२०१९ - लोकसभा निवडणूक
डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत. एकाच घरात इतके लोक पीएचडी हे जगातले एक आश्चर्यच मानावे लागेल पण ते कदम कुटूंबाने वास्तवात उतरवले आहे. २०१४ ची लोकसभेची निवडणूक विश्वजीत कदम यांनी लढवली होती. त्यावेळी त्यांनी म्हणजे त्यांच्या माणसांनी कसून प्रयत्न केले होते. आत्तापर्यंत झोपडपट्टीपर्यंत जाऊन आम्हाला मते द्या सांगणारे लोक फ्लॅट आणि बंगल्यांपर्यंत पोचले होते. खूपच जनसंपर्क केला होता त्यांनी.
सुरेश कलमाडी - पुण्याचे अनेक वर्षे खासदार होते, रेल्वे राज्यमंत्री सुद्धा होते. पूर्वी ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. सुरेश कलमाडी हिंदी, इंग्रजी बोलू शकतात. पवारांसाठी ते दिल्लीमधल्या उच्च वर्तुळांमधे संपर्क ठेवण्याचे काम करीत. पण मधल्या काळात शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे संबंध तितकेसे चांगले राहिले नाहीत. पवार काँग्रेसमधे असताना त्यांनी सुरेश कलमाडींना काँग्रेसमधून बाहेर जायला लावले होते. मग काँग्रेसबाहेर पडून ते लोकसभेला उभे राहीले. पुणे शहर भाजपाने आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता असूनही सुरेश कलमाडींना पाठींबा दिला. पुणे शहर भाजपाने १९९८ मधे मनाचा असा मोठेपणा का दाखवला कळत नाही. भाजपाच्या पाठींब्यावर निवडणूक लढवणारे कलमाडी काँग्रेसच्या विठ्ठल तुपे यांच्याकडून ९१००० ने हरले. भाजपाच्या पारंपरिक मतदारांनीच चिडून जाऊन काँग्रेसला मतदान केले आणि भाजपाला धडा शिकवला, अशी त्यावेळी चर्चा होती. जो मतदार प्रेम करू शकतो तो धडाही शिकवू शकतो. पण यातून भाजपाने काही धडा शिकला का हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकेल. 2009च्या निवडणुकीमधे कलमाडी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कलमाडींना सहकार्य करीनात. शरद पवारांनी जाहीर प्रचार-सभेमधे आपल्या कार्यकर्त्यांना सुरेश कलमाडींसाठी काम करण्याचे आवाहन केले होते. किंबहुना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरेश कलमाडींसाठी काम करणार नसतील तर आपण आपली बारामतीमधील निवडणूक बाजूला ठेऊन सुरेश कलमाडींसाठी पुण्यात राहून काम करू, असे पवारांनी सांगितले. शरद पवार जाहीर भाषणांमधे आपल्याबद्दल इतके गोड बोलताहेत त्याअर्थी या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून काहीतरी दगाफटका होण्याची शक्यता आहे हे सुरेश कलमाडींनी ताडले. आपल्या पाठीमधे खंजीर खुपसला जाणार नाही याची सुरेश कलमाडींनी योग्य ती काळजी घेतली आणि 2009 मधे ते खासदार म्हणून पुण्यातून निवडून आले. सुरेश कलमाडींनी आपल्या कुटुंबियांना राजकारणामधे आणलेले नाही.
महीला सबलीकरण - यासाठीही सुरेशभाईंचे नाव घेतले जाते. पुणे शहरात अनेक महीलांना त्यांनी संधी दिली, त्यांच्यामुळेच अनेक महीला महापौरपदापर्यंत पोचू शकल्या. महर्षी कर्वे यांच्या पुण्यात कलमाडींनी कर्व्यांचा वारसा जपला असे म्हणावे लागेल. सध्या वाढते वय आणि कदम यांचा उपलब्ध झालेला पर्याय, यामुळे कलमाडींना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच.
गिरीश बापट हे अनेक वर्षे आमदार राहिलेले आहेत. १९९६ मधे भाजपाकडून ते काँग्रेसच्या कलमाडींविरुद्द लोकसभेची निवडणूक हरले होते. २०१४ मधे ते लोकसभेसाठी इच्छुक होते पण खासदार न होता आमदार झाले पण राज्यात मंत्री होण्याची संधी मिळाली. सध्या ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधे वजनदार मंत्री आहेत. पुणे शहराच्या कारभारावर चांगली पकड आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एक कार्यक्षम मंत्री आहेत. सर्वपक्षीयांशी त्यांची उत्तम मैत्री असते. आपल्या पोराबाळांना त्यांनी राजकारणात आणलेले नाही. कित्येक वर्षे नगरसेवक, मागील कित्येक टर्म्स ते आमदार आहेत. राजकीय आयुष्याच्या सुंदर टप्प्यावर ते सन्मानाने निवृत्ती घेणार की लोकसभेसाठी प्रयत्न करणार याबाबत उत्सुकता आहे. त्यांचे नाव पुढे आल्यास भाजपाकडून बाकी सर्व नावे मागे पडतील. त्यांच्या नावाला आव्हान दिले जाण्याची शक्यता कमीच.
प्रदीप रावत - हे बर्यापैकी अभ्यासक, वाचक म्हणून ओळखले जातात. हिंदी, मराठी, इंग्रजी मधून वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देऊ शकतात. भारतीय इतिहास, संस्कृती, सावरकरांचा विज्ञानवाद, सामाजिक समरसता हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. अटल बिहारी पंतप्रधान असताना प्रदीप रावत पाच वर्षे पुण्याचे खासदार होते. २००४ मधे कलमाडींकडून पराभूत झाले होते. त्यांनी आपल्या कुटुंबियांना राजकारणात आणलेले नाही. सध्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत.
ashutoshjog@yahoo.com
अनिल शिरोळे - 2009च्या लोकसभा निवडणुकीमधे सुरेश कलमाडींकडून पराभूत झाले. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीमधे पुणेकरांची असलेली मोठी सहानुभूती, मोदी लाट आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचा पाठिंबा यामुळे अनिल शिरोळे पुण्यातून अभूतपूर्व बहुमताने विजयी झाले. खासदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या सुपुत्राला तिकिट मिळवून दिले आणि नगरसेवक केले. पीएमटीच्या समितीवर सुपुत्र संचालक म्हणून काम करतात. पण प्रवाशांना सुद्धा पीएमटी बद्दल जितकी माहिती असते तितकी शिरोळेपुत्राला असते का आणि या सुपुत्राला पीएमटीचा दिवाकर रावते म्हणता येईल का यावर सध्या आमचे चिंतन सुरू आहे. खासदार म्हणून अनिल शिरोळे यांनी काय काम केले, कितपत प्रभाव पाडला याचाही अभ्यास करावा लागेल.
जाणकारांनी आमचा मागील वेळचा धागाही अवश्य पाहून घ्यावा. २०१४ पुणे लोकसभा निवडणूक
2019 मध्ये भाजप-शिवसेना युती होईल का ? काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील का ? राष्ट्रवादी पक्ष पूर्वीइतकीच ताकदवान राहील का ? आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला दगा देण्याइतकी राष्ट्रवादी स्ट्राँग राहील का ? अशा अनेक प्रश्नांची अजून उत्तरे मिळायची आहेत. कोणी सांगावे जनतेच्या मनात आणखीनच एखादे नाव असू शकेल आणि ही सगळी नावे बाजूला सारून एखादी वेगळीच व्यक्ती पुणेकर सुज्ञपणे खासदार म्हणून निवडून देऊ शकतील. काळाच्या उदरात काय दडले आहे कुणालाच माहीत नाही. तोवर चिंतन सुरु ठेवायचं . . .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वरील नावाव्यतिरिक्त वेगळे
.
बरोबर.समजा लोकसभेवर निवडून
धाग्याचे नाव
..
कास्ट फॅक्टर असेल तर मग
वाईटातून चांगले निवडण्याची संधी.
.
शीर्षक अस्सल पुणेकरी
.
मन हरखलं
साहित्य सम्पादकाना विनंती
.
वंदना चव्हाणांना परत राज्यसभा