Skip to main content

कोणता मोबाईल घेऊ ?

लेखक कट्टापा यांनी रविवार, 18/10/2015 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?) Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे. तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा. मोबाईल कडून अपेक्षा (Requirement) 1.चांगले बॅटरी बॅकअप. 2.उत्तम कॅमेरा

वाचने 33510
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

लेनोवो के८ नोट ( व्हेनम काळा) ऑन-लाइन अ‍ॅमेझॉन वरून खरेदी केला. दोन तीन दिवसात कुरियरने घरी येईल. आरडी सेल व हाडेफाका डेबिट कार्ड खरेदी सुट मुळे रू.१४,०००चा रू.९८९० ला पडला ४जीबी, ६४ जीबी इन्टरनल मेमरी, १३एमपी+५एमपी डयुअल कॅमेरा आणि बरेच काही. व्हॅल्यू फॉर मनी ! https://www.amazon.in/Lenovo-Note-Venom-Black-4GB/dp/B01LZKSUXF?tag=goo…

शाओमि नोट फोरने किंमत उतरवल्याने(~10ह) इतरांनाही कमी कराव्या लागत आहेत. प्रसेसर क्वालकॅाम नसून मिडियाटेक आहे k8चा.

In reply to by कंजूस

अच्छा, मिडियाटेक तुलनेने नविन व कामगिरीत दुय्यम आहे. घेतला आहेच, वापरून, अनुभव घेवुन पाहतो. काही अडचण नाही आलीच तर ओक्केच.

जुलै २०१५ ला Redmi Note 4G फ्लिपकार्ट वरून खरेदी केला.....आता वय-वर्षे २.७ अजूनपर्यन्त मस्त पळत आहे......एकदाही आजारी नाही पड़ला.......

आजच्यासाठी कोणता चांगला पर्याय उपलब्ध आहे

In reply to by नर्मदेतला गोटा

तुमचे बजेट किती आहे ? काय स्पेसिफिकेशन हवीत ? त्यावर कोणकोणती अ‍ॅप्स वापरणार आहात हे तर कळू द्या ! पोस्ट कोविड, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर दसरा दिवाळी निमित्त सवलतीत सेल १६-१७ ऑक्टोबर पासॉन सुरु होणारेत, त्यावर अक्षरशः शेकड्याने आहेत. कुठला ठरवलात ते इथे टाकायला विसरू नकात.

In reply to by नर्मदेतला गोटा

यावरून आता कोणता घ्यावा हे लगेच तुलना करून सांगता येईल. ड्यूल सिम ,ड्यूल 4g LTE हा नवीन ट्रेंड आहे android phone साठी. ( एकाचवेळी जिओ आणि एरटेल/वोडा कार्ड active राहाणे) ओटिजी कनेक्टिविटी हवीच. चांगली क्याम्रे हाइ रेझ विडिओ काढतात आणि मेमरी लवकर फुल होते. ते दुसऱ्या कार्डावर ढकलण्यासाठी.

६ जीबी १२८ जीबी मेमरि आणी १८,००० बजेट मध्ये असलेले फोन सुचवा सॅम्सन्ग एम ३१ , मोटो फ्युजन प्लस , रेड मी नोट प्रो ९ हे तीन शॉर्ट्लिस्ट केलेत . यातला चांगला कोणता ??

In reply to by कपिलमुनी

मोटो नक्की नाही. गुगलचा पहिला मोटो बेस्ट होता. आता फक्त नाव राहीलंय.

In reply to by शाम भागवत

गेले ३ वर्ष , मोटो चे दोन फोन वापरतोय. अजुन तरी काही समस्या नाही.

पूर्वीच्या जे सिरिजचं नाव बदलून एम केलंय. A seriesयापेक्षा चांगली आणि S galaxy आणखी चांगली. ------------ A चा प्रॉब्लेम म्हणजे हाइब्रिड सिम स्लॉट . (पण ६४ /१२८ जीबीला आणखी मेमरी कार्डाची गरज नसते.)