(आपल्या संगीतप्रेमी मित्रांना खालील पुरावे अवश्य वाचावयास द्या!)
सवाई महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद- इति मंबाजी बीग्रेड (संगीत, अर्थात पंधरावे महापातक)
नुकताच पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला. या आनंदात विरजण पाडायचे काम संभाजी महाराजांचे नाव घेऊन चालविल्या जाणा-या एका टोळीने केले. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की रसीक श्रोते मराठा समाजाला नावे ठेऊ शकतात, तसे झाले तर तो आपल्या शत्रूचा विजय ठरेल. तसा तो ठरू नये म्हणून हा लेखन प्रपंच.
समर्थ रामदास मोठेच संगीत प्रेमी! आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगितात रामदासी मल्हार इ. नावात रामदासी असा शब्द असलेले समर्थ निर्मित राग गायले जातात. संगीतगायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धातमाता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम,(ताल शास्त्रातले काही प्रकार आहेत हे) नृत्यकला मज दे रे राम असे रामाकडे मागणे मागणारे समर्थ त्यामुळेच परंपरेने संगीताचे जतन व संवर्धन करण्यास सांगतात. समर्थ परंपरेतील शिष्य असलेले तंजावर नरेश व्यंकोजीराजे भोसले यांचे पुत्र तुळजेंद्रराजे भोसले यांनी समर्थांच्या मण्णारगुडी येथील मठात बसून लिहिलेला संगीत-रस-सारामृत हा ग्रंथ, संगीत शास्त्रातला खूप महत्वाचा ग्रंथ आजही मानला जातो. (www.dasbodh.com वर उपलब्ध) असो, तात्पर्य, आपली संस्कृती ही संगीतास पूज्य मानणारी आहे.
म्हणूनच आपली सरस्वती वीणा धरण करते, कृष्ण मुरली धारण करतो, गजानन मृदंग धारण करतो.
मग ब्रिगेडला संगिताचे वावडे का? असा प्रश्न तुम्हाला पडाला असेल तर तुम्ही अजूनही ब्रिगेडला हिंदूच समजण्याची चूक करीत आहात. आम्ही गेली अनेक वर्षे कंठशोष करून सांगत आहोत की ब्रिगेड मध्ये एकही अस्सल रक्ताचा मराठा नाही. हा सर्व बाटग्यांचा भरणा असून त्यांना विशेष रूपाने आर्थिक सहाय्य इस्लामिक देशांमधून चालविल्या जाणा-या जिहादी संघटनांकडून आहे. त्यांचा “जाणता” रझा कोण आहे हे ही आपणास ठाऊक असेलच. परंतु याचा आणि सवाई चा काय संबंध? संबंध आहे ना! असे आहे, की इस्लाम मध्ये संगीत निशिद्ध मानलेले आहे! त्यामुळेच इस्लामचे तळवे चाटणा-या ब्रिगेडी(संपादित)ना स्वराधिराज भारतरत्न पं. भीमसेन जोशींनी सुरु केलेली ही सांस्कृतिक चळवळ एक दहशतवादच वाटणार यात नवल नाही! खरी पोटदुखी अशी आहे की या उत्सवाच्या निमित्ताने अनेक मुसलमान गायक-वादक-कलाकार आपली कला सरस्वतीदेवी चरणी अर्पण करतात! हे इस्लामच्या विरोधातले आहे! त्यामुळे हे असले बाटगे पुढे करून याला खरा विरोध कट्टर मुसलमानच करत आहेत याबाबत आम्हाला शंकाच नाही. सवाई मध्ये आजवर कला सादर केलेल्या जन्माने मुसलमान पणा वर्तनाने हिंदुस्थानी कलाकारांची खालील यादी पहा म्हणजे सर्व ध्यानात येईल!
उ. झाकीर हुसेन, उ. विलायत खां साहेब, उस्ताद अमजद अली खां, उ. उस्मान खां, बेगम परवीन सुल्ताना (या तर चक्क कुंकू लावतात!), उस्ताद अमान अली बंगश, उस्ताद अयान आली बंगश, उ. शुजाद हुसेन खान, उस्ताद अल्ला रखा खां, उस्ताद शौकत हुसेन खां, उस्ताद रफ़िकुद्दिन सबरी, उस्ताद डांगर बंधू, उस्ताद बिस्मिल्ला खा, उस्ताद निशात खां, उस्ताद इर्शाद खां, उस्ताद सुल्तान खां, ....यादी मोठी आहे व न संपणारी आहे.
तात्पर्य: सवाई गंधर्व ला विरोध संभाजीराजांच्या विचारांचे वारस करत नसून त्यांना हाल हाल करून संपविणा-यांच्या विचारांचे वारस करीत आहेत.आपण जाणताच, आपण पुराव्याशिवाय काही बोलत नाही, त्यामुळे हे घ्या पुरावे.
इस्लाम आणि संगीत
इस्लाम नुसार संगीत हे पंधरावे महापाप आहे.
इस्लाम मधील धर्ममार्तंडांच्या मतांनुसार आणि धर्मग्रंथांनुसार संगीताला निषिद्ध अर्थात हराम मानलेले आहे.
ज्यात गायन, स्वरवाद्य वादन, तालवाद्य वादन, नृत्य, संगीत श्रवण, वाद्य विक्री व खरेदी या सर्व बाबींचा समावेश केलेला आहे. या सर्व बाबी आता आपण पुराव्यानिशी पाहूयात. वाक्य व पुढे कंसात पुरावा क्रमांक दिलेला आहे.
इमाम जफ़र अस-सादिक सांगतात की प्रेषिताने सांगितले आहे,
"मी बासरी, ड्रम आणि तबला वाजविणे तुझ्यासाठी निषिद्ध केलेले आहे." (1)
प्रेषित(स.) असेही सांगतात की, "सर्वशक्तिमान देव अल्लाहने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, जगावर एक दया म्हणून मला पाठविले आहे आणि त्याने बासरी वादन, वाद्य वादन, आवाजाचे सर्व खेळ, मूर्ती (पूजा) आणि अज्ञानींच्या सर्व सवयींचा नाश करण्याचे आदेश दिले आहेत. " (2)
इमाम जफ़र अस-सादिक सांगतात,
"ज्या व्यक्तीने अल्लाहकडून आशीर्वाद प्राप्त केले आहे आणि जेव्हा हे आशीर्वाद घेऊनही तो बासरी वाजवतो तेव्हा असे करून जणू तो त्या आशीर्वादांचा आव्हेरच करतो आहे. "(3)
सहाव्या इमाम (ए.एस.) यांनी असेही सांगितले आहे की,
"जसे पाणी हिरवळ(शेवाळे) वाढायला मदत करते तसेच व्हायोलिन वाजविणे हे ढोंगीपणाला प्रोत्साहन देते. " (4)
इमाम (अ.)असे देखील म्हणतात,
"जर ड्रम आणि झांजा एकाद्या मुसलमानाने चाळीस दिवस आपल्या घरात वाजविल्या, तर अल्लाह 'फ़कंदर' नावाच्या एका सैतानाला त्या घरी पाठवितो. सैतान त्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक पेशी मध्ये घुसून जातो. या सैतानाच्या प्रवेशामुळे ती व्यक्ती आपला आत्मसन्मान आणि स्वत:ची कीर्ती इ. सर्व काही गमावून बसतो. मग तो जे काही बोलतो किंवा त्याच्याविषयी कोण काय म्हटले आहे त्याबद्दल तो काळजी करणार नाही. मग, या माणसामध्ये हा सैतान वारा फ़ुंकतो. परिणामी तो निर्लज्ज होतो. इतका की त्यामुळे त्याचा स्त्रियांचा अपमान/शीलभंग झाल्यास त्याचेही त्याला काही सोयरसुतक असण्याचा काहीही संबंध येत नाही. " (5)
मुअद्दा इब्न ज़ियाद म्हणतो, "मी इमाम जाफर अब्द-सौदी (ए.एस.) च्या सहवासात होतो, जेव्हा एका व्यक्तीने म्हटले होते की," मी शौचालयात जातो तेव्हा माझ्या शेजारच्या मुली गातात ते मला ऐकू येते. कधीकधी, मी (शौचालया मध्ये) जास्त वेळ बसून राहतो जेणेकरून मी अधिक काळा ते गाणे ऐकू शकेन. "
त्यावर चिडून इमाम (ए.एस.) म्हणाले:
"संगीत आणि गाणी लक्षपूर्वक ऐकण्यापासून परावृत्त हो, हे थांबव! "
मग हा मनुष्य पुढे म्हणाला, "मिया, मी संगीत संमेलनांना जात नाही! मी फक्त कानावर सहज पडेल तेच ऐकतो! "
इमाम जाफर अस-सादिक (ए.एस.) म्हणाले, "तुम्ही या कुराणाच्या आयती वाचल्या नाहीत काय ...
“खरोखरीच ते ऐकणे, ते पहाणे व त्याचे मनन करणे, हे सर्व त्याला प्रश्नार्थकच आहे” (सूरत अल-ईस्रा ', 17:36)
त्या मनुष्याने उत्तर दिले, "मला या विषयी माहिती नव्हती. मी माझ्या कृत्यांबद्दल खेद वाटतो, भविष्यात मी असे करणार नाही. मी माझ्या पूर्वीच्या पापांसाठी पश्चात्ताप करतो आणि मी माझ्या पालनकर्त्याकडून क्षमा मागतो. "
त्यांची अवस्था पाहून इमाम (अ.) म्हणाले, "उठ ! जा आणि घुस्ल कर आणि सलात कर आणि माफी साठी प्रार्थना कर. (चुकून कानावर पडलेले गाणे ऐकून) तू निश्चितपणे एक भयानक व प्राणघातक पाप केलेले आहेस आणि एका भयानक परिस्थितीत तु सामील झाला आहेस. तु त्याकरिता पश्चात्ताप केला आहे आणि मी त्यासाठी अल्लाहचा आभारी आहे. आणि मी ज्या गोष्टी त्याला नापसंत आहेत त्या सर्व गोष्टींसाठी अल्लाहची क्षमा मागतो. निश्चितच, अल्लाह केवळ वाईट गोष्टींना नापसंत करतो. वाईट गोष्टी वाईट लोकांसाठीच सोडा कारण त्यांचे भवितव्य वेगळॆच असणार आहे.” (6)
अमीर उल-मुमिनिन 'अली (ए.एस.) म्हणतात,
"ज्या घरात वाइन असते किंवा ड्रम, खंजिरी/डफ़, किंवा बासरी वाजविणारे असतात त्या घरात देवदूत पाऊल सुद्धा ठेवत नाहीत. या घराच्या रहिवाशांच्या प्रार्थना देखील अल्लाहला अस्वीकार्य आहेत. ते बरकतीपासून (भरभराटीपासून) वंचित ठेवले जातात. " (7)
हजरत इमाम अली आर-रिदा (अ.) म्हणाले आहेत,
"वाद्य वादन ऐकणे हे मोठ्या पापांपैकी एक आहे." (8)
मुहम्मद पैगंबर (स.) म्हणतात,
"सतार वाजविणारा व्यक्ती कयामत च्या दिवशी काळ्य़ा तोंडाचा करून मगच पेश केला जाईल.. त्याच्या हातात आगीची सतार धारण केलेली असेल. अग्नीच्या ज्वाळांनी धगधगणा-या गुर्ज नावाच्या शस्त्राने ७०,००० देवदूत त्याला तोंडावर आणि डोक्यावर मारत रहातील. गायक आपल्या कबरीमधून उठतानाच अंध, बहिरे आणि मुके बनून बाहेर येतील. व्यभिचार करणा-यासारखीच त्याची अवस्था होईल (थोडक्यात संगीत उपासना व व्यभिचार ही प्रेषितांच्या मते एकाच दर्जाची पापे आहेत). तालवाद्ये वाजविणारे व बासरी वाजविणारे यांचेही हेच हाल होतील " (9)
हजरत इमाम 'अली आर-रिया (ए.एस.एस.) टीका,
"एक व्यक्ती दैवी संताप निमंत्रित करते तेव्हा बासरी वादन, ड्रम वादन आणि बुद्धिबळा सारख्या गोष्टी त्याच्या घरामध्ये चाळीस दिवस चालत असतात. जर या चाळीस दिवसात त्याला मृत्यु आला तर त्याला एखाद्या पापी व धर्माचे नियम मोडणा-या माणासाप्रमाणे गती मिळेल. त्याची जागा जहान्नुम मध्ये( नरकात) असेल. आणि हे किती भयंकर ठिकाण आहे! " (10)
फजल इब्न शाजाइन यांनी इमाम अली अर-रिदा (ए.एस.एस.) यांचे मतानुसार,संगीत म्हणजे मोठे पाप आहे म्हणून सांगितले आहे: "आणि वाद्य वाजवण्याच्या धुंदीत असणे हे देखील मोठे पाप आहे." (11)
सर्व मुजाहिदीन लोकांसाठी, इस्लामी मतानुसार एकमते हे सत्य आहे की वाद्य निर्मिती, विक्री आणि खरेदी हे हराम/निशिद्ध आहे आणि संगीत क्रियाकलापांमधून मिळणारे उत्पन्न हे सुद्धा हराम आहे. संगीत वाद्यांचा समावे समावेश असलेले सर्व व्यवहार अवैध आहेत. वाद्य बाळगणे देखील हराम आहे. त्यांना (वाद्ये व ते बाळ्गणारे, वाजविणारे, संगीत उपासना करणारे) नष्ट करणे आवश्यक आहे. "तोहफुल उकुल" या पुस्तकात नोंद झालेल्या इमाम जाफार अ-सौदीक (ए.एस.)त्याचप्रमाणे, शेख हुर अल -मिमिली याने इमाम जफर अल सादिक (ए.एस.) पासून खालील परंपरा नोंदविली:
"अल्लाहने सर्व प्रकारच्या वस्तूंचे निर्माण करण्यास मनाई केली आहे जी केवळ हरम पद्धतीने वापरली जाते; आणि अशा गोष्टी ज्या फक्त पाईप (एक वाद्य), बासरी, बुद्धीबळ आणि सर्व प्रकारचे जुगार, प्रतिमा, पुतळे यांसारख्या वाईट गोष्टी निर्माण करतात. या सर्व वस्तुंची निर्मिती हराम आहे. "
इमाम (ए.एस.) शेवटी म्हणाले, "मग गाणे किंवा संगीत शिकणे व शिकविणे, संगीत गाणे व संगीत वाजविणे, या गोष्टींसाठी पैसे देणॆ किंवा घेणे किंवा या दोन्ही दोषांमधली हरप्रकारे वागणे हे हराम/निषिद्ध आहे." (12)
जो मनुष्य (संगीत, गायन) आदि अनावश्यक गोष्टींवर वेळ खर्च करतो तो भरकटलेला आहे. (कुराण ३१.६)
आणि त्यांच्यापैकी (संगीत, गायन, वादन करणारे) ज्यांना बहकविता येईल त्यांना बहकव, ऐकत नसतील त्यांच्यावर तोफ़ा, घोडदळानिशी स्वारी कर(कुराण १७:६४)
• 1. अल काफी
• 2. मुस्तड्रक-उल-वासन, अध्याय 79
• 3. वसैल उल-शिया
• 4. वसैल उल-शिया
• 5. वसैल उल-शिया
• 6. संगीत प्रकरण अल-काफी
• 7. वसैल उल-शिया
• 8. मुस्तड्रक उल- वसैल
• 9. मुस्तड्रक उल- वसैल
• 10. मुस्तनाद अल ताराकी
• 11. मुस्तानाड नारकि
• 12. पुस्तिका पहा; "तासीर मौसीकी बार आसाब" पृष्ठे 3,6, 10.
संदर्भ वेबसाईट quran.com, www.al-islam.org
ब्रिगेडच्या इस्लाम कनेक्शनचे अजून पुरावे इथे पहा.
https://muslimbrigade.blogspot.in/p/blog-page_27.html
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिहाद्यांची पोलखोल
जिहाद्यांची पोलखोल केल्याबद्दल रामदास.कॉम यांचे आभार.
-गा.पै.
मोक्याची जागा पकडून पॉपकॉर्न आणि पेय्य घेऊन बसायला हरकत नाही. .
परंतु सामना एकतर्फी होईल काय? काही आयडी उडालेले असल्याने एकटे बाबूमोशाय किती लढणार?
कमाल आहे. कसाही संबंध जोडून
कमाल आहे. कसाही संबंध जोडून इस्लामला/मुसलमानांना झोडपायचे हा अजेंडा दिसतोय लेख लिहिणाऱ्याचा. शिवाय लेखात दिलेले कुरानातले तीनही ( १७:३६, १७:६४ आणि ३१:६) संदर्भ धादांत खोटे आहेत. (मी तपासून पाहिले) खोटं बोलायचं वर रेटून बोलायचं तसला प्रकार दिसतो.
या लेखातले बाकी संदर्भही तपासावे लागतील कारण जर तीन संदर्भ/ उद्धरणं चुकीची निघाली आहेत तर बाकीच्या इतर सगळ्याच अवतरणांची विश्वासार्हता संशय निर्माण करते. नुसती अवतरणे न देतां कुठल्या पुस्तकातल्या कुठल्या पानांवरुन ही सगळी अवतरणे घेतली आहेत तेही लेखकाने वाचकांसमोर मांडावे. तळटीपांचे आकडे टाकून अख्खं पुस्तक रेफरंस म्हणून देणं एका अभ्यासकाला साजेसं नाही. उलट सगळा मामला मोघम करुन वाचकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. अभ्यासूपणे लेख लिहिण्याचा भास निर्माण करण्याचा लेखक प्रयत्न करतो आहे पण विवक्षित आणि नेमका संदर्भ देत नाहीय. संपादक असला धादांत खोटी नाटी उद्धरणं देणारा प्रचारकी लेख संस्थळावरून काढून टाकतील अशी आशा करतो.
वरचा लेख लिहिणाऱ्या लेखक महाशयांना ब्रिगेडवर टीकाच करायची होती तर ती सरळ समोरून आणि थेट करता आली असती पण तसे करण्यातून त्यांना सोशल मिडीयावरच्या मुस्लिमद्वेष्ट्या लोकांची सहानुभूती मिळवता आली नसती असे दिसते. इस्लाममधल्या संगीतविषयक (खऱ्या ? खोट्या?) मतांचा आधार घेऊन नथीतून तीर मारायचे कारण तेवढेच दिसते मला तरी. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न असावा कदाचित पण तो फसला आहे.
भारतीय संगीताच्या क्षेत्रात मुसलमानांची दैदीप्यमान परंपरा आहे. इस्लाम धर्म जर इतक्या टोकाचा संगीतद्वेष्टा असता तर ही परंपरा टिकली नसती. पिढ्या दर पिढ्या संगीतात उज्ज्वल कामगिरी करणारे प्रतिभावान उस्ताद निर्माण झाले नसते. त्यांनी जिव्हाळ्याने गाणं गायलं नसतं संगीताची घराणी टिकली नसती. त्यांना हिंदू-मुस्लिम राजाश्रय मिळाला नसता. नवी वाद्ये,नवे गायनप्रकार, नवनवे राग निर्माण झाले नसते.
इस्लाममध्ये संगीतविषयक कडवी/ कट्टर मते असतील. मी सरसकटपणे असं काही नाहीच असं म्हणणार नाही पण त्याचा किती परिणाम मुस्लिम जनमानसाच्या संगीतप्रियतेवर झाला आहे ? तेही पहा ना. पोथ्यांमधे असलेली मते आणि प्रत्यक्षातील लोकांचे वागणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे.
खुलासा व/वा संदर्भ अपेक्षित आहेत
In reply to कमाल आहे. कसाही संबंध जोडून by हारुन शेख
धागालेखकाकडून खुलाशाची अपेक्षा आहे. स्वत: न वाचलेले संदर्भ असतील तर तसं स्पष्टपणे लिहायला हवं. आणि ते खोटे निघाले तर क्षमा मागायला पाहिजे.
-गा.पै.
हारून शेख, संपूर्ण सहमत.
In reply to कमाल आहे. कसाही संबंध जोडून by हारुन शेख
हारून शेख, संपूर्ण सहमत.
इस्लाम धर्माची शिकवण आणि भारतिय मुसलमानांची शतकानुशतकांपासून चालत आलेली मुसलमान संस्कृती यात भेद करणे आवश्यक आहे. धर्माची शिकवण जशीच्या तशी स्विकारायची हे कधीही व्यवहार्य नसते. म्हणून तर भारतीय मुस्लिम वेगळे ठरतात कट्टर अरबी मुस्लिमांपेक्षा.
संतुलित प्रतिसाद
In reply to कमाल आहे. कसाही संबंध जोडून by हारुन शेख
हे अगदी पटलं. शास्त्रीय संगीत , त्यातली घराणी ई बद्दल मला फारसे ज्ञान नाही . पण जर मुस्लिमांचा संगीताला विरोध अगदी कडवा असता अगदी अलिकडच्या काळातील अत्यंत लोकप्रिय मुस्लिम गायक (रफी, नूरजहापासून अतिफ अस्लम पर्यंत), संगीतकार (नौशादपासून रहमान, साजिद-वाजिद) , वादक (झाकीर हुसेन , बिस्मिल्ला खा) ई कलाकार कायम भितीखाली वावरले असते, कदाचित त्यांना कलाकार म्हणून जगणे कठीण होवून या क्षेत्रातून माघार घ्यावी लागली असती. पण कुणाच्याही बाबतीत असे काही झाल्याचे (धमकी, हल्ले ई) ऐकण्यात नाही.
कलाकारांसमोरची आव्हाने अद्याप बाकी असावीत
In reply to संतुलित प्रतिसाद by मराठी कथालेखक
प्रस्थापित त्यांच्या समोरील सामाजिक दबावाचे अडथळे कसे पार पाडतात याची कल्पना नही. पण कुठेही सर्वसामान्य एकदा चालत नाही म्हणून सांगितले की वाटी न जाण्याची शक्यता अधिक असेल. १९६७ - २०१७ हा काळ सौदीत कला आणि इतर काही विषयात अधिक कट्टरतेत गेला आणि तेथील कट्टरतेचा प्रभाव जगभर कमी अधिक प्रमाणात नक्कीच पडला असावा. (उदा. ऑस्ट्रेलियातील एक संदर्भ) शेजारच्या पाकीस्तान बांग्लादेशातील स्थिती या काळात अधिक आव्हानात्मक झाली असावी.
भारतात सर्वच स्थिती वाईट नसेल तर अद्याप सर्वच आलबेलही नसावे (संदर्भ), भारतात १९७० च्या दशका नंतर मुस्लीम स्त्री कलावंतांचे प्रमाण वाढण्या एवजी कमी होत गेले असावे. तस्लिमा नसरीन ना अजूनही भारताच्या मोठ्या भागात मोकळेपणाने फिरता येत नसावे . संगिताच्या क्षेत्रात अलिकडे आसामातील आणि कर्नाटकातील एक एक बातमी नवोदीतांस्मोरील आव्हानांची कल्पना देऊ शकते.
कलाकार मंडळी यातून मार्ग काढतच नाही असे नाही पण अद्याप आव्हाने बाकी आहेत हे ही लक्षात घेणे जरुरी असावे.
आव्हानांचे अजून एक उदाहरण
In reply to कलाकारांसमोरची आव्हाने अद्याप बाकी असावीत by माहितगार
फतव्यामुळे काश्मिरी मुस्लीम मुलींना त्यांचा बँड बंद करावा लागल्याची टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त आणि एन डी टि व्ही चर्चा
११ जुलै २०१८
In reply to कलाकारांसमोरची आव्हाने अद्याप बाकी असावीत by माहितगार
* २७ एप्रिल २०१८ : पाकीस्तानात वाढलेल्या कडवेपणामुळे पाकीस्तानी कव्वालीवर आलेली वाईट वेळ .
* ११ जुलै २०१८, केरळात कोणा एका सलाफी प्रचारकाने गाणे आणि संगिताविरुद्ध कडव्या भूमिकेचा प्रचार चालवला तर सायरा नावाची मल्याळी गायिकेने ताठ मानेने केलेले गायन आणि संगिताचे समर्थन.
इस्लाममध्ये संगीतविषयक कडवी/
In reply to कमाल आहे. कसाही संबंध जोडून by हारुन शेख
एकूणात हे मत एकदम सुभानल्ला आहे, पण "असतील" शब्दामधे बर्याच लोकांना बिझनेस पोटेंशियल दिसते.
================
लेखकावर जास्त हेत्वारोप करणं अयोग्य आहे. लेखकानं मुस्लिम संगीतकारांचं योगदान मान्य केलं आहे. सामान्य मुसलमान श्रोता याबद्दल त्यानं काही लिहिलेलं नाही, पण त्याचं मत उलटं असावं असं मानायचं कारण नाही. कुराणाचे संदर्भ, भाषा, संस्कृती, आवृत्त्या, कुराणाच्या पश्चात विकसित झालेले ग्रंथज्ञान, त्याचे महत्त्व, लोकमान्यता, त्यांचा इतिहास आणि त्याचा गैर-इस्लामिक संस्कृतींवर झालेला परिणाम ही बाब संगीताच्या बाबतीत तितकी थेट नाही असं प्राथमिक चौकशीतून कळतं.
=================
तसा गीतेचा संदर्भ देऊन तिच्यात "भावांना मारून टाक" असं लिहिलंय असं सांगता येतं. कोणी कोणत्या मानसिकतेने कोणत्या उद्देशाने कशाचे काय इंटरप्रिटेशन केले आणि ते कोणाच्या हाती लागले नि त्याने त्याचा वापर कोणत्या संदर्भात गुंफवून टाकला याचा भरोसा देता येत नाही. लेखक जर हॅबिच्यूअल इस्लाम हेटर नसेल तर त्याच्यावर टिका अस्थानी असेल. कारण मूळात त्याच्या चुंबकाची सुई कुराणाकडे नाही, ती देशविरोधी तत्त्वांकडे आहे.
Quran.com
Please check quran.com for quranic references. Rest article is translation of an article from al-islam.org. verified before posting. This dinial is well known tool of these people.
these people ??
In reply to Quran.com by दासबोध.कॊम
.
कपिलमुनी,
In reply to these people ?? by कपिलमुनी
कपिलमुनी,
देशद्रोह्यांचा, समाज फोडणार्या लोकांचा पराकोटीचा तिरस्कार असणं तब्येतीला चांगलं असतं. आणि सेन्स ऑफ शेम पराकोटीला पोचला असेल तर सिलेक्टिव वाचन करणे, सिलेक्टिव अर्थ काढणे हे देखिल शरमेचंच आहे.
हे करून पहा
quran.कॉम वॉर जाऊन music असे सर्च केल्यावर मुहसीन खान नामक माणसाचे इंग्रजी ट्रान्सलेशन येते. येथे कुराणाची अनेक व्हर्जनस आहेत.पैकि मुहसीन खा साहेबांच्या व्हर्जन मध्ये हा अर्थ दिलेला आहे. ते काफीर नसून मुसलमानच आहेत स्वतः.
वरील आयती त्यातूनच घेतलेल्या आहेत. राहिला प्रश्न अन्य हदीत चा तर त्या खालील लेखातून आहेत तशा उचलल्या आहेत.
https://www.al-islam.org/greater-sins-volume-1-ayatullah-sayyid-abdul-h…
तुम्ही लिहिलेला लेख हा
In reply to हे करून पहा by दासबोध.कॊम
तुम्ही लिहिलेला लेख हा कुठल्यातरी वेबसाईटवरच्या खोडसाळ मजकूराचं भाषांतर आहे हे वाचून आश्चर्य वाटलं नाही. ती अहमदिया मुसलमानांची वेबसाईट आहे म्हणजे त्यातलं म्हणणं जगातल्या सगळ्या मुसलमानांचं अधिकृत म्हणणं आहे असंही नाही पण ते एक असो. मला पंथापंथांच्या वादात रस नाही.
या वेबसाईटवरचा एक लेख घेऊन सर्वच्या सर्व मुसलमानांना झोडपणे हे काही भडकाऊ कंटेट लिहिणाऱ्या सनातनी वेबसाईट्सवरचे लेख घेऊन सगळ्या हिंदूंना झोडपण्यासारखेच आहे. अतिशय अयोग्य अॅप्रोच आहे तुमचा.
तुम्ही कुरानातली जी तीन उद्धरणं दिली ती खाली देत आहे. तुम्ही वर जी उद्धरणं दिली आहे ती किती वेगळी आहे आणि मूळ आयत काय सांगतेय ते तुमच्या लक्ष्यात येईलच अशी अपेक्षा आहे.
'एखाद्या अशा गोष्टीमागे लागू नका जिचे तुम्हाला ज्ञान नसेल. निश्चितच डोळे, कान आणि ह्रदय या सर्वांच्याकडे जाब विचारला जाईल.' (सूराह १७: आयत ३६)
'(सैतानाला उद्देशून) तू ज्याला ज्याला आपल्या आमंत्रणाने फूस लावू शकतो, लाव. त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चालून आण. संपत्ती आणि संततीमध्ये त्यांच्याबरोबर भागीदारी कर. आणि त्यांना आश्वासनाच्या जाळ्यात अडकव.पण लक्ष्यात असू दे की तुझे ( सैतानाचे) आश्वासन एका फसवणुकीशिवाय दुसरं काहीही नाही.' (सूराह १७: आयत ६४)
'आणि माणसांपैकी काहीजण असेही असतात की जे मनमोहक कहाण्या खरेदी करुन आणतात जेणेकरुन (त्या कहाण्यांचा उपयोग करुन) इतर लोकांना अल्लाहच्या मार्गापासून ज्ञानावाचून भटकवावे आणि या मार्गावरुन चालण्याचे आवाहन चेष्टा मस्करीत उडवून लावावे. अशा लोकांसाठी भयंकर अपमानजनक शिक्षा ( आम्ही राखून ठेवली) आहे.' (सूराह ३१: आयत ६)
कुरानात संगीतविरोधी मत आढळत नाही.मुसलमानांच्या इतर काही पुस्तकांत संगीतविषयक कट्टर मते असतीलही. मी ते नाकारत नाहीये पण ती मतं बऱ्यापैकी 'पुराणातली वांगी पुराणात' अशीच राहिली आहेत. संगीताच्या बाबतीत फार थोडे मुसलमान पोथीनिष्ठ वागतात किंवा वागत आले आहेत. तसं नसल्यास मुसलमानांच्या संगीतातल्या इतक्या मोठ्या योगदानाचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल ? तुमच्या एकूण लिखाणातून मुसलमान बघा किती संगीतविरोधी आहेत असा प्रचारकी सूर लागलाआहे तो वस्तुस्थितीशी अतिशय विसंगत आहे. ब्रिगेडबद्दल तुमच्या मनात राग असल्यास तो तर्कसंगत पद्धतीने मांडा त्यासाठी मुसलमानांची संगीतविषयक मते लिहून ब्रिगेड जिहादी विचारसरणीची संस्था आहे हे सिद्ध करायला जाणे हा 'अव्यापारेषु व्यापार' आहे. कशाचाही कशाशीही आणि कसाही संबंध जोडून, काहीतरी उथळ लिखाण करुन तुम्ही स्वत:चे ( त्यासोबतच दासबोध.काॅम आणि समर्थ रामदासांच्या वारश्याचे) हसे करुन घेत आहात.
कुठे या अयोग्य माणसांच्या नादाला लागतात
In reply to तुम्ही लिहिलेला लेख हा by हारुन शेख
अहो हारून शेख साहेब कुठे शेणात दगड मारताय. आम्ही हिंदू दुर्लक्ष करतोय असल्या मूर्ख लेखांना. दासबोध नाव पण त्यातील एक टक्का पण अक्कल नाही या लेखात. सोडून द्या. एवढी अक्कल असती तर अनेक मुस्लिम कलाकार झाले अथवा आहेत त्यांच्याकडे पाहून तरी या id ला काही समजले असते. पण नाव सोना बाई आणि हाथी कथलाचा वाळा. तसेच हे दासबोध.
आम्ही हिंदू दुर्लक्ष करतोय
In reply to कुठे या अयोग्य माणसांच्या नादाला लागतात by महाठक
लेखकाने मांडलेल्या समस्यांपैकी नक्की काय तुमच्यामते दखल घेण्याजोगं आहे?
हारुनजी,
In reply to तुम्ही लिहिलेला लेख हा by हारुन शेख
हारुनजी,
व्यवस्थित शब्दात, संंयतपणे लेखाची पिसे काढलात.
मुद्देसूद प्रतिवाद खूपच आवडला.
प्रतिसाद आवडला आणि पटलाही
In reply to हारुनजी, by अभिजीत अवलिया
या भागातील रामदास स्वामी उल्लेख केला त्याआडून रामदास स्वामी यांच्यावर चिखलफेक होऊ नये अशीच इच्छा.
अवलिया जी,
In reply to हारुनजी, by अभिजीत अवलिया
अवलिया जी,
और ब्रिगँम्बो खुष हुवा, असं?
ती अहमदिया मुसलमानांची
In reply to तुम्ही लिहिलेला लेख हा by हारुन शेख
मग हे त्यांचं रचलेलं असेल, इतर पंथ निर्दोष आहेत इतकं स्पष्टीकरण पुरेसं आहे.
स्वतःला दासबोध डॉट कॉम
स्वतःला दासबोध डॉट कॉम म्हणवता आणि विवेक अजिबात नाही. कसे काय?
लेखात कसा म्हणे त्यांनी
In reply to स्वतःला दासबोध डॉट कॉम by सतिश गावडे
लेखात कसा म्हणे त्यांनी कुणाचा विवेकभंग केला?
हारून शेख ह्यांच्याशी सहमत.
माझी हारून शेख ह्यांच्याशी पूर्ण सहमति आहे.
'सवाई'विरुद्ध आरडाओरडा करणार्यांचा संगीतविरोधी अजेंडा काय असेल तो असो - आणि त्याचा तुम्ही जरूर प्रतिवाद करावा - पण इस्लाम संगीतविरोधी आहे असा सोयीस्कर अर्थ काही आयतांमधून काढायाचा, त्यावरून इस्लाम = 'सवाई'विरुद्ध आरडाओरडा करणारे असा शोध लावायचा आणि ते सूत पकडून आपली इस्लामविरोधी गरळ येथे ओतायची हे योग्य वाटत नाही.
आपणापैकी कोणासच अरेबिकमध्ये लिहिलेले कुरान वाचता येत नाही. किंबहुना त्यातील अरेबिक भाषा प्राचीन असून बहुतेक मुस्लिमांनाहि ती समजत नाही ही वस्तुस्थिति आहे. बहुसंख्य मुल्ला-मौलवींची परिस्थिति फार वेगळी नाही. (ह्या बाबतीत हिंदु धर्माकडे पहा. आपल्यापैकी बहुतेकांना मनुस्मृति मुळातून वाचता येत नाही. कोणाच्यातरी भाषान्तरावरून आपली मते बनवून आपण वितंडवाद घालत बसतो. येथेच अलीकडे झालेला 'न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति' ह्याचा वाद आठवा. घरच्या पूजा सांगणार्या भटभिक्षुकांपासून तथाकथित संतमहंतांपर्यंत बहुतेकांना आपले प्राचीन ग्रंथ मुळातून वाचता येत नाहीत तरी ते सनातन धर्माची व्याख्याने देत फिरत असतात आणि सर्वसामान्यांची दिशाभूल करत असतात.)
हे असले बाटगे पुढे करून याला
In reply to हारून शेख ह्यांच्याशी सहमत. by अरविंद कोल्हटकर
मूळ लेखातील कट्टर हा शब्द बहुतेकांच्या नजरेतून सुटलाय बहुतेक.
सवाई'विरुद्ध आरडाओरडा करणार्
In reply to हारून शेख ह्यांच्याशी सहमत. by अरविंद कोल्हटकर
हाच लेखाचा गाभा आहे असं वाटतं.
संभाजी ब्रिगेड पंढरपूरची वारी पण बंद करा असं म्हणू शकते. ट्रॅफिकच्या दृष्टीने वारकर्यांचा ताप या महोत्सवापेक्षा खूप जास्त होतं. हा महोत्सव कधी झाला म्हटलं तर अर्धे पुणेकर माहित नाही म्हणतील. तेच वारी ९५% लोकांना माहित होते आणि त्रास देते.
तर कट्टर मुसलमान कोणाच्या विरोधात आहेत आणि ब्रिगेडी कोणाच्या विरोधात आहेत ते लोक एकच आहेत. त्यामुळं आपण ज्याला सुत म्हणताय तो चांगला दोरखंड आहे.
---------------
बाय द वे, या लेखाच्या निमित्ताने अनेक लोकांनी लेखकाची भूमिका किंचितही न समजून घेता आपल्या उजव्या विचारसरणी विरोधातली गरळ ओकून घेतली आहे असे वाटते.
===========================
जग म्हणजे विद्वत्ता गाजवायची लागलेली स्पर्धा नाही. अशा स्पर्धेतच सगळा रस असलेल्या लोकांचं एक छोटं जग असतं. तिथं बसून ते सार्या जगावर पिंका टाकत असतात. बाकीचे लोक सद्भावनेने आपल्या परिने सहभागी होतात. त्यात सगळा मूर्खपणा बघणं हा एक विद्वज्जनांचा मूर्खपणा आहे. ज्या लोकांनी कमी अभ्यास केला वा ज्यांना करायला मिळाला नाही वा ज्यांची क्षमता नाही अशा लोकांच्या सत्सहभागाचा आदर झाला पाहिजे.
-------------------------------
अतिरेक्यांना कुराण वाचता येत नाही. पण त्यांना कुराणातल्या जिहादचा हवाला देऊन अतिरेकी बनवलं जातं, जीव द्यायला सांगीतलं जातं. अशावेळी कोणी "कट्टर मुसलमान कुराणतल्या जिहादच्या संकल्पनेनं अतिरेकी बनत आहेत" असं म्हटलं त्यालाच झोडपणार कि काय? कुराणात काय म्हटलं आहे हे कुठं महत्त्वाचं आहे? त्याचं पॉप्यूलर इंटरप्रिटेशन काय आहे, समाजमान्यता काय आहे हे कोण पाहणार?
--------------------
संभाजी ब्रिगेड चालवायला असे किती पैसे लागणार आहेत? पण तिचे प्रणेते निर्माण करायला गडगंज पैसाच लागेल ना? देशातल्या सर्वात प्रभावशाली ४% लोकांचा द्वेष करणारी संघटना टिकवून ठेवायची मंजे हुशार लोक कसे पटवायचे? आता पोटेंशियल फायनान्शियर्सची लिस्ट बनवा मंजे सूत आणि दोरखंडामधले फरक कळतील.
योग्य माणूस भेटला
आपले मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि एकंदर इस्लामचा अभ्यास पाहून बरे वाटले .आपण माझ्या वर्षानुवर्षे पडलेल्या शंकांचे समाधान करू शकता ; खरोखरीच मला माहिती नाही म्हणून विचारतो आहे .
अहमदिया ,शिया,सुन्नी ,बोहरी, सूफी वगैरे वगैरे पंथांमध्ये नक्की काय फरक आहे व कशामुळे हे एकमेकांशी इतके अंतर राखून राहतात ?
भारतातले मुसलमान स्वतःला कुठल्या प्रकारामध्ये धरतात ?
शियांनी सुनीचा व सुन्नी नि शीयांचा जीव घेण्याइतपत काय घडलेले आहे ?
लेखात आपापसात संबंध नसलेले
In reply to योग्य माणूस भेटला by दासबोध.कॊम
लेखात आपापसात संबंध नसलेले दोन वेगवेगळे काँटेक्स्ट वडाची साल पिंपळाला लावले आहेत. दोन्ह विषय वेगवेगळ्या चर्चेस टाकले तर प्रशस्त राहीले असते. आणि या प्रतिसादाने धागा लेखा पेक्षा तिसराच विषय चर्चेस घेऊन स्वतःच विषयांतर करू इच्छित आहात. ?
हे वाचा.....
In reply to योग्य माणूस भेटला by दासबोध.कॊम
हे वाचा
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग )
https://www.misalpav.com/node
In reply to हे वाचा..... by पंतश्री
https://www.misalpav.com/node/17500
या वृत्ता नुसार सवाई गंधर्व
या वृत्ता नुसार सवाई गंधर्व मुळे ट्रॅफीक इश्यूज आहेतआ, आजू बाजूच्या परिसरात ध्वनी प्रदूषण होते, आणि शालेय अभ्यास आणि खेळ तासांचे नुकसान होते असे काही आक्षेप नोंदवले गेलेले दिसतात.
वृत्त नीट अभ्यासले तर इतर प्रसंगांना ध्वनीक्षेपकांना रात्री १० पलिकडे वेळ वाढवून मिळत नाही पण सवाईला रात्री १२ पर्यंत वेळ वाढवून मिळते . हे खरे दुखण आहे. प्रसंगी आवाजाच्य भिंतींना मोकळीक दिल्यास हा वाद त्यांच्या कडून घातला जाण्याची शक्यता कमी वाटते आहे, सर्वसामान्यांनी आवाज केला तर ध्वनी प्रदुषण आणि संगित कर्यक्रमात केले तर होत नाही हा त्यांच्या मते दुटप्पी पणा आहे.
ह्या आक्षेपांवर चर्चा करण्यास हरकत नाही. पण आक्षेप नोंदवताना एका ठिकाणी मात्र त्यांची गल्लत होत असावी ती म्हणजे ऑर्गनायझर्स आणि उपस्थितांवराचा राग ते कलाकारांवर सुद्धा काढू इच्छित दिसताहेत हे तर्सुसंसंगत वाटत नाही. आवाजाच्या भिंती बद्दल आवाजाच्या भिंती ऑर्गनाईज करणार्यांवर कारवाई करावी आवाजाच्या भिंतीउपलभ्ब्ध करणार्यांवर कारवाईचे मागणी ठिक पण त्याच्यावर ज्याचे गाणे अथवा म्युझीक वाजते त्या गायक वादकावर राग काढण्यात पॉईंट आहे का ?
बाकी आक्षेप नोंदवण्यास हरकत नाही पण सर्व सामाजिक आणि राजकीय कामे एकाच संघटनेच्या नावावर करणे त्या संघण्टनेस नक्की नावा रूपाला आणते का की वेगवेगळी कामे वेगवेगळ्या संघटेनेच्या नावाने करणे श्रेयस्कर या बद्दल शंका वाटते.
ह्याची सत्यता काय?
धागाकर्त्याने भाषान्तर करून घातलेल्या इस्लामच्या संगीतविरोधी वचनांमध्ये खालीलहि आहे.
आता पहा - मूळ लेखन अरेबिक, तेहि बहुधा जुने आणि बहुसंख्यांना न समजणारे, त्याचे कोणीतरी इंग्रजीत भाषान्तर केले (कारण सोप्या अरेबिकमधलेहि भाषान्तर धागाकर्त्याला समजत नसावे असा माझा तर्क आहे) आणि त्या इंग्रजीचे धागाकर्त्याने मराठी करून आपल्यापुढे पुरावा म्हणून ठेवले आहे. त्यातहि (संगीत, गायन) आणि (संगीत, गायन, वादन करणारे) हे शब्द कंसात आहेत. ह्यावरून वाटते की ते शब्द मुळात नसून कोणा भाषान्तरकर्त्याने त्याला भासणारा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून ते वाढवले आहेत. माझ्याजवळ कुराणाचे एक इंग्लिश भाषान्तर आहे (मौ.वहिउद्दिन खान कृत) त्यातील कुराण ३१.६ चे भाषान्तर इतकेच आहे - "And among men there are some who spend their time in idle diversions only to lead people qway from the path of God, and, without knowledge, hold it up to ridicule; for such there is a humiliating punishment in store." त्याच पुस्तकातील १७.६४ चे भाषान्तर असे आहे: "Go ahead and entice whomsoever of them you can, with your voice, and mount assault against them with your cavalry and infantry and be their partner in wealth and offspring, and make promise to them - Satan promises nothing but delusion."
ह्या भाषान्तरामध्ये कोठेहि संगीत, नृत्य, वादन ह्यांचा उल्लेख नाही. हे खरे आहे की इस्लाम कट्टरतेने पाळणार्यांमध्ये अनेक जण कसल्याहि आनंद उत्पन्न करणार्या गोष्टींचा दुस्वास करतात पण हा दुस्वास कितपत कुराणातून येतो आणि कितपत त्यांनी लावलेल्या कुराणाच्या अर्थामधून येतो हे सांगणे अवघड असते. हिंदु, ख्रिश्चन वगैरे धर्मांमध्येहि असे कडकडीत वैराग्याचे समर्थक असतातच पण आपण ते धर्म अशा वैराग्य आलेल्यांच्या चष्म्यामधून पहात नाही. इस्लामलाहि तोच न्याय लावायला हवा.
साशंकता १
In reply to ह्याची सत्यता काय? by अरविंद कोल्हटकर
हिंदुंमधील वैराग्य व्यक्तिगत आहे ते इतरांच्या कलागुणांवर लादण्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यवस्था नाही . कलांमध्ये हरवून गेलेल्या व्यक्तीच्या वैराग्यावरही हिंदू धर्मात साशंकता फारशी नसते. तपस्व्याच्या तपस्या-भंगासाठी कलागुणांचा वापर डिस्टर्ब करण्यासाठी केला तर फारतर तपस्वी शाप देऊ शकतो पण वस्तुत क्रोधीत होणे आणि शाप देणे हेही तपस्व्याने संयम गमावणे ठरते म्हणजे कुणी तपस्या-भंगाचा उद्देश ठेवला तरी तपस्व्याने संयम ठेवणे अभिप्रेत असते अभिव्यक्तीला दडपणे अपेक्षीत नसते. त्यामुळे हिंदू धर्मातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तुलना ख्रिश्चन आणि इस्लाम मधील अभिव्यक्ती वरील बंधनांसोबत होऊ शकते का या बद्दल साशंकता वाटते.
इस्लामलाहि तोच न्याय लावायला
In reply to ह्याची सत्यता काय? by अरविंद कोल्हटकर
धागा लेखकाने सवाई गंधर्व महोत्सवाच्या बाहेर होणार्या ट्रॅफीक आणि ध्वनीक्षेपक बद्दलच्या चर्चेत इस्लाम कुठून ओढून आणला ते माहित नाही.
बाकी इंग्रजी विकिपीडिया Islamic_music#Permissibility_of_music तील संदर्भ बरोबर असतील तर बंधन टाकणारे अर्थ काढण्यास जागा असावी त्या शिवाय नैसर्गीक कलात्मक अभिव्यक्तीवर बंधने टाकणारी त्यांची समाज व्यवस्था सहज आकार घेऊ शकत नसावी.
; शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य किती नाकारता अथवा टाळता अथवा अर्थांचा खीस किती पाडता यावर बरेच काही अवलंबून असते पण संस्कृती म्हणून अमुर्त कलेचे काही मर्यादीत प्रकार सोडले तर संस्कृती म्हणून इस्लामिक संस्कृती आणि काही प्रमाणात ख्रिश्चन संस्कृतीने काही अपवाद सोडले तर बर्याच नैसर्गीक मानवी कला अभिव्यक्तींना बर्यापैकी काळ दूर ठेवणे भाग पाडले असावे असे वाटते. व्यक्तीगत अभिव्यक्ती स्वांतत्र्य जोपासण्यासाठी हिंदू संस्कृतीतही व्यक्तीला संघर्ष करावा लागू शकतो त्या पेक्षा कदाचित इस्लामी संस्कृतीत व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अधिक संघर्षाला सामोरे जावे लागते का ?
https://en.wikipedia.org/wiki
In reply to ह्याची सत्यता काय? by अरविंद कोल्हटकर
https://en.wikipedia.org/wiki/Violence_in_the_Quran
इस्लाममधे हिंसा नाही असं आम्ही क पार्टिकडून ऐकतो. मग ग पार्टी त्याच्या विपरित मत सांगते. वरचा विकिपिडीयावरचा लेख वाचलात तर लक्षात येईल कि प्रकरण दिसतं तितकं सरळ नाही. तुम्ही कुराणाला निर्दोष सोडायच्या मानसिकतेनेच बसले आहेत (कारण तुम्हाला सहिष्णू मुस्लिमांना काय वाटेल याची चिंता आहे.) म्हणून तुम्ही सोपा अर्थ लावत आहात.
उदा. कुराणाच्या काळात कंस नव्हते का? शब्द कंसात आहेत म्हणजे मूळ लेखनात नाहीत, अभिप्रेत नव्हते? हे कायय?
===============================
https://en.wikipedia.org/wiki/Islamic_music#Permissibility_of_music
अगदी विकिपेडिया पण म्हणतो कि प्रकरण तितकं सरळ नाही. मग धागालेखकाला अंध द्वेष्टा ठरवायची इतकी काय घाई?
=====================================
आता मी हे सिनेमात पाहिलेलं, पण प्रकरण अगदी हिंदूंत देखील इतकं सोज्वळ नाही. नवरंग चित्रपटात मी हिरोला "एके काळी संगीत केवळ धार्मिकच असायला हवे असा दंडक होता" असे म्हणतो असे आठवते. अगदी माझी निरिक्षणे देखील तशी आहेत, कि एका काळामागे साध्या माणसांवरची रचना कोणती याचं उत्तर "नाही " असं येतं.
ब्रिगेडच्या इस्लाम कनेक्शनचे
ब्रिगेडच्या इस्लाम कनेक्शनचे धागे-दोरे इथे दिल्याबद्धल धन्यवाद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
माझी हारून शेख ह्यांच्याशी पूर्ण सहमति आहे.
माझी हारून शेख ह्यांच्याशी पूर्ण सहमति आहे.
आणि ब्रिगेडशी?
In reply to माझी हारून शेख ह्यांच्याशी पूर्ण सहमति आहे. by सचिन
आणि ब्रिगेडशी?
इस्लामी विचारवंत झाकिर नाईक यांचे संगीताबद्दलचे मौलिक विचार ऐका
https://www.youtube.com/watch?v=CZXLOcQ-LYA
त्यांच्या निसटत्या बाजू
In reply to इस्लामी विचारवंत झाकिर नाईक यांचे संगीताबद्दलचे मौलिक विचार ऐका by हुप्प्या
एकमेव अबकड वाद्य चालत पण उर्वरीत ह,ळ, क्ष, ज्ञ वाद्ये स्वर्ग प्राप्तीसाठी चालत नाहीत हे श्रद्धेच्या नावावर खपवता येऊ शकते पण तर्कांवर बसवणे कठीण जाते मग संगिताचा व्यासंग किंवा हव्यासाची तुलना दारूच्या व्यसनाशी करणे हा दिशाभूल करणारा मार्ग पत्करला जातो. जर संगिताचा हव्यास , व्यासंग आणि छंद असणे पाप असेल तर हाच नियम इतर अनेक ह्व्यास/ व्यासंग/ छंदांना लावता येतो तेवढे करुन माणसातली बहुतेक कलात्मक प्रेरणा मारल्या नंतर माणूस केवळ वस्तुंचे उत्पादन करण्या सोबत प्रजोत्पादन करणारे यंत्र म्हणून शिल्लक रहातो. असो.
हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू
हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू व समर्पक प्रतिक्रिया देऊन,
इथे एकप्रकारे,
विखार पसरवू पाहणाऱ्या एकाच्या, सणसणीत कानाखाली चपराक दिलीये...
आता एकतर ते किंवा त्यांच्या सारखे विषयाला फाटे फोडून, गिरे तो भी टांग उपर, या थाटात प्रतिक्रिया देतील, किंवा १ -२ दिवस गप बसतील, नंतर हळूच परत कुजबूजी पिल्लू सोडतील...
त्यांचे चॉईस ऑफ वर्ड पहा....
उदा.
इथे पण शब्द माझ्या सारख्या माणसाला खुपतो, मनुवादी लोकांना हा 'पण' खुपणार नाही....
इथे तुम्हाला मनुवादी शुद्ध/अशुद्ध वंश/डीएनए मेंटयालिटी दिसते...
यातुन त्यांचे संगीतातील रागाचे नव्हे , तर विखारी 'नथु दे राम'
या रागाचेच त्यांनी किळसवाणे प्रदर्शन घडवले आहे...
धर्म आणि संस्कृती यांची गल्लत हा एक उपमुद्दा
In reply to हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू by पगला गजोधर
या समज गैरसमजां मागच्या मुद्यात धर्म आणि संस्कृती यांची गल्लत हा ही एक सहज लक्षात न येणारा मुद्दा असावा जसे वर 'कुंकू लावणे' याचा उल्लेख आला आहे. कुंकू लावणे, रांगोळी काढणे इत्यादी शब्द रहीत भारतीय शास्त्रीय गायन या सांस्कृतीक बाबी आहेत कुंकू लावण्या बद्दल हिंदूंमध्ये आणि न लावण्या बद्दल इस्लाम मध्ये धार्मीक आधार मिळण्याची शक्यता कमी असावी . तिच गोष्ट अमुर्त रांगोळी अथवा शब्द आणि वाद्य नसलेले शास्त्रीय गायन यांना विरोध करण्यासारखे इस्लाम मध्ये काही नसावे. योगासनाती विशीष्ट उचारणे काढून टाकली केवळ खेळ म्हणून पाहीले तर योगासनात अ-इस्लामिक फारसे नसावे तरीही गैरसमज चालत रहातात. त्याच वेळी मेंदी, बांगड्या अशा सांस्कृतीक गोष्टी धार्मिक हस्तक्षेपा शिवाय शेअर पण होताना दिसतात.
योगासनाती विशीष्ट उचारणे
In reply to धर्म आणि संस्कृती यांची गल्लत हा एक उपमुद्दा by माहितगार
धाग्याशी विषयांतर, तरीही सहमत...
मी मॅरेथॉन झाल्यावर सर्वांग सुंदर स्ट्रेचिंग करतो, जर कोणी अट्टहासाने त्यास योगासन म्हणत असेल तर त्याचाही निषेध व्हावा....
कैच्या कै! स्ट्रेचिंगला
In reply to योगासनाती विशीष्ट उचारणे by पगला गजोधर
कैच्या कै! स्ट्रेचिंगला योगासने कोणी का म्हणेल? जर तुम्ही एखाद्या योगासनाशी साधर्म्य दाखवणाऱ्या स्टेप्स करत असाल तर त्याला योगासनंच म्हणायला हवं! आणि तसेही समजा एखाद्याने म्हणले योगासनं तर लगेच त्याचा निषेध वगैरे कशाला करायला हवा? अशावेळी ते भाषांस्वातंत्र्य, सहिष्णुता वगैरे कुठे जाते काय माहित!
योगासनं
In reply to धर्म आणि संस्कृती यांची गल्लत हा एक उपमुद्दा by माहितगार
योगासनंही इस्लामला अमान्य आहेत असं अनेकदा ऐकण्यात येत, त्यावरुन आठवलं काही काळापुर्वी हमसफर नावाची एक पाकिस्तानी मालिका बघत होतो (झी जिंदगी वाहिनीवर) त्यामध्ये एक स्त्रीपात्र (अर्थातच मुस्लिम) योगासनं करताना दाखवली आहे असे मला आठवते. मला योगासनं येत नाहीत म्हणून मी १००% खात्रीने सांगत नाही. पण मला ते योगासनच वाटले. कुणी ती मालिका पाहिली असल्यास सांगू शकेल काय ?
धर्म आणि संस्कृती यांची गल्लत करण्याचे उत्तम उदाहरण आहे
In reply to योगासनं by मराठी कथालेखक
बरेच ख्रिश्चन आणि इस्लामीक धर्ममार्तंड -कदाचित सोबत उच्चारल्या जाणार्या ओम ध्वनी मुळ सुर्य नमस्काराच्या बाबतीत सुर्याला इश्वर मानल्यामुळे , स्त्रीयांच्या बाबतीत पब्लिक प्लेस मध्ये केल्यामुळे - अमान्य म्हणत असावेत, पण लॉजीक पेंड खातय हे लक्षात घेत नसावेत . कुणी उभ्याने कुणी पळताना कुणी चालताना कुणी झोपताना, कुणी नहाताना ओम किंवा अजून काही इतर धर्मीय शब्दोच्चार करत असेल तर तुम्ही उभे रहाणे, झोपणे, चालणे, पळणे , नहाणे सोडाल की टाळावे वाटणारे उच्चार टाळून तेवढी अॅक्टीव्हिटी करणार ? बेसिकली धर्म आणि संस्कृती यांची गल्लत करण्याचे उत्तम उदाहरण आहे.
बाकी सौदीने या नव्हेंबर पासून योगाला खेळ म्हणून मान्यता दिल्याची बातमी आहे. इराण या दुसर्या कट्टर देशात आधी पासून मान्यता आहे. केवळ पाकीस्तान आणि अजून एखाद दुसरा देश शिल्लक रहात असावे.
हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू
In reply to हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू by पगला गजोधर
हारुनजींनी "लेखकाने दिलेले" कुराणाचे संदर्भ कसे चूक/अपुरे आहेत नि सामान्य भारतीय मुस्लिम कसा संगितप्रेमी आहे हे सांगीतले आहे.
=====================================
बाकी उरलेल्या विषयात लेखकाचीच चपराक खणखणीत आहे.
=================================================
तो हिंदुस्थानी शब्द शास्त्रीय संगीतातला आहे का पासपोर्टवरचा आहे हे एकदा विचारून पहा.
====================
भारतीय पद्धतीने लग्न करणारे फॉरेनर, दिवाळी साजरी करणारे अहिंदू अधिकारी, अर्थातच विशेष जवळचे वाटतात.
---------------
या कुंकू लावतात हे लेखकाला आवडतं हे तुम्हाला किळसव्वाणं वाटतं हे बघून मला तुमची कीव येते. माझी किव बघून पुढे तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटेल, गेस करतोय.
============================
वंशशुद्धी अर्थहिन आहे हे एक (अर्धवट) शास्त्रीय, पुरोगामी मत असू शकतं. अस्सल मराठा ही संकल्पना महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत आहे. लोकांनी स्वतःला अस्सल मराठा मानण्यात काही गैर नाही.
--------------
बाटगे शब्द टाळता आला असता. धर्मांतर आपल्या देशात, धर्मात मान्य आहे.
हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू
In reply to हारून शेख यांनी अतिशय अभ्यासू by पगला गजोधर
हारुनजींनी "लेखकाने दिलेले" कुराणाचे संदर्भ कसे चूक/अपुरे आहेत नि सामान्य भारतीय मुस्लिम कसा संगितप्रेमी आहे हे सांगीतले आहे.
=====================================
बाकी उरलेल्या विषयात लेखकाचीच चपराक खणखणीत आहे.
=================================================
तो हिंदुस्थानी शब्द शास्त्रीय संगीतातला आहे का पासपोर्टवरचा आहे हे एकदा विचारून पहा.
====================
भारतीय पद्धतीने लग्न करणारे फॉरेनर, दिवाळी साजरी करणारे अहिंदू अधिकारी, अर्थातच विशेष जवळचे वाटतात.
---------------
या कुंकू लावतात हे लेखकाला आवडतं हे तुम्हाला किळसव्वाणं वाटतं हे बघून मला तुमची कीव येते. माझी किव बघून पुढे तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटेल, गेस करतोय.
============================
वंशशुद्धी अर्थहिन आहे हे एक (अर्धवट) शास्त्रीय, पुरोगामी मत असू शकतं. अस्सल मराठा ही संकल्पना महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत आहे. लोकांनी स्वतःला अस्सल मराठा मानण्यात काही गैर नाही.
--------------
बाटगे शब्द टाळता आला असता. धर्मांतर आपल्या देशात, धर्मात मान्य आहे.
धर्मग्रंथातील ज्या गोष्टी
धर्मग्रंथातील ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत तसेच निरोपयोगी ठरल्या आहेत त्या आचरणार आणू नये. मग त्या कोणत्याही धर्मातील असोत. लोकही अशा गोष्टी बाजूला टाकतात.
मिपाची पातळी खालावणारा लेख
ह्या लेखात सरळ सरळ उचलेगिरी आहे आणि उगीच्च केलेली भंकस आहे .
असल्या सडक्या मेंदूंनाच हाकलले पाहिजे.
बाकी त्या वडा चटणी महोत्सवाबद्दल : तुम्ही त्याला जातीय आणि धार्मिक रंग देत आहात . जे ब्रिगेड करत आहे तेच तुम्ही करताय कहीही फरक नही
अभ्यासपूर्णतेची कमतरता ,
In reply to मिपाची पातळी खालावणारा लेख by कपिलमुनी
अभ्यासपूर्णतेची कमतरता , तर्कसुसंगततेचा अभाव आणि मुख्य विषयावरून भरकटणे या लेखाच्या मांडणीतील उणिवा सर्वसाधारणपणे बहुतेक प्रतिसादातून मान्य झाल्या आहेत. वस्तुतः अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उणिवा मानवाची सर्वसाधारण बाब असावी नाही तर आता झालेली प्रगती काही हजार वर्षांपूर्वीच मानवाला साधता आली असती. मिपावर असे बरेच लेख येत असतात, आणि केवळ लेखांमुळे नव्हे तर सोबत झालेल्या उलट सुलट चर्चेने मिपाची उंची वाढत असावी असे वाटते.
एखादा अभ्यासपूर्णतेची कमतरता , तर्कसुसंगततेचा अभाव असलेला विचार खंडनाची पुरेशी संधी न मिळू न शकणार्या इतर सोशल मिडीयातून पडद्या मागून चर्चेत रहाण्या पेक्षा मिपा माबो सारख्या संवादी संकेतस्थळांवर उलट सुलट चर्चेतून बाहेर पडणे हे अधिक सयूक्तीक ठरत असावे किंवा कसे.
एखादा अभ्यासपूर्णतेची कमतरता , तर्कसुसंगततेचा अभाव नकारात्मक संकुचित दृष्टीकोण या मुळे फारतर एखादा विचार सडका असू शकतो, मेंदूंना सडके म्हणणे आपणही पुन्हा त्याच तराजूत जाण्यासारखे ठरते किंवा कसे
इस्लामचे सलाफी रुप
इस्लाम हा आक्रमक धर्म अनेक देशात पसरला. शेकडो वर्षे त्या देशात राहिल्यामुळे तिथल्या संस्कृतीशी काही प्रमाणात एकरुप झाला. अफ्रिकेतील चालीरिती अफ्रिकेचे मुसलमान पाळतात, भारतातील दर्गे मझार हे देवळांप्रमाणेच असतात. यात्रेकरु येतात, उत्सव होतात. हार, फुले, ऊद वाहतात, चादर चढवतात. कव्वाल लोक भजनासारख्या कव्वाल्या गातात. इंडोनेशिया, मलेशिया ह्या देशात रामायण, महाभारत ह्यावर आधारित नाटके होतात आणि मुस्लिम नि:संकोच त्यात सहभागी होतात.
भारतीय संगीताची मोठी परंपरा आहे आणि त्यात मुस्लिम कलाकारांचा मोठा वाटा आहे.
परंतु गेल्या ३०-४० वर्षात सौदी अरेबियाच्या कृपेने, इस्लामवर ही जी धूळ साठली आहे ती हटवून मूळ इस्लाम पुन्हा जागा करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
ह्याला सलाफी वा वहाबी म्हटले जाते. कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा वर्ज्य आहे हे लोकांच्या मनावर ठसवले जात आहे. संगीत (एक डफ वाजवणे सोडून) सगळे हराम आहे, स्त्रीने बुरख्यात असणे आवश्यक आहे अशा प्रकारचे विचार लोकांमधे पसरवले जात आहेत. झाकीर नाईक सारखी उदाहरणे दिसतात. प्रचंड पैसा ह्यामागे आहे. आणि मूळ इस्लामचे पुनरुत्थान असे नाव असल्यामुळे कुठला धार्मिक मुसलमान त्याला सहजासहजी विरोध करत नाही. त्यामुळे कडवा इस्लाम जास्त फोफावतो आहे. संगीतविरोधी विचार हे ह्या अशा कडव्या इस्लामची देणगी आहे.
आता ब्रिगेडने कुठल्या प्रकारच्या मुस्लिम लोकांशी संधान बांधले आहे त्यावर त्यांचे भारतीय संगीताबद्दलचे विचार अवलंबून आहेत.
शंका वाटते
In reply to इस्लामचे सलाफी रुप by हुप्प्या
मतपेटीची राजकीय गणिते आप आपल्या जागू असू शकतत, पण येथे चर्चित ब्रिगेडला शहाजी राजे, छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज आदर्श पुरुष आहेत तो पर्यंत यांना संधान साधायचे असले तरी त्यांच्यातील कट्टरांना ते कितपत शक्य होईल ह्या बद्दल शंका शिल्लक रहाते, तिन्ही राजे बाकी संगित माहित नाही पण काव्य आणि पोवाड्याचे भोक्ते असवेत, शिव धर्मा बद्दल आदर असावा आणि संगित वाद्यांच्या बाबतीत तुतारी सारखे वाद्य वापरात असावे . बुक गंगा डॉट कॉमवर दिसत असलेला प्रभाकर ताकवले सरांनी केलेला बुधभूषण ग्रंथाच्या अनुवाद बरोबर असेल तर १५ क्रमांकाच्या टिपेत छ. संभाजी महाराजांनी ६४ कला अवगत किमान रस तरी असावा आणि 'तिकडच्या' कट्टरांना ६४ मधील किती कला आणि बुधभूषण किती चालेल आणि किती नाही या बद्दल प्रथम दर्शनी शंका वाटते.
ह्यांनी तुर्त तुतारी वाजवण्यास सांस्कृतीक दहशतवादात मोजले नाही म्हणजे मिळवले.
* बुकगंगा डॉट कॉमवर बुधभूषण
In reply to शंका वाटते by माहितगार
* बुकगंगा डॉट कॉमवर बुधभूषण
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4669336226339679028
भरकटलेला लेख
हा लेख अगदीच भरकटलेला आहे. Title काय आणी लिहिले आहे काय.
त्यापेक्षा maayboli वर प्रसिद्ध झालेला हा लेख संतुलित आहे. सगळ्या गोष्टी नीट मांडलेल्या आहेत. अर्थात लेखाबद्दल मतभेत असू शकतात. पण मुद्दा प्रभावीपणे दिलेला आहे.
https://www.maayboli.com/node/64804
अवघड आहे.
चर्च प्रस्ताव वाचून थांबलो असतो तर पवित्र कुराणानुसार संगीत हे महापापच समजलो असतो. हारुन शेख उत्तम प्रतिसादाबद्दल अभिनंदन आणि आभार...!!
-दिलीप बिरुटे
हारुन शेखांची प्रमाणपत्रे
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हारुन शेखांची प्रमाणपत्रे सर्वत्र चालत नसावीत ते असो, आणि खासकरून यनावाला समितीत दाखल झाल्या नंतर आपली महापापातून सुटका अशीही होत नाही आणि तशीही होत नाही :))
पापधूण्यासाठी आपल्या कडे पंचगव्य आणि गंगास्नानाची सोय आहे तिकडे ती पण नाही :(
अन्यत्र अश्रद्ध यनावालांची
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अन्यत्र अश्रद्ध यनावालांची फॅन असलेली मंडळी अचानक कुराणास पवित्र मानू लागतात तेव्हा त्यात सर्व काही समजून यावं. उदा. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे.
