उपयुक्त साईट्स
विमान बुकिंगसाठी - www.skyscanner.com
हॉटेल बुकिंगसाठी - www.agoda.com
हॉटेल रिव्ह्यूसाठी - www.tripadvisor.com
या सग्ळ्या मी स्वतः वापरलेल्या आहेत :)
रहाण्यासाठी जागा
बँकॉक - खाओसान रोड
फुकेत - बांग्ला रोडच्या जवळ (पण बांग्ला रोडवर नाही :D)
क्राबी - मार्केटच्या जवळ
-------------------------------------------------------------------------------------------------------------
पोहोचण्याचा दिवस (T day) बँकॉक
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शक्यतो संध्याकाळी ३:३० पर्यंत पोहोचणारे विमान निवडावे...विमानतळावरून बँकॉकला जाण्यासाठी मेट्रो आहे...विमानतळावर चौकशी खिडकीवर मेट्रोचे उतरण्याचे स्टेशन विचारावे
हॉटेलला पोचून फ्रेश होऊन लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका मारावा आणि त्याचबरोबर लोकल टूर कंपनीकडे दुसर्या दिवशीसाठी (T+१ day) "टायगर टेंपल + फ़्लोटिंग मार्केट + बाकी" (ग्रँड पॅलेस नसलेली) अश्या "फक्त एकदिवसीय" टूरचे बुकिंग करून टाकावे (साधारण माणशी जास्तीत जास्त १२००-२००० दर असावा)...२-४ टूरवाल्यांकडे चौकशी केल्यावर टूरची नक्की किंमत समजतेच (आणि तसाही १००-२०० चाच फरक असतो)...टूरवाले सकाळी हॉटेलवर न्यायला येतात आणि नंतर आणून सोडतात (तरीसुध्धा ही सुविधा आहे की नाही ते नक्की करून घ्यावे)
त्याच बरोबर (T+२ day) च्या संध्याकाळची / रात्रीची फुकेताला जाणार्या ट्रेनचे / बसचे तिकिट बुक करून ठेवावे...ट्रेन / बस दुसर्या दिवशी सकाळी फुकेतला पोचते.
मुख्य सुचना - टूरला जाताना टायगर टेंपलसाठी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत हे आठवणीने विचारावे
-------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ला दिवस (T+१ day) बँकॉक
-------------------------------------------------------------------------------------------------------------
टूरवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे कटाक्षाने हलक्या रंगाचे कपडे घालावेत...लोकल टूर कंपनी कडून टायगर टेंपल + फ़्लोटिंग मार्केट + बाकी
टायगर टेंपल हा Once in life time प्रकार आहे...वाघाला हात लावता येतो :) तिथे साधारण २००० रुपये भरले (ग्रुप साठी - जास्तीत जास्त ६ जण एका ग्रुप मध्ये) तर वाघाच्या बछड्याला मांडीवर घेऊन फ़ोटो काढता येतात...नैतर फक्त हात लावता येतो :)
मुख्य सुचना - लहान मुले बरोबर असतील अथवा जरा ज्यादाच आगावू लोक बरोबर असतील तर त्यांना आधीच "शिस्तीत" समजावून टायगर टेंपलमधल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या सुचना व्यवस्थित पाळायला बजावावे...वाघाला हात लावता येतो पण जर जास्त आगावूपणा केला तर वाघ "ए हा बघा ना मला त्रास देतोय" असे सांगत नाही...वाघ डायरेक्ट मान पकडणार नैतर पंजा मारणार...टायगर टेंपलमधल्या कार्यकर्त्यांचा वास वाघांना ओळखीचा असतो त्यामुळे त्यांना वाघ काही करत नाही परंतु आपण मात्र पहिल्यांदाच गेलेलो असतो...तस्मात काळजी घेणे
जवळपास संध्याकाळचे ६:३०-७:०० होतात परतायला मग संध्याकाळी लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका कम शॉपिंग...खाओसान रोडला लागूनच खाउगल्ली आहे
रात्र्र रात्री खाओसान रोडवर जीवाचे बँकॉक करावे :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------
२ रा दिवस (T+२ day) बँकॉक
-------------------------------------------------------------------------------------------------------------
