पच्ची पलसू, मूळ तेलगू उच्चारण बहुधा 'पच्ची फुलसू ' असावे. बेसिकली गरम करण्या एवजी थंड केलेले, आंबटपणा बराच डायल्यूट केलेले चिंचेचे पेय (सार). ज्यांना पाणीपुरी मधली चिंच गूळ चटणी चालते त्यांना पच्ची पलसू ही आवडावे . उष्णतेच्या काळात हे गार क्षूधावर्धक दुपारच्या भोजनाची लज्जत सहज वाढवते. अगदी पुण्यासारख्या ठिकाणाचा उन्हाळाही तीव्र होतो आहे तेव्हा पच्ची पुलसू चा उन्हाळ्यात महाराष्टॄय लोकांनी अधून मधून समावेश करण्याचा विचार करण्यास हरकत नसावी.
मूळ पदार्थ चिंचप्रेमी तेलंगाणाचा, जराशा वेगळ्या व्हर्शन मध्ये आंध्रा मध्येही बनते . मराठवाड्या प्रमाणे विदर्भही तेलंगाणाच्या बॉर्डरवर येते पण वैदर्भीय मंडळींचे आंबट प्रेम मात्र अत्यंत कमी त्यामुळे वैदर्भीय व्हर्शन मध्ये आंबटपणा अजूनच डायल्यूट केला जात असावा. तसे आफ्रीकन ट्रायबल रेसिपी म्हणून दार ए सलाम मध्येही तदृश्य चिंच पेयाचा आनंद घेण्याचा एकदा योग आला होता.
बर्याच वर्षांनी काल मूळ तेलंगाणा व्हर्शनचा केवळ आस्वादच घेता आला असे नाही तर बनवताना पहाताही आली. या निमीत्ताने रेसिपी मिपावर शेअर करण्याचा विचार केला. त्यांच्या मूळ व्हर्शन मध्ये दोन लिटर पाण्यासाठी दिडशे ग्राम चिंच धुऊन कोमट पाण्यात भिजवली गेली . ( महाराष्ट्रीयन रुचीला कदाचित ५० ग्राम चिंचही पुरली असती असे वाटून गेले - वैदर्भीय व्हर्शनमध्ये असेच काहीसे कमी प्रमाण असावे, केवळ अधिक काळ भिजवावी लागली असती एवढेच.) चिंच भिजे पर्यंत अर्ध्या तासात अर्धीवाटी तीळ भाजून, मिक्सरवर बारीक वाटून घेतले. तीळ तीन चमचे पुरेत असे सांगितले होते तरीही मी अधिक वापरले - अधिक तीळ वापराबद्दल एका कुटूंबीयाची तक्रारही आली. ( युट्यूबवरील आंध्र व्हर्शन्स मध्ये तीळ किंवा कोणतेच थिकनर दिसले नाही; तर काही तेलंगाणा व्हर्शन्स मध्ये थिकनर म्हणून रोस्टेड पीनट पावडर अथवा भाजलेल्या शेंअदाण्याचा कुट अल्प ते पूर्ण आवडी नुसार बदललेला दिसला पण मूळ तेलंगाणा स्वैपाकात सहसा शेंअदाण्याच्या कुटा एवजी तीळाचा कुट प्रीफर करते. थिकनर म्हणून नॉन ऑईल सिड्सचा प्रयोग करुन पहाण्याची गरज असावी. पण तीळाचा तरंगता कूट पेयाच्या लज्जती सोबतच पहाण्यासही आकर्षक वाटतो अर्थात फोटोत तीळाचा तेवढा इंपॅक्ट सहज दिसत नाही मे बी अधिक जाणकार छायाचित्रणाची गरज असावी) गूळाचा बराच मोठा खडाही खिसून घेतला. ( वैदर्भीय व्हर्शन मध्ये तीळ आणि गूळ अधिक तर चिंच बरीच कमी असण्याची शक्यता वाटते)
चिंच भिजल्या नंतर कोळून चिंचेचे पाणि गाळण्यातून गाळून घ्यावी ( आंबटप्रेमी तेलंगाणा लोक गाळणी न लावता थोडी फार चिंच इनक्लूड होऊ देतात) थंड पाण्याचे प्रमाण साधारणपणे दिड ते दोन लिटर घेऊन आवडीनूसार शतक्य तेवढे डायल्यूट करून घ्यावे. त्यात अर्धा ते पाऊण चमचा हळद, चवी पुरते मीठ खिसलेला गूळ आणि तीळ पूड टाकावी. (गूळ न आवडत नाही पण आंबट चालते त्यांच्यासाठी बीन गूळाचे पाणी वेगळे काढून ठेवले ) गूळ विरघण्यासाठी पेय डावाने गोल फिरवावे. कोथिंबीर टाकावी, मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली की झाले चविष्ट पच्ची फुलसू तयार. युट्यूब वरचाच्या आंध्रा व्हर्शन मध्ये फोडणीस कडीपत्ता हिरवी/ लाल मिरची जिरे इत्यादी दिसून आले . एका आंध्र व्हर्शन मध्ये फोडणीतील कडीपत्ता मिरची जिरे जरा वेगळे काढून खलबत्त्यात वाटून पच्ची पुलसूत टाकलेले
मी टेस्ट केलेल्या वैदर्भीय व्हर्शन मध्ये तुळशीच पाने टाकलेली होती असे आठवते. कच्चा चिरलेला कांदाही आवडीनुसार चालतो. पुदीना तसेच धणा जीरा चिंचे सोबत भिजवून पहाण्याचे प्रयोग करुन पहाण्यास हरकत नसावी असे वाटते.
तर असे हे पच्ची पलसू फ्रिज मध्ये ठेऊन दुपारच्या वेळी स्वतंत्र पेय म्हणून आस्वाद घेता येतो . किंवा भरडा भाजी भात किंवा भाताच्या एखाद्या मसालेदार व्हर्शन सोबत ताकाच्या मठ्ठ्या एवजी किंवा सोबतीने जेवणाची लज्जत वाढवू शकते.
भरडा भाजी बाबत आंतर जालावर युट्यूबसहीत फारशी माहिती पाकृत अद्याप नसाव्यात . एक या दुव्यावर सापडली पण अजून व्हर्शन्सची माहिती लिहिण्यास वाव असावा असे वाटते.
छायाचित्रांच्या आग्रहामुळे विकिमिडिया कॉमन्सवरील पच्ची पुलसू चे एक छायाचित्र खाली देतोय पण ते फारसे न्याय देणारे वाटत नाही. त्याला जाणकार छायाचित्रकाराची गरज असावी. पच्ची पुलसूच्या वेग वेगळ्या व्हर्शन्स युट्यूबवर उपलब्ध दिसतात.
हे छायाचित्र विकि मिडीया कॉमन्सवरुन घेतले आहे. मी विकिमिडीया कॉमन्स शिवाय इतर पर्याय अद्याप ट्राय केलेले नाहीत पाकृ छायाचित्रांसाठी इतर संस्थळे सुचवल्यास किंवा तुम्ही कोणती वापरता ते सांगितल्यास आभारी राहीन.
माझी वैदर्भीय चवीची लेखातील ऑब्झर्वेशन चुकली असण्याची शक्यता खालील एका प्रतिसादा वरुन दिसते. त्या बद्दल क्षमस्व.
हे छायाचित्र विकि मिडीया कॉमन्सवरुन घेतले आहे. मी विकिमिडीया कॉमन्स शिवाय इतर पर्याय अद्याप ट्राय केलेले नाहीत पाकृ छायाचित्रांसाठी इतर संस्थळे सुचवल्यास किंवा तुम्ही कोणती वापरता ते सांगितल्यास आभारी राहीन.
माझी वैदर्भीय चवीची लेखातील ऑब्झर्वेशन चुकली असण्याची शक्यता खालील एका प्रतिसादा वरुन दिसते. त्या बद्दल क्षमस्व.
याद्या
14592
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
मस्तय...!
तुम्ही कायपण म्हणता, पन्हे
In reply to मस्तय...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to तुम्ही कायपण म्हणता, पन्हे by प्रचेतस
=))
In reply to तुम्ही कायपण म्हणता, पन्हे by प्रचेतस
साला..ये दिल की मुराद जबान पे
In reply to मस्तय...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) =))
In reply to मस्तय...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही थोडे ऑफ मार्क झालात!
आभार
In reply to तुम्ही थोडे ऑफ मार्क झालात! by जेम्स वांड
छान
नेटवर पाहिले youtube
भरडा भाजी
भरडा भाजी
In reply to भरडा भाजी by manguu@mail.com
कोरड्या हरभरा डाळीची भरड
In reply to भरडा भाजी by manguu@mail.com
फोडणी दिली असल्याने हे पेय
फरक वाटतो
In reply to फोडणी दिली असल्याने हे पेय by कंजूस
चिंच ऑप्शनल ?
In reply to फरक वाटतो by माहितगार
होय
In reply to चिंच ऑप्शनल ? by manguu@mail.com
छान पाकृ