मागच्या महिन्यात मी १० -१२ दिवस बाहेर असल्याने गाड़ी पार्किंग मधेच उभी होती, हीच संधी साधून २ लहान डुकराएवढ्या उंदीर/घुशिंनी गाडीच्या इंजिनात संसार थाटला होता. गाड़ी चालू होत न्हवती म्हणून बाजुच्या ग्यारेज मधून मेकनिक आणून तपासले असता समजले की, उंदीर मामाने वायरिंग कुरतडली आहे. ब्याट्रीतुन इंजिनला पॉवर सप्लाय होत न्हवता. पण धक्का मारून चालू होत होती. दुसरया दिवशी ऑफिसला सुट्टी घेउन ग्यारेज मधे काम करुण घेतले. त्यानंतर व्यवस्थित चालली. बिल झाले ३०० रुपये.
काल जिमला जाताना पुन्हा बंद पडली, त्याच मेकनिक्ला बोलावले, धक्का मारून्ही चालू होईना, मेकनिकच्या मतानुसार हा उंदराचाच प्रताप आहे, त्याने मागच्या वेळी अजूनही काही वायरी खाल्ल्यात त्यामुळ कदाचित शोर्ट सर्किट देखिल झाले असू शकते. गाड़ी रात्री त्याच्या ग्यारेज्वर लावली, यावेळी ऑफिसला सुट्टी घेऊ शकलो नाही.
गाड़ी निदान सुरु झाली तर तिला टाटाच्या अधिकृत सर्विस सेंटरमधे दाखल करायची आहे. १५ दिवस अगोदर सर्विसिंगला दिली तेव्हा त्यांना या उंदीराचे प्रताप सांगायचे विसरलो मी त्यांना. उंदीर जरी लहान असला तरी त्याने दिलेला मनस्ताप खुप मोठा आहे. नेमक्या कामाच्या वेळेला गाड़ी रुसून बसली तर पुढचे सगळ प्लानिंग बोम्बलते.
नो एंट्री नावाचे एक औषध आणले होते इंजिनवर फवारायला, परंतु ते लावल्यावर उग्र वास येतो अणि निदान २ दिवस गाड़ी वापरायची नाही अणि वापरली तर एसी लावायचा नाही, हे झेपणार न्हव्ते म्हणून ते औषध अजुन तसेच पडून आहे. गायछाप तंबाखूची पुड़ी देखील सॉक्स मधे बांधून ठेवली आहे इंजिनला, पण मेकनिक म्हणतो यावर काहीही उपाय नाही.
आपल्याकडे काही उपाय आहेत का? कृपया सांगावे, आभारी राहीन.
वाचने
18743
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
तंबाखू...
तंबाखूची पुड़ी ठेवलिये इंजिन
In reply to तंबाखू... by योगी९००
मांजराचे नाव राजेश ठेवा आणि
In reply to तंबाखूची पुड़ी ठेवलिये इंजिन by सतिश पाटील
मी तर म्हणतो बद्दला घ्या..
In reply to मांजराचे नाव राजेश ठेवा आणि by अभ्या..
पार्कींगची जागा बदलता येत
पार्किंगची जागा नेहमी बदलतो
In reply to पार्कींगची जागा बदलता येत by king_of_net
हा भांडी घासायचा
In reply to पार्कींगची जागा बदलता येत by king_of_net
dhanyawaad
In reply to हा भांडी घासायचा by प्रसाद_१९८२
उंदीर
हा प्रयोग करुण पाहतो.
In reply to उंदीर by कुशल द. जयकर
गाडीत शिवसेनेचे स्टीकर लावा.
काचेवर सेनेचा झेंडा अगोदरच
In reply to गाडीत शिवसेनेचे स्टीकर लावा. by विजुभाऊ
_/\_
In reply to काचेवर सेनेचा झेंडा अगोदरच by सतिश पाटील
इंजिनात झेंडा लावा
In reply to _/\_ by टवाळ कार्टा
हाहाहा
In reply to गाडीत शिवसेनेचे स्टीकर लावा. by विजुभाऊ
गाडीखाली गाजर ठेवा. गाजर
एकदा हे वाचून बघा, यात बरेच
काय मस्त आठवण करून दिलीत हो!
In reply to एकदा हे वाचून बघा, यात बरेच by मिसळलेला काव्यप्रेमी
काका
In reply to काय मस्त आठवण करून दिलीत हो! by पिवळा डांबिस
फटींमध्ये रॅट किलरच्या वड्या ठेवा.
गाडीत मेला बिला तर जास्त
In reply to फटींमध्ये रॅट किलरच्या वड्या ठेवा. by बबन ताम्बे
मानवी केस ठेवा ..
सध्या ब-याच ठिकाणी
काल मेकनिकने दुरुस्त करुण
अरेच्चा!
In reply to काल मेकनिकने दुरुस्त करुण by सतिश पाटील
एक्सचेंज करुन आता काय होईल
In reply to अरेच्चा! by पैसा
हायला
In reply to एक्सचेंज करुन आता काय होईल by अभिजीत अवलिया
rat sticky pad
घड्याळ ठेवा....
सिक्सर मारलीत
In reply to घड्याळ ठेवा.... by चौकटराजा
उंदिर
सेम प्रोब्लेम यायचा मला ...