"वॉटसन, डॉक्टरला वॉकिंग स्टिक कोण देईल? अर्थात एखादं हॉस्पिटल, जिथे तो काम करत होता. मग 'सीसीएच' म्हणजे चेरिंग क्रॉस हॉस्पिटल असण्याची शक्यता जास्त आहे."
"बरं तर मग. चेरिंग क्रॉस हॉस्पिटल. आणखी कोणते निष्कर्ष काढता येतील?"
"तुला माझी पद्धत ठाऊक आहे, वॉटसन. वापर!"
"मला सुचणारा एकच निष्कर्ष म्हणजे या माणसाने खेड्यात आपली प्रॅक्टिस सुरू करण्याआधी लंडनमध्ये काही काळ काम केलं असावं."
"बरोबर आहे. आणखी थोडं पुढे जाऊन, हॉस्पिटलने ही काठी भेट देण्याचं कारण म्हणजे डॉक्टरसाहेब लंडनची नोकरी सोडताहेत हे असू शकेल. ही गोष्ट आपल्याला काय सांगते? हा गृहस्थ फार उच्चपदावर नसावा - कारण तो अशी मोठी नोकरी सोडून खेड्यात गेला नसता. म्हणजे नोकरी सोडतेवेळी हा नवशिका डॉक्टर होता - हाऊसमन. आता आपल्यासमोर उभा राहिलाय तिशीच्या आत-बाहेर असणारा एक डॉक्टर. बऱ्यापैकी मित्रमंडळी असलेला, फारशी महत्त्वाकांक्षा नसणारा, थोडा वेंधळा. त्याच्याबरोबर त्याचा लाडका कुत्रा असतो - टेरियरपेक्षा मोठा, पण मास्टिफपेक्षा लहान."
- दि हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स, लेखक: आर्थर कॉनन डॉईल
माणूस सामाजिक प्राणी आहे. त्याला इतर माणसांबरोबर राहायला, वावरायला आवडतं. एकलकोंडेपणा हा स्वभावातला दोष मानला जातो, आणि एकटेपणा ही अप्रिय स्थिती. माणसाच्या समाजातल्या वावरावर समाजातल्या इतरांचे डोळे रोखलेले असतात. एखाद्याच्या वावराचा उपयोग समाजातल्या इतरांनी आपली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करून घेतला तर ते गैर समजलं जात नाही, किंबहुना अशा वर्तनाला प्रोत्साहनच दिलं जातं. त्यानेच एकमेकांत देवाणघेवाण असणारा एकसंध समाज तयार होणार असतो. त्यातच सर्वांचं हित असतं.
वर दिलेल्या उताऱ्यात एका विसरून राहिलेल्या वॉकिंग स्टिकवरून शेरलॉक होम्स त्या स्टिकच्या मालकाबद्दल निष्कर्ष काढताना दिसतो. वावरावरून, हावभावावरून मनाच्या पार खोल तळातलं ओळखण्याची उदाहरणं होम्स कॅननमध्ये अन्यही आहेत. (चट्कन आठवलेलं म्हणजे 'दि रेसिडंट पेशंट' या कथेमध्ये वॉटसनच्या डोक्यातले युद्धविषयक विचार होम्स क्षणार्धात सांगतो.)
तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर समाजातला वावर प्रत्यक्ष वावरापुरता मर्यादित न राहता आभासी (virtual) ही झाला. मग मोबाईल तंत्रज्ञानातली क्रांती आणि स्वस्त इंटरनेटमुळे प्रत्यक्ष आणि आभासी वावरातल्या सीमारेषा पुसट होत आहेत. एक साधा प्रयोग करून बघा. गूगलकडे असलेल्या तुमच्या विद्याची प्रत https://takeout.google.com/ येथे मिळेल. त्यातली लोकेशन हिस्ट्रीची जेसन फाईल आणि ही साईट वापरून तुम्ही कुठेकुठे गेला होतात याचा साद्यंत इतिहास अगदी नीटस नकाशावर बघायला मिळेल!
थोडक्यात काय, तर ते बघतायत. बिग ब्रदर इज वॉचिंग यू.
बर्मंग वॉचायचं तर बसा वॉचत. आपण कोणाला घाबरत नाय. कर नाही त्याला डर कशाला, वगैरे.
कर नसला तरी डर असू शकतो हे नुकतंच केंब्रिज ॲनालिटिका आणि फेसबुकच्या कृपेने पहायला मिळालं. हा विषय इतका चावला जातो/गेला आहे, की त्याचे आणखी तपशील देण्यात हशील नाही.
आपल्याच वावराचे बारकावे वापरून आपल्या विचारांवर, आचारांवर प्रभाव टाकला जातोय. हम सब इस रंगमंच की कठपुतलियाँ. किस की डोर कब खींच जाए कोई नहीं कह सकता. ती डोर खींचून कोणी साबण विकतंय, कोणी राजकीय विचार.
पण ... जेवायला बाहेर जायच्याआधी झोमॅटोवर रिव्ह्यू पाहायचे आहेत. ठोस पत्ता हाताशी असूनही मला गूगल मॅप्स वापरायचे आहेत. दाराशी उबर पाहिजे. रेस्टॉरंटात वेटिंग आहे - बसल्याबसल्या दोन पोस्टी लाईक आणि तीन शेअर करायच्यात. "फीलिंग हंग्री विथ अन्या, गन्या अँड थ्री अदर्स" अशी क्याप्शन मारून फोटो शेअर करायचे आहेत. पान खाताना मल्लूॲप्सवर 'मी द्वापारयुगात कोण होतो' ही मौल्यवान माहिती मिळवायचीय.
म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला आहे.
पण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार नाही...
असं तुम्हाला वाटत असेल, तर आप xxx (भाबडे) है!
सगळी बोंबाबोंब थांबेल, तेव्हा उरेल ते इतकंच : एका कंपनीकडे एक बायप्रॉडक्ट होतं. ते त्यांनी विकलं आणि पैशे केले.
तुम्हाला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, दगड आणि धोंडे वापरायचे आहेत ना? त्याचे फायदे पाहिजेत ना? मग हे असंच चालणार. आहे हे असं आहे. घ्यायचं तर घ्या. नाहीतर भो...
वाचने
32081
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाच का तो किस्सा ?
In reply to माहिती विस्फोटाचा किस्सा .. by चौकटराजा
होय पण
In reply to हाच का तो किस्सा ? by मराठी_माणूस
कॅमेरा बंद ठेवणे
ऑपरेशन .
In reply to कॅमेरा बंद ठेवणे by चित्रगुप्त
उत्तम लेख आणि चर्चा!
खुद्द आधार प्रणालित काम
In reply to उत्तम लेख आणि चर्चा! by लई भारी
अगदी असंच वाटलं!
In reply to खुद्द आधार प्रणालित काम by डॉ सुहास म्हात्रे
ह्याच विषयावरचा हा एक मस्त