खारे दाणे
खारे दाणे
खारे दाणे कोणाला आवडत नाहीत?मी तर फॅनच आहे.लहानपणी शनिवरी सकाळची शाळा असे.पपा 10 पैसे देत असत,त्या दहा पैशांचे स्कर्टचा खिसा भरून जाईल इतके खारे दाणे येत असत.राजा बढे चौकात भडभुंजाचे दुकान होते.फुटाणे,गोडे शेंगदाणे,खारे शेंगदाणे,कुरमुरे,चूनखडीची माती,भाजलेले चिंचोके असं काय काय मिळायचं तिथं. आत तिथे चांदीच्या वस्तूंचं दुकान आहे.पुढे आशिष मेडिकलच्या शेजारीही एक दुकान होतं, त्याने आता चाटही ठेवायला सुरवात केली आहे.जसजशी जागांची किंमत वाढू लागली तसतशी बऱ्याच ठिकाणची भडभुंजांची दुकाने कमी होत नाहीशीच झाली.पण खरे दाणे तर लागतातच.आणि तेच दहा पैशात मिळणारे खारे दाणे आर दहा रुपयाचाही मिळत नाहीत.
थोsडेसे,हो अगदी थोsडे sसेच कष्ट घेतले तर हे आपण घरच्या घरी करू शकतो,हवे तितके आणि हवे तेव्हा.तेव्हा अधिक लांबड न लावता मी तुम्हाला मला माहीत असलेल्या तीन प्रकारांची ओळख करून देते.
प्रकार पहिला
साहित्य:-
१.दोन वाट्या मीठ,
२.एक वाटी शेंगदाणे,
3.लोखंडाची कढई.
कृती:-
१.कढई मोठ्या गॅसवर चांगली तापवून त्यात मीठ घालावे.
२.मीठ छान गरम जरून घ्यावे.
3.त्यात शेंगदाणे घालून परतत राहावे. मिनीटभराने शेंगदाणे तडकायला लागतील तसेच मोठ्या आचेवर परतत राहावे,जेव्हा शेंगदाणे तडतदायचे कमी होतील तेव्हा गॅस बंद करावा.मिनिटभर तसेच परतत राहावे.
४.नंतर शेंगदाणे चाळणीत ओतून मीठ वेगळे करावे,हे मीठ पुन्हा पुन्हा वावरत येते,तेच थंड झाले की,भरून ठेवावे.
प्रकार दुसरा
साहित्य:-
१.एक वाटी शेंगदाणे,
२.दोन वाट्या पाणी,
३.दोन मोठे चमचे मीठ,
४.मायक्रोवेव्ह प्रूफ भांडे.
कृती:-
१.भांड्यातत पाणी घालून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करावे.
२.मीठ,पाणी व शेंगदाणे एकत्र करून तीन तास तसेच ठेवावेत.
३. तीन तासांनी निथळून घ्यावेत.
४.स्वच्छ कपड्यावर पसरून सुकवावेत.
५. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ८ मिनिटे हाय पॉवरवर भाजावेत,३-३ मिनिटांनी व नंतर १-१ मिनिटाने हलवावेत.
प्रकार तिसरा.
साहित्य:-
१.एक कप शेंगदाणे,
२.अर्धा कप पाणी,
3.एक टेबलस्पून मीठ,
४.मायक्रोवेव्ह प्रूफ भांडे.
कृती :-
१.पाणी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अर्ध मिनीट गरम करावे.
२. मीठ मिसळून त्यात शेंगदाणे पाच मिनिटे भिजवावेत.
३. दोन मिनिटे हाय पॉवरवर मायक्रोवेव्ह करावेत.
४.बाहेर काढून उथळ प्लेटमध्ये पसरून दोन मिनिटे हायपॉवरवर मायक्रोवेव्ह करावेत.
कुठल्याही प्रकाराने केलेत तरी थंड झाल्यावरच खावेत,ही विशेष सूचना विसरू नका.

वाचने
16594
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
शेंगदाणे मात्र गुजरातमधले
छान....!!
In reply to छान....!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
खारे दाणे (कोरडे) पेक्षा मीठ
In reply to खारे दाणे (कोरडे) पेक्षा मीठ by गवि
उकडलेले मक्याचे दाणे नाही का
In reply to खारे दाणे (कोरडे) पेक्षा मीठ by गवि
स्वप्नाळू बाता.
In reply to स्वप्नाळू बाता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कल्पना आहे.☺️
In reply to खारे दाणे (कोरडे) पेक्षा मीठ by गवि
खरं आहे
In reply to खारे दाणे (कोरडे) पेक्षा मीठ by गवि
खारवून सुकविलेल्या शेंगा
सोप्पी रीत
मस्त!
पा.कृ. आवडली...
In reply to पा.कृ. आवडली... by मुक्त विहारि
:) :) :)
In reply to पा.कृ. आवडली... by मुक्त विहारि
विकत चे च छान .....
रेसिपी
In reply to रेसिपी by तिमा
हा हा हा
In reply to रेसिपी by तिमा
अजुनपण म्हणतात ... फक्त
मस्तच.
मस्तं!
दोन्ही कृती मस्त