Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २९

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 15/04/2018 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल. भाजप - ७८ ते ८६ कॉन्ग्रेस - ९० ते १०१ निजद - ३४ ते ४३

वाचने 53939
प्रतिक्रिया 189

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे. नबाब म्हणजे दुसरा राहुल आहे. मागे एकदा आरोप केला होता की गिरीश बापटांनी तूरडाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. १५-२० दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला. महिनाभराने हा आकडा २०००० कोटींवर नेला. तो सातत्याने बाष्कळ आरोप करीत असतो. त्याच्या बरळण्याची कोणीही दखल घेत नाही.

In reply to by arunjoshi123

अगं बये, पोस्ट मार्टमच्या वेळी असे डाग पडतात! ---- तुमच्या माहीतीसाठी सांगतो, ती गधडी बहीण एक प्रतिष्ठीत डॉक्टर आहे.

नवी दिल्ली: न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. याप्रकरणातून केवळ न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी किंवा इतर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार नाही, असा स्पष्ट निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय देताना लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
--- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supreme-court-judgem… --- कॉंग्रेसी नेते/समर्थकांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक हाणली आहे. गेले कित्येक महिने जस्टिस लोया यांच्या नैसर्गिक मृत्यूचे भांडवल करुन स्वत:ची राजकिय पोळी भाजून घेत होते.

आता दहा वर्षात अमेठीचे सिंगापुर हाँगकाँग करणार , :- -- ईती युवराज राहुल गांधी , गेली ६५ वर्षे अमेठीमध्ये ह्यांचेच राज्य होते हे विसरलेले आहेत !! असा माणुस देशाचा पंत प्रधानपदाचा प्रतिस्पर्धी होणार ह्याचा विचार करुन जीवाचा थरकाप ऊडतो.

In reply to by manguu@mail.com

तसा दावा करत ते फिरत आहेत का? गेली कित्येक वर्षे राज्य केल्यावर असा दावा करणे हास्यास्पद वाटत नाही कि अशा दाव्यांचे समर्थन करणे मजबुरी आहे कसली?

In reply to by manguu@mail.com

नेहमीप्रमाणे गोलपोस्ट चेंज करणे आहे का हे? ********************* खडे टाकण्यापेक्षा जरा लिस्ट करा की राव काय काय १०० दिवसात करायचे ठरले होते, म्हणजे मग कळेल तरी! ******************** नोटबंदीचे स्वतंत्र धागे आहेत, परत जाऊन वाचा असे सुचवेन. ******************** सिंगापूर बनवून दाखवतो या स्टेटमेंटला तुमचे समर्थन आहे? ५१ पैकी ५० वर्षे काँग्रेस आणि गेली १९ वर्षे मतापुत्र आहेत तिथे खासदार, पैकी १० वर्षे त्यांचेच सरकार. अशी परिस्थिती असताना हे वक्तव्य करत आहेत आणि अंधविरोधक समर्थनार्थ उद्या मारत आहेत. मज्जाय!

In reply to by बिटाकाका

तुमच्या रथयात्राही कधीपासून सुरु आहेत. एव्हाना प्रभूंचे अडीच तीन वनवास झाले असतील नै ! पण आमी नाय हसत तुम्हाला. नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ?

In reply to by manguu@mail.com

तुमचे मुद्दे वेगळे आहेत, त्यावर वेगळी चर्चा करूयात, कसे? सध्या त्यांच्या सिंगापूर करण्याबद्दल काय म्हणणे आहे तेवढे बोला ना, इकडचं तिकडचं का बोलत आहात? आणि तुमच्या, तुम्हाला म्हणजे नेमकं काय तेही लगे हाथ सांगून टाका.

In reply to by बिटाकाका

शब्दप्रयोग बदलावे अशी विनंती. सिंगापूर करण्यावर आक्षेप कसला ? प्रश्न असा आहे कि यांचे पिताश्रीनी अमेठी बारामतीसारखी विकसित करायची इच्छा प्रकट केली होती , ती तरी पूर्ण झाली का ? आधीचं टार्गेट मीट न करता नवं टार्गेट उभं करतायत (यात काय समजायचं ते समजायचं)

In reply to by manguu@mail.com

नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ? तुम्ही त्यांना मत दिलं होतं का?

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच फॉरेन्सिक लॅबने कठुआ घटनेचा अहवाल सादर केला आहे. या मंदिरात पीडित मुलीचे केस सापडले असून त्याची तपासणी केली असता तिचा डीएनए प्रोफाइल आरोपी शुभम सांगरा याच्याशी मिळत असल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीच्या कपड्यावर मिळालेले रक्ताचे डागही तिच्या डीएनए प्रोफाइलशी मिळत असून तिच्या गुप्तांगाजवळ रक्त आढळून आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचं विशेष पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र पुरेसे पुरावे नसल्याने या पथकाला अडचणींचा सामना करावा लागत होता. आरोपींनी काही पोलिसांशी हात मिळवणी करून पीडित मुलीचे कपडे धुऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल होता. काश्मीरच्या फॉरेन्सिक लॅबलाही कपड्यांवर रक्ताचे डाग मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांना बलात्काराचा निष्कर्ष काढता आला नव्हता. परिणामी एसआयटीला आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करता आला नव्हता.  त्यामुळे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी गृहमंत्रालयाला विनंती करून दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅब द्वारे पुराव्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती. मार्चमध्येच पीडित मुलीचे कपडे आणि इतर पुरावे तपासणीसाठी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर आरोपी पोलीस अधिकारी दीपक खजुरीया, शुभम सांगरा आणि परवेशच्या रक्ताचे नमूनेही पाठविण्यात आले होते.  https://m.maharashtratimes.com/india-news/delhi-forensic-lab-report-str…

In reply to by बिटाकाका

होय. प्रश्नंच नाही. कर्नल पुरोहितांनी सिमी ( = स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) फोडंत आणली होती. त्याची शिक्षा म्हणून त्यांना गुंतवण्यात आलं. -गा.पै.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ६ नगरपालिकांचे निकाल लागले. भाजपने ४ जिंकल्या, नारायण राणेने एक जिंकली आणि बाकी एका ठिकाणी स्थानिक आघाडी निवडून आली. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोपळा मिळाला. आज झारखंडमधील स्थानिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपने ३४ पैकी २१ महापौर पदांवर विजय मिळविला. एवढे वाईट काम भाजप करीत असेल तर ते निवडून कसे येत राहतात? https://www.indiatoday.in/india/story/jharkhand-nagar-panchayat-electio…

In reply to by विशुमित

तरीसुद्धा आता निवडणुकांत VVPAT वापरतात. मागच्या वर्षी नांदेडच्या निवडणुकांनंतर याची सुरुवात झाली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी आणि खरे हा सदाशिवपेठी जोक तुम्हाला समजेल अशी अपेक्षा होती. मी फक्त EVM म्हटलं EVM घोटाळा नाही. बाकी चोराच्या मनात चांदणं ही सुसंस्कृत म्हण आठवली. * टाकायची गरज भासली नाही.

In reply to by विशुमित

कोणाच्या मनात चांदणं किंवा अजून वेगळंच काहीतरी, हे सर्वांनाच ठाऊक आहे. बरं, तुमच्या आदरणीय साहेबांचे हे नवीन उद्योग पहा. https://m.rediff.com/news/report/impeachment-the-pawar-factor/20180421…

In reply to by विशुमित

हा उद्योग साहेबांच्या पाताळयंत्रीपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी कितीही आपटली आणि असले कितीही उद्योग केले तरी त्यांची इनिंग केव्हाच संपलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काय सांगताय श्रीगुरुजी? पवारसाहेबांकडे पैसे नाहीत?
"Most of us represent smaller parties. Whatever the public perception, neither we nor our parties have the wherewithal to fight expensive court battles if cases were to be filed against us out of sheer vindictiveness for pursuing the impeachment motion," an Opposition MP said.
नोटाबंदी चांगलीच डसलेली दिसतेय! आ.न., -गा.पै.

