Skip to main content

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

लेखक यनावाला यांनी सोमवार, 19/02/2018 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................

वाचने 82936
प्रतिक्रिया 247

प्रतिक्रिया

In reply to by यनावाला

नास्तिकाने आस्तिकांना विचारलेल्या या प्रश्नाचा प्रारंभीचा अध्याहृत भाग "जर देव अस्तित्वात आहे तर तो...."असा आहे.
हे सांगायची गरज नाही. लोकांनी बरेच प्रतिसाद असं मानूनच लिहिलेत. चर्चा याच्या फार पुढे गेलेली आहे. तुम्ही माझा तुमच्या पहिल्याच पॅराग्राफवरचा प्रतिसाद वाचलेला असेलच नि नेहमीप्रमाणे तुम्हाला कळला नसेल. ------------------------------------------
आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
शिक्षा करत नाही. केली तरी लूटूपूटूची करतात, आंतरिक प्रेम असतंच. लहान मुलांना पालकांच्या शिक्षांनी आपले जीवन दु:खी इ वाटते का??तुमचा नियम इतका सरळधोट असता तर जगात असंस्कारित मुले मोठी होउच शकली नसती. --------------- देव म्हणजे हिरण्यकश्यपू हे कुणी शिकवलं तुम्हाला? लोकशाहीत सार्वभौम सत्ता असून विरोधकांना वा विरोधी मतदारांना मर्त्य अतिशय स्वार्थी लोकांनी बनलेलं सरकार काही करत नाही इतकं ते सज्जन असतं. मग देव काय इतका फालतू असतो का त्याला नाही मानलं तर शिक्षा करत सुटेल?
यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
नास्तिकांना काय असतं नि काय नसतं हे फार व्यवस्थित कळतं असं दिसतंय. तेव्हा गुरुत्वाकर्षण तरंग आहेत कि नाहीत हे कळण्यासाठी प्रयोग करूच नये. थेट नास्तिकाला विचारावं, 'सांग रे बाबा, हे तरंग असतात कि कसे?' ------------------------- यना, देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.

In reply to by यनावाला

कोणातरी, टिपिकल अंधश्रद्धाळू, देवभिरु क्ष आस्तिकाला आणि त्याच्या देवाच्या, देवाच्या न्याय करण्याच्या पद्धतीच्या कल्पनेला बेसलाईन पकडून मुद्दे मांडले की असं होतं. ************************* देव कोणालाही अशीच शिक्षा करत नाही, देव शिक्षाच करत नाही न्याय करतो, नास्तिक देवावर विश्वास ठेवत नाही हा अस्तिकतेच्या पुस्तकातील गुन्हा नाहीये असे समजणारे आस्तिक असतात हेच मुळात (आधीच, पूर्वग्रहाने) नाकारलेले असल्याने बाकीची चर्चा वांझोटी ठरते.

In reply to by यनावाला

देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.


In reply to by यनावाला

यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
देव ही संकल्पना नेमकी काय आहे याची विशिष्टताच अशा मांडणीने पुसली जाते. देव , as we think of अशा प्रकारचा देव अस्तित्वात नाही इतकंच सिद्ध करायचंय का? देव अशी व्यक्ती किंवा एक युनाइटेड शक्ती अस्तित्वात नाहीच आहे. पण देव हे "चांगुलपणा", "व्यक्तिगत तात्कालिक हितापेक्षा दीर्घकालीन सार्वत्रिक हित पाहणारा सद्विचार" इत्यादि अनेक गोष्टींचं "प्रतीक" आहे. ज्यांना समूर्त झेपतं त्यांना समूर्त, ज्यांना अमूर्त झेपतं त्यांना अमूर्त. हे सद्विचार, चांगुलपणा वगैरे कितपत उपयुक्त किंवा योग्य आहेत यावर मतभेद संभवतो. पण त्या चांगुलपणाचं देव ही कल्पना हे एक आदर्श प्रतीक आहे. त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल. पण प्रतीकाशिवाय स्मरण राहात नाही हो लोकांना. वडील वारुन वीसतीस वर्षं झाली की लोकांना माहीत असतं हो की आपले वडील अस्तित्वात नाहीत. कोणी फोटो लावतो, कोणी लावत नाही. पण आयुष्यातल्या एका मोठ्या भागाचं, अनेक गुणांचं प्रतीक म्हणून ते वडील असतातच. मलाही माहीत नाही की देव आहे का किंवा कसा आहे. पण त्याला एक भौतिक अस्तित्व म्हणून सिद्ध किंवा असिद्ध करण्यातला तर्क समजत नाही. आपल्या अस्तित्वातला चांगुलपणा याचंच देव ही "संकल्पना" हे एक प्रतीक आहे. त्याचं स्मरण भजन पूजन हे चांगुलपणा या गुणाला दिलेला सन्मान आहे असा विचार करुन पाहता येईल का?

In reply to by गवि

त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल.
गवि, असं अजिबात नाही. ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.

In reply to by सतिश गावडे

अस्तित्व ही संकल्पना विज्ञानाच्या दायर्‍या बाहेर आहे. जे अस्तित्वात आहे नि समोर आहे ते आतापर्यंत कितपत समजलं आहे इतकंच विज्ञान सांगतं. काय असू शकतं नि काय असू शकत नाही हे विज्ञानाच्या स्कोपमधेच येत नाही. https://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/sci…
Clearly, the scientific method is a powerful tool, but it does have its limitations. These limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity. Sometimes, scientific principles are used to try to lend credibility to certain nonscientific ideas, such as intelligent design. Intelligent design is the assertion that certain aspects of the origin of the universe and life can be explained only in the context of an intelligent, divine power. Proponents of intelligent design try to pass this concept off as a scientific theory to make it more palatable to developers of public school curriculums. But intelligent design is not science because the existence of a divine being cannot be tested with an experiment.
विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा.

In reply to by arunjoshi123

विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा. बरोबर ओळखलंत तुम्ही. आणि अशा लोकांना उघडे पाडण्याचे तुम्ही जे धर्मकार्य अंगिकारले आहे त्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे.

In reply to by arunjoshi123

ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.
विज्ञान कशाचंच अस्तित्व नाकारत नाही. शब्द बदलून असं म्हणावं की एखादी थियरी सिद्ध करताना "देव जसा आज लोकांच्या समजुतीत आहे तशा रूपात तो अस्तित्वात आहे" असं गृहीतक सध्यातरी "इनव्होक" करण्याची गरज विज्ञान (आजरोजी) मानत नाही. मुद्दा तो नाही. देवकण किंवा अन्य त्यापुढचंही काही सध्याच्या ज्ञाताच्या जरा जरा पलीकडचं दिसायला लागलं तरी लगेच देवाचं भौतिक अस्तित्व सिद्ध, मान्य वगैरे होऊ शकत नाही. यांचं मुख्य कारण म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मानणं हे कशाचंच उत्तर असू शकत नाही. ते फक्त "प्रश्न ट्रान्सफर करणं" आहे. विज्ञान "उत्तरं" शोधत असतं. तेव्हा सध्या तरी देव ही संकल्पना भल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून ज्याच्या मनात ते आहे त्याच्या मनात ते असू दे. आवर्जून त्याचं भंजन करु नये असं मत आहे.

In reply to by यनावाला

तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
यना, यना जरा धीरानं घेत जा. अहो, सर्व माणसे देवाची जैविक लेकरे आहेत असं कोणी मानत नाही हो. हे एक बोलायची पद्द्धत झाली. ब्रह्मांडातील सर्व अस्तित्वांमधे (वा जगातल्या सर्व चेतनाचेतन गोष्टींमधे वा असेच काही) एक आंतरसंबंध आहे असा नि असाच त्याचा व्यवहार्य अर्थ निघू शकतो. या आंतरसंबंधाचे स्वरुप म्हणजे जैविक बंधु वा भगिनी नव्हे. जरी एक आत्मियतेचा भाव असला तरी डायरेक्ट कुटुंबाचं उदाहरण देत सुटावं असा अभिप्रेत अर्थ नाही.

In reply to by यनावाला

तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
यना, यना जरा धीरानं घेत जा. अहो, सर्व माणसे देवाची जैविक लेकरे आहेत असं कोणी मानत नाही हो. हे एक बोलायची पद्द्धत झाली. ब्रह्मांडातील सर्व अस्तित्वांमधे (वा जगातल्या सर्व चेतनाचेतन गोष्टींमधे वा असेच काही) एक आंतरसंबंध आहे असा नि असाच त्याचा व्यवहार्य अर्थ निघू शकतो. या आंतरसंबंधाचे स्वरुप म्हणजे जैविक बंधु वा भगिनी नव्हे. जरी एक आत्मियतेचा भाव असला तरी डायरेक्ट कुटुंबाचं उदाहरण देत सुटावं असा अभिप्रेत अर्थ नाही.

In reply to by यनावाला

तद्वतच नास्तिकांनी देवा-धर्मावर श्रद्धा ठेवावी म्हणून मायबाप देवाने त्यांना शिक्षा करायला हवी, अशी अपेक्षा योग्यच आहे.
डोळ्यासमोर दिसणार्‍या आईबापांना लेकरे अस्तित्वातच नाहीत असे का म्हणतील? आणि म्हणू लागले तर मानसोपचारासाठी नेतील, शिक्षा का देतील? ================== ज्या लेकरांची मायबापांवर श्रद्धा नाही त्यांना ते मायबाप १००% केसेस मधे शिक्षा देतातच असं कुठं पाहिलंत?

In reply to by यनावाला

देव सर्वसमर्थ असल्याने तो कोणतीही शिक्षा सहज देऊ शकतो. पण असे होताना दिसत नाही सकाळ झाल्यावर आपल्याला "अंधार समजून" सूर्य खाऊन टाकेल या भीतीने कावळे ओरडत असतात वयं काक: काक:. याचा वरील लेखाशी संबंध आहे असे वाटल्यास तो योगायोग समजावा.

सृष्टीच्या इतिहासात अगदी अलिकडे अवतरलेला माणुस नावाचा यःकश्चीत प्राणी आपल्या सुख-दु:खांच्या आणि नैतीक-अनैतिकतेच्या कल्पना केंद्रस्थानी ठेऊन सॄष्टीचं नियमन त्यानुसार का होत नाहि वगैरे चॅलेंज करतो. आपण नेमके काय आहोत, कसे आहोत याची कणभर देखील जाणीव झाली नसताना पार न्याय-अन्यायाच्या बाता मारणे.... किती कॉमेडी सुरु आहे.

In reply to by अर्धवटराव

यनावाला सृष्टीच्या नियमांना आव्हान देत नसून माणसाच्या मनातील देव कल्पनेला आव्हान देत आहेत.

In reply to by सतिश गावडे

हे खरच आहे.पण मन या गोष्टीचे आकलन पुर्णपणे झाले आहे का? देव ही संकल्पना मनात का रुजली? मेंदु आणि मन याचा परस्पर सबंध कसा आहे की ते एकच आहे? असे अनेक प्रश्न या आव्हाना सोबत पण येतातच.

In reply to by सतिश गावडे

"निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करत नाहि" या वाक्यात एखाद्या मानवी मान्यतेवर दुसर्‍या एखाद्या व्यवस्थेकडुन जजमेण्ट का दिलं जात नाहि, असा काहिसा अर्थ मला उमगतोय. तेंव्हा मानवी मनाच्या उगमापासुनच्या घडामोडी आणि त्यावर मिळणारी कलेक्टीव्ह रिअ‍ॅक्शन याबाबत काहि बेसीक चिंतन झालेलं असावं अशी किमान अपेक्षा आहे. असो. बाकी सदर धागाकर्ता कुठल्याच कल्पनेला आव्हान वगैरे देत नाहि आहे. रिकामटेकड्यांचे देव-देव करण्याचे उद्योग आणि त्याला 'प्रबोधनाचे' डोज पाजण्याचे उद्योग यातील कृती जरी नेमक्या उलट असल्या तरी त्याची पत एकच असते. इट्स लाइक अ पिरॅमीड. त्याच्या टोकावर बसलेत नारायणराव. एक ब्लॉक खाली "ईश्वरी रिअलायझेशन" असणारे असे काहि तुरळक जीव. आणखी खालच्या पातळीवर "ईश्वरी संकल्पना" उमगलेले जीव. मग येतो "ईश्वरी कल्पनेचा" मोठा ब्लॉक. त्याच्या खाली "ईश्वरी बिझनेस"चा प्रचंड मोठा ब्लॉक. सर्वात खाली "ईश्वरी मनोरंजनाचा" सगळ्यात मोठा ब्लॉक. या बॉटम ब्लॉकवर आस्तीक-नास्तीक, सो कॉल्ड श्रद्धा-डबल सो कॉल्ड विवेक अशी कुस्ती सुरु असते. ते तसंही सिरीयसली घेऊ नये.

In reply to by अर्धवटराव

वरकरणी अगदी छोट्या वाटणार्‍या या प्रतिसादात तुम्ही बरेच मुद्दे मांडले आहेत. आणि त्या मुद्द्यांमध्ये दमही आहे. तुमची पिरामिडची उपमा आवडली. मात्र तुम्ही तुमच्या ईश्वरविषयक धारणेनुसार नारायणरावांना तुम्ही पिरामिडच्या टोकावर बसवलेत. माझ्या ईश्वरविषयक धारणांनूसार ते टोक अज्ञानाचे आहे (म्हणजे ही सृष्टी कशी निर्माण झाली, कशी चालते याबद्दल ठामपणाने काहीच बोलता येत नाही. भविष्यात एखादे नविन आकलन होऊन महास्फोट आणि उत्क्रांतीसुद्धा कविकल्पना ठरु शकतील या मताचा मी आहे.) सविस्तर दुसर्‍या एखाद्या प्रतिसादात. :)

In reply to by सतिश गावडे

तुम्ही नारायणराव म्हणा, शंभूसाहेब म्हणा, ओंकारगुरुजी म्हणा, मायबाई म्हणा किंवा काहिच म्हणु नका... हे सगळे पिरॅमीड टोकाच्या जवळ गेल्यावरचे धंदे आहेत. 'नर ऐसी करनी करे कि नर का नारायण होए' असं जेंव्हा कबीर म्हणतो तेंव्हा त्याला एखाद्या मिपाकरांस एकदम दोनाच्या ऐवजी चार हात फुटावे , आणि तो मस्तपैकी अजगरावर बसुन स्मीमींगपूलमधे चकरा मारु लागावा असं काहि अभिप्रेत नसतं. आणि त्याने आपल्या भाटांव्यतीरीक्त इतरांना शिक्षा देत सुटावं असं तर अजीबात नसतं. जाऊ देत. :)

In reply to by सतिश गावडे

मनात आणलं तर यनावाला सृष्टीच्या नियमांना देखील आव्हान देऊ शकतात असं वाटतं. त्यांना ढोलकीवाल्यांची नीट साथ मिळाली तर सृष्टीच्या नियमांनाच काय सृष्टिलाच आव्हान करतील.

In reply to by सतिश गावडे

माझा देव असं काही असतं का? माझ्यासाठी सवता देव असावा असं असण्याचं काही कारण नाही. इंग्रजी: I suppose God is a common commodity. सर्व लोकांची जी सर्वसामान्य धारणा आहे त्यापुढे जाऊन मी काही अभ्यास केलेला नाही. धारणांतील विरोधाभासांचा अभ्यास चर्चांमधून मात्र खूप झाला आहे. ---------------------- ज्या लोकांना त्या क्षेत्रातलं कळतं, अभ्यासता येतं, माझ्यासारख्या कमी समजूत नि वेळ असलेल्या सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसासमोर मांडता येतं, त्यांच्या मतांवरील आव्हानांना तोंड देता येतं आणि जे लोकप्रसिद्ध आहे ते म्हणणं मी माझा विवेक न लावता स्वीकारतो. -------------------------- माझ्या ईश्वरविषयक धारणा काय आहेत व त्या कसकश्या विकसित होत आल्यात ते एका सवत्या लेखात सवडीप्रमाणे. --------------------------- बाकी, नास्तिकीय मूर्खतांमधे मला डॉक्टरेट आहे असं आरामात म्हणता येईल.

In reply to by arunjoshi123

माझा देव असं काही असतं का?
हो असतो ना. म्हणून तर विचारले. उदाहरणार्थ काहींचा देव संकटात धावून येतो. त्यांच्या भल्या बुर्‍या कृत्यांवर त्या देवाचे लक्ष असते आणि वाईट कृत्याची तो शिक्षा देतो. तर चांगल्या वागणुकीचे, देवाच्या भक्तीचे देव चांगले फळ देतो. काहींचा देव यातले काही करत नाही. त्याने एकदाच सृष्टी निर्माण केली, ती कशी चालेल याचे नियम बनवले आणि आता निवांत हा सृष्टीचा खेळ पाहत बसला आहे. तो त्या खेळात काही ढवळाढवळ करत नाही. वगैरे. या अंगाने मी तुमचा देव कसा आहे हा प्रश्न मी विचारला आहे.
बाकी, नास्तिकीय मूर्खतांमधे मला डॉक्टरेट आहे असं आरामात म्हणता येईल.
एव्हढी खात्री बरी नव्हे. :)

बुद्धिदाता ? देव बुद्धिदाता आहे. सर्व प्राणिमात्रांना देवच बुद्धी देतो. गणेश हा देव बुद्धिदाता आहे. असे बहुसंख्य आस्तिक मानतात. म्हणजे त्यांच्यामते निरीश्वरवाद्यांनासुद्धा देवच बुद्धी देतो. आता प्रश्न असा पडतो की जो बुद्धी देतो त्याचेच अस्तित्व नाकारण्याची बुद्धी निरीश्वरवाद्यांना होते तरी कशी ? बुद्धिदात्याचे अस्तित्वच नाकारण्याची बुद्धी कोण कशी देतो ?

In reply to by यनावाला

देव बुद्धी देतो की नाही हा प्रश्न वेगळा. पण, देवाने दिलेली असो किंवा उत्क्रांतीने नैसर्गिकरित्या मिळालेली असो... मानवाची बुद्धी हे एक दुधारी (किंवा अनेकधारी) शस्त्र आहे ! प्रत्येक जण ते आपापल्या कुवती/औकातीप्रमाणे वापरतो. एखादा मानव आपल्या बुद्धीचा उपयोग... "या जगात कोणताच मानव सर्वज्ञ असू शकत नाही आणि मानवाच्या संवेदना व समजेपलिकडे असंख्य गोष्टी आहेत, हे सत्य जाणून, विनयशीलतेने इतरांचे म्हणणे, मन, भावना, इ समजून घेऊन मग"... आपले म्हणणे समंजसपणे सांगण्यासाठी करतो. अशी माणसे स्वतः सुखी असतात आणि दुसर्‍यांच्या उत्कर्षात व सुखात भर घालू शकतात. तर इतर कोण मानव आपण सर्वज्ञानी असल्याच्या कल्पनेत अंध होऊन अहंमन्य बनतो आणि आपल्याशी सहमत न होणार्‍या इतरांचा उपमर्द करण्यात धन्यता मानतो. हे अंधत्व इतक्या टोकाचे असू शकते की, "भौतीक व वैचारीक विविधता हा या सृष्टीचा मूलभूत गुणधर्म आहे आणि ते मानल्याशिवाय कोणत्याच गोष्टीचा सर्वांगिण, समतोल व शास्त्रिय विचार होऊ शकत नाही", हे त्याला दिसत नाही ! असा माणूस, स्वतः कधीच सुखी होऊ शकत नाही आणि दुसर्‍यांच्या सुखाची तर त्यांला पर्वाच नसते... आपल्याशी सहमत नसलेल्यांच्या सुखात विरजण टाकण्याचा त्याचा स्वाभाविक स्वभाव बनतो. आजूबाजूला पाहिले तर जगात वरच्या दोन्ही प्रकारांची, विशेषतः दुसर्‍या प्रकाराची, अनेक उदाहरणे दिसतील. मात्र, बुद्धी वापरून सरळ विचार केला तर तिचा पहिला उपयोग जास्त योग्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पहिल्या प्रकाराचं आंतरजालावर वर हे उदाहरण सापडलं P. L. Deshpande पु. लं. चा नम्रपणा, त्यांची वैचारिक झेप, त्यांचा बुद्धीप्रामाण्यवाद विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. प्रत्येक धर्मातल्या अंधश्रद्धांवर केलेली टीका (फक्त हिंदू नव्हे) फार महत्वाची आहे. यनावाला, या गोष्टी तुमच्या लेखांमध्ये दिसत नाहीत, हे खेदाने नमूद करू इच्छितो.

यनावाला,
बुद्धिदात्याचे अस्तित्वच नाकारण्याची बुद्धी कोण कशी देतो ?
बुद्धी ही काय सांगून सावरून द्यायची वस्तू आहे का? नीरव मोदीला पंजाब न्याशनल ब्यांकेने अनधिकृतपणे पैसे दिले तरी त्याची नोंद ठेवावीच लागली ना? तशी बुद्धी दिल्याची नोंद दाखवायची म्हंटली तरीही दाखवता येत नाही. आ.न., -गा.पै.

एक पेशीय जीव उदा. जिवाणू किंवा अमीबा. हा पुढे का जातो? आपल्यासारखाच दुसरा जीव का निर्माण करतो? या मागे कोणती प्रेरणा / चैतन्य आहे. सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असलेला विषाणू आपल्या सारखे असंख्य जोव कोणत्या शक्तीने आणि का निर्माण करतो? या चैतन्य किंवा शक्ती किंवा प्रेरणेला मी जर देव मानले आणि तिच्याप्रति कृतज्ञ राहिलो तर त्यात वावगे काय आहे? या एक पेशीय किंवा पेशी नसलेल्या आणि स्फटिकरूपात शतकानुशतके निर्जीव राहू शकणाऱ्या विषाणूंना मेंदूचं नसतो तर मन कुठून असणार? पण तरीही कोणत्यातरी गूढ चैतन्याने ते पुनरुत्पादन करतातच. केवळ या चैतन्याला देव मानायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.

