Skip to main content

एनजीओ साठी नावे सुचवा

लेखक निशांत_खाडे यांनी सोमवार, 08/01/2018 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! औरंगाबादमधील काही मनोरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही नैराश्य(Depression) चिंतारोग (Anxiety Disorder) व नैराश्य आणि अतिउत्तेजना (Bipolar Disorder ) व इतर मानसिक समस्या असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समुपदेशन व उपचारासाठी एक संस्था सुरु करत आहोत. या संस्थेकरता मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इंग्रजीमध्ये नावे सुचवावीत तसेच औरंगाबादवासीय मिपाकरांपैकी कोणी आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्यास व्य. नि. करावा! सहकार्याच्या अपेक्षेत! धन्यवाद!

वाचने 41041
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

मनोविकास डिस्क्लेमर ====> "विकास" ह्या शब्दावरून शब्दख्खल करू नये ही विनंती....आजकाल कोण कुठल्या शब्दावरून (शाब्दिक) मारामारी सुरु करेल काही सांगता येत नाही.

In reply to by मुक्त विहारि

मनोविकास हे नाव चांगले आहे. या नावाची एक प्रकाशन संस्था आहे. चेतना या नावाचाही विचार व्हायला हरकत नाही.

In reply to by एमी

:-( आहे ह्या नावाचं कोणीतरी आधीच! मी कुठेतरी वाचलं असेल पूर्वी म्हणून आतापण हेच 'सुचलं'....

'मनमोकळं' समतोल माईंड इट मनन आशादान मानस मनोविकास चेतना आत्मभान अनन्त रन्ग चित्तस्वास्थ्य स्मितानन्द दिलासा सीमित सुक्रुत POISE (मनाचे स्थैर्य) उन्मेश मनोभुती निरामय निशांंत 'उत्साह' / 'उत्फुल्ल' मानसवज्र मनोजवम निरभ्र

सध्या बोलबाला असलेल्या आणि अनेकांना उपयुक्त ठरलेल्या एका व्यायामप्रकारात (याला ब्रह्मविद्या असे नाव दिले गेले आहे.) निरोगी, सुदृढ मन आणि शरीरासाठीच्या प्रत्येक व्यायामानंतर एक प्रार्थना किंवा स्वयंसूचना म्हणायची असते. शरीराला एक मंदिर, परमात्म्याचे एक जागृत मंदिर मानले आहे. ते शब्द असे आहेत, "या क्षणापासून पुढे कधीही माझ्या स्मरणात असे काहीही... कुठल्याही अभावाची कोणतीही कल्पना- आजाराची, वार्धक्याची,नैराश्याची, संशयाची,अपयशाची, मृत्यूची कोनतीही कल्पना माझ्या स्मरणात शिरणार नाही. जे सर्वोतम आहे त्याविरुद्ध आणि सत्याच्या माझ्या सर्वोच्च कल्पनेविरुद्ध माझ्या स्मरणात काहीही शिरणार नाही...." "-मी शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो की या क्षनापासून मी असे काहीही करनार नाही किंवा बोलणार नाही किंवा असा विचार मनात आणणार नाही की ज्यामुळे माझ्या शरीराला, परमेश्वराच्या या जागृत मंदिराला इजा पोहोचेल किंवा त्याचा गैरवापर होईल." हीच स्वयंसूचना मनासाठीही उपयुक्त आहे. म्हणून मनमंदिर हे नाव मला सुचते.

In reply to by पगला गजोधर

संस्कृत नाव आहे. अर्थ समजून सुचवता आहात का? का या धाग्यावर सुद्धा पिंका टाकण्याची सुरुवात? हे लोक काही चांगले करू बघताहेत निदान शुभेच्छा द्याल का नाही?

In reply to by अर्जुन

४ वेळा तीच ४ नांवे परत परत देण्याऐवजी... ४ वेळा एक एक नाव शेपरेट दिलं असतं तर् ???

भिडू हिंदीला जगगुदादाचा "भिडू" मराठीतला चला प्रोब्लेमशी "भिडू"