✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बक्षिस समारंभ (शतशब्दकथा)

श
शब्दानुज यांनी
Fri, 02/16/2018 - 16:00  ·  लेख
लेख
अरे बापरे..एवढी सगळी प्रशस्तीपत्रके ? कमीतकमी अर्धा तास तरी लागेल हा सगळा गठठा संपायला... आयोजकांनी हे आधी सांगायला नको का ? सगळीकडची हीच बोंब. ..नियोजन म्हणून काही नाहीच. आणि एवढं करून मिळणारे मानधन किती ? सात हजार फक्त. कोण कुत्र तरी विचारत का सात हजारला .. छ्या.. वेळ काही संपतच नाही आजचा. कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतो अस वाटतयं.. ................................................................................ माहितेय आज मला बक्षिस मिळणार! फक्त अर्धा तास राहिला आता.. आला की नंबर माझा..धावत जाऊन बक्षिस घेतो आता.. बापरे..यात चक्क पन्नास रुपये आहेत ..एवढ्या पैशाच काय करावं ? मला तर कळेचना.. घरी जाऊन ताईला देऊन टाकतो. हे बघून एवढी खूश होईल ना ती..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4344 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

कथुकली आवडली. दोन भिन्न

एस
Fri, 02/16/2018 - 16:06 नवीन
कथुकली आवडली. दोन भिन्न दृष्टिकोन.
  • Log in or register to post comments

+११

प्राची अश्विनी
Sat, 02/17/2018 - 10:17 नवीन
+११ यावरून आठवलं एक फेस्टीवल आम्ही आयोजलेला त्यात प्रशिक्षकांना मानधन दहा हजार होते, प्रथम पारितोषिक पंचवीस हजार. परिक्षक म्हणाले आम्ही स्पर्धक म्हणून येणार.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

#प्रशिक्षक नव्हे परिक्षक.

प्राची अश्विनी
Sat, 02/17/2018 - 10:18 नवीन
#प्रशिक्षक नव्हे परिक्षक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

मस्त... दोन्ही दोन टोकं...

ज्योति अळवणी
Fri, 02/16/2018 - 19:38 नवीन
मस्त... दोन्ही दोन टोकं... आवडली
  • Log in or register to post comments

छान छोटुकली कथा.

सस्नेह
Sat, 02/17/2018 - 11:29 नवीन
छान छोटुकली कथा.
  • Log in or register to post comments

आवडली.

पद्मावति
Sat, 02/17/2018 - 14:42 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

चांगली आहे , पुलेशु

हेमंतकुमार
Sat, 02/17/2018 - 21:01 नवीन
चांगली आहे , पुलेशु
  • Log in or register to post comments

मस्त!!

जव्हेरगंज
Sat, 02/17/2018 - 21:31 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

विरोधाभास

सुखीमाणूस
Sat, 02/17/2018 - 23:16 नवीन
छान रेखाटला आहे. कथुकली आवडली. लिहित राहा...
  • Log in or register to post comments

मस्त

शित्रेउमेश
Wed, 02/28/2018 - 12:03 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा