Skip to main content

अयोध्या राममंदिर

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 10/02/2018 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
अयोध्या राममंदिर संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेहमीच वादग्रस्त अन संशयास्पद राहिली आहे. कोर्टाने निष्पक्ष पणे समोर उपलब्ध तथ्ये , पुरावे अन घटनांचा आढावा घेवून त्वरित निकाल देणे अपेक्षित असते . गेल्या महिन्यात घडलेल्या जजेस च्या पत्रकार परिषदे सारख्या घटनांमुळे संशयाची सुई कोर्टाकडेच वळत आहे. कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी अथवा अल्पसंख्यांकांच्या हिंसक प्रतिक्रिया येतील या भीतीपोटी अथवा दडपणाखाली सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणात चालढकल व वेळकाढूपणा करत आहे . अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्‍या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ? घोर कलयुग !

वाचने 41146
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

संघिष्टांनी आणि मनुवाद्यांनी कधी राज्यघटना मनापासून स्वीकारली नाही.. त्यामुळे सर्व भारतीयांनी स्विकारलेल्या ही वाक्यरचना चुकीची आहे.

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

हिंदु १०० कोटी असले तरी बाबराच्या काळात मंदिर प्रवेश करण्याचा अधिकार असणारे त्या काळात वरच्या दोन वर्णातले १०-२० % च होते ना? की सगळे हिंदु आत जात होते ? मग इतराना त्या काळात त्या मंदिराचे सोयरेसुतक का असेल ? आज त्या १४ % पेक्षा आपण भरपूर जास्त आहोत हे दाखवायला हे वरचे १०-२० % उरलेल्या ६० % ना सांगताहेत, या तुम्हीही देवळात !

In reply to by manguu@mail.com

बरोब्बर.... एकदा त्या १४ टक्क्यांना पायाखाली आणले की परत ह्या ६० टक्क्यांना पायाखाली आणायचे प्रयत्न सुरु होतील. शिकू नका, शिकलेले वेडे असतात, शिकलेल्या पोरी चवचाल असतात अशी प्रचारफेरी त्यासाठीची पायाभरणी आहे. आपल्या पोरांना बरोब्बर शिकून परदेशी पाठवायचे, इतरांच्या पोरांना बत्तीसमण सोन्याच्या सिंहासनामागे दौडत लावायचे संघी कावे.

In reply to by श्रीगुरुजी

आणि तुमची जळजळ काय आहे ? अब्दागिर्या धरायला , पालख्या उचलायला , धुणी धुवायला , अमूक तमूक म्हटले की कोरसमध्ये जय म्हणायला ... माणसे कमी पडतील ?

अगदी सहमत. सलमान सुटला.. आता हेही प्रकर्ण लवकर सोडवावे. कोर्टाने म्हटले आहे ... की या वादाकडे फक्त जागेचा वाद म्हणून पाहिले जाईल. धार्मिक , भावनिक मुद्दे विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ?

राम खरोखरीच होता की नव्हता हा येथे प्रश्नच नाही. तो होता अशी श्रद्धाळू हिंदु समाजाची श्रद्धा होती आणि त्याचा जन्म 'येथेच' झाला असेहि त्या भोळसट लोकांना वाटत होते. त्यांना तसे वाटत होते हे जाणणार्‍या शासकांनी 'आता नव्या धर्माचे राज्य आले आहे' हा मुद्दा त्यांचे नाक जमिनीत घोळवून सिद्ध करण्यासाठी 'तेथेच' मशीद बांधली. मशिदी बांधण्यासाठी अन्य बर्‍याच जागा उपलब्ध असणार तरीहि ती येथेच बांधली ह्यामागे हिंदु समाज आता दुय्यम आहे हे दाखविणे हाच हेतु होता. (जिझिया कर देतांना कर देणार्‍याने तो नम्रपणेच दिला पाहिजे असेहि त्या कराच्या नियमावलीमध्ये आहे. कुर्रान ९.२९ सांगते:
Fight those who believe not in God and in the Last Day, and who do not forbid what God and His Messenger have forbidden, and who follow not the Religion of Truth among those who were given the Book, till they pay the jizyah with a willing hand, being humbled.
) त्या भोळसटांच्या हातात आता सत्ता आली आहे आणि ते आपल्यावरचा perceived अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्यात चुकीचे काय आहे? मी म्हणेन की मुस्लिम समाजाने हे मान्य केले आणि तेथे पुनः राममंदिर बांधायला संमति दिली तर ह्या समजूतदार वर्तनाचे देशाच्या राजकारणावर आणि हिंदु-मुस्लिम संबंधावर चांगला परिणाम होईल.

In reply to by अरविंद कोल्हटकर

जागेचा वाद सोडवताना श्रद्धा , राजकारण विचारात घेतले जाणार नाही, असे कोर्टाने सांगितले आहे.

In reply to by manguu@mail.com

दोन्ही बाजूंसाठी पुरेसे ifs and buts आहेत.

In reply to by अरविंद कोल्हटकर

अयोध्येतील मुस्लीम बोर्डातील काही सदस्यांनी दुसरीकडे मशीद उभारु असे म्हटल्याबरोबर त्यांना काढून टाकलंय. कोण घेईल आता समजूतदारपणा....! दुसरीकडे राममंदिर उभारता येईल का ? -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

घोर कलयुग ! - ?? नारायण ! नारायण ! कल्कि अवतार होई पर्यंत थांबले नाही म्हणजे झालं... बाकी मंदिरात जाउन आलो याची सुद्धा फॅशन आली आहे... पिक्चर रिलीज असो... काम अडलं असो... संकट निवारण ! इंइंइं... तेव्हा बालाजी पासुन साई बाबांन पर्यंत सगळीकडे मथ्था टेकुन येतात ! [ याला सेलिब्रिटी लोकांची / राजकारण्यांची / इंइंइं मंडळींची श्रद्धा म्हणता येईल का ? ] { मी तर प्रभुंची भक्तांनी चालवलेली बार्टर सिस्टीम म्हणतो... म्हणजे, देवा तु मला हे दे, म्हणजे मी तुला अमुक एक गोष्ट देइन. } हल्ली तर प्रभु रामंचंद्र / कॄष्ण काल्पनिक असे समजणारे सुद्धा चक्क देवळात जाऊ लागलेत. { संदर्भ :- Congress does not believe in Ram, Krishna, what was Rahul doing at Dwarka: Yogi Adityanath No historical proof of Ram, Centre tells SC जाता जाता :---- नारायण ! नारायण ! आता माझी सप्तलोकात चक्कर टाकायची वेळ झाली... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Exquisite Afternoon Raga Bhimpalasi | Kaushiki Chakraborty | Music of India

In reply to by manguu@mail.com

ते ज्यांच्यासाठी उद्देशून आहे त्यांना टाकलं आहे का तुम्ही? तसा काही उल्लेख दिसला नाही! पण तरीही, काय संबंध तुमच्या दोन्ही वाक्यांचा? संस्कृतीचा भाग असणाऱ्या ठिकाणचेच सेल्फी टाकावेत असा काही नियम आहे का??

In reply to by manguu@mail.com

राममन्दिर प्रकरण कोर्टात चालू आहे, तर कोर्टाचा सन्मान करा , ते मुस्लिम पर्सनल बोर्डाचा कोणीतरी बोलला म्हणून नाचू नका, ते तीन तलाक वर कोर्टाने निर्णय दिला तर मात्र हा मुसलमानचे हक्क मारण्यासाठी कायदा करत आहेत अशी बोम्ब ठोकायची, काय मोगाखांन?

In reply to by भंकस बाबा

तिथे काय का बांधेनात. टेंपल झालं तरी तिथे आम्ही जाणार नाही. मॉस्क झाले तरी तिथवर जाणे शक्य नाही. ( केक खायला येणार का ? उद्या १२ फेबला आमचा हॅ. ब. असतो . पण कार्यबाहुल्यामुळे १४ फेबला करावा लागतो. नेमका त्याच दिवशी बाबराचा हॅ. ब. असतो . )

मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे. चालू द्या. -दिलीप बिरुटे

manguu@mail.com कार्यबाहुल्यामुळे १४ फेबला हॅ. ब. करायला जमत नसेल तर १४ ऑगस्टला करा आणि हो बाबर बरोबर हॅ. ब. साजरा करायला मिळाला नाहीतरी शब्बीर शहा बरोबर नक्कीच करा

ताहेर शाह असे वाचावे

राम कहानी ऐतिहासीक सत्य असल्याचा पुरावा नसणे हि रामकथेची लिमीटेशन आहे कि इतिहास शास्त्राची ??

In reply to by अर्धवटराव

...राम कहानी ऐतिहासीक सत्य असल्याचा पुरावा नसणे हि रामकथेची लिमीटेशन आहे कि इतिहास शास्त्राची ??
लिमीटेशन रामकथेचे नाही संदर्भ न नमुद करता पुराणे लिहिणार्‍या आणि सांगणार्‍या संदर्भाचा आग्रह न धरणार्‍या श्रोते आणि वाचकांचे लिमीटेशन आहे. दुसरे लिमीटेशन आपापल्या प्रवासाची प्रवासवर्णने न टिपणार्‍या तितिहासातील भारतीय प्रवाश्यांचे कि ज्यामुळे , बाहेरुन येणार्‍या संकटांची माहिती भारतीय राजांना वेळेत विश्वासार्ह पद्धतीने मिळाली नाही . भारतीय व्यापारी आणि उत्पादक ज्यांनी पररास्।ट्रात उपलब्ध शस्त्रांचा अभ्यासकरुन तशी शस्त्रास्त्रे भारतीय राजांना उपलब्ध करवली नाही त्यांची लिमीटेशन आहे.भारतीय प्रवासांनी प्रवासातील नोंदी करण्याची संस्क्र्ती न जोपासल्यामुळे भारतीय इतिहासाच्या नोंदी होऊ शकलेल्या नाहीत . ही लिमीटेशन आहे. लिमीटेशन इतिहासशास्त्राचे नाही, जनतेचे इंटरेस्ट ओळखून उत्खनानांवर आणि इतिहास संशोधनावर वेळीच लक्ष न पुरवणार्‍या स्वातंत्र्योत्तर सरकारची लिमीटेशन आहे - एक उदाहरण द्यायचे म्हणजे नेताजी सुभाष चंद्रांच्या मृत्यूचा शोध घेणारी बहुतेक कमिशने तैवानच्या भेटीला गेलीच नाहीत किंवा जपान मधल्या अस्थींचा डि एन ए चेक केला जाऊ शकतो पण एकही सरकार काय केल्या पुढे येत नाही. सांगायचा मुद्दा सखोल संषोधनाचा अ‍ॅटीट्यूड नसण्यात लिमिटेशन आहे. समोर आलेल्या ऐतिहासिक पुराव्यांना केवळ ऐतिहासिक पुरावा म्हणून न पहाता डावे किंवा उजवे चष्मेलावून सोईस्कर भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करण्यात लिमिटेशन आहे. शास्त्रांनाही लिमिटेशन असता त पण शास्त्रे काळाच्या ओघात प्रगती करतात. माणसांच्या अ‍ॅटीट्यूडमधली लिमिटेशन्स अधिक खतरनाक असू शकतात.

In reply to by माहितगार

शंभर कथांपेक्षा अस्सल कागदपत्राचा एक चिटोरा इतीहास संशोधन शास्त्रात जास्त प्रमाण मानतात. त्यातही समकालीन, समभाषीक, समप्रादेशीक, नॉन बायस्ड वगैरे चाळण्या असतातच. तसं ते योग्य देखील आहे. पण घटनांची जंत्री अशी हार्ड कॉपी करुन साठवणे हे अगदी अलिकडचे आहे. अशी जंत्री बनवणे, भविष्यात त्याचा संदर्भ म्हणुन अभ्यास करणे, त्यातुन इन्फरन्स काढणे हि एक शैली आहे. घटनांवरुन निष्कर्श काढणे, मेंदुत साठवणे, आणि हे शहाणपण गोष्टीरुपाने प्रचलीत करणे हि दुसरी शैली. पूर्वीच्या काळात हि दुसरी शैली प्रचारात असणं जास्त स्वाभावीक होतं. उदा. व्यासांनी एकाच वेदराशीला चार भागात विभागलं. पुढे तेच चार वेद म्हणुन प्रसिद्ध झाले. मूळ वेदसंहितेला जपण्याच्या भानगडीत कुणी पडलं नाहि. तसं करणं व्यावहारीक देखील नव्हतं. आता या घटनेला अर्वाचीन इतीहास शास्त्रात कसं बसवायचं ? रामायणलाकीन कागदाचा चिटोरा कसा मिळणार ? बाकी डॉक्युमेण्टेशनची बोंब तर होतीच इथे. चंद्रगुप्त वगैरेचे संदर्भ आपल्याला परदेशी साहित्यात होते म्हणुन कळले. चाणक्याचा केवळ एक अर्थशास्त्र ग्रंथ कसा तरी उपलब्ध आहे. अजुन शीवचरीत्र पूर्णपणे समोर आलेलं नाहि. अशा वेळी पौराणीक काळाचं, आणि त्या आधीचं जग कसं होतं याची व्युत्पती आधुनीक इतीहासशास्त्राच्या चौकटीत मांडणं कठीण वाटतं. म्हणुनच रामायण-महाभारताला इतीहास म्हणुन कधि मान्यता मिळेल असं वाटत नाहि. पण त्याने काहि फरक देखील पडु नये :).

In reply to by अर्धवटराव

....अशा वेळी पौराणीक काळाचं, आणि त्या आधीचं जग कसं होतं याची व्युत्पती आधुनीक इतीहासशास्त्राच्या चौकटीत मांडणं कठीण वाटतं.
इथे असंख्य साधनांची उपलब्धता असताना अलिकडच्या काळाचा निष्पक्ष लेखा जोखा मांडणे कठीण असते , तिथे ज्या काळासाठी साधनांची कमतरता अथवा साधने अनुपलब्ध आहेत त्याचा अमुक एकच शक्यता बरोबर अशा पद्धतीने इतिहास शास्त्राच्या चौकटीत बसवणे कठीण असावे. अनेक शक्यता असू शकतात असा सर्वसाधारणपणे विचार करणे आणि अधिकतम स्विकारणे श्रेयस्कर असावे. येशू ख्रिस्ताचा काही काळ तो नेमका कुठे होता हे माहित नाही. तो भारतात येऊन गेला असेल का अशी एक शक्यता पिकवली जाते, अशी शक्यता पिकवण्यास हरकत नाही पण शक्यतेला शक्यतेची मर्यादा असते तीही की इतरही अनेक शक्यता असू शकतात . तो त्याच्या त्याच्या गावी नॉर्मल जिवन जगत फक्त इतिहासात अनरेकॉर्डेड असावी.

