भारतीय पालक आणि मुले -कमवा आणि शिका
कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे ब्रीदवाक्य होते . पण भारतात असे करणारी मुले किती ? किंवा कोणत्या शैक्षणिक संस्था अशी संधी देतात ? मला वाटते असे काम करून जगणारी मुले नगण्यच असावीत. त्यामुळे घरात सुबत्ता असेल तरच मुले चांगले शिक्षण घेतात . पूर्वी मूल्यशिक्षणातून काही कमावून नॅक सारख्या संस्थेला मदत वैगेरे करायचे फॉर्म असायचे पण तेही आईबाप मुलांना एकरकमी पैसे देऊन धडपडण्यासाठी नाकारतातच.
तिकडे अमेरिकेत मुले सोळा सतरा वर्षापासूनच स्वतः कमवायला लागतात. मग ती कोठेही काम करतात अगदी वेटरचे वैगेरेही करतात असे ऐकले आहे . मग भारतीय वंशाच्या तिकडे मुले जन्माला आलेल्या पण आई बापाची जडण घडण इकडेच झालेल्या मुलांना ह्याचा फार त्रास होतो हे अपर्णा वेलणकर ह्यांच्या "फॉर हिअर ऑर टू गो "ह्या पुस्तकात वाचलेले आहेच. ते असोच, पण निदान भारतात जन्मलेल्या आणि इथेच वाढलेल्या मुलांना आपण भारतीय सर्व काही हातात देत असतो. निदान त्यांच्या पीजी चे शिक्षण होईपर्यंत . पण मुले मात्र अगदी वयाच्या पंचविशी पर्यंत शाळेच्या फी पासून ते पॉकेटमनी ह्यासाठी आई बापांवरच अवलंबून असतात . म्हणूनच भारतीय पालक आयुष्याची जवळपास अर्धी अधिक पुंजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करून म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे बघतात . त्याचेच परिणाम म्हणुन मुलांवर आपला सर्वोतोपरी अधिकार गाजवण्यासाठी सरसावलेले असतात . मग त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आवडीनिवडी पासून ते त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यावर अधिकार गाजवतात .
असो मुद्द्याकडे वळूया . तर असे सोळा सतरा वर्षांपासून आपआपले काम करून पोट भरायचे किंवा फीसाठी सुट्ट्या मध्ये काम करून हातभार लावणे अशी सवय लावायला काय हरकत आहे ? त्यासाठी किती सुरक्षितता किंवा धोके आहेत ह्यावर चर्चा व्हावी असे वाटतंय . मुलांचे एकवेळ ठीक पण मुलींसाठी किती सुरक्षित आहे ? किंवा असा प्रयोग इथल्या कुणी मिपाकाराने(इथल्या किंवा बाहेरच्या ) केलाय का?
तळटीप:तुमच्या मुलगा किंवा मुलगीने सेक्स वर्कर म्हणून काम केले तर चालेल का हे इथे अपेक्षित नाही .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
निदान एवढे तरी करावे
प्रतिसादासाठी धन्यवाद.
मुंबईत कमावण्यासाठी कुठं जावं हा प्रश्न आहे
आहा
प्रतिसादासाठी धन्यवाद . भलेही
पाल्यांना लवकरात लवकर
-----------------------------
उत्तम चर्चा विषय.
संपूर्ण सहमत
बीए पर्यंत काही केलं नाही, पण
+१००
छान प्रतिसाद. आवडला.
अमेरीकेत ताशी १२ डॉलर कीमान वेतन आहे
गेल्या काही दिवसांपासून सुरू
लेखातले विचार पटले. शिवाय
बर्याचदा मार्कांच्या
भारत आणि अमेरिका फार वेगळ्या
एक मुद्दा कदाचित निसटतोय.
चान्गला धागा आणि प्रतिसाद.
कमवा आणि शिका
सुट्टीमधे काम
+१०००