In reply to by सुबोध खरे

याच उत्तर अस दिल जात की या सर्वामागे कोणतीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही. हे सर्व आपोआप वा यदृच्छेने घडत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपो आप दगड का हलत नाही? घोडा म्हशीला का जन्म देत नाही? सजीव आपल्यासारख्याच सजीवाला का जन्म देतो. विषाणू काही तर्हेच्या सजीवांवरच का हल्ला करतात? १० मिनिटांपूर्वी जिवंत असलेला माणूस मृत होतो तेंव्हा त्याचे शरीर तसेच असते मग जीव जातो म्हणजे नक्की काय जाते? काही तरी प्रेरणा चैतन्य ऊर्जा आहे जे अजून आपल्याला समजलेले नाही. त्याला जर एखादा देव मानत असेल तर? तो केवळ आस्तिक आहे म्हणून त्याला मूर्ख म्हणायचे? बढिया है.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जर खालच्या जीवांस जाणिव नसेल (तसं वनस्पतींसही भावना असतात, हे असो.) तर वरच्या जीवांना देखील जाणिव असावयाचे कारण नाही. कारण दोहोंची पेशीय रचना समानच आहे. म्हणून खालच्या जीवाचे जगणे हे भौतिक रासायनिक आण्विक प्रक्रियांचा परिपाक असेल तर तेच आपल्यालाही लागू आहे. याचा थेट अर्थ यनावालांचं नास्तिक असणं त्यांच्या स्वेच्छेने नसून त्यांच्या डोक्यातील रसायनांमुळे आहे. तसेच असे असल्यामुळे त्यांनी कोणावर अस्तिक म्हणून टिका करायचा अतार्किक्पणा न करावा कारण असा अस्तिकी मूर्खपणा घडवून आणणारी रासायनिक क्रिया आहे नि त्यात त्या व्यक्तिचा दोष नाही. मात्र अशा निर्दोष व्यक्तिवर टिका करण्यात यनावालांचाही काही दोष नाही कारण असे विरोधाभासी वर्तन करावे अशीच त्यांची भौतिक रचना आहे! नास्तिकांचं विश्व खरोखरच सुंदर आहे! बर्‍याच लोकांना माझं लेखन अर्थहीन नि बेबंद वाटतं. त्याकरिता मी इंग्रजीत देखील लिहित आहे. त्यानं मला जो अभिप्रेत अर्थ आहे तो दोन प्रकारे मांडून झाल्याने कळेल. मी लिहिलं आहे ते चूक असू शकतं पण अर्थहीन नाही हे कळेल. If we choose to say that the micro-organisms don't have consciousness, there is no reason to believe that even the higher order organisms have it. It is because the cellular structure for both the entities is the same. Or we if say that the consciousness is on account of genetic complexity in the higher organisms, then one must concede that organisms including us don't need any consciousness to eat, to grow, to reproduce or to move, i.e. the basic things that micro-organisms do. This further leads to a conclusion that an atheist's own disbelief in god is not based on his intellect or free will but his physio-chemical setup. Same way, it is pointless to criticize a believer for being one as he is just following the outcome of his biological set-up. In turn it is pointless to criticize an atheist for criticizing a believer because that's how he is made. Thus everything is meaningless. Such is the beauty of atheist world.

In reply to by arunjoshi123

बर्‍याच लोकांना माझं लेखन अर्थहीन नि बेबंद वाटतं. आपल्या लेखन प्रतिसादाचं हे सार अगदी मनापासून पटलं. आभार. -दिलीप बिरुटे

देव आणि धर्म यांविषयी सुप्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांचे विचार. ("एक शून्य मी" हे पु.लंच्या काही वैचारिक लेखांचे पुस्तक आहे. त्या लेखसंग्रहातून हे सुविचार टिपले आहेत.) १) धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा, यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून कोणत्याही मूर्तीला मी नमस्कार केलेला नाही. २) पूर्वजन्म, पुनर्जन्म, या थोतांडांवर माझा विश्वास नाही. ३) देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही. ४) आपल्या देशात इतके संत जन्माला आले त्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. ५) अनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संतापेक्षा अधिक मोठा वाटतो. ६) (पूर्वी) पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलर्‍याने मरत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलर्‍याची लस शोधून काढणार्‍या वैज्ञानिकाने. ७) सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणीना कुणी ताला सुरांत सांगत असते. आणि इकडे गॅलरीत आल्यावर समोरच्या कचराकुंडीत बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसतात. रेडियोत देवावर विशेषणांची खैरात चालूच असते. ८) देवदीनांचा वाली आहे आणि संकटकाळी तो भक्तांच्या मदतीला धावून येतो याचे पुरावे पौराणिक कथांखेरीज अन्यत्र कुठेही सापडत नाहीत. ९) देऊळ बांधणे हा सत्ताधारी राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. १०) धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील. *****************************************************************************

In reply to by यनावाला

+१,००,००० ! प्रत्येक वाक्य लाखाची गोष्ट आहे !! हा प्रतिसाद लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन ! प्रबोधन कसे करावे याचा वस्तूपाठ असलेला, आणि म्हणूनच, प्रत्येक दिवस सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वतः कमीत कमी दहादा वाचावा, असा हा प्रतिसाद आहे. तुमचा प्रतिसाद असूनही, फक्त पुलंच्या लेखनाची पुनरुक्ती असल्यामुळेच केवळ, त्यात आस्तिकांसह इतर कोणालाही उद्धटपणे निर्बुद्ध, मूर्ख, अविचारी, इत्यादी तुमची सिग्नेचर विशेषणे लावलेली नाहीत याकडे (अगोदरच ध्यानात आले नसल्यास) आपले लक्ष वेधत आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इतक्या दिवसांच्या वादविवादानंतरही, किमान मिपावरच्या बहुतेक जणांचा विरोध, तुमच्या विचारांना नाही तर... (अ) तुमची अहंमन्य, अशिष्ट व उद्धट भाषा, (आ) आपले म्हणणे मांडताना बहुतेक वेळेस तुम्ही वापरलेली चुकीची उदाहरणे व त्यांचे अतार्किक विश्लेषण/कार्यकारणभाव, आणि (इ) या दोन्ही गोष्टी, (तुमच्या व इतरांच्या) समाजप्रबोधनाला विरोधाभासी (काऊंटर-प्रोडक्टिव्ह) ठरतात ...यासाठी आहे, हे तुमच्या ध्यानात आलेले नाही (की ध्यानात घेण्याचे हेतुपुरस्सर टाळले जात आहे ?!) याचे महदाश्चर्य वाटत आहे !?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रतिसाद डॉ साहेब... ज्यांना स्वता: ला प्रबोधनाची गरज आहे.. ते दुसर्यांचे प्रबोधन करण्यात धन्यता मानतात...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुलंची खालील वाक्ये ३) देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही. ९) देऊळ बांधणे हा सत्ताधारी राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. १०) धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील. अास्तिकांना निर्बुध्द वगैरे म्हणणारी नसली, तरी अास्तिकांच्या नावांवर जे काही समाजात चालू अाहे, त्यावर अाणि अास्तिक मनोवृत्तीवर निश्चितपणे टीका करणारी अाहेत. देव धर्म या कल्पना अाहेत व त्या वापरणारे सत्याचे शत्रू अाहेत एवढी प्रखर टीका असूनही तुंम्ही यनावालांना वेगळा न्याय लावताय का, असे वाटले. तुंम्हाला पुलंचे म्हणणे पटते, का फक्त त्यांचा सांगण्याचा मार्ग यनावालांपेक्षा पटतो?

In reply to by स्वधर्म

बहुतेक पुलंचा असा लेख नाही. =================== ही वाक्ये सुटी सुटी नि वेगवेगळ्या संदर्भात आहेत. ================ त्या त्या संदर्भात ती लागू असावीत. ========================= हे एकत्र असंच तुटक लिखाण असेल तर पुल आणि यनावाला सारख्याच पात्रतेचे आहेत. ============== कोणी पुलंची रामावरची नि त्याला मानणारांवरची काही विधानं देऊ शकतं का?

In reply to by arunjoshi123

यांचा अादर अाहे. फॅशनेबल पुरोगाम्यांविषयी तुमचे मत प्रतिकूल दिसते, ते बरोबरच अाहे. उगीच फॅशन म्हणून काहीही करणे तसे भोंगळच! माझ्या प्रतिसादात म्हात्रे सरांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची प्रतिक्षा.

In reply to by arunjoshi123

"देवाने आमची लहानशी जीवने समृद्ध करण्यासाठी दिलेल्या ह्या देणग्या, न मागता दिल्या होत्या, न सांगता नेल्या" "आयुष्यात पक्षी पाळावासा वाटला तर हंस पाळेन, असा पक्षी बनवणं विधात्यालाही पुन्हा जमले नाही" "जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने आपणा सर्वांचे चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की, यातून सुटका करायला आपली आणि आपुलकीने भोवती जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?" ========================== पुलंची वाक्ये चुकीच्या संदर्भात वापरून काय सिद्ध करायचे आहे? तुम्ही पुलंना मानता ना मग बघा पु. ल. पण नास्तिक होते, हे? किती आस्तिक वैज्ञानिकांची नावे लिहावीत बरे? ========================== खरेतर मी म्हणेन, पुलंसारखा आस्तिकच मलातरी अभिप्रेत आहे.

In reply to by स्वधर्म

साधनशुचिता, समतोलपणा आणि सभ्यपणा या तीन शब्दांचे शास्त्रिय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातले महत्व लक्षात ठेवून माझे वरचे प्रतिसाद परत वाचलेत तर पुलंच्या वचनांत आणि यनावालांच्या भाषेत आणि साधशुचितेतले दोष स्पष्ट होतील असे वाटते ! (वरचा प्रश्न तुमच्याकडून यावा याचे आश्चर्य वाटले ! पण ते असो.)

In reply to by स्वधर्म

साधनशुचिता, समतोलपणा आणि सभ्यपणा या तीन शब्दांचे शास्त्रिय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातले महत्व लक्षात ठेवून माझे वरचे प्रतिसाद परत वाचलेत तर पुलंच्या वचनांत आणि यनावालांच्या भाषेत आणि साधशुचितेतले दोष स्पष्ट होतील असे वाटते ! (वरचा प्रश्न तुमच्याकडून यावा याचे जरासे आश्चर्य वाटले ! पण ते असो.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर, धन्यवाद. साधनशुचिता, सभ्यपणा व समतोलपणाबाबत अापले म्हणणे पटलेच. पण माझा प्रश्न यनावालांबाबत कमी अाणि अापल्या मतांबाबत जास्त अाहे. “तुंम्हाला पुलंचे म्हणणे पटते, का फक्त त्यांचा सांगण्याचा मार्ग यनावालांपेक्षा पटतो?”

In reply to by स्वधर्म

“तुंम्हाला पुलंचे म्हणणे पटते, का फक्त त्यांचा सांगण्याचा मार्ग यनावालांपेक्षा पटतो?” पुलंचे म्हणणे आणि सांगण्याचा मार्ग, दोन्हीही पटतात. स्वतःचा देवावर, धर्मावर किंवा एखाद्या विचारसरणीवर विश्वास असणे-नसणे हा वैयक्तिक हक्कांचा भाग आहे. स्वतःचे मत स्पष्ट, समतोल, संयत व शास्त्रिय पद्धतीने दुसर्‍यांना सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे हे योग्य आहे. पण अश्या स्वतःच्या अथवा दुसर्‍याच्या विश्वासाचा उपयोग इतरांची दिशाभूल/फसवणूक/अपमान/जबरदस्ती करण्यासाठी करणे हे सर्वथा निषिद्धच आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुंम्ही वर जे म्हटलं अाहे, तेच जाणून घ्यायचं होत. हिरीरीने तुंम्ही यनावालांच्या मतांचा प्रतिवाद करता पण जाता जाता त्यांचाही कडक समाचार घ्यायचात, म्हणून तुंम्ही साधारणपणे असतात, तसेच अास्तिक असाल असे वाटू लागले होते. वरती तुंम्ही पुलंची मते पटतात, म्हटल्यावर प्रश्नच मिटला. तुमचा सर्व विरोध हा केवळ अास्तिकांचे ज्या पध्दतीने प्रबोधन केले जात अाहे, तिला अाहे, हे स्पष्ट झाले. पुन्हा धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

तुमचा सर्व विरोध हा केवळ अास्तिकांचे ज्या पध्दतीने प्रबोधन केले जात अाहे, तिला अाहे, हे स्पष्ट झाले. हे आणि इतर काही. यनावालांच्या या व इतर अनेक लेखांच्यावरचे माझे प्रतिसाद पाहिले असतेत तर, हेच मी पुन्हा पुन्हा स्पष्टपणे लिहित आहे, हे तुमच्या ध्यानात आले असते. :) आजतागायत मानव या जगातल्या बर्‍याच गोष्टींबाबत अज्ञानी आहे याचे ज्ञान झाले की, मनाचे अंधत्व, हट्टीपणा व अडेलतट्टूपणा खुल्या मनाने टाळून, इतरांच्या मानवी अधिकारांवर गदा न आणणार्‍या कोणत्याही विचार व कृतीचे खुल्या मनाने विश्लेषण करणे शक्य होते. या विचारसरणीला अज्ञेयवाद असे म्हणतात... अज्ञानाचे ज्ञान... "अज्ञानाचे ज्ञान" झाले की; इतरांचे विचार व कृती... (अ) पटले तर, अहंकार बाजूला ठेवून, खजिल न होता, स्विकारता येतात आणि (आ) नाही पटले तर, "असहमतीवर सहमती" असा मध्यममार्ग काढून सरळ सुखाने राहता येते. "अज्ञानाचे ज्ञान" झालेले नसले की; आस्तिकांत, नास्तिकांत किंवा इतर कोणत्याही विचारधारेत, "मी म्हणतो तेच ज्ञान हेच अंतीम सत्य" अशी अंधश्रद्धा व त्या पायावर निर्माण झालेला अहंकार दोन्हीही, इतके बळावतात की आपले म्हणणे खरे करायला माणूस कोणत्याही थराला जायला तयार असतो. आणि ते करताना, तो स्वतः जप करत असलेल्या त्याच्या विचारधारेच्या मूलतत्वांची पायमल्ली होते आहे, याची त्याला पर्वा अथवा खंत वाटत नाही. असे करताना त्याचे बोलणे-लेखन-कृती स्वतःच्या विचारधारेपासून दूर जावून वैयक्तिक स्वार्थ व हितसंबंधाच्या दिशेने केव्हा जाते हे त्यालाही कळत नाही. ही एक प्रकारची अंधश्रद्धाच झाली, नाही का? जर कोणी असा दिशाबदल जाणीवपूर्वक करत असला, तर "तो त्याच्या कथित विचारधारेच्या पडद्यामागून चलाखीने वैयक्तिक स्वार्थ व हितसंबंध साधतो आहे", असेच म्हणावे लागेल ! ही तर सरळ सरळ बदमाषी झाली, नाही का ? (अज्ञानाचे ज्ञान... या विषयावर एक लेख लिहावा असे बरेच दिवस मनात आहे. पण ते "थोडक्यात पण समर्पकपणे" लिहायचे म्हणजे फुरसतीने लिहायला लागेल, म्हणुन ते काम मागे पडले आहे.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मला स्वत:पुरती खात्री पटली अाहे, की देव अाहे का नाही हा प्रश्न अापण सोडवू शकणार नाही. शास्त्राच्या भाषेत बोलायचं तर, समजा एक फूटपट्टी अाहे. तुंम्हाला तिची लांबी अगदी तंतोतंत मोजायची अाहे. तर त्यापेक्षा अाधिक काटेकोर अशा लांबी मोजण्याच्या साधनाची गरज अाहे. त्यामुळे कुठलेही उपकरण कॅलिब्रेट करायला त्याहून किमान १० पट (दशमान पध्दतीमुळे) अॅक्युरेसीचे उपकरण लागते. म्हणून माणसानेही माणूस जोखणेही शास्त्रीयदृष्ट्या शक्य नाही. एका मर्यादित पातळीवर व्यवहारापुरते अापण ते करत असतो, पण ते संपूर्णपणे करणे शक्य नाहीच. दुसर्या माणसाची इनअॅक्युरेसी मध्ये येते. देव ही कल्पना अतिमानवी असल्याने तो संपूर्ण पडताळा मानवाकडून करता येणे शक्य नाही. तथापि, देव या कल्पनेचा कुणाला उपयोग असेल, तर असे ना का! जोपर्यंत त्यांचा इतरांना उपद्रव नाही, तोपर्यंत त्यांना विरोध करण्यात वेळ घालवण्याचे काहीच कारण नाही. या प्रश्नाचे बुध्दाने दिलेले उत्तर खूप अावडते. तुंम्हाला माहिती असेलच. वेळ काढून लिहा स्वतंत्र धागा. कदाचित यनावाला येतीलही तिथे :-)

In reply to by स्वधर्म

कदाचित यनावाला येतीलही तिथे :-) किती अतीआशावादी आहात तुम्ही ! दुसर्‍यांच्या धाग्यावर त्यानी लिहिलेले माझ्यातरी नजरेस आलेले नाही. स्वतःच्या धाग्यावरही ते अपवादाने प्रतिसाद देतात. :) ;) (वस्तूस्थिती आहे, पण हघ्यावेसांन)

In reply to by यनावाला

यातल्या कोणत्या विधानात पुलं यनीय आत्मविश्वासाने "देव नाही म्हणजे नाहीच्च" असं म्हणताहेत? --------------- देवात रस नाही मंजे? देव आहे का नाही? ========================================== कोणालाही कसंही वेडंवाकडं कोट करायचं, विचित्र अर्थहिन संदर्भ द्यायचे हे पुरोगाम्यांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ================ पुलं देखील एक विचारहीन, फॅशनेबल पुरोगामी आहेत पण निरुपद्रवी नि सधेतूप्रेरित आहेत. सो आपला पास.

कॉलरा, पटकी आणि इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार सोडले तर बाकीच्या आजारांशी देवाचा काहीही संबंध नाही .. आता मागे मी पेपरमध्ये वाचले होते .. अमेरिका लोकांच्या आयुष्याशी खेळते आहे .. स्वाईन फ्लू काय आणि बर्ड फ्लू काय .. अजून इतर काही .. इथे देव नाही तर पैसा बोलतो ... जो विषाणू बनवतो तो त्यावरचा उपाय खिशात घेऊन फिरतो .. त्याचं वारं पसरलं , लोक तडफडून मरायला लागली कि पोतडीतून काहीतरी गावसाळ्यासारखं काढायचं आणि मिरवायचं शास्त्रज्ञांचं बिरुद लावून ... याला काय म्हणायचं ... यनावाला साहेब .. हे असं कमावण्यापेक्षा .. देव देव करत बसलेलं बरं.... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

कॉलरा, पटकी आणि इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार सोडले तर बाकीच्या आजारांशी देवाचा काहीही संबंध नाही हे कोणत्या निकषांवर ठरवले ???!!! कॉलरा, पटकी या रोगांचा प्रादुर्भाव करणार्‍या मायक्रोब्जचा शोध लागून आणि त्यांच्यावरचे खात्रीचे औषोधोपचार सापडून अनेक दशके लोटली आहेत. "इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार" हे काय असतात ? असे देवांशी संबंध असलेले कोणतेच आजार आस्तित्वात नव्हते/नाहीत/नसतील... अश्या आजारांची कल्पना भूतकालात, सद्यकालात आणि भविष्यकालातही १००% अंधश्रद्धा होती/आहे/असेल.

" पोतडीतून काहीतरी गावसाळ्यासारखं काढायचं " हे चुकीचे टंकले आहे .. ते असं वाचा "पोतडीतून काहीतरी गवसल्यासारखं काढायचं

यनावाला, पु.ल.देशपांड्यांची मतं उद्धृत केल्याबद्दल आभार. यावर माझं मतप्रदर्शन करतो. १.
१) धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा, यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून कोणत्याही मूर्तीला मी नमस्कार केलेला नाही.
पु.ल. यांच्या वैयक्तिक प्रधान्यांचा आदर आहे. मी १००% आस्तिक असूनही मला देवळांत जायचा प्रचंड कंटाळा आहे. मूर्तीस नमस्कार करावासा वाटणे वा न वाटणे याचा ईश्वराशी व/वा आस्तिक्याशी कसलाही संबंध नाही. २.
२) पूर्वजन्म, पुनर्जन्म, या थोतांडांवर माझा विश्वास नाही.
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे वा न ठेवणे हा देखील वैयक्तिक आवडीनिवडींचा भाग आहे. बाकी, डॉ. इयन स्टेव्हनसन यांनी अनेक पुरावे जमवून पुनर्जन्म हे थोतांड नसल्याचं सिद्ध केलेलं आहे. ३.
३) देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही.
तशा वापरल्या असतीलही. धूर्त सत्ताधाऱ्यांनी याहून इतर अनेक गोष्टी (उदा. : शस्त्रास्त्रे, संपत्ती) आपल्या स्वार्थासाठी वापरल्या आहेत. यावरून देव, धर्म इत्यादी कल्पनांना दोष नेणे योग्य नव्हे. ४.
४) आपल्या देशात इतके संत जन्माला आले त्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता.
सुखी म्हणजे नक्की काय? देश सुखी होणे म्हणजे नक्की काय? निसर्गाची रहस्ये ओळखून ऐहिक जीवनात विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ पाश्चात्य देशांत जन्मास आले. मात्र तरीही दोन महायुद्धांत त्यांची अपरिमित हानी व अपमृत्यू झाले. शास्त्रज्ञांनी प्रगत केलेल्या विज्ञानामुलेच महासंहारक अस्त्रे निर्माण झाली. या वाईटाचा दोष देखील त्यांच्याच माथी मारणार का? ५.
५) अनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संतापेक्षा अधिक मोठा वाटतो.
वेदनाविरहित शल्यकर्म करणे हे संतांचं काम नाही. शिवाय, उकीरड्यावरचा कचरा साफ करणारा सफाई कर्मचारी सरन्यायाधीशाहून महान म्हणता येईल का? माझा आजपावेतो कोर्टाचा काहीच लफडा झाला नाही. पुढे करायची इच्छाही नाही. न्यायव्यवस्थेचा मला काडीइतकाही फायदा नाही. पण कचरा साफ न केल्यास माझं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मग सफाईवाला सरन्यायाधीशांहून श्रेष्ठ नव्हे काय? उगीच बिचाऱ्याला कमी पैसे मिळतात. आजची न्यायव्यवस्था ही धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरली याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही. ६.
६) (पूर्वी) पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलर्‍याने मरत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलर्‍याची लस शोधून काढणार्‍या वैज्ञानिकाने.
वारीचं नियोजन नसल्याने वारकरी कुठेही मलमूत्र विसर्जित करायचे. त्यामुळे कॉलरा सारखे संसर्गजन्य रोग फैलावत. याचा विठ्ठलाच्या नामाशी काहीही संबंध नाही. नामगजर म्हणजे नियोजन नव्हे. बरेच वारकरी अडाणी असंत. त्यांची सेवा म्हणून शिकलेल्यांनी नियोजन करवून दिलं तर बरं होईल. ७.
७) सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणीना कुणी ताला सुरांत सांगत असते. आणि इकडे गॅलरीत आल्यावर समोरच्या कचराकुंडीत बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसतात. रेडियोत देवावर विशेषणांची खैरात चालूच असते.
रेडियोवरील गाण्याचा उकीरड्याशी संबंध नाही. ८.
८) देवदीनांचा वाली आहे आणि संकटकाळी तो भक्तांच्या मदतीला धावून येतो याचे पुरावे पौराणिक
कथांखेरीज अन्यत्र कुठेही सापडत नाहीत. ते पु.लं.ना इतरत्र सापडंत नाहीत. अनेकांना आजही प्रत्यय आलेत. ९.
९) देऊळ बांधणे हा सत्ताधारी राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.
असू शकतो. पण त्यामुळे देव खोटा हे सिद्ध होत नाही. १०.
१०) धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील.
धर्म धर्म करणारे काही लोक कर्मयोगी होते. त्यांचा पु.लं.ना विसर पडलेला दिसतो. आ.न., -गा.पै.

निराधार आक्षेप गेल्या २६ महिन्यांत (३-जाने.२०१६ ते २०-फेब्रु.२०१८) इथे बारा लेख लिहिले. त्यांत कुठेही आस्तिकांना ,अथवा अन्य कोणालाही उद्देशून निर्बुद्ध , मूर्ख, अविचारी किंवा तत्सम शब्द वापरलेला नाही. उद्धट, अशिष्ट भाषा तर नाहीच नाही. लेखातील विचार ज्या वाचकांच्या मतांविरुद्ध असतात, त्यांना ते लेखन अशिष्ट वाटते. [यासंदर्भात , "विवेकवादी लेखनावरील आक्षेप " हा लेख आहे--लिंक:http://mr.upakram.org/node/2580]. लेखन शुचिता कटाक्षाने पाळतो. इथे एखाद्या सदस्याला --"... दिवस सुरू करण्यापूर्वी तुम्ही (हे लेखन ) कमीत कमी दहादा वाचावे ." असा उपदेश करणे, शिष्टसंमत आहे काय ? (हा उपदेश इथल्या एका मान्यवर सदस्यांनी केला आहे. त्यांच्या प्रतिसादातील विधाने धादान्त असत्य आहेत. उपरोक्त बारा लेख न वाचता विधाने केली आहेत असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.) लेखन उद्धट आणि अशिष्ट वाटत असेल तर त्याविरुद्ध मि.पा.च्या प्रवर्तकांकडे तक्रार करावी. म्हणजे ते बंद पडेल.

In reply to by यनावाला

सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो. हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची
बुद्धी कुंठित
झालेली असते.
विचारशक्ती बधिर
झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे. पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते. समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते. मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात. देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते. यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ? यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही. पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो. "आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे." हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते
चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही.
"हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने
ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या
अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर
करावा.
शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता
अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
======================== हा यनावालांचा लेख आहे. यातला वाक्यांचं मेरिट असो, सुर पाहा. शिवाय त्यांनी स्वतःला लावलेली विशेषणं पाहा.

विज्ञान दिनाच्या निमित्ताने 'द हिंदू'त आलेला हा लेख वाचला.
http://www.thehindu.com/opinion/op-ed/the-power-of-persuasion/article22…
यातला खालील परिच्छेद वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, समाज विवेकवादी व्हावा यासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांसाठी चिंतनीय ठरावा.
How then does one eradicate superstition? Not, as the evidence suggests, by preaching or legislating against it. Awareness campaigns against dangerous superstitions along with better education and scientific outreach may have some impact but will be a slow process. Today, the topic of “persuasion” is popular in the psychology, social science and marketing communities. Perhaps scientists have something to learn here too. Pascal, whom Nehru cited on reason, wrote on persuasion too. He observed that the first step is to see the matter from the other person’s point of view and acknowledge the validity of their perception, and then bring in its limitations. “People are generally better persuaded by the reasons which they have themselves discovered than by those which have come into the mind of others.”

In reply to by यनावाला

हि पुलंचीच वाक्ये आहेत ना? "देवाने आमची लहानशी जीवने समृद्ध करण्यासाठी दिलेल्या ह्या देणग्या, न मागता दिल्या होत्या, न सांगता नेल्या" "आयुष्यात पक्षी पाळावासा वाटला तर हंस पाळेन, असा पक्षी बनवणं विधात्यालाही पुन्हा जमले नाही" "जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने आपणा सर्वांचे चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की, यातून सुटका करायला आपली आणि आपुलकीने भोवती जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?" ----------------------------------------- पू.ल. निरीश्वरवादाबद्दल काही बोलले का? कि अंधश्रद्धांबद्दल बोलले? पु.लंची वाक्ये देण्यामागचा उद्देश काय?

In reply to by यनावाला

पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत.
इथे पुलंना नि आंबेडकरांना अभिमान करायला पाहिजे असं अभिप्रेत आहे. यनांना आहे का? ---------------------------
कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर. न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते.
ओके. इथे देखील संपूर्ण स्पष्टीकरण दैवात पाहू नये असाच सूर असावा. ----------------- यात देव आहे का नाही यावर एकही विधान नाही. त्यांची व्यक्तिगत आवडनावड सांगीतली आहे. शिल्पे बनवण्यापेक्षा अजूनही बरी कामे असावीतच. अगदी साहित्य, संगीत इ इ पेक्षाही बरी कामे असावीतच, नै का पुलं? मग ह्यांनी हे केलं, त्यांनी ते, ह्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते नाही असलं उगाळण्यात अर्थ नाही. -------------------------- http://www.shareblast.com/view/text/y7LDdwjVNMb1YKX इथे पुलं स्वतःपुढे "माझी क्ष क्ष क्ष श्रद्धा आहे" असं म्हणतात. शेवटी श्रद्धावंतांसाठीची यनांची विशेषणं पुलंच्या नशीबी पण आहेतच. ======================================================================= बाकी लेखात धार्मिक सुधार, सामाजिक सुधार, इत्यादि बद्दल लिहिलं आहे. ते सर्व योग्य आहे. पण पुलंची आधुनिक व्यवस्थांबद्दलची जाण अत्यंत अपरिपक्व होती हे आधुनिकतेवर ०% टिका आहे यावरून दिसते. तरीही त्यांच्या भाषेला नि उद्विगनतेला मर्यादा आहे. -------------------------
ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि 'माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्' अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे.
https://www.quora.com/Did-Mao-kill-60-million-Chinese-people-If-so-what… माओ ने सहा कोटी लोक मारलेत. आणि पुलं त्याची कशी पूजा करताहेत पहा. यावरनं पुलंची नव्या व्यवस्थांबद्दलची जाण किती बायस्ड आणि अपरिपक्व होती हे दिसून येईल. आणि लक्षात घ्या या हत्या हा लेख लिहिण्यापूर्वी कितीतरी वर्षे लिहिलेला आहे. --------------------------------------
विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही.
हा एक अज्ञानाचा दुसरा नमुना. वंश ही करोडो लोकांची हत्या घडवून आणणारी संकल्पना वैज्ञानिकच होती. त्या वंशाच्या लोकांची हत्या करायची आवश्यकता नाही अशी चर्चची भूमिका होती. आणि सेक्यूलर साम्राज्यवादी विज्ञानवादी देशांना काही वंशांचा पृथ्वीवर कमी अधिकार आहे असं वाटे. ==========================================================================
मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. 'उपरा', 'बलुतं', 'आठवणीचे पक्षी' ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.
सुखी बामनावर दलित साहित्य वाचल्याचा काय परिणाम होतो हे पुलंच्या शेवटच्या उतार्‍यातून कळतं. धर्म एकत्र कसे राहतात इ इ काहीही अ‍ॅकनॉलेज केलेलं नाही. एक मुस्लिम अतिरेकी दिसला कि म्हणा पृथ्वीवर २०० कोटी अतिरेकी आहेत!! याला काही अर्थ? धार्मिक व्यवस्थेतेतून उत्पन्न झालेले संगीत, साहित्य, भाषा इ इ ते आयुष्यभार एंजॉय करणार, आणि एक दलित साहित्य वाचले कि सगळी व्यवस्थाच त्यांना घाण दिसणार. पुलं, मॅच्यूअर व्हा, सर्वांगीण विचार करा.

In reply to by arunjoshi123

आणि लक्षात घ्या या हत्या हा लेख लिहिण्यापूर्वी कितीतरी वर्षे लिहिलेला आहे.
आणि लक्षात घ्या या हत्या हा लेख लिहिण्यापूर्वी कितीतरी वर्षे झालेल्या आहेत.

डॉक्टर सुहास म्हात्रे,
आजतागायत मानव या जगातल्या बर्‍याच गोष्टींबाबत अज्ञानी आहे याचे ज्ञान झाले की, मनाचे अंधत्व, हट्टीपणा व अडेलतट्टूपणा खुल्या मनाने टाळून, इतरांच्या मानवी अधिकारांवर गदा न आणणार्‍या कोणत्याही विचार व कृतीचे खुल्या मनाने विश्लेषण करणे शक्य होते. या विचारसरणीला अज्ञेयवाद असे म्हणतात...
मला वाटतं की खुल्या मनाने विश्लेषण करणे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्याचा अज्ञेयवादाशी थेट संबंध नाही. एखादा अज्ञेयवादीदेखील हट्टी, दुराग्रही असू शकतो. अर्थात, माझ्या विधानाच्या 'असहमतीस असहमती' हा मध्यममार्ग उपलब्ध आहेच. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अज्ञेयवाद म्हणजे "इट कान्ट बी नोन" , संबंधित वास्तव जाणता येणे शक्य नाही हे विधान सत्य मानणारा. ======================= अज्ञेयवादी हा नास्तिकांचाच एक प्रकार आहे. "जाणता येणे शक्य नाही" म्हणजे "आहे हे अमान्य आहे. नि त्यासंबंधीचे वागण्याचे धर्माचे फ्रेमवर्क अमान्य आहे." असे अभिप्रेत होते. "ईश्वराबद्दलचे सत्य जाणता येणे शक्य नाही" म्हणजे "देव नाही हे अमान्य आहे" असे देखील होते. पण देव नसल्याचे कोणते फ्रेमवर्क नसते म्हणून नास्तिकात आणि अज्ञेयवाद्यात वर्तनात्मक फरक नसतो.

In reply to by arunjoshi123

@गामा पैलवान व arunjoshi123 अज्ञेयवादाचा अर्थ तसा नाही... आणि तो आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा प्रकार तर अजिबात नाही. अज्ञेयवादी माणूस मानवाच्या जाणिवा व समजूतीच्या मर्यादा जाणतो आणि मानतो; तसेच, मानवाचे विश्वाबद्दलचे भौतिक व अधिभौतिक ज्ञान तोकडे आहे हे पण जाणतो आणि मानतो. सर्व प्रकारांच्या भौतिक व अधिभौतिक माहितीस आपल्या मनाची कवाडे खुली ठेवतो. जी माहिती तर्क व सद्य शास्त्रिय ज्ञानावर पटते ती मानतो. कोणत्याही एकेरी विचारसरणीला चिकटून दुसरे सगळे थोतांड असे म्हणत नाही. स्वतःला अथवा दुसर्‍या कोणाला घातक अथवा क्लेशकारक नाही असे विचार एखाद्याने वैयक्तिक जीवनात बाळगले अथवा कृती केली तर, अज्ञेयवादी त्याचे सामंजस्याने तर्काच्या व शास्त्रिय पायावर मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल. त्याने मानले नाही तर, त्याच्या वैयक्तिक विचार/कृतीच्या मानवी हक्काचा आदर करून, त्याच्यावर मानसिक अथवा शारिरीक जुलूम होईल इतपत त्याच्यामागे हात धुवून लागणार नाही. अज्ञेयवाद्यांबद्दल खालील काही ठोकताळे ग्राह्य धरता येतील... (१) हे जग नैसर्गिकरित्या भैतिक व वैचारिक वैविध्याने भरलेले आहे आणि त्याला कोणत्याही आस्तिक, नास्तिक किंवा इतर प्रकारच्या एकेरी विचारसरणीत बसवणे अनैसर्गिक होईल, किंबहुना या वैविध्यामुळेच हे जग जास्त रोचक झालेले आहे याची पुरेपूर खात्री अज्ञेयवाद्याला असते. हे जग एकसूरी बनवण्याचा प्रयत्न अनैसर्गिक, अन्यायकारक व जुलूमी असेल असे तो मानतो. (२) मानवाच्या ज्ञानेन्द्रियांच्या व बुद्धीच्या सीमा पाहता, अजूनही मानवाला या जगातल्या सगळ्याच गोष्टींचा उलगडा झालेला नाही. काल मानदंड असलेल्या गोष्टी आज मोडीत निघालेल्या आहेत आणि काल अशक्य-अनाकलनिय समजल्या जाणार्‍या गोष्टी आज वास्तवात आलेल्या आहेत किंवा समजलेल्या आहेत. त्यामुळे, कोणत्याही एका गोष्टीला "अंतीम सत्य" समजण्याऐवजी तिची मर्यादा "सद्य पुराव्यांवर पटलेली विश्वासू माहिती" इतकीच असते. अश्या गोष्टींसंबंधांत उद्या नवीन शास्त्रिय/तार्किक पुरावे सापडल्यास, आपले मत बदलणे नामुष्कीचे नाही तर ते शास्त्रिय विचारसरणीचे आणि जिवंतपणाचे लक्षण आहे (जिवंत व्यक्तीच, आपल्या मनाने बदलू शकतात, नाही का ?) असे अज्ञेयवादी मानतो. (इ) वरच्या गोष्टी मान्य असल्या की मग सर्व प्रकारच्या विचारसरणींचा समतोल व सामंजस्याने विचार होऊ शकतो. त्यामुळे, अज्ञेयवाद्याला आस्तिक, नास्तिक व मानवी हक्कांवर गदा न आणणार्‍या इतर कोणत्याही विचारसरणीचे वावडे नसते... म्हणूनच, प्रत्येक विचारसरणीतील तार्किक अथवा शास्त्रसंमत नसलेल्या पण वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनासाठी उपयोगी व सुखकारक अश्या गोष्टी तो सहजपणे स्विकारू शकतो. स्वतः अंगिकारल्या नाहीत किंवा स्वतःला पटल्या नाहीत अश्या गोष्टींचा तो फारतर विरोध करेल, पण हट्टी तिरस्कार (पॅथॉलोजिकल हेट) करणार नाही. (उ) फार हट्टी अथवा आग्रही नसल्यमुळे; अज्ञेयवादी, आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांच्या बरोब्बर मध्यबिंदूवर न राहता; व्यक्तीगत मते व अनुभव यांच्या वैविध्याप्रमाणे, त्या मध्यबिंदूच्या दोन्ही बाजूला असलेल्या एका वर्णपटावर (इन अ रेंज अराऊंड द सेंटर) असतात... म्हणूनच त्यांच्या समजूतदारपणामुळे काहीं वेळेस त्यांना आस्तिक समजले जाते, तर त्यांच्या परखड शास्त्रिय विचारसरणीमुळे काही वेळेस त्यांना नास्तिक समजले जाते. या वैविध्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही चांगल्या विचारसरणीचा मुख्य उद्येश मानवी जीवन अधिक समंजस, समजूतदार, विकसित, आनंदी आणि सुखकारक करणे हाच असला पाहिजे, हे अज्ञेवाद्यांना पटलेले असते. असा उद्येश नसलेल्या विचारसरणीपासून मानवाला फायद्यापेक्षा धोकाच जास्त होईल, नाही का ? अज्ञेयवादी व्यक्ती, मानवी "अज्ञानाचे ज्ञान" झालेली, आणि म्हणूनच कोणत्याही एका विचारसरणीच्या आहारी न गेलेली, सर्व नवे-जुने ज्ञान तपासून त्यातील पटेल त्याचा स्विकार करण्यासाठी मनाची कवाडे सतत खुली असलेली व्यक्ती असते... ना कट्टर आस्तिक, ना कट्टर नास्तिक, ना इतर कोणत्या एकेरी विचारसरणीची (इझमची) पाईक... हटवादी तर नाहीच नाही.