मातीच्या भांड्यातला पालकगोश
ही एकदम सोपी साधी कृती आहे. गरमागरम पालकगोश आणि पराठे मस्त लागतात. कल्पनाशक्ती ताणून पहा, तुम्ही आळसाहून सोप्यावर पडून आहात. बाहेर मुसळधार पाउस पडतोय आणि स्वंयपाकघरातून मटण शिजतानाच सुगंध... तुम्ही उठून स्वंयपाक खोलीत आलात म्हणून समजा(आणि त्यानंतर आत जेवण कोण करतय त्यावर बरेच अवलंबून आहे नंतरची रीयक्शन) :)
बरे कृती कडे वळूया,
१ किलो बकर्याचे कोवळं मटण,
१ पालक जुडी धूवून, निथळून ठेवलेली,
३ चमचे आले,लसूण,कोथींबीर्,पुदीना ची पेस्ट्,(ही आवडीप्रमाणे प्रमाण प्रत्येकाचे कमी ज्यास्त करावे),
३ चमचे दही,
१ चमचा कश्मीरी मिर्च मसाला,
२ चमचे गरम मसाला,
१ चमचा तिखट,
४ ,५ सुख्या लाल मिरच्या,
तेल प्रमाणानुसार,
मिठ चवी प्रमाणे,
३ मोठे कांदे पातळ कापलेले,
सुखा खडा मसाला : फोडणीला १ मसाला वेलची, २ साधी वेलची, २ काड्या दालचीनी, २ तेजपत्ता, थोडेसे केसर, ४-५ दाणे काळमीरी, ३-४ दाणे लवंगा,
चपातीचे पिठ अथवा फॉइल मडक्याला बंद करायला.
मुरवणी:
मटण नीट साफ करून त्यात हळद्,तिखट्,गरम मसाला, आले पेस्ट, दही कश्मिरी मिर्च घालून मुरवत ठेवा बाहेरच १ तास.
साफ सफाइ:
पालक कच्चाच बारीक वाटून घ्या.
फोडणी:
मातीचे भांडे गरम पाण्यात बुडवून ठेवा आधी १५ मिनीटे. हे देसी दुकानातून आणा. अमेरीकेतील भांडे हे फक्त अवन साठीच योग्य असते.गॅस मंद ठेवून मातीच्या भांड्यात तेल घाला. मग कांदा मस्त हळूवार परता. गुलाबी असु द्या. काळा होवु देवू नका. वरील खडा मसाला त्यात टाकून परतत रहा. आता मटण घाला आणि परता. पाणि अजाबात नाही घालायचे.:) खमंग वास आला की आता झाकण ठेवा. त्याच झाकणावर गरम पाणि टाकून ठेवा. बाजूने चपातीच्या गोळ्याच्या चकतीनी तोंड बंद करा. नाहीतर फॉइल वापरा ,चपाती फुकट जाईल असे वाटत असेल तर. मधून मधून पाणी संपत असे वाटले की गरम पाणिच झाकणात ओता पण झाकन अजाबात उघडायचे नाही. साधारण ४५ मिनीटाने वाटलेला पालक टाकावा. आता झाकण थोडेसे उघडे ठेवून शिजवावे. जवळपास एक तास निवांत पडा नाहीतर गप्पा मारा कोणाशी. मटणाची हड्डीपासून मांस मस्त गळून पडते. खूप चिवट नाही वा खूप नरम नाही.
वाचने
5973
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
ख्खल्लास्स !
धन्यवाद!
अहाहा!!
बेसनलाडू,
घुंगरू मटण
हम्म . .
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
१९६९ - २००९
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
चला...
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
तात्या ते
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
:)
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
तात्या अभ्यंकर अमर रहे !!!!
सही
अरेरे! हे