? ते पूर्ण झाले काय ?
मी हसलो ...तो गोंधळला ….
म्हणाला ..”अरे वेड्या ..मी इथे न बोलवता आलो आहे !
तुला उत्तरे द्यायला ..आणि तू असा हसतोस काय ?”
मी म्हणालो ...अरे प्रश्न माणसांचे ...त्यांनीच उत्तरे शोधायला हवीत !
उत्तरे शोधायला देवदूताला यावे लागले,इथेच ..
देवाच्या योजनेत नक्की काही तरी चुकले
प्रश्न माझ्या मनात असतील तर ..उत्तरेही असलीच पाहिजेत .
फक्त शोधण्याची गरज आहे …
देवदूताची इथे गरज कुठे आहे ?
आता हसण्याची पाळी देवदूताची होती ...तो हसून म्हणाला ,
“ अरे सगळा गुंता इथेच तर आहे ! सगळा घोळ या मनाचा आहे….
मनाच्या बाहेर गेलास तर सारे काही स्वच्छ आहे !
हे जर तुला जमले तर तूच तुझा देवदूत ! “
देवदूताने आपले काम केले ..
मनाच्या कोपऱ्यात एक मिणमिणता दिवा लावून गेला ..
मार्गावर माझ्या ..प्रकाश आपोआप पडत गेला ...
जयंत नाईक
***********************************************************************************************
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1900
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
छान आहे . आवडेश एकदम येगळी .
व्वा काय बाते , भारी !!
उत्तरे बरोबर आहेत हे कसे समजते
In reply to व्वा काय बाते , भारी !! by माहितगार