In reply to by अर्धवटराव

..... म्हणुनच रामायण-....ला इतीहास म्हणुन कधि मान्यता मिळेल असं वाटत नाहि. पण त्याने काहि फरक देखील पडु नये :).
विधिशाशास्त्राचा विचार करताना प्रस्तुत अयोध्या मंदिर वादाच्या बाबत अंशतः फरक /प्रभाव पडतो. शोले चित्रपट किंवा हॅरी पॉटर इतिहास नाही हे नक्की माहीत आहे तर शोले किंवा हॅरी पॉटर संबंधी मंदिर अयोध्येत होते असा कुणी दावा केला तर तात्काळ फेटाळता येतो कारण तशी शक्यता मुळी बाकी राहात नाही . रामायणाच्या बाबतीत शक्यता पूर्ण फेटाळताही येत नाही. जे शक्यता पूर्ण फेटाळू इच्छितात त्यांनाहि १) बाबरी ढाचाखाली (बाबरपुर्व भारतीय शैलीतील) मंदिर भींतीचे आर्किओलॉजीकल पुरावे मिळाले हे वास्तव स्वीकारावे लागते. २) बाबरी ढाचाच्या जागी मंदिर असल्या बद्दल (कागदोपत्री पुरावा उपलब्ध होता नसतानाही) आणि सांस्कृतिक दृष्ट्या गंडवले गेल्याचा लोकसंस्कृती सातत्याने दावा सांगता होती हे मात्र बऱ्या पैकी पुढे येते (संदर्भ मीनाक्षी जैन ) हे हि स्वीकारावे लागते. ( ३) हरी-विष्णू शिलालेखास प्रमाण म्हणून स्वीकारावे कि नाही - ३.१ आणि स्वीकारला तर ते विष्णू मंदिर रामाचे म्हणून स्वीकारावे का - हा तिसराही प्रश्न न्यायालयासमोर असेल तो वेगळा अधिकचा ) तसे पहाता आपण म्हणता तसे क्रमांक १, २, ३, ३.१ या पैकी कोणताही दावा स्वीकारण्यास न्यायालय तयार झाले तर रामायण झाले नसले तरी निकाल मंदिराच्य बाजूने लागणे शक्य आहे. पण रामायण घडलेच नाही असे शोले सिनेमाचे साम्य दाखवून जनतेच्या गळी उतरवता आले तर मंदिराकरताचा दाव्यातला जनतेचा रस कमी होईल अशी काही डाव्या विचाराच्या लोकांना आशा असते. त्यांच्या कथनाला जनतेचे बळ मिळाले तर टोकाच्या उजव्यांचा करणी सेना स्टाईल फ्लॉपशो होऊ शकतो. जिथपर्यंत न्यायालय आहे, तीथपर्यंत १२० कोटी भारतीयांपैकी एकाही भारतीयाने मूलभूत अधिकाराचा वास्ता दिला कि न्यायालयास बाबरी च्या बाजू अधिक वरील चार मुद्दे पैकी कशास रास्त मानायचे हे ठरवून निकाल द्यावा लागेल म्हणजे रामायण खरेच घडले कि नाही याचा वास्ता न्यायालयास नाही, पण रामायण घडले आणि नाही घडले या पैकी जनतेस काय कन्व्हीन्सिंग वाटेल त्यात डाव्यांच्या आणि उजव्यां चे दोन्हीही बाजूचे राजकीय हितसंबध नेमके कसे गुंतले आहेत हे लक्षात येते. विषय निघालाच आहे तर विधी न्याय मीमांसाशास्त्रा समोरची अजून काही आव्हानांचा विचार करता येईल . १) कोणत्याही जमिनीचा पहिला आणि शेवटचा मालक कोण ? तसे म्हटले तर त्या त्या वेळचे सत्ताधीश / राजे आणि आताच्या काळात सरकार १. १) सत्ता बदलानंतर मागच्या सत्तेने केलेले जमिनीचे अलोकेशन नवीन सत्तेने मान्य करावे का १.२) मागच्या सत्ताधीशानी त्यांच्या आधीच्या सत्ताधीशाच्या वेळच्या मालकी बदलताना अन्याय्य दृष्टिकोन ठेवला असेल -जसे अयोध्या मंदिर संबंधाने दावा आहे किंवा आताच्या काळात नव्या सत्तेस बदल करणे जरुरी वाटते जसे कुळ कायदा - तरीही मान्य करावे का ? १. २ ) मान्य केले तर मागच्या सत्ताधीशानी त्यांच्या आधीच्या सत्ताधीशाच्या वेळच्या मालकी बदलल्या असतील कोणती मालकी ग्राह्य धरावी १. ३ ) मागच्या सत्ताधीशानी त्यांच्या आधीच्या सत्ताधीशाच्या वेळच्या मालकी बदलताना अन्याय्य दृष्टिकोन ठेवला असेल आणि त्या बद्दल आता न्याय द्यायचे नव्याने ठरवले तर असे किती केसेस बद्दल किती काळासाठी मागे जात राहावे १. ४) नव्या सत्तेने मागच्या सत्तेचे अलोकेशन सरळ सरळ त्याज्य ठरवून नवी अलोकेशंस करावीत का ? आता हे सर्व प्रश्न पाहिल्या नंतर काही बाबाजी न्यायालयाच्या अखत्यारीत तारा काही संसदेच्या आणि राज्य घटनेच्या अधीन असतील हे लक्षात येते.

