गुलाब 'जाम' नाही, पण थोडा आवडला
गेले काही दिवस झी मराठीवर 'गुलाबजाम' च्या प्रोमोज ने धुमाकूळ घातला होता. 'चला हवा येऊ द्या' मध्ये 'गुलाबजाम' ची टीम येणार म्हणून तो एपिसोड आवर्जून बघितला. त्यात चित्रपटातील कलाकार, 'खाण्याची आणि बनवण्याची आवड असेल तर हा चित्रपट नक्की पहा' असा आग्रह करित होते. विविध पदार्थ खाण्याची आवड, महाराष्ट्रीय पदार्थांवर विशेष प्रेम, शिवाय पुण्यातील शूटिंग आणि बरेचसे कलाकार पुण्यातले! त्यामुळे चित्रपट बघण्याची उत्सुकता होतीच. इकडे मस्कत मध्ये मराठी चित्रपट फारसे रिलिज होत नाहीत. त्यामुळे हा चित्रपट हुकणार अशी हळहळ वाटत होती. मात्र हा चित्रपट चक्क मस्कत मध्ये ५ दिवस एका चित्रपटगृहात लागणार असल्याचे समजले आणि मला 'गुलाबजाम' ची भूक लागली!
'बेडेकर’ मध्ये मस्तपैकी गोडसर-तिखट मिसळ खायला जावं आणि तिकडे 'रामनाथ' ची झणझणीत आणि डोक्याला मुंग्या आणणारी मिसळ मिळाल्यास जसं वाटेल" तसं चित्रपट बघितल्यावर झालं. चित्रपट अतिशय तरल, कलात्मक वगैरे आहे, कलाकारांची कामे देखील उत्कृष्ट आहेत . पण चित्रपटाचे नाव आणि प्रोमोज पाहून एखादा हलका-फुलका चित्रपट असावा ह्या विचाराने तुम्ही गेलात तर मात्र अपेक्षाभंग होण्याची शक्यता अधिक.
चरचरीत फोडण्या, पांढराशुभ्र ओला नारळ भुरभुरवलेली भेंडीची भाजी, व्यवस्थित भाजलेल्या घडीच्या पोळ्या, कुरकुरीत भजी, वगैरे शाकाहारी स्वयंपाक सुरुवातीला पाहून भूक नक्की चाळवली जाते. "मी माझ्या मनातले सगळे पदार्थांना सांगते... ते समजूनही घेतात आपल्याला आणि मग छान चव येते त्यांना.." किंवा ‘प्रमाण, मापं, हिशोब याच्या पलीकडे जाऊन मनापासून एखादा पदार्थ बनवला ना तर तो सुंदर बनतोच’ यासारखे अनेक संवाद आपल्या मनाला स्पर्शून जातात. कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) त्या पदार्थाशी गप्पा मारतो असे दाखवण्यात आले आहे. या सगळ्या गोष्टी चित्रपटात बऱ्यापैकी जमून आल्या आहेत. मात्र राधा (सोनाली कुलकर्णी) चा भूतकाळ आणि घडलेली ट्रॅजेडी समजल्यावर चित्रपट अतिशय गंभीर वळण घेतो. त्यानंतर चित्रपटाचा मुख्य विषय बाजूला राहून लवकरच 'डोक्याला शॉट' होतो. एकदा हा शॉट लागल्यावर मग पुढचे अनेक प्रसंग अनावश्यक वाटू लागतात. 'भूतकाळ विसरलेल्या राधाला फक्त रणबीर कपूरचेच चित्रपट का आवडतात?' इथपासून ते 'आदित्यला इतक्या लहान वयात झोपेच्या गोळ्या घेतल्याखेरीज झोप का येत नाही?' असे अनेक प्रश्न मनात थैमान घालतात. गुलाबजाम मधला गोड पाक आटण्यास सुरुवात होते आणि लवकरच ते कोरडे गुलाबजाम वाटायला लागतात (ते देखील वरून साखर नसलेले!). 'पाक'क्रियेवरील चित्रपट असूनही पाक म्हणावा तसा जमला नाही असं 'जाम' वाटतं.
चित्रपटात राधा म्हणते कि 'भाजीत आलं लसूण जपून वापरावं, नाहीतर भाजीची मूळ चव लागत नाही'. अगदी असंच चित्रपटाचं देखील झालंय. राधा आणि आदित्यच्या नात्यातील गुंतागुंत उलगडण्याच्या नादात 'मराठी खाद्यसंस्कृती' हा चित्रपटाचा मूळ गाभा थोडासा बाजूला राहिल्यासारखं वाटतं. आर्ट फिल्म्सची आवड असल्यास हा चित्रपट बघण्यास हरकत नाही. मात्र सिरीयस चित्रपट बघून डोकं जाम होत असल्यास तिकिटावर खर्च करण्यापेक्षा हलवायाच्या दुकानातून गुलाबजाम घेऊन खाणे जास्त बरं!
याद्या
7738
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
झकास लिहिलंय ! आवडलं.
परवाच पहिला,
चाकोरीची वाट सोडून एका
भेंडी
सिनेमॅटोग्राफी (त्यातल्या
असे चित्रपट आवडत असतील तर
In reply to सिनेमॅटोग्राफी (त्यातल्या by अभ्या..
.
शक्य असल्यास नेऊ नये
In reply to . by आशु जोग
अतिशय देखणा, (सर्व अर्थाने)
+११,१११
In reply to अतिशय देखणा, (सर्व अर्थाने) by पुंबा
आपला मानुस बघन्यासाठि गेलो असता चुकुन बघितला
'भाजीत आलं लसूण जपून वापरावं,
फाफे सिनेमा बघितला असा
In reply to 'भाजीत आलं लसूण जपून वापरावं, by सूड
:-))) भारी पंच मारलाय !
In reply to फाफे सिनेमा बघितला असा by सरनौबत
मला तर जामच आवडला !
खरंय, सिनेमॅटोग्राफी छान आहे.
चांगल्या चर्चेला गालबोट
In reply to खरंय, सिनेमॅटोग्राफी छान आहे. by प्राची अश्विनी
???
In reply to चांगल्या चर्चेला गालबोट by आनन्दा
शेफ, स्टॅन्ली का डब्बा,
In reply to खरंय, सिनेमॅटोग्राफी छान आहे. by प्राची अश्विनी
एक साधा सिनेमा आहे "टुडेज
.
हा हा कुंडलकरचे सिनेमे
In reply to . by आशु जोग
"व्वा, क्या बात हैं" मराठीत
In reply to . by आशु जोग