चालत चालत Grand Palace + Sleeping Golden Budhdhaa + जवळची ३-४ टेंपल...५-६ तासात आरामात होते पाहून (इतके चालणे नसेल जमत तर Grand Palace थोडा कमी फिरावा अथवा सरळ बँकॉक सिटी टूर बुक करावी)...सगळ्या जागा एकमेकांपासून चालत ५-१० मिनिटांच्या अंतरावर आहेत...सकाळी ८:३० ला निघून नाश्ता बाहेरच करून निघालेले उत्तम...संध्याकाळी लोकल मार्केटमध्ये चालत फ़ेरफ़टका कम शॉपिंग...रात्री फुकेतला जाणार्या ट्रेन / बस मध्ये झोपून जावे. ट्रेनचे तिकिट भारतातून बुक करता येत असेल तर तसे करावे कारण तिकिटे फार लवकर संपतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
३ रा + ४ था + ५ वा दिवस (T+३, T+४, T+५ day) फुकेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हा दिवस पुर्णपणे तुमचा...फुकेत पायी फिरा...पॅटाँग बीचला वोटरस्पोर्ट करा...बांग्ला रोड + मार्केट...सगळे अगदी लागून आहे...फुकेताला २ समुद्रकिनारे आहेत (२ विरुध्ध बाजूंना)...दोन्ही बाजूंसाठी वेगवेगळ्या Island hopping बोट टूर असतात...दोन्ही साठी बुकिंग करा :)
क्राबीला जाणार असाल तर त्यासाठी सकाळी लवकरच्या बसचे बुकिंग करा...फक्त आणि फक्त सकाळची लवकरचीच बस घ्यावी...फुकेत ते क्राबी हा ३ तासांचा प्रवास अगदी गुळगुळीत रस्त्यांवरून आणि मुख्य म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणार्या रस्त्यावरून होतो :)
फुकेत मध्ये एकाच Island hopping बोट टूर करणार असाल तर ज्या मध्ये "माया बे" आणि "Twin island" असतात ती टूर करा
फुकेत मध्ये १ दिवस वाचवायचा असेल तर मग बँकॉकमधूनच फ़ुकेतच्या टूरचे बुकिंग करून ठेवा आणि ज्या दिवशी फुकेतला पोचाल त्या दिवशी एक Island hopping बोट टूर करा...पॅटाँग बीचला वॉटरस्पोर्ट त्याच दिवशी संध्याकाळी (उजेड असे पर्यंतच) करता येतील
मुख्य सुचना - बांग्ला रोडवर लहान मुलांना बरोबर नेऊ नका ;)
-------------------------------------------------------------------------------------------------------------
६ वा दिवस (T+६ day) क्राबी
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी क्राबीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारे नजारे डोळ्यात साठवून घ्यावे...फ़ोटो काढायचे भान रहात नाही :)...क्राबी मध्ये पोचल्यावर फक्त आणि फक्त आराम...लोकल मार्केट मध्ये फिरावे :)
क्राबीमध्ये चुकुनही Island hopping बोट टूर करू नये...फुकेत मधून आणि क्राबी मधून एकाच टैपच्या टूर असतात कारण फुकेत आणि क्राबी हे एकाच समुद्राच्या विरुध्ध बाजू आहेत :)
क्राबी मध्ये बघण्यालायक टूर करावी ती एकाच "Ton Sai beach" (http://matadornetwork.com/trips/15-places-to-see-bioluminescence-pics/)
फमिलीसाठी थायलंड इतकेच ;)
वाचने
38299
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा छान माहिती दिली!
अरे वा, २ वर्ष्यापूर्वी टका
हा धागा तेव्हाच टाकायचा होता.
In reply to अरे वा, २ वर्ष्यापूर्वी टका by पगला गजोधर
उपयोगी माहिती. फोटो हवे होते.
त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन
+१११११११११११
In reply to त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन by गवि
आपल्याकडे माकडवाले,अस्वलवाले
In reply to +१११११११११११ by टवाळ कार्टा
*त्यांच्याकडून नाच करवत*
In reply to आपल्याकडे माकडवाले,अस्वलवाले by कंजूस
त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन
In reply to त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन by गवि
हा विषय इथे नको हि विनंती
In reply to त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन by पगला गजोधर
मि गेलेलो तेव्हा वाघाचा १
In reply to त्या वाघांना इतकं ड्रग्ड करुन by गवि
बोका असेल रंगवलेला. नीट
In reply to मि गेलेलो तेव्हा वाघाचा १ by टवाळ कार्टा
हा हा हा..!! खळखळून हसलो.