माझ्या मते, सर्वोच्च न्यायालय या केसचा निकाल लावण्यासाठी जो वेळ घेते तो योग्य आहे. तडकाफडकी कुठल्यातरी एका बाजूला फेव्हर करणारा निर्णय दिला तर राजकिय पक्ष, धर्मांध संघटना लोकांच्या भावना भडकावून दंगली घडवून आणण्याची मोठीच जोखीम आहे. यात गरीबाची घरे जळणार. मुख्य सूत्रधार नामानिराळे राहतील. आपल्या देशात कायदा- सुव्यवस्थेबाबत जे 'गांभिर्य' दिसते त्यावरून आणखी १०-१५ वर्षे तरी सतत भळभळती जखमच माथी राहील. त्यापेक्षा न्यायालयाच्या बाहेरच काही समेट होतो का ते पाहणे योग्य राहिल.

In reply to by पुंबा

माझ्या मते, सर्वोच्च न्यायालय या केसचा निकाल लावण्यासाठी जो वेळ घेते तो ....
धागा लेखकाच्या न्याययंत्रणेवर अनावश्यक खापर फोडण्याकडे आपले लक्ष गेले ते बरे झाले. पण वस्तुतः न्याय हा लवकरात लवकर होणे अभिप्रेत असते. जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड अशी म्हण आहे. तरीही धागा लेखकाचीही बाजू निसटती आहे.
अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्‍या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ?
इथे धागा लेखकाचा दृष्टीकोण सब्जेक्टीव्ह आहे. मुळात न्यायालयीन दिरंगाई केवळ या एका केसपुरती होते आहे हे अनभिज्ञतेतून किंवा हेतुपुरस्सर रंगवलेले चित्र ठरते. वस्तुतः पुरेशा न्यायाधिशांच्या संख्ये अभावी प्रचंड मोठी संख्या निकालांच्या प्रतिक्षेत आहे . त्या पैकीच हा एक खटला आहे. न्यायालयासमोर हा केवळ प्रॉपर्टी विषयक खटला म्हणुन दाखल केला गेला त्याला इतर प्रॉपर्टी विषयक खटल्या पेक्षा वेगळी वागणूक देण्याचे वस्तुतः न्याय यंत्रणेस कारण नाही. व्यक्ति स्वातंत्र्य विषयक खटले सर्वसाधारणपणे न्यायालयये अधिक तातडीने घेतात तसे फाशी दिल्या जाणार्‍ञा व्यक्ती बाबत अपरात्री सुद्धा पुर्नचाचपणी करण्यात न्यायालयाची यथायोग्य तत्परता दिसून येते. अयोध्या खटल्यालाच जेव्हा धार्मिक प्रार्थना मुलभूत अधिकार आहे त्या दृष्तीने प्रॉपर्टी विषयक खटला विचारात घ्यावा असा अर्ज जेव्हा अर्जदार म्हणुन सुब्रमण्यम स्वामींनी केला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने खटला विचारार्थ ही घेतला. पण मुलतः न्यायाधीशांची संख्या कमी असणे त्यासाठी बजेटची व्यवस्था करणे यास न्याययंत्रणा नव्हे तर सरकारे जबाबदार असतात. त्याचे खापर न्याययंत्रणेवर फोडणे आणि लोकांच्या भुकेचे आणि टॉयल्ट्सारखे जिवनावश्यक इतर प्रश्न सोडून धर्मस्थळाच्या प्रॉपर्टी विषयक खटल्यास प्राथमिकतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल साशंकता आहे. तसे पाहू जाता ईश्वर र्‍हदयात असणे अपेक्षीत असते. कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी

रामाचे राज्य काव्यात वर्णिलेले आहे. बाबराचे राज्यही कागदोपत्री लोकांना माहित आहे. घटकाभर दोघेही राजे काल्पनिक मानु...तरीही दोहोंच्या ""कथित व काल्पनिक’" राज्यपद्धतीचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांना कुणाचे राज्य आदर्श वाटते? एका सामान्य प्रजाजनाच्या मनातील शंकेखातर सुद्धा, त्या शंकेला मान देत आपल्या पत्नीची परीक्षा घेणा-या व त्याचे समाधान करणा-या शासक रामाचे की परस्त्रिया उचलून आणून उपभोगणा-या बाबराचे? प्रश्न महत्वाचा आहे कारण रामायणातील राज्यशासनाचा प्रभाव आपल्या राज्यशासनात असलेले, व प्रभावी राज्य केलेले शासक या देशाने पाहिले आहेत. उदा. शिवाजी महाराज. आता शिवाजी महाराज पण खोटे होते असे म्हणणार असाल तर तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

In reply to by दासबोध.कॊम

एका सामान्य प्रजाजनाच्या मनातील शंकेखातर सुद्धा, त्या शंकेला मान देत आपल्या पत्नीची परीक्षा घेणा-या व त्याचे समाधान करणा-या शासक रामाचे की परस्त्रिया उचलून आणून उपभोगणा-या बाबराचे?
मला वाटते आपल्या वाक्याची मांडणी जरा वेगळी असणे उपयूक्त ठरले असते का ? "एका सामान्य प्रजाजनाच्या मनातील शंकेखातर व्यक्तीगत त्याग करु इच्छिणार्‍या राम आदर्श की परस्त्रीस जबरदस्तीने उचलून नेणारा बाबर ? (बाबराने असे केल्याचा प्रमाण ऐतिहासिक पुरावा आहे का ? हे तुर्तास बाजुस ठेऊ) प्रश्न एवढाच असेल तर उत्तर राम आदर्श ठरतो असे होईल. (पण मग व्यक्तीगत त्याग करु इच्छिणार्‍या व्यक्तीच्या नावे न्यायालयाचा आमच्या बाजून निकाल नाही आला तरीही मंदिर उभारु हि भूमिका -भक्तांचे तर काम होईल- रामास किती न्याय देते ?) सितेवरचा ब्लेम व्हिक्टीम ब्लेमींग होते हे लक्षात न घेता , व्हिक्टीम ब्लेमींग करणार्‍याला एज्युकेट अथवा दंडीत न करता व्हिक्टीमला पुन्हा एकदा व्हिक्टीम करणे , त्यागाचा उद्देश किती ही चांगला असला तरी अस्थानी दान होते. त्यामुळे सीता कथा खरी असो अथवा काल्पनिक व्हिक्टीम ब्लेमींग करणारे सुटत राहीले आणि नसत्या शुचितेच्या आग्रहाने भारतातील किती पिढ्यातील किती स्त्रीयांचे जीवन होरपळून निघाले असेल. रामायणातील उत्तर कांडाचा भाग प्रक्षीप्त आहे असे म्हणतात, ६ व्या शतकातील एक प्रत दोन वर्षापुर्वी एसियातीक सोसायटी कलकत्तात सापडली त्यात सुद्धा बातमी प्रमाणे उत्तरकांड नाही . पण एका लेखकाच्या लेखनाचा उद्देश्य सीतेवर अन्याय झाला तसा पुन्हा होऊ नये असाही असेल पण पढत ..र्खांचा विवेक कैक शतके जागेवर येऊ शकला नाही. माणूस हा प्राणी तर्कसुसंगत विचार करण्याचपाक्षमते बाबत खरेच साशंकता वाटत राहते.

In reply to by दासबोध.कॊम

हा हा , काल्पनिक 'अच्छे दिन' तर चांगलेच वाटत असतात. जनतेला मात्र सत्याशीच सामना करावा लागतो. बाकी बिनबुडाच्या मुस्लिमविरोधी प्रतिक्रिया देत राहणे दासबोधडॉटकॉमवाल्याचा पिढीजात धंदा दिसतो.

In reply to by तर्राट जोकर

आमच्या पूर्वजांच्या काळात इंटरनेट नव्हते त्यामुळे हा आमचा पिढीजात धंदा नाही .आम्हीच अभ्यासपूर्वक सुरू केला आहे .आपला पिढीजात धंदा कुठला ?

अयोध्येतील रामजन्मभूमीचा प्रश्‍न न्यायालयातून सोडवण्यापेक्षा चर्चेने सोडवला जाऊ शकतो का ? या दृष्टीने अनेक घडामोडींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना सलमान नदवी हे श्री श्री रविशंकर यांना भेटले आणि त्यांनी ‘बाबरी मशीद शरीयतनुसार इतरत्र हालवली जाऊ शकते’, असा पर्याय ठेवला होता. त्यानंतर मौलाना सलमान नदवी यांना ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’तून निलंबित करण्यात आले. यावर मौलाना सलमान नदवी यांनी ‘सध्या बोर्डामध्ये हुकूमशाही चालू असून कट्टरपंथियांनी बोर्डावर ताबा मिळवला आहे’, असे पत्रकारांना सांगितले. दुसरीकडे एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बाबरी मशिदीविषयी धर्मांध भूमिका घेतांना सांगितले, ‘‘एकदा मशीद बांधली की, ती तेथे अनंतकाळपर्यंत रहाते. त्यामुळे अयोध्येत बाबरी मशीदच राहील. बाबरीविषयी तडजोड करणार्‍यांना ‘अल्लाह’ला उत्तर द्यावे लागेल.’’ ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’मधील कट्टरतावाद ! मौलाना सलमान नदवी यांच्यावरील कारवाईनंतर बोर्डाच्या सदस्यांची कट्टरपंथियता उघड झाली. तशाच प्रकारे उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिजवी यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे खरे स्वरूप घोषित करतांना ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ ही आतंकवाद्यांचीच एक शाखा आहे. पसार झालेले वादग्रस्त धर्मगुरु डॉ. झाकिर नाईक हे बोर्डाचे सदस्य आहेत. आतंकवाद्यांची ही शाखा देशाचे वातावरण बिघडवत असून ‘बोर्ड’वर बंदी आणायला हवी’, असे म्हटले आहे. वरील दोघांच्या वक्तव्यावरून ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’मध्ये कट्टरतावाद फोफावलेला दिसून येतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. याचसमवेत राममंदिराच्या जागेचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन आहे. बोर्डातील कट्टरतावाद पहाता उद्या न्यायालयाने कोणताही निर्णय दिल्यास तो ‘बोर्ड’ मान्य करेलच, असे ठामपणे सांगता येणार नाही. सध्या सर्वोच्च न्यायालयात राममंदिराचे प्रकरण चालू असतांना बोर्डातील धर्मांध त्यावर भाष्य करून वातावरण बिघडवत आहेत, हेही कितपत उचित ? याविषयी तथाकथित न्यायप्रेमीही गप्प का ? हिंदू ठाम भूमिका कधी घेणार ? ज्या पद्धतीने बाबरी मशिदीविषयी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ स्वतःची आक्रमक भूमिका मांडते, तशी राममंदिराविषयीची ठाम भूमिका सध्या भाजपचे नेते तथा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी सोडल्यास अन्य कोणीही मांडतांना दिसत नाहीत. ओवैसी यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर एका ठिकाणी मशीद बांधल्यावर ती अनंतकाळपर्यंत तेथेच असते, तसेच हिंदूंची मंदिरेही अनादी काळापासूनची असून विश्‍वाच्या अंतापर्यंत ती जेथे बांधली तेथे कायमच रहातील. हे सत्य ओवैसी राममंदिराविषयी का नाकारत आहेत ? ओवैसी यांनी ते नाकारले, तरी हिंदूंनी त्यांना ते ठामपणे सांगणे आवश्यक आहे. आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर परकियांनी आक्रमणे करून भारतासह जगभरातील अनेक मंदिरे पाडून त्या ठिकाणी प्रार्थनास्थळे बांधली आहेत. याविषयी अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. असे असतांना यापूर्वी राममंदिराविषयी बोलणारे हिंदूंचे नेते आता ठाम भूमिका मांडतांना कोठेच दिसत नाहीत. अलाहबाद उच्च न्यायालयाने रामजन्मभूमीला अनुकूल असा निर्णय दिला होता. त्या दृष्टीनेही हिंदू ठाम भूमिका घेतांना दिसत नाहीत. आज राममंदिर आणि हिंदु देवता यांच्या विरोधात सातत्याने गरळओक केली जात असतांना कोणीच काहीही न बोलणे, हे हिंदूंना लज्जास्पद आणि त्याचसमवेत संशयास्पदही आहे. स्वतःचे राजकीय हित साधण्यासाठी राममंदिराचे सूत्र उपस्थित केले गेले, असा जो विरोधक आरोप करत आहेत, त्याला राममंदिराविषयी कोणतेही मत न मांडल्याने बळ दिल्यासारखे होईल. सरकारचा हस्तक्षेप आवश्यक ! वसिम रिजवी आणि मौलाना सलमान नदवी यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’विषयी उपस्थित केलेली सूत्रे महत्त्वाची आहेत. बोर्डामध्ये वाढत असलेला कट्टरतावाद हा काही एका दिवसात निर्माण झालेला नाही. मौलाना नदवी हे बोर्डामध्ये मोठ्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी त्याविषयी कधीही वाच्यता केलेली नाही. त्या दोघांनी जर वेळीच हा कट्टरतावाद सरकार आणि जनता यांच्यासमोर आणला असता, तर त्यावर उपाययोजना करता आली असती. जनतेला वाटत होते की, कट्टरतावाद हा केवळ जम्मू-काश्मीर आणि देशातील काही भागांपुरता मर्यादित आहे; पण तो राममंदिर, तिहेरी तलाक आणि देशांतर्गत वाढत असलेली धर्मांधता यावरून देशभर पसरत चालला आहे, हेच त्या दोघांच्या विधानाची दुसरी बाजू तर नाही ना ? वादग्रस्त धर्मगुरु डॉ. झाकिर नाईक हे जर ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य असतील, तर या बोर्डाचे कामकाज कसे चालत असेल, ते सांगायलाच नको. ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा वाढता हस्तक्षेप आणि कट्टरतावाद हा नेमका काय आहे ? डॉ. झाकिर नाईकच्या प्रवृत्तीची आणखी किती माणसे तेथे आहेत ?, याची पडताळणी सरकार करणार कि नाही ? हिंदूंच्या प्रथा, परंपरा यांच्याविषयी जरा कुठे खुट्ट झाल्यास सरकार तात्काळ हस्तक्षेप करते. ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’मधील कट्टरतावाद तर देशातील वातावरणच बिघडवणारा आहे. त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे. दैनिक सनातन प्रभात संपादकीय

In reply to by संन्यस्त खड्ग

टनाटन प्रभात आणि झाकिर नाईक दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्ही आवळेजावळे बंधूच. एकसारखेच विचार, धर्म वेगळा फक्त.

In reply to by तर्राट जोकर

तर्राट जोकर, टनाटन प्रभात म्हणजे काय? प्रभातसमयी तुमचं टनाटन होत नाही का? होत नसल्यास यथोचित उपचार घ्या म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

मटेरियल एव्हिडन्स उपलब्ध करू शकले नाहीत म्हणून " बाबराने अन्यायाने हिंदूंचे श्रद्धास्थान उद्ध्वस्थ करून त्याचे मशिदीत रूपांतर केले " हा दावा न्यायालयात खोटा ठरेल का ? जर फक्त मटेरियल एव्हिडन्स हाच ठोस पुरावा आहे असे मानायचे तर गेल्या ४००- ५०० वर्षांपासून सुरु असलेला राम मंदिरासाठीचा लढा हा " ही रामजन्मभूमी किंवा राममंदिर आहे " या गैरसमजुतीमुळे सुरु आहे असे म्हणावे लागेल .

In reply to by manguu@mail.com

गेल्या ४००- ५०० वर्षांपासून सुरु असलेला राम मंदिरासाठीचा लढा
आठवणीप्रमाणे हा तथाकथित 'लढा' विश्व हिंदू परिषदेने १९८३-८४ च्या सुमारास चालू केला. शहाबानो खटल्यानंतर 'रामलल्ला'चा बर्यापैकी उपयोग करून घेता येईल हे भाजपा धुरीणांच्या लक्षात आले व 'शीलान्यास समिती' स्थापन झाली. मग पुढे 'मंदीर वही बनायेंगे' चालु झाले व १९९२ साली मस्जीद पाडून 'त्यांना' धडा शिकवल्याचे समाधान भाजपा व त्यांच्या मतदारांना मिळाले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तेच ना ! ४०० वर्षे म्हणे ... तसे असते तर हिंदू राजानी एकत्र येऊन मोघलांचा पाडाव केला असता की .. युद्धात जिंकणे , हरणे , चारदोन गावे येणे जाणे हे म्हणजे बुद्धिबळागत कधी काळा जिंकला कधी पांढरा जिंकला , इतका किरकोळ मामला होता. आपले वतन शाबूत राहिल्याशी मतलब ..

In reply to by manguu@mail.com

ते जशी चुकीची माहिती सांगत आहेत तशीच तुमची माहिती पण चुकीची आहे असे मला वाटते. ३००-४०० वर्षे जरी नसली तरी या वादाला कमीत कमी १५० एक वर्षांची पार्श्वभूमी तरी नक्कीच असावी. १८५० च्या वगैरे सुमारास पहिल्यांदा तिथल्या स्थानिकांनी इंग्रज वसाहत वाल्यांकडे या जागेचा ताबा मागितला होता, शिवाय काही हिंसक घटनांचेही संदर्भ आहेत असे काही इतिहासतज्ञ नोंदवतात. मला वाटते मशिदीच्या आत मूर्ती ठेवण्याच्या घटना १९४९-१९५० च्या सुमारास घडल्या होत्या. त्यामुळे तो वरचा १९८३ -८४ चा संदर्भ सुद्धा चुकीचा वाटतो.

In reply to by बिटाकाका

या मुद्यावर मीनाक्षी जैनांची मांडणी अधिक व्यवस्थीत वाटते. वर आधीच्या प्रतिसादातून युट्यूब जोडलेल्या आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माईसाहेब, तिथे कुठलीही मशीद नव्हती हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जरा तुमच्या ह्यांना विचारून घ्यायचं होतं ना, इथे लिहिण्याआधी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मग ६ डिसेंबर(१९९२)ला विहिपवाले 'एक धक्का और दो, बाबरी मस्जीद तोड दो' हे बेंबीच्या देठापासून ओरडून का सांगत होते?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मशीद नव्हती, मग पाडणार्यानी नेमकं काय पाडलं ?

In reply to by गामा पैलवान

मग अडवानी मशीद पाडा बोल्ले , ठाकरे बोल्ले मला आमच्या लोकांचा अभिमान आहे इ इ इ हे सगळे अज्ञानीच होते की !

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ती बाबरी मशीद रेमडोक्या सेक्युलरांच्या मस्तकात बिली आहे. ती जमीनदोस्त करायची आजसुद्धा तितकीच गरज आहे. -गा.पै.

In reply to by manguu@mail.com

रोचक आहे.. पण मला वाटते याला देखील काउंटर स्टोरी असणारच.

In reply to by विशुमित

.
...पण मला वाटते याला देखील काउंटर स्टोरी असणारच. टोक गाठणार्‍यांचे असेच असते टोकावरचहोचजीवन त्यांना सुरक्षीत भासते.या टोकाला तरी असतात अथवा त्या टोकाला , एका टोआवरुन ढललले गेले की सरळ दुसर्‍या टोकास पोहोचतात

In reply to by विशुमित

टोकाच्या मंडळीची वैशीष्ट्य म्हणजे कुणाच्या तरी एकांगी बहकाव्यात आलेली असतात , इकडे या धर्माची पूर्ण बाजू बघीतलेली नसते आणि तिकडे गेले तर त्याही धर्माची पूर्ण बाजू समजलेली नसते. एकांगी दृष्टीकोणांच्या प्रभावाखाली असणेच तेवढे जमते . अन बॅलन्स्ड सी सॉ असतात टोकाची मंडळी मग सी सॉच्या कोणत्याही बाजूस बसू द्यात त्यांना. वस्तुतः सर्वसामान्य माणूस बॅलन्सस्ड असण्या पेक्षा नसण्याचीच शक्यता अधीक असते.