In reply to by विशुमित

हा जोक मला समजला तरी सर्वच लोकांना समजेल असे नसते म्हणून सार्वजनिक न्यासावर सरळ अर्थ असणाऱ्या गोष्टीच लिहाव्या लागतात. यामुळे काही लोकांचा मला जोक समजत नाही असा (गैर) समज झालेला आहे. वाच्यार्थ व्यंगार्थ समजून घेण्याची कुवत प्रत्येकाची असेल असे नाही. माझ्या सुरुवातीच्या काही लेखांमध्ये लोकांनी गदारोळ केल्यानंतर मी शहाणा झालो आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तपासून पाहू शकता.

In reply to by सुबोध खरे

जोकमुळे वातावरणात खुपच seriousness आला. जाऊ द्या द्या सोडून नाहीतर एवढं ग्यान ऐकून मी serious होयचे ...चिल्याक्स...!!

In reply to by मार्मिक गोडसे

इतरांच्या सर्जनशील व अमूर्त प्रतिभेच्या आविष्काराला संधी मिळावी यासाठी मुद्दामच * टाकलाय.

In reply to by श्रीगुरुजी

इतरांच्या सर्जनशील व अमूर्त प्रतिभेच्या आविष्काराला संधी मिळावी यासाठी मुद्दामच * टाकलाय. अमूर्त विनोद समजत असेल त्यानेच टाकावे.

२०१९ जवळ येईल तसे भक्तांची भाषा सात्विक- राजसी- तामसी अशी बदलत आहे. पूर्वी जो तामसी भाव त्यांच्या मनातच होता तो आता परा-पश्यति-मध्यमा - वैखरी असा दृग्गोचर होत आहे.

कोट्याधीश परीवारातीय्ल मोक्ष शेठ नावाच्या २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जैन तरुणाने संन्यास घेण्याचे ठरव्ले आहे आणि टाइम्स ऑफ इंडीया वृत्तात अलिकडे अजूनही काही श्रीमंत जैन तरुणांनी केल्याचे वाचनात आले. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तरीही, घरात जो काही पैसा आहे तो राष्ट्रीय उत्पादन वाढीस लावण्यासाठी आपले षिक्षण कामात न आणता अवेळी संन्यास वगैरे कै पॉईंट समजत नाही.

In reply to by माहितगार

कोट्याधीश परीवारातीय्ल मोक्ष शेठ नावाच्या २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जैन तरुणाने संन्यास घेण्याचे ठरव्ले आहे आणि टाइम्स ऑफ इंडीया वृत्तात अलिकडे अजूनही काही श्रीमंत जैन तरुणांनी केल्याचे वाचनात आले.
वर वर निरुपद्रवी/कौतुकास्पद/धार्मिक/अध्यात्मिक/ भासणार्‍या असल्या गोष्टींमागील अंदरकी बात काही वेगळीच असणार (काही प्रॉपटी , टॅक्स वगैरे चा लोच्या किंवा असेच काहीतरी) . माझ्या माहितीतला एक अरबोपती जैन व्यापारी असले काहीबाही करत असतो. मात्र नक्की काय हे खोलात जाऊन तपास केल्याशिवाय उलगडणे कठीण. आर्थिक क्षेत्रातले तज्ञ मिपाकर यावर काही प्रकाश टाकतील का ?

_________________________________________ Good riddance. आता शत्रुघ्न सिन्हानेही यांचे अनुकरण करावे.

'राज्यातील सन २०११च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी कायदा बनवण्यात आला असून, त्या विधेयकाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर अशा झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे बेकायदा झोपड्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांतील २०११ सालापर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्यावी तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत संबंधित लाभार्थींना ४०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या शहरांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या बेकायदा झोपड्यांबाबतच्या प्रश्नावरील उपाययोजनांची माहिती सादर केली. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबतचीही माहिती दिली. 'झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किमान ३० मीटर ते ४० चौ. मीटरपर्यंतचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शक्य आहे तेथे ४०० चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबई व मोठ्या शहरांतील हे दोन मोठे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने घेतलेल्या या पवित्र्यामुळे घरांचा प्रश्न सुटण्यासही मदत होणार आहे. ------------------------------------------------------- काँग्रेसच्या काळात हेच झाले असते तर टॅक्स पेअरचा पैसा बर्बाद झाला म्हणून गदारोळ झाला असता.

माझ्या भावाला काँग्रेस पक्षाने तिकिट द्यावे अशी विनंती मी प्रियंका गांधींना केली होती. त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली आणि रायबरेलीतून कोणत्याही ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नाही असे म्हटले. मात्र नंतर त्यांनी माझ्या भावाला हरचंदपूर येथून तिकिट दिले. https://www.loksatta.com/desh-videsh-news/be-it-sonia-or-priyanka-none-… भावाला तिकिट दिले नाही म्हणून काँग्रेस सोडून भाजपात जायचे आणि म्हणायचे .. काँग्रेसात घराणेशाही आहे म्हणून भाजपात जात आहे. गंमतच करतात लोकपण !!

In reply to by बिटाकाका

ध्रुतराष्ट्राला पुत्रमोह होता म्हणे .. ( मग पांडू तरी का वनवासात गेला होता ? संभोग व पुत्रसुख मिळणार नाही म्हणूनच ना ? ) गुरु द्रोण सर्व मुलाना घागर द्यायचे म्हणे - नदीतून पाणी आणायला. सर्वांच्या घागरीची तोंडे अगदी बारीक असायची , ते उशीरा परत यायचे. फक्त अश्वत्थाम्याला मात्र रुंद तोंडाची घागर द्यायचे. तो लवकर आला की इतर मुले यायच्या आत ते त्याला स्पेशल मंत्र शिकवायचे म्हणे ! घराणेशाहीला फक्त ३ लोक विरोध करतात... ( असे माझे मत आहे. ) १. ज्याना बायको नाही २. बायको आहे , पण मुले नाहीत ३. मुले अजुन अज्ञान आहेत. ते कुणीतरी होते ते काँग्रेसच्या घराणेशाहीला फार्फार विरोध करायचे. त्यांची पुढची आणि त्याच्यापुढची पिढी सज्ञान झाल्यावर आता त्यांचा पक्ष इतरांच्या घराणेशाहीबद्दल बोलत नाही . !!!

In reply to by manguu@mail.com

गुरु द्रोण सर्व मुलाना घागर द्यायचे म्हणे - नदीतून पाणी आणायला. सर्वांच्या घागरीची तोंडे अगदी बारीक असायची , ते उशीरा परत यायचे. फक्त अश्वत्थाम्याला मात्र रुंद तोंडाची घागर द्यायचे. तो लवकर आला की इतर मुले यायच्या आत ते त्याला स्पेशल मंत्र शिकवायचे म्हणे !
महर्षी व्यास महामूर्ख होते. इतकं गलथान उदाहरण देणारा माणूस मूर्खच असणार. १. राजकुमार पाणी भरायचे? २. ५+१००+१ इतके लोक पाणी भरायला? बाकीचे देखील भरत असतील ते असो. ३. इतक्या घागरी? अरे काही लॉजिस्टिक्स? ४. रुंद आणि अरुंद तोंडाच्या घागरी भरायला किती वेळेचा फरक पडतो? हे लायनीनं थांबायचे की एकदाच घाटावर पाणी भरायचे? ५. बापाला पोरासोबत चंद सेकंद जास्त मिळत नाहीत? आमच्या मास्तरला त्याच्या पोरासोबत आमच्यापेक्षा फक्त काही सेकंद जास्त मिळतात? ६. रुंद तोंडाची घागर जास्त डचमळते. ७. पिठात पाणी का कैतरी घालून त्याला दूध म्हणून द्यायचे इतकी गरीबीची कहाणी आहे द्रोणाची. मग इतके पावरफुल मंत्र असताना ? ८. आन ते पिठाचं पाणी पिऊ घालताना, कौरव भेटायच्या अगोदर, शिकवायचे ना मंत्र?

Rajya Sabha chairman Venkaiah Naidu rejects Opposition notice for removal of chief justice Dipak Misra यासंबंधात, स्वतःच्याच पक्षातल्या विधितज्ञ वकिलांकडून घरचाच आहेर मिळाला असला तरी, काँग्रेस पक्षातील काही मंडळी आता सर्वोच्च न्यायलयात खटला दाखल करण्याची भाषा करत आहेत. असा रडीचा डाव ताणत बसल्याने लोकांत हसू होत राहते आणि त्याचा फायदा शेवटी भाजपलाच होते, हे या हुशार लोकांच्या अजूनही कसे घ्यानात येत नाही ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कपिल सिब्बल यांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केलीये की :
सरन्यायाधीश मिश्रा जोपर्यंत पदावरून पायउतार होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कोर्टात पायच ठेवणार नाही
च्यायला कपिल सिब्बलची चड्डी सुटलीये. चड्डीची नाडी सापडंत नाही तोवर तो कोर्टात पाउल ठेवणार नाहीये. मोठे उपकारंच झाले म्हणायचे जनतेवर. -गा.पै.

होना,मुंडण करीन, पांढरी वस्त्रे वापरेन, जमिनीवर झोपन अशी काहीतरी भीमदेवी थाटात गर्जना करायला हवी होती.

In reply to by श्रीगुरुजी

गर्जना मुंडनाची तर चौकात वस्तरा घेऊन थांबावं लागेल ना हो. ==================================================== पोकळ बांबूचे फोक हे मोदींची स्वतःची सुचवणी होती!!!!!!! समजलात काय??

In reply to by मार्मिक गोडसे

"भारताची फाळणी माझ्या मड्यावरून होईल." (मंजे होणार नाही याची मी गॅरंटी देतो.) अशी एक लै मोठ्ठी राणा भीमादेवी गर्जना एका काँग्रेस्याने केली होती. (त्यामुळे भारतीय लोक लै चिल राहिले होते, आन आक्रित झालं होतं). त्यावेळी चौकात काय घेऊन गेला होतात?

In reply to by मार्मिक गोडसे

मध्यंतरी एक गोरी मड्डम नवर्‍यासोबत प्रचाराला गेली. नेमका तिला कंटाळा आला नि प्रचाराला गेली नाही त्याच सभेत तिचा नवरा बाँबस्फोट होऊन मेला. त्यावेळी तिने ही एक राणा भीमादेवी थाटात गर्जना केली. तीच गर्जना एका पुरोगाम्याने लेकरांची शपथ घेऊन केली. सावकाश त्या मोडल्या गेल्या. गोडसे साहेबांचे वस्तरे, फोकं, इ इ त्यावेळी सर्विसला दिले होते.

In reply to by मार्मिक गोडसे

१. केवळ महाभियोग चालवता येतो म्हणून चालवायचा (तितके संख्याबळ आहे म्हणून कार्यवाही चालू करायची) हे योग्य आहे काय? २. मुख्य न्यायाधीशांनी नक्की कोणता नियम उल्लंघिला आहे? कोणता गैरव्यवहार केला आहे? ३. .... ४. .... ५. .... असे अनेक प्रश्न आहेत. त्यांवर चर्चा करा. आपल्या गर्जनांचं मेरीट (सध्याला मानू, आहे म्हणून) हा मुद्दा असू शकत नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

'या काळाबाजारवाल्यांना फासावर लटकावले पाहिजे' ऐसी रा.भी. थाटात कोंण गर्जना करांयचें बरें? साक्षात पप्पूपितामातामहच (*१) की! प्रत्यक्ष जवाहरखान नेहरूंच्या तब्बल १७ वर्षांच्या पंतप्रधानकीच्या कारकीर्दीत एकही काळाबाजारवाला फाशी गेला नाही. -गा.पै. *१ - पप्पूपित्याचा मातामह

In reply to by manguu@mail.com

भ्रष्ट काँग्रेसी नेत्यांना फासावर लटकवा ! व्वा वा !! देशाबाहेर ह्याच नेत्यांनी पाठवलेले पैसे मात्र ह्यांच्या झोळीत टाकायचे ! व्वा काय न्याय आहे !! ह्या न्यायाने पैसे मागणार्या ह्या लोकांना सुद्धा फासावर लटकवल पाहीजे !!