In reply to बोका असेल रंगवलेला. नीट by अभ्या..
पिलांना ड्रग नसावेत करत (मरून
In reply to मि गेलेलो तेव्हा वाघाचा १ by टवाळ कार्टा
मी जिथे भेट दिलेली त्या
In reply to पिलांना ड्रग नसावेत करत (मरून by गवि
टायगर टेम्पल ही क्रूरतेची
इकडे आपल्या शहरांत गायींना
कृपया, धागा लेखकाला कोणी,
दिलेल्या जागांचे भरपूर फोटो
टीप
पाण्याने शिंतोडे उर्फ
फॅमिली टूरसाठी प्लान परफेक्ट
विमान प्रवास
स्वतःच नीट प्लान केल्यास २५
In reply to विमान प्रवास by कपिलमुनी
आणि 'तो' खर्च साधारण किती
In reply to स्वतःच नीट प्लान केल्यास २५ by गवि
बावीस तेवीस ह. +-
In reply to आणि 'तो' खर्च साधारण किती by प्रचेतस
दुप्पट आहे हो अलमोस्ट :(
In reply to बावीस तेवीस ह. +- by गवि
ऑन सिझन / ऑफ सिझन दरात फरक
In reply to दुप्पट आहे हो अलमोस्ट :( by प्रचेतस
दुप्पट आहे हो अलमोस्ट :(
In reply to दुप्पट आहे हो अलमोस्ट :( by प्रचेतस
हे वायलं, ते वायलं...
In reply to दुप्पट आहे हो अलमोस्ट :( by गवि
वल्ल्याने काय विचारले ते एकतर
In reply to दुप्पट आहे हो अलमोस्ट :( by गवि
:)
In reply to वल्ल्याने काय विचारले ते एकतर by टवाळ कार्टा
लेण्यांत फक्त दगडी सौंदर्य
In reply to दुप्पट आहे हो अलमोस्ट :( by गवि
तरीही सौंदर्यच ते.
In reply to लेण्यांत फक्त दगडी सौंदर्य by टवाळ कार्टा
लेण्यांत फक्त दगडी सौंदर्य
In reply to लेण्यांत फक्त दगडी सौंदर्य by टवाळ कार्टा
अष्टविनायकातला जरासा वेगळा
In reply to लेण्यांत फक्त दगडी सौंदर्य by गवि
व्यनि करा
कधी सांगणार?
In reply to व्यनि करा by वरुण मोहिते
क्राबीत थाई मसाज घ्यावा.
जवळपास सगळीकडे रेट सारखाच
In reply to क्राबीत थाई मसाज घ्यावा. by अनुप ढेरे
आयुष्यात कधी फॅारनला गेलोच तर
३)मेक्सिको
In reply to आयुष्यात कधी फॅारनला गेलोच तर by कंजूस
फॅमिली साठी खाओसान अयोग्य
फॅमिली म्हणजे पार्टनर - मुले
In reply to फॅमिली साठी खाओसान अयोग्य by मालोजीराव
फॅमिली म्हणजे पार्टनर - मुले
In reply to फॅमिली म्हणजे पार्टनर - मुले by टवाळ कार्टा
पार्टनर मायनस मुले असे
In reply to फॅमिली म्हणजे पार्टनर - मुले by पगला गजोधर
"पार्टनर"ला घेऊन कुठं जायचं
In reply to पार्टनर मायनस मुले असे by टवाळ कार्टा
तुमचा पार्टनर काय म्हणतोय
In reply to पार्टनर मायनस मुले असे by टवाळ कार्टा
म्हणजे इथेच बघायची, की तिकडे
In reply to तुमचा पार्टनर काय म्हणतोय by सूड
आता तो टक्कॉजीरावांचा प्रश्न
In reply to म्हणजे इथेच बघायची, की तिकडे by पगला गजोधर
अरेरे...मिपा परंपरेला धरून
In reply to म्हणजे इथेच बघायची, की तिकडे by पगला गजोधर