ओटीतले ब्लाऊजपीस...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
- काकी, पुन्हा सुरू झाले बघ..
- आता काय... थांब बघते..
अरे देवा… तिकडे सुखी कुटुंब च्या ग्रुपवर पुन्हा एकदा मेसेज आला होता..
आशय काहीसा असा..
कोकणात हाणामारी, मोर्चे हे प्रकार फार होत नाहीत,
कारण,
लिंबू पुरतं..
आता यावर हसावं की रडावं..
तर विनोद म्हणून हसावं. पण किती वेळा? एकच विनोद तीन माणसांनी सलग तिनदा टाकला की हसू येण्याऐवजी संतापच येतो हल्ली.
मग मला पर्सनलवर मेसेज करणाऱ्या पुतण्याने सुखी कुटुंब वर मेसेज टाकला..
“संक्रांत येतेय. तिळगुळाचे मेसेज सुरू करायचे का...”
मी त्याला प्रतिसाद दिला, थांब जरा. लिंबं संपू देत..
त्यावर अनेकांचे उत्स्फूर्त स्मायली.
मग कोणी म्हणे, येऊ देत लिंबं.
मी म्हटलं, इथे सगळेच कोकणातले. माणशी एक तरी येणारच.
त्यावर दुसऱ्याचा प्रतिसाद, मग काय, लिंबाचं लोणचं, लिंबाचा भात, लिंबाचं मटण,...
मग त्यावरून लिंबू कलरची साडी आणि बनवाबनवी कडे मोर्चा वळला...
रिपीट मेसेज टाळू या, असा सरतेशेवटी उपस्थित सगळ्यांचा सूर लागला आणि, अवघ्या तिसऱ्या मेसेजनंतर... पहिले पाढे पंचावन्न...
अशा मेसेजेसना आम्ही ओटीतले ब्लाऊजपीस म्हणतो. कोणी दिले, कधी दिले, का दिले या कशाचाही विचार न करता, आली सवाष्ण घरी की घाल तिच्या ओटीत.. त्याच धर्तीवर आजकाल व्हॉट्स ॲप मेसेज पुढे ढकलले जातात. बहुतेकदा काय लिहिलंय, हे ही पूर्ण वाचायचे कष्ट घेत नाहीत लोक. व्हॉट्स ॲपच्या अनेक ग्रुपवर हे होत राहतं. या प्रकाराला कंटाळून मी आँटो डाऊनलोड बंद करून टाकलं. पण हा काही उपाय नाही ना..
आरोग्यविषयक माहिती देणारा आणखी एक ग्रुप. तो बनवणारे गृहस्थ खरोखर जाणकार. उत्तम माहिती देतात ते. शक्यतो औषधांचा वापर टाळून योग्य आहार, योग्य दिनक्रम आणि योगमुद्रांच्या आधारे आरोग्यपूर्ण कसं जगता येईल, याबाबत त्यांचे सल्ले उत्तम असतात. मी या ग्रुपची सदस्य झाले. सुरूवातीला काही काळ सुरळीत गेला. पण नंतर काहींचे सुप्रभात संदेश, सचित्र सुप्रभात, अमके व्हिडीयो, तमकी गाणी आणि असा बराच गाळ येऊ लागला. काही सदस्यांनी सांगून बघितलं, आरोग्यविषयकच पोस्ट टाका. पण नाही. काहींनी ग्रुप ॲडमिनना सांगून पाहिलं, पण ते व्यस्त असावेत. मग असे संदर्भहीन मेसेज आले की मी, यात आरोग्यविषयक काय? असा प्रश्न टाकायला सुरूवात केली. अनेकांना त्याचीही मौज वाटली. काहींनी दाद दिली तर काहींनी अशा मेसेजेसना गुलाबाची फुलं पाठवू, गेट वेल सून चे मेसेज पाठवू, अशा सूचना केल्या. काही काळाने लक्षात आलं की असंबद्ध मेसेज टाकणारे एकतर मठ्ठ असावेत किंवा ग्रुपवरचे मेसेजेस पाहतही नसावेत... पुन्हा एकदा ओटीतले ब्लाऊजपीस, आले की ढकल पुढे...
एकंदरच व्हॉट्स ॲपवरची ही चालढकल हा काही फार हवाहवासा प्रकार नाही. काही ग्रुप विशिष्ट विषयांना समर्पित असतात, काही मित्रमंडळींचे असतात, काही फक्त मित्रांचे, काही फक्त मैत्रिणींचे, काही बल्लवांचे आणि सुगरणींचे तर काही चक्क शाळासोबत्यांचेही. या सगळ्याच ठिकाणी समविचारी माणसं एकत्र आली असतील, किमान काही समान सूत्र असणारी माणसं एकत्र असतील, असं गृहित धरलं जातं. ते सूत्रं जपलं जावं ही माफक अपेक्षाही अवास्तव नाही ना...
प्रतिक्रिया
समाज म्हटला की काळे-गोरे असणारच....
हाहाहा!!!
ग्रूप म्युटवर टाकावेत आणि
ब्लाउज पीसेस वापरून एक छानशी क्विल्ट करता येईल.
जाता जाता -- पुण्यात लक्ष्मी
व्हाट्सऍप, फेसबुक इ. इ. सर्व
व्हाट्सऍप, फेसबुक इ. इ. सर्व
जरा दुसर्या बाजूने विचार करा
:)
लेख आवडला. :)
खरंच
एक ओटीतला ब्लाऊज पीस...
एक ओटीतला ब्लाऊज पीस...
नम्र सुचना वजा विनंती
नम्र सुचना वजा विनंती
आधीच इतके ओटीचे ब्लाउज पीसेस पडलेत त्यात तुम्ही चार ची भर घातलीत
ब्लॉउज पीस आलेच नाहीत. हे
नम्र सुचना वजा विनंती
५० वेळा!
सगळं अॅडमिन/अॅडमिन्सवर अवलंबून असतं.
त्रास व्हायचाच असेल तर!
आपल्याला कोणी सुप्रभात म्हटलं
व्हाट्सआपने जर प्रत्येक
विनागट वाटसप उपयुक्त. उगाचच
मस्त आणि उपयुक्त प्रतिसाद...