✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गुलामीची १२ वर्षे..

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Mon, 04/02/2018 - 21:50  ·  लेख
लेख
नमस्कार ! बर्‍याच प्रयत्नांनंतर मी एक पुस्तक अ‍ॅमॅझॉन किंडलवर टाकले आहे. पुस्तकाचे नाव आहे... गुलामीची १२ वर्षे. मूळ लेखक आहे सालोमन नॉरथप आणि मी त्याचा अनुवाद केला आहे. पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जरा समजून घ्यावे. ...हा इतिहास मोठा विचित्र आहे. त्यातील सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षा ही अद्भुत आहे. जरा विचार करा, तीस वर्षे या माणसाने स्वातंत्र्यात काढली. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते ज्यातून त्याला हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. दुर्दैवाने त्यानंतर १२ वर्षे तो गुलाम झाला, दुसर्‍याची मालमत्ता झाला. अक्षरश: एखादे खेचर, घोडे असतात तसे आणि त्याचा दर्जा त्यांच्यापेक्षाही हीन होता. त्यांनी त्याला त्याच्या घरादारापासून तोडले, त्याच्या बायकापोरांपासून तोडले. त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला व दक्षिणेत भाजत्या उन्हात, शेतात, ज्याचा शून्य मोबदला मिळतो अशा कष्टप्रद कामाला जुंपले आणि ते सुद्धा एका क्रूर मालकाच्या चाबकाखाली. भयंकर ! अशी माणसे जगात असतात हे वाचून तुमचे रक्त तापेल... -फ्रेडरिक डग्लस.(१८१८-१८९५) .... हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना प्रश्न पडेल की सॉलोमन नॉरथपचे पुढे काय झाले. खरे सांगायचे तर त्याचा मृत्यू हे शेवटपर्यंत रहस्यच राहिले. त्याच्या पत्नीचा, मुलांचा शोध लागला पण सॉलोमन नॉरथपच्या थडग्याचा साधा उल्लेखही कुठे सापडला नाही. आश्‍चर्य म्हणजे त्याचा अमेरिकेत त्या काळात झालेल्या जनगणनेत ही उल्लेख सापडत नाही. पण सुटल्यानंतर तो अमेरिकेत सगळीकडे गुलामगिरीच्या विरुद्ध भाषणे देत हिंडत होता. शेवटी तो कॅनडात गेला होता. तेथे त्याच्या सभेत काहीतरी गोंधळ झाला . त्यानंतर मात्र त्याचा पत्ता लागला नाही.... - जयंत कुलकर्णी. Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे पुस्तक येथे उपलब्ध आहे. आपला, जयंत कुलकर्णी. तसेच मागच्या महिन्यात मला जो पुरस्कार मिळाला त्याचे छायाचित्र खाली देत आहे. हे जोडायचे कारण माझी जी ओळख त्यांनी दिली आहे त्यात "मिसळपाव'' चे नाव आहे. . ते ही खाली देत आहे. मला खात्री आहे आपल्या येथे अनेक लेखक असलाच कुठलातरी पुरस्कार मिळवतील किंवा मिळवले ही असतील. Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
16170 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

अभिनंदन !!!

स्पार्टाकस
Mon, 04/02/2018 - 21:53 नवीन
क्या बात है सर! जिओ!
  • Log in or register to post comments

असच म्हणतो.

शाम भागवत
Mon, 04/02/2018 - 22:15 नवीन
असच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

हार्दिक अभिनंदन.

पगला गजोधर
Mon, 04/02/2018 - 22:18 नवीन
हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अरे वा जयंतकाका,

अभ्या..
Mon, 04/02/2018 - 22:27 नवीन
अरे वा जयंतकाका, आप तो रोशन हैही, हमकोभी रोशन कर दिया. आमच्या जयंतकाकांची उचित दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार.
  • Log in or register to post comments

अरे वा!

चांदणे संदीप
Mon, 04/02/2018 - 23:08 नवीन
जयंतकाका अभिनंदन! तुमचा हा पुरस्कार मिपावरच्या अनेक होतकरू लेखक/कवींना प्रेरणा देईल यात शंका नाही! :) Sandy
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक अभिनंदन.

पद्मावति
Mon, 04/02/2018 - 23:18 नवीन
मन:पूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

वाह! अभिनंदन!

थॉर माणूस
Mon, 04/02/2018 - 23:36 नवीन
वाह! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अतिशय आनंद झाला. अभिनंदन!

एस
Tue, 04/03/2018 - 00:22 नवीन
अतिशय आनंद झाला. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

कपिलमुनी
Tue, 04/03/2018 - 00:48 नवीन
तुमच्या लेखनाचे फॅन आहोतच ! मिपाचे नाव वाचल्याने आनंद द्विगुणीत झाला
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Tue, 04/03/2018 - 02:54 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

डाम्बिस बोका
Tue, 04/03/2018 - 03:51 नवीन
आपले लिखाण नेहमीच आवडते. त्रिवार अभिनंदन. असेच चांगले लेख लिहित जा. आपले लिखान नेहमिच अवदते
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन काका.

प्रचेतस
Tue, 04/03/2018 - 08:35 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन काका.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुमीत भातखंडे
Tue, 04/03/2018 - 11:09 नवीन
मनापासून अभिनंदन सर.
  • Log in or register to post comments

अभिनंदन काका

इरसाल कार्टं
Tue, 04/03/2018 - 11:19 नवीन
अभिनंदन काका
  • Log in or register to post comments

अभिनंदन जयंत कुलकर्णी काका !.

दुर्गविहारी
Tue, 04/03/2018 - 11:40 नवीन
अभिनंदन जयंत कुलकर्णी काका !.
  • Log in or register to post comments

श्री. जयंत कुलकर्णी यांचे

Sanjay Uwach
Tue, 04/03/2018 - 12:22 नवीन
श्री. जयंत कुलकर्णी यांचे मनापासुन अभिनंदन
  • Log in or register to post comments

जयंत काका यांचे मन:पूर्वक

सस्नेह
Tue, 04/03/2018 - 12:27 नवीन
जयंत काका यांचे मन:पूर्वक अभिनंदन...पुन्हा एकदा !!
  • Log in or register to post comments

अभिनंदन काका

जावई
Tue, 04/03/2018 - 13:51 नवीन
अभिनंदन काका
  • Log in or register to post comments

अभिनंदन ...

अभिजीत अवलिया
Tue, 04/03/2018 - 14:20 नवीन
अभिनंदन ...
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आबा पाटील
Tue, 04/03/2018 - 16:37 नवीन
काका, अभिनंदन ! या विषयावर आधारित चित्रपट पण छान आहे. https://en.wikipedia.org/wiki/12_Years_a_Slave_(film) http://www.imdb.com/title/tt2024544/
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन.

अर्धवटराव
Tue, 04/03/2018 - 18:38 नवीन
आम्हि तसंही आपल्या लिखाणाचे फॅन आहोत. जय हो.
  • Log in or register to post comments

जबराट !

गामा पैलवान
Tue, 04/03/2018 - 19:39 नवीन
जयंतरावांचं अभिनंदन. अशीच घोडदौड चालू राहूदे! -गा.पै.
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Tue, 04/03/2018 - 21:06 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मित्रहो
Wed, 04/04/2018 - 18:48 नवीन
अभिनंदन आनंद झाला वाचून.
  • Log in or register to post comments

जयंतराव

सुबोध खरे
Wed, 04/04/2018 - 19:50 नवीन
जयंतराव आपले मनापासून अभिनंदन. आपले लेखन उत्कृष्ट असते यात शंकाच नाही पण आता त्याला सरकार दरबारी मान्यताही मिळाली यामुळे आनंद द्विगुणित झाला. आपल्याकडून असे सकस लेखन होत राहो आई आमच्या सारख्या सामान्य वाचकांचे प्रबोधन होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन.

रामदास२९
Wed, 04/04/2018 - 21:03 नवीन
हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/04/2018 - 21:35 नवीन
हार्दीक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

मनापासून

नाखु
गुरुवार, 04/05/2018 - 09:50 नवीन
अभिनंदन अखिल मिपा हसतं खेळतं जिंदादील ठेवा आणि ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करा संघाचा किरकोळ सदस्य नाखु
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन काका.! वरील

किसन शिंदे
गुरुवार, 04/05/2018 - 13:46 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन काका.! वरील पुस्तक किंडलवर फ्री आहे कि पेड?
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन काका..!

दीपक११७७
गुरुवार, 04/05/2018 - 14:37 नवीन
हार्दिक अभिनंदन काका..!
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 04/05/2018 - 17:16 नवीन
सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments

अभिनंदन करण्याची परत संधी

मदनबाण
Fri, 04/06/2018 - 21:38 नवीन
अभिनंदन करण्याची परत संधी दिल्या बद्धल तुमचे विशेष अभिनंदन ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्‍या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबन
  • Log in or register to post comments

अभिनन्दन......!!!!

विनोद१८
Sat, 04/07/2018 - 16:14 नवीन
मा. जयन्तराव आपले हर्दिक अभिनन्दन, चेपुवर बातमी मिळाली होतीच. आता एका नवीन देरसुच्या प्रतिक्षेत आहोत. उत्तम व दर्जेदार लिखणा / अनुवादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

महामाया
Fri, 04/13/2018 - 03:03 नवीन
मनापासून अभिनंदन सर.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन!!!

नो वन
Tue, 05/01/2018 - 02:18 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा