मी सध्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईकर झाले असले तरी मूळची कोल्हापूरकर आहे. नुकत्याच फेब्रुवारी महिन्यातील लागून आलेल्या सुट्यांचे सार्थक करण्याकरीता सासरी सडोलीला (ता.करवीर) गेले होते. त्यामध्ये एक दिवस सहकुटुंब कणेरीमठ येथील संग्रहालय पाहण्याचा बेत आखला. कणेरीमठ कोल्हापूरपासून जुना पुणे- बेंगलोर हायवेवर उजवीकडे 12-13 कि.मि. वर आहे. कणेरीमठला जायला बस सुविधा आहेत. आम्ही खाजगी गाडीने कोल्हापूरवरुन अर्ध्या तासात पोहोचलो. येथे प्राचीन काळातील भारतीय संस्कृतीचे दर्शन पुतळ्यांद्वारे उभारले गेले आहे. प्रवेश फी 150 रु. प्रति व्यक्ती असली तरी संग्रहालय पाहून झाल्यावर पैसै वसूल झाल्याचे समाधान मिळते. प्राचीन काळातील ज्ञानी ऋषी-मुनींचे कार्य देखाव्यांच्या रुपात पाहून आपण थक्क होऊन जातो. प्रत्येक देखाव्यासोबतच त्या ऋषींच्या कार्याची माहितीदेखील असल्याने अनेक अजात गोष्टींचे ज्ञान होऊन आपण अचंबित होऊन जातो. देखावे पाहताना त्यातील पुतळे अक्षरश: खरे वाटावेत इतके जिवंत वाटतात. याबद्द्ल आपसूकच आपण पुतळा साकारणाऱ्या कलाकारांना दाद देऊन जातो. बऱ्याचदा आपण पुतळ्याला खरा माणूस किंवा प्राणी समजून फसतो इतके हे देखावे सजीव आहेत. कापडावर पडणाऱ्या चुण्या, वाऱ्याने हलणारी कापडे, केस, डो्ळयातले भाव अगदी हुबेहूब साकारले आहेत. बाराबलुतेदारांची घरे त्याकाळात कशी दिसत असतील हे प्रत्येक घर पाहताना जाणवते व नकळतच आपण त्या जुन्या काळात जाऊन पोचतो. कुंभार, लोहार, कोळी, सोनार अशा प्रत्येक बारा बलुतेदाराचे घर साकारताना खूप बारीक सारीक विचार केला गेला आहे. या संग्रहालयाबरोबरच बारा राशींची शिल्पे, महादेवाचे मोठे मंदीर, मायानगरी(आरसामहल) व आता हॉरर म्युझियम देखील झाले आहे. 7D हॉरर शो साठी 12 माणसांची गरज असते. आम्ही तेवढेजण नव्हतो त्यामुळे तो ऑप्शन कट केला. पण मायानगरी आरसेमहाल चुकवू नये. वैज्ञानिक आधारावर वेगवेगळे प्रयोग येथे केले आहेत. आरशाचे वेगवेगळे प्रकार येथे पाहता येतात. बच्चे कंपनी येथे धमाल करते. येथे खादी भंडार असून उत्तम दर्जाच्या साड्या अत्यंत स्वस्त किंमतीत मिळतात. अगदी मुंबईपेक्षा!मी येेेथे 2 साड्या व 2 कुर्ते घेतले. येथे खाण्यापिण्याची सोय उत्तम आहे. संग्रहालयाच्या पायथ्याशी सिद्धगिरी मॉल आहे. येथून आपण खादी व सेंद्रीय उत्पादनांची खरेदी करु शकतो. एकूणच एकदा अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. कुटुबासमवेत मजेत वेळ जातो व वेगळे काही पाहिल्याचे समाधान मिळते.
टीप - खूप मोठ्या परिसरात हे संग्रहालय वसलेले असून पायी चालत जावे लागते. पायाचा प्रचंड व्यायाम होतो. तथापि जागोजागी बसण्याची व्यवस्था केली आहे. संग्राहालय तसेच इतर ठिकाणे पाहण्यात 3-4 तास सहज जातात. शक्यतो सकाळी लवकर पोहोचून संग्रहालय पाहून घ्यावे म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. आम्ही काढलेले काही तसेच Google Images वरुन घेतलेले काही फोटो टाकत आहे.
वाचने
7110
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख
जमत नाहीये
In reply to छान लेख by पैसा
हे धागे पहा
In reply to जमत नाहीये by श्वेता२४
ही लिंक पाठवत आहे.
In reply to हे धागे पहा by पैसा
लिंक चुकीची आहे. खालील संदेश
In reply to ही लिंक पाठवत आहे. by श्वेता२४
खरोखरच पाहण्यासाठी अतिशय
फोटो टाकायची पद्धत कशी आहे,
मलाही नाहीच जमलं ते
In reply to फोटो टाकायची पद्धत कशी आहे, by राहुल करंजे
Me pan 2 da jaaun aale kaneri
@ श्वेता२४, राहुल करंजे
पुढच्यावेळी प्रयत्न करते धन्यवाद.
In reply to @ श्वेता२४, राहुल करंजे by डॉ सुहास म्हात्रे