बर्याच दिवसापुर्वी शिवथरघळ येथे जाण्याचा योग आला होता. आजकाल होणार्या उकाड्यामुळे अचानक या ठिकाणाची आठवण झाली.
तर शिवथरघळ..भोर तालुक्यापासुन थोड्याच अंतरावर असलेले हे छोटेसे ठिकाण. आजुबाजुला रम्य हिरवीगार दाट झाडी आणी अबोल शांतता, पण मधेच तिचा भंग करीत कोसळणारा प्रचंड धबधबा आणी त्यामुळे तयार झालेली घळई. अशा धबधब्याचे तुषार अंगावर उडतात तेव्हा अगदी अमृतवर्षाव झाल्यासारखे वाटते. खळखळ वाहणारे पाणी जणु संगीताचा अपरिचीत रागच छेडते जसे. मुक्तविहार करणारे पक्षी आणी त्यांच्याबरोबर खेळणारी थंड हवा. सुर्यामुळे सोनेरी झिलई मिळालेली रानफुले तर फारच मोहक वाटतात अशा वातावरणात. या सर्व गोष्टींचा मोह झाल्यामुळेच कदाचित रामदासांनी ही जागा दासबोध ग्रंथ रचण्यासाठी निवडली असावी. रडवेलं झालेलं मुल जसे आईच्या कुशीत गेल्यावर सुखावते तसाच आनंद झाला मला या निसर्गाच्या कुशीत. सर्वाचा विसर पडावा अशी ही माया.
हे सर्व अनुभवले कि असे वाटते कि नको तो ईहलोकातला यंत्राचा माणुस. रहाव इथेच आणी घ्यावा आनंद या निसर्गाच्या अनोख्या कलेचा. शहरातल. धावपळीच्या जीवनात गुरफटुन गर्दीच्या चकीत पिसण्यापेक्षा आणी प्रदुषणाचं कोरड विष पिण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जगणे कितीतरी सुखकर. निसर्ग मानवाला इतके काही देऊ करीत आहे आणी करंट्या नशिबाच्या माणसाला त्याच्याकडे ढुंकुनही पहायला वेळ नाही. म्हणुनच अशा ठिकाणी क्षणिकच का होइना पण आनंद उपभोगण्यात जी मजा आहे तिची सर स्वर्गातल्या सुखसोयींनाही येणार नाही कदाचित.
पण आता या सुखाचा मोह त्यागुन पुन्हा यांत्रिक जगात जावे लागणार म्हणुन मन व्यग्र झाले. पण काय करणार? जादुगार दुनियेतली संसाराची माया परत बोलवु लागली आणी त्याबरोबरच परतीचा प्रवास सुरू झाला. मोहक निसर्गाच्या दृश्यात संध्येने वेगवेगळे रंग भरायला सुरूवातच केली होती आणी मी य्ताचा निरोप घेत होतो. पुन्हा सिमेंट काँक्रिट कडे जाणारा रस्ता कापु लागलो, पण त्या दृश्याची, निसर्गाची एक छबी कायमची मनात घेऊन चाललोय हे खरे.
आपला,
निसर्गप्रेमी मराठमोळा
वाचने
5445
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत...
छायाचित्र
In reply to सहमत... by प्रभाकर पेठकर
छान
जाण्याचा रस्ता कळवा
कुठुन
In reply to जाण्याचा रस्ता कळवा by विनोद कोकने
सुंदर
छान
खरंय सायबा!
मस्त !!!!!
धन्यवाद