भुबनेश्वर किंवा त्रिभुबनेश्वर ही ओडिशा राज्याची राजधानी स्वातंत्र्यानंतर झाली. अगोदर कटक होती ती महानदीच्या बेटावर असल्याने जागा अपुरी पडू लागली. ब्रिटिशांनी ही भुबनेश्वरची जागा नियोजित करून बांधायला घेतली. रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागात जुने शहर होते तिथूनच कटक - पुरी रस्ता(NH 203) जातो. पश्चिम भाग हा नवीन भाग. इथे तीन किमिवर विमानतळ, पाच किमिवर मोठा बस स्टँड आहे.( NH 5 ) रस्ते मोठे आणि दोन्ही बाजूस सुंदर इमारती दिसतात. साठ किमिवरच्या जगन्नाथपुरी आणि कोनार्क येथे जाण्यासाठी हे मुख्य शहर असले तरी भुबनेश्वरला स्वत:चे असे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व होतेच. ती सर्व माहिती विकिलेखांत सापडेल.
डिसेंबरमध्ये केलेल्या पुरी यात्रेच्यावेळी इथले स्थळदर्शन झाले त्याचे थोडक्यात फोटो आणि माहिती देत आहे. पुढे कोणास जाताना टुअर नियोजनास थोडीफार उपयोगी पडेल अशी आशा आहे. भुबनेश्वर -पिपली - साक्षीगोपाल - पुरी - कोनार्क - परत अशी कार हायर करणारे बरेच आहेत.
प्रमुख स्थळे, अंतर
१) उदयगिरी - खंडगिरी
स्टेशनपासून सहा किमि. समोरासमोरचे दोन डोंगर आहेत. अंदाजे १५० मिटरस उंच. इ०पू०दुसय्रा शतकापासूनच्या गुंफा,शिलालेख. जैन,बौद्ध आणि हिंदू लेणी. तीन ते सहा संध्याकाळी उत्तम वेळ. पिकनिक स्पॅाटच होतो. NH 5 रस्त्यावर बरमन्डा चौकपाशी मोठा आंत राज्य बस स्टँड आहे. तिथून दीड किमीवर खंडगिरी चौक सिग्नल लागेल. या आतल्या रस्त्यावर दोनशे मिटरसवर डावीकडे खंडगिरी आणि उजवीकडे उदयगिरी डोंगर आहे.
२ ) धौली
कलिंग विजयानंतर अशोकाने येथे बौद्ध धर्म स्विकारला. पुरी रस्त्यावर आठ किमिवर आहे.
३ ) नंदनकानन प्राणी संग्रहालय
उत्तरेस वीस किमिटरस कटकजवळ.
४ ) बिंदुसागर तलाव आणि परिसर मंदिरे
स्टेशनपासून अडीच किमिवर जुन्या गावात.
५ ) म्यूजियम
स्टेशनपासून १ किमि कल्पना चौक, बिंदुसागर अगोदर. काही चांगल्या मूर्ती ठेवल्या आहेत.
बिंदुसागर तलाव आणि त्याभोवती पसरलेली पन्नासेक मंदिरे सातव्या ते तेराव्या शतकांतील आहेत. यांमध्ये लिंगराज मंदिरात आणि अनंत बसुदेवमध्ये पूजा होते. लिंगराज भव्य आहे. अनंत बसुदेव अगदी बिंदुसागरसमोरच आहे.
६ ) चिलिका सरोवर
शंभर किमि दक्षिणेस.
पिपली, नंदनकानन आणि धौली येथे गेलो नव्हतो.
चिलिका सरोवर येथून शंभर किमि दक्षिणेस आहे. हिवाळ्यात येथे स्थलांतरीत पक्षी येतात. या नावाचे स्टेशनही आहे. सरोवर सत्तर किमि लांबीला आहे आणि रेल्वे ,इस्टकोस्ट हाइवे बाजूनेच जातो. इस्टकोस्ट एक्स्पप्रेस (१८६४६) येथून पहाटे पाचवाजता जात होती तेव्हा अतिशय दुर्गंधी येत होती. कशामुळे माहित नाही. पाणपक्षी पाहायचा उत्साह कमी झाल्यामुळे चिलिका वगळले.
फोटो १ ) भुबनेश्वर - बिंदुसागर तलाव _अ

फोटो २ )बिंदुसागर तलाव_ब

फोटो ३ )अनंत वसुदेव मंदिराचा सिंह, मागे दिसणारा लिंगराज मंदिर कळस

इथला कृष्ण मथुरेचा कृष्ण आहे तो बलराम सुभद्रेसह.
फोटो ४ )अनंत वसुदेव मंदिराचा कळस/शिखर.

फोटो ५ )उडिशा देवळाची संपूर्ण रचना ( कल्याण,नाट्य,भोगमंडप आणि देऊळ असे चार भाग असतात) पाहायला मिळते.मंदीर रचना

फोटो ६ )अनंत वसुदेव मंदिराच्या भोगमंडपात असे हारे नेतात त्यात भात,डालमा,भाज्यांची मडकी असतात. भोग ठेवतात तेव्हा अर्धा तास मंदिर बंद असते.

बिंदुसागर तलावाभोवती पसरलेली सर्व शंकराचीच मंदिरे आहेत, त्यासमोरच असलेले अनंत वसुदेव मंदिर हे एकमेव विष्णू मंदिर आहे. मूर्ती पुरीच्या जगन्नाथासारख्या आहेत. गर्भगृहसोडून फोटो काढू देतात. गर्दी अजिबात नसते. अवश्य पाहा. लिंगराज मंदीर हे भुबनेश्वरातले महत्त्वाचे आहे पण मंदिरात फारनरना प्रवेश नाही. आवारात इतर छोटी मंदिरे आहेत.
फोटो ७ )नकाशा, भुबनेश्वर - बिंदुसागर तलाव - आसपासची मंदिरे . परशुरामेश्वर मंदिराबाहेरच्या भिंतीवर.

फोटो ८) परशुरामेश्वर मंदीर, भुबनेश्वर

फोटो ९) कार्तिकेय, परशुरामेश्वर मंदीर. वरच्या शिल्पपट्टीत कोणती कथा असावी?

फोटो १० )शिवपार्वती , परशुरामेश्वर मंदीर, भुबनेश्वर.

फोटो ११ )गंधर्व, परशुरामेश्वर मंदीर, भुबनेश्वर

मंदिरे पाहण्याचा क्रम - मुख्य मंदिरे १) अनंत वसुदेव - उडिया मंदिराची छोटी प्रतिकृती. फारनर आत जाऊ शकतात. फोटो काढता येतात. हे अगदी बिंदुसागर तलावासमोरच आहे. २)लिंगराज - मोठे पुजा होणारे देऊळ. फोटोग्राफी बंदी. ३) कोटितिर्थेश्वर छोटा तलाव/कुंड. ४) स्वर्णजलेश्वर - शिल्पे आहेत शिखरावर. ५)परशुरामेश्वर - छान शिल्पे.,६)सिद्धेश्वर आणि ७) मुक्तेश्वर - सुंदर एकाच आवारात आहेत. ८) राजारानी. हे थोडे दूर आहे. मुक्तेश्वरपासून पंधरा मि चालत. ९)भास्करेश्वर आणि १०) ब्रह्मेश्वर ही दोन राजारानीपासून थोडी पुढे आहेत. ११) यामेश्वर आणि वेताळ देऊळ ही बिंदुसागर तलावापलिकडे. बरेच पर्यटक फक्त लिंगराज मंदिर पाहातात.
फोटो १२) मुकुटेश्वर /मुक्तेश्वर. तलाव आणि तोरण असलेले छोटेसे खुप सुंदर.

फोटो १३)/मुक्तेश्वर/मुकुटेश्वरचे तोरण प्रवेशद्वार

फोटो १४)राजारानी मंदिर. ( यास पंधरा रु तिकिट आहे.)

फोटो १५)उदयगिरीची पाटी

फोटो १६) उदयगिरीची वानरसेना. वानरे त्रास देत नाहीत.

फोटो १७)उदयगिरी हत्ती

फोटो १८)उदयगिरीची शिल्पपट्टिका १/३

फोटो १९)उदयगिरीची शिल्पपट्टिका २/३

फोटो २०)उदयगिरीची शिल्पपट्टिका ३/३

फोटो २१) खरवेला शिलालेखाची प्रतिकृती

फोटो २२)भुबनेश्वर म्युझियम.

फोटो २३)म्युझियममधील पट्टचित्र १

फोटो २४)म्युझियममधील पट्टचित्र २

फोटो २५)म्युझियममधील पट्टचित्र ३, जगन्नाथ सुभद्र,बलराम.

फोटो २६) कोणार्क. सूर्यमंदीराचे एक चाक

फोटो २७ ) कोणार्क सूर्यास्त

इतर ऐतिहासिक, पर्यटन उपयुक्त माहिती अवश्य लिहा.

वाचने
11251
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
थोडी भर...
माहितीत भर आवडली. भारतात
भारी माहिती.
अतिशय उत्तम धागा
१+ वा खु साठवण्यात आलेली आहे.
ओदिशा पर्यटनावर सुधीर कांदळकर
दुर्लक्षित आकर्षणाची ओळख
+१
In reply to दुर्लक्षित आकर्षणाची ओळख by डॉ सुहास म्हात्रे
मागच्याच आठवड्यात भुवनेश्वर
विशुमित, पुन्हा जात आहात तर
क्षमा करा कामाचे वेळापत्रक
In reply to विशुमित, पुन्हा जात आहात तर by कंजूस
हा का?
In reply to विशुमित, पुन्हा जात आहात तर by कंजूस
हो.
In reply to हा का? by मनो
सुंदर .......
या ट्रिपमध्ये वरंगळ येथे
In reply to सुंदर ....... by सुधीर कांदळकर
केवळ सुरेख!
आठवणी ताज्या झाल्या...