प्रिय निलेश साबळे,
जागतिक महिला दिनाच्या 'चला हवा येऊ द्या' टीम ला शुभेच्छा. सगळ्या कलाकारांमध्ये केवळ श्रेया बुगडे ही एकमेव महिला असूनही पूर्ण टीम ला का शुभेच्छा दिल्या ते तुम्हाला समजलं असेलंच. पत्रास कारण कि Women's Day हा केवळ ८ मार्च पुरता मर्यादित न ठेवता तुम्ही आणि तुमची गुणवान टीम 'वर्षभर' साजरा करत असते. सुरुवातीला क्वचितच पुरुष बाईचा वेष घेऊन गमती-जमती करायचे ते तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. गेले अनेक महिने मात्र पुरुष कलाकार बाईच्या भूमिकेतच जास्त दिसायला लागलेत. इतके गुणी कलाकार असताना विनोदनिर्मितीसाठी तुम्हाला असल्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो त्याचं वाईट वाटतं. हा कार्यक्रम बघताना अनेक दशकं मागे गेल्यासारखं वाटतं - जेव्हा स्त्रियांनी नाटकात काम करणं कमीपणाचं समजलं जायचं म्हणून पुरुष पार्टी स्त्री चा रोल करायचे.
सागर कारंडे ला पुण्याची महिला, कुशल बद्रिके कोल्हापुरी स्टाईल म्हातारी आणि (सर्वात किळसवाणी!) भाऊ कदम ची शांताबाई ह्या गोष्टी दाखवल्या नाही तर सेन्सॉर बोर्ड प्रक्षेपणाला परवानगी देत नाही बहुधा. भरीस भर म्हणून भारत गणेशपुरेला देखील मिश्या भादरायला लावून स्त्री-पार्टी बनवलात! अधून-मधून दिसणारा दाक्षिणात्य चित्रपटात शोभणारा 'काळा गेंडा' एकदाचा साडीत दाखवल्यावर तुमच्या जीवाला शांतता लाभणार आहे कि काय?
असला अगतिक महिला दिन कृपया लवकरात लवकर थांबवा, नाहीतर आम्हा प्रेक्षकांना देखील म्हणावं लागेल कि 'चला, हवा येऊ द्या'.
~ सरनौबत
वाचने
5935
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी सहमत
सहमत
हम्म
'गाव गाता गजाली' जरा तरी बरी.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्ही अजून हा कार्यक्रम बघता
गुप्ते तिथे खुपते इतके बरोबर
गुप्ते तिथे खुपते?? हाहाहाहा!
In reply to गुप्ते तिथे खुपते इतके बरोबर by कंजूस
तेच तेच विनोद ऐकून कंटाळा आला आहे.
कलाकारांशी गप्पागोष्टी या स्वरूपाच्या कार्यक्रमध्ये
तुमच्या मतांशी सहमत पण "काळा
लेखाशी सहमत!!
जौद्या हो
हम तो तेरे आशिक ?
In reply to जौद्या हो by राजेंद्र मेहेंदळे
होम
In reply to हम तो तेरे आशिक ? by बबन ताम्बे
तो परदेश दौरा
वास्तविक पाहता चला हवा येऊ