नास्तिक्यांनी आस्तीक्यातील
In reply to अन्यत्र अश्रद्ध यनावालांची by arunjoshi123
नास्तिक्यांनी आस्तीक्यातील काही गोष्टींचे पावित्र्य स्विकारूच नये असे काही नसावे.
* बेसिकली आदर व्यक्त करण्याची
In reply to अन्यत्र अश्रद्ध यनावालांची by arunjoshi123
* बेसिकली आदर व्यक्त करण्याची आणि भावना जपण्याची पद्धत आहे.
वकिली खीस
In reply to अन्यत्र अश्रद्ध यनावालांची by arunjoshi123
वाक्याचे व्याकरण वकिली बाण्याने बघयचे तर समोरच्यांना पवित्र एवढा मर्यादीत अर्थ ही असू शकतो . सरांना पवित्र आहे की नाही या विषयी त्यांचा वेगळी भूमिका ठेवण्याचा आधिकार शिल्लक रहातो नाही का ?
(सर आम्ही वकिली केली बर का ! फिस मध्ये काय मिळणार ? :)
>> चर्च प्रस्ताव वाचून थांबलो
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> चर्च प्रस्ताव वाचून थांबलो असतो तर
संगीत, हिंदू, मुस्लिम, मराठा, ब्राम्हण, ब्रिगेड इ. कमी होते त्यात तुम्ही चर्च ची भर घातलीत प्राडॉसर.
संभाजी ब्रिगेडच्या
संभाजी ब्रिगेडच्या तत्त्वज्ञानामधे "मराठे" प्लस "मुसलमान" हे मिळून स्वराज्याचे शत्रू असलेल्या "ब्राह्मणांना" धडा शिकवणार, नष्ट करणार इ इ प्रकार आहे बाबा. इस्लाम वा मुसलमान हे कधीही मराठी स्वराज्याचे शत्रू नव्हतेच नि तो दुष्ट (आणखी बरीच विशेषणे) ब्राह्मणांनी केलेला खोटा प्रचार आहे असं लख्ख लिहिलेलं मी ब्रिगेडच्या साईटवर वाचलं आहे.
जालावर नुसतं इस्लाम, कुराण आणि मुझिक इतकंच लिहिलं (मंजे फॉरबिडन इ नाही लिहिलं) तरी "इस्लाममधे संगीत हराम आहे का?" यावर अनंत उलट सुलट प्रश्नोत्तरे येतात. अगदी कुराणातच संगीत हराम असायला हवं असं नाही. https://www.voanews.com/a/music-quietly-comes-back-to-saudi-arabia/3701… या बातमीत गेली २५ वर्षे सौदीत धार्मिक कारणांनी संगीत बैठक झाली नाही असं लिहिलं आहे ते फुकट आहे का? इस्लाममधे मूर्ती हराम आहेत तर अनेक देवळांत मुस्लिमांनी तोडलेल्या मूर्त्या हॄद्य द्रवून जातात. अर्थात असं करायला मराठ्यांनी देखील मदत करायला हवी होती हा ब्रिगेडी स्टान्स नसला तरी मूलतः देवळं सगळी बामन असलेल्या पेशव्यांनीच लुटली आणि मुसलमानांनी त्यांना चिक्कार देणग्या दिल्या असं ते म्हणतात.
=====================
लेखात लेखकाने जो संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे त्यात अजिबातच काही चूक नाही. ब्रिगेडचा हा ओपन स्टान्स आहे. हे सवाई गंधर्व ब्राह्मण असावेत असा माझा गेस. तेवढं पुरतं ब्रिगेडच्या लोकांना. म्हणजे तस्संच आहे असं नाही, पण संभावना आहे. कारण ब्रिगेडी साइट वाचली तर बदनाम न केलेला ब्राह्मण कोणता असा प्रश्न पडतो. पण लेखकाने संदर्भ चूकिचे दिले आहेत तर कुराणाचे नि सर्व इस्लामीक साहित्यांचे मराठी वा इंग्रजी भाषांतर नक्की एक लिंक हवी. म्हणजे पुरता संदर्भ तपासता येईल.
(मुस्लिम + मराठा) विरुद्ध ब्राह्मण.
=============================
लेखकाला भारतीय जनसामान्यांच्या इस्लामवर टिका करायची होती हा ही एक जावईशोध वाटतो. त्याने कौतुकानं इतकी उदाहरणं दिली नसती. भारतीय मुसलमानांना संगीत हराम आहे असं कोणी निर्बुद्धही म्हणणार नाही. लोकसंख्येने १५% असून आकाशवाणीवर ५०% फर्माईश मुसलमानच करतात. चर्चा चालली आहे ती वहाबी, धर्मांध मुसलमानांच्या कारस्थानांची. https://www.quora.com/What-exactly-does-Ghazwa-e-Hind-mean-How-and-when… काही मुस्लिमांचे मते भारत जिंकणे हे धार्मिक इ आहे. असलं काही नाहीच असं समजणं पुरोगाम्यांना जमत, परवडत असेल; पण असं नाही हे असत्य आहे. टीका असते ती फक्त या लोकांसाठी असते. जे मुसलमान भारताळलेले आहेत त्यांना नावं ठेवायला डोकं फिरलं आहे का? भारतात (मोदींचे आवडते?) पारशी, जैन, बौद्ध, ज्यू, नागा, मिझो, इ इ किमान १००-२०० धर्मांचे लोक असावेत. त्यात हिंदूंना विखार फक्त मुसलमानांच्याच विरोधात का आहे? हा शुद्ध वेगळा धर्म असल्याचा आकस असता तर गडचिरोली, नागा नि अरुणाचल चे आदिवासी लोक मुसलमानांपेक्षा फार वेगळे आहेत संस्कृतीने हिंदूना!!! हा विखार नसल्याचं कारण धर्माधारित देशविरोधी किंवा हिंदूविरोधी भावना त्यांच्यात नाही.
===============================
सबब, एखाद्या गोष्टीत कट्टर इस्लामी लोकांचा हात असू शकतो असं कोणी म्हणालं तर पुरोगामी काठ्या घेऊन त्याला बडवायला सुटु नये. तुमचा संबंध नाही तर मधे स्वतःला घालू नये. आणि दर वेळेस इस्लामवर टिका करताना ते निर्दोष मुसलमानांचं सवतं सांत्वन/वर्णन्/डिस्क्लेमर करायची गरज असू नये. असंबंधित निरपरांधाना काही होऊ नये हे अतिरेक्यांचं सोडलं तर बाकी जगळ्या जगाचं तत्त्व आहे. ते दरवेळी उगाळायची गरज नाही.
सवाई गंधर्वांचे - त्यांच्या
In reply to संभाजी ब्रिगेडच्या by arunjoshi123
सवाई गंधर्वांचे - त्यांच्या जाती बद्दल कल्पना नाही- एक गुरू आणि किमान एक शिष्य मुस्लिम होते, त्यामुळे जात-धर्म आणि राजकारण याची गल्लत करण्यासाठी त्यांचे नाव किती वापरता येईल या बद्दल शंका आहे.
नाव ब्रिगेडचे आले असले तरी त्यांचे आक्षेप प्रथम दर्शनी तरी ट्रॅफिक समस्या आणि ध्वनी प्रदुषण असे मर्यादीत दिसतात. त्यामुळे धागा लेखक धर्माचा विषय ओढून ताणून आणत असल्याचे येथिल बहुतेक प्रतिसादकांचे मत झालेले दिसते.
भारतरत्न
In reply to सवाई गंधर्वांचे - त्यांच्या by माहितगार
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ब्राह्मण आहेत ना, त्यांनीच हा महोत्सव सुरू केलेला आहे.
नशीब एक तरी माणूस असे बोलणारा
In reply to संभाजी ब्रिगेडच्या by arunjoshi123
नशीब एक तरी माणूस असे बोलणारा सापडला.
हारून शेख यांनी हा विषय स्वतःवर का ओढवून घेतला कळले नाही. संभाजी ब्रिगेडला बाहेरून मदत मिळते आणि त्याच्या आधारावरच ते असला मूर्ख प्रचार करताय असे मानण्यास हरकत नसावी.
त्याचबरोबर सवाईसारख्या कार्यक्रमांना हजेरी लावणारा बहुसंख्य वर्ग ब्राह्मण आहे असे माझे निरीक्षण आहे, त्यामुळे बिग्रेडच्या तत्वानुसार ते इथे अपशकुन करायला येत असतील असे सहज म्हणू शकतो.
मी मनुची मुळापासून वाचलेला नाही, पण इथे लिहिलेले खरे असेल तर भारतीय मुस्लिमांना देखील संगीताचे वावडे होते असे म्हणावे लागेल, कारण मनुची हा बऱ्यापैकी विश्वासार्ह स्रोत आहे. औरंगजेब हा स्वतःला इस्लामचा खरा पाईक समजत असे.
https://www.telegraph.co.uk/comment/letters/7873098/When-a-Muslim-emper…
तेव्हा लेख काही अगदी हवेत गोळीबार नाही, त्यात तथ्यांश नक्की आहे.
असो,
सवाईचे समालोचन असेल म्हणून हा धागा 4 दिवस उघडला नव्हता, आज उघडला तर काहीतरी वेगळेच.
...पण इथे लिहिलेले खरे असेल
In reply to नशीब एक तरी माणूस असे बोलणारा by आनन्दा
मला वाटते दुसर्या धर्मातून आपल्या धर्मात आकर्षीत करून घेणारी मंडळी सहसा उदममतवादी असतात किंवा लवचिक होतात, कट्टर लोकांशी सामना नंतरच्या काळात होऊ लागतो, आणि संधींसाठीच्या स्पर्धे मध्ये कोण अधिक कट्टर याची स्पर्धा रंगू लागते त्यामुळे परस्पर विरोधी पुरावे समोर येताना दिसत असावेत.
धागा लेखकाचा बहुधा कुराण मधला संदर्भ चुकला असावा, जे संगित-उदारमतवादी आहेत ते फक्त कुराणवर विश्वास ठेवत असावेत आणि हदीथ कडे दुर्लक्ष करत असावेत. ऑनलाईन वाचनातून मला जिथ पर्यंत कळले इश्वर अमुर्त आणि एकच आहे आणि इश्वराप्रती समर्पीत आहे आणि स्त्रीयांबाबतच्या निर्बंधांचे पालन होते अशा काव्य लेखनास प्रॉब्लेम नसावा -इतर काव्य लेखन करताना आपण किंवा इतर ज्यांना तुम्ही अर्थ सांगता आहात समजावता आहात त्यांच्या कडून या अटींचे केव्हा न कळत उल्लंघन होईल याची भिती / असुरक्षीतता दाटत असावी. - वाद्यांच्या बाबतीत मात्र डफलीस परवानगी असल्याचा दाखला आहे हा दाखला दोन विरुद्ध पद्धतीने वापरला जात असावा उदारमतवादी डफलीस परवानगी आहे म्हणजे इतर वाद्यांना परवानगी आहे असे दाखवू इच्छितात, तर कट्टरता वादी केवळ डफलीस मर्यादीत परवानगी आहे आणि इतर वाद्यांना परवानगी नाही असे समजत असावेत, कोल्हटकर म्हणतात तसे या शिवाय सुद्धा वेगवेगळे अर्थ लावले जातात. मी इथे वर्णिलेल्या नंतरच्या दोन भूमिकांना हारुन शेख यांनी थोडक्यात दुय्यम महत्व देऊन दुर्लक्ष केले / करावे असे त्यांचे मत असण्याची शक्यता दिसते.
कोणत्याही सर्व सामान्य समाजात अजून ट्रेंड दिसून सर्वसाधारण पणे नियम आणि संकेतांची अमंबबजावणी स्वैरपणे चालू असते, पण एखाद्या कट्टर धर्मगुरूचा प्रभाव पडला कि त्याच स्वैर व्यक्ती / समुह कट्टर भूमिका स्विकारू लागतात. तुम्ही गार्डीअन मधील जी
मनुची औरंगजेब संदर्भ दिलात त्याच्या आधीच्या संदर्भातील २०१० मधील ब्रिटन मधील मुस्लीम समाज मुलांना शाळेतील म्युझिक तासाला अनुपस्थित ठेवू लागल्याची बातमीचा हा संदर्भ आहे. अशी अचानक लाट येण्या मागे एखाद्या कट्टर व्यक्तीच्या नरेटीव्ह प्रभाव वाढू लागणे असू शकते.
जिथ पर्यंत औरंगजेबाचा संदर्भ आहे , सेक्युलर इतिहासकारांनी औरंगजेबाची बदनामी औरंगजेबाच्या विरोधकांकडून केली गेली असा व्हाईट वॉश मारण्याचे बरेच प्रयत्न केले आहेत. मी इतिहास तज्ञ नाही पण बेसिक जिथ पर्यंत समजले आणि माझा कयास झाला तो असाकी औरंगजेब दाराशुकोह्शी झालेल्या कुरघोडीच्या स्पर्धेतून अधिक कट्टर भूमिका घेत गेला त्यात त्याने राज्याचा प्रमूख धर्मगुरु नेमलेली व्यक्ती कट्टर होती त्याच्या कलाने औरंगजेबाने त्याचे व्यक्तिगत जिवन अधिक साचेबंद करून घेतले. त्या पुर्वी तो पखवाज वादना सोबत शास्त्रीय संगिताचा आनंद घेत असे, पण एका मुमेंट नंतर त्याने त्याच्या व्यक्तिगत जिवनातून बर्याच प्रकारचे संगित हद्दपार केले असावे. आणि दरबारातून संगित दूर ठेवण्यासाठी सक्तिपेक्षा आर्थिक किंमत मोजणे त्याने प्रिफर केले असावे. त्याचे काही सरदार नक्कीच अधिक फॅनॅटीक असावेत पण सर्वसाधारणपणे त्याच्या स्वतःच्या कुटूंबीयांनी आणि इतर सरदारांनी एकतर औरंगजेबाच्या नव्या संगितद्वेषाकडे दुर्लक्ष केले किंवा सरदारांच्या पदरी संगित चालू रहाण्याकडे औरंगजेबाने दुर्लक्ष केले किंवा औरंगजेबाकडे एकुण युद्ध परिस्थितींमुळे दुर्लक्ष करणे भाग पडले - किंवा तो दख्हन मध्ये अडकला आणि उत्तरेतला त्याचा प्रत्यक्ष प्रभाव कमी झाला -जे काही असेल औरंगजेबाने जो काही फतवा काढला असेल त्याच्या दरबाराच्या बाहेर त्या फतव्याचा प्रत्यक्ष प्रभावा एवजी मुघल काळातील शास्त्रीय संगितावरील सर्वाधीक लेखन औरंगजेबाच्या काळात झाले असे मानले जाते.
खूपच छान विवेचन केलेत. म्हणजे
In reply to ...पण इथे लिहिलेले खरे असेल by माहितगार
खूपच छान विवेचन केलेत. म्हणजे हे साधरण सगळे दारूबंदीसारखे झाले.. इस्लाम दारूविरोधी आहे, आणि माझ्या वाचनानुसार औरंगजेब देखील दारू पीत नसे, पण तरी दारू त्याच्या साम्राज्यातून तो हद्दपार करू शकलेला नाही.
किंबहुना बहुजन समाज ज्यातून आनंद मिळवतो अश्या गोष्टींवर बंदी घालून त्या हद्दपार करणे कोणत्याही सत्ताधीशाला जमणे कठीण आहे.
म्हणूनच बंदी घालण्याची
In reply to खूपच छान विवेचन केलेत. म्हणजे by आनन्दा
म्हणूनच बंदी घालण्याची मानसिकता ही औरंगजेबी /मनुवादी मानसिकता आहे..
उदा.. कॉन्डोमची जाहिरात रात्री ९ पर्यंत बंदी...
पॉर्न साईटवर बंदी....
साईबाबाची पूजा करण्यावर बंदी...
मत व्यक्त करण्यावर बंदी...
हे ठिक , चर्चा प्रस्तावाचे
In reply to म्हणूनच बंदी घालण्याची by पगला गजोधर
हे ठिक , चर्चा प्रस्तावाचे कारण मूळ मुद्दा वर्षातून एकदाच होत असलेल्या सवाई गंधर्व गायकीच्या कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकांवर बंदी घालावी नको घालायची तर किती वाजता यावर तुमचे आणि इतरांची मते काय आहेत ? दुसरे पार्कींग स्पेसच्या कमतरतेमुळे ट्रॅफीकवर ताण पडतोय म्हणतात तसेच व्हेन्यु असलेल्या शाळेतील वियार्थ्यांच्या पाठ्य आणि क्रिडा तासांचे नुकसान होते तर सद्य व्हेन्यू वर बंदी असावी किंवा कसे या वर आपली आणि इतरांची नेमकी मते काय आहेत ?
माझ्या वैयक्तिक मते, सवाई
In reply to हे ठिक , चर्चा प्रस्तावाचे by माहितगार
माझ्या वैयक्तिक मते, सवाई कार्यक्रम हा पुणे/कला यांच्या मानबिंदू तील एक रत्न आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व सर्व धर्म जात समाज लोकांना वापरून, पुण्यातील मोकळी मैदाने वैगरेच्या ऑप्टिमम वापर करून, योग्य नियोजन वैगरे करून तो नियमितपणे आयोजित करण्यातच यावा,
कोणी समाजविघातक शक्ती विखार पसरवत असतील त्यांचा निष्ठुरपणे समाचार घेण्यात यावा.
कोणी समाजविघातक शक्ती विखार
In reply to माझ्या वैयक्तिक मते, सवाई by पगला गजोधर
तुम्हाला धागालेखक म्हणायचं आहे कि ब्रिगेड?
==================================
ब्रिगेड देखील अभिप्रेत असेल तर - सहमत आहे.
अजो आणि आनन्दा
In reply to संभाजी ब्रिगेडच्या by arunjoshi123
अजो आणि आनन्दा
मी काही अंगावर ओढवून घेतलं नाही. संदर्भ चुकीचे होते ते दाखवले, त्या चुकीच्या संदर्भांवरून त्यावरून लेखातला इस्लामच्या एकूण टोकाचं संगीतविरोधी असण्याबद्दलचा निष्कर्ष खटकला तोही लक्ष्यात आणून दिला. ( कोल्हटकर सर आणि माहितगार यांनीही तो तसाच लक्ष्यात आणून दिला आहे त्याचा अर्थ त्यांनीही काही अंगावर ओढवून घेतलं असा होत नाही.) तुम्हाला मराठी कुरानाची लिंक हवी होती ती इथे आहे.
तुम्ही सौदीबद्दल उल्लेख केला आहे पण इथे विषय भारतीय मुसलमानांचा चाललेला. ( अवांतर : सौदीमध्ये तिथलं संगीत रूढ आहेच. अरबी संगीत नावाचा प्रकार अस्तित्वात आहे. तो तुम्ही गुगलला विचारू शकता. )
भारतीय मुसलमानांच्या संगीतप्रेमाबद्दल तुम्हालाही शंका नाही असेच एकूण तुमच्या प्रतिसादावरून दिसते पण मग शेवटी तुम्ही अगदी निःशंकपणे हिंदूंना मुसलमानांविषयी वाटणाऱ्या विखाराचं कारण मुसलमानांत असलेली धर्माधारित देशविरोधी किंवा हिंदूविरोधी भावना आहे असं मुसलमानांबद्दलचं सरसकटीकरण करून मोकळे होता यात तुमचं खरं मत काय मानायचं. ( मुसलमानांनासाठी तुम्ही सरसकट वापरलेला 'देशविरोधी' हा शब्द तर अतिशय अपमानास्पद आहे. तुमच्याकडून अपेक्षित नव्हता.)
तुम्हाला वरचा लेख विसंगत वाटत नाही. ठीकच आहे. मला वाटला. आपण असहमतीवर सहमत होऊया.
मुळात लेखकाने भारतीय
In reply to अजो आणि आनन्दा by हारुन शेख
मुळात लेखकाने भारतीय मुसलमानावर हा लेख लिहिला आहे हा निष्कर्ष आपण कशाच्या आधारावर काढलात? त्याने सरळ सरळ सौदीमधून पैसे येतात असे लिहिलेले आहे. यात भारतीय मुसलमान कुठे आले? आले असले तर केवळ कट्टर मुसलमान असा ओझरता उल्लेख त्यांनी केला आहे. त्यात कुठेही सरसकटीकरण नाही.
बाकी भारतीय मुसलमान संगीतद्वेष्टे नव्हतेच किंवा भारतात देखील संगीतद्वेष्टे पंथ नव्हते असे मानणे व्यर्थ आहे हे मी वरतीच लिंक दिलेली आहे त्यात दिसतेच.
बाकी अजोच्या सरसकटीपणाबद्दल बोलायचे असेल तर त्याला ओवायसी आणि झाकीर नाईक यांच्यासारख्या लोकांची भाषणे कारणीभूत आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त पुरोगाम्यांची एकांगी लेखणी कारणीभूत आहे. आत्ता याच लेखावर बघा, तो मुसलामांविरोधी आहे अशी नुसती शंका आल्यावर तो पूर्ण वाचायचे कष्ट ना घेता सगळे तुटून पडले. मुळात सौदीच्या आश्रयाने भारतातच नव्हे तर अन्य अनेक देशामध्ये होणार कत्तरतावादाचा प्रसार हा एक वेगळा चिंतेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्याचा एक अँगल या लेखाला आहे, पण ते कोणी समजून घेण्याचा विचारच करत नाही, त्यामुळे आमच्यासारखे लोक पुरोगामी आणि अश्या मुसलमानांपासून दूर होत जातात.. आत्ता देखील तुंही भारतीय मुसलमान संगीतप्रेमी, कुराणात असे लिहिलेच नाही असे ठासून सांगताय पण औरंगजेबाच्या संगीतप्रेमकडे(?) सोयीस्कर दुर्लक्ष्य करताय यात समजून जा.
अवांतर, तलत, रफी ची गाणी आणि दिलीपकुमार आदीचे चित्रपट मी देखील आवडीने बघतो, पण म्हणून भारतातले सगळे मुसलमान संगीतप्रेमीच आहेत असा निष्कर्ष मी तरी काढू शकत नाही
मति
In reply to अजो आणि आनन्दा by हारुन शेख
माझ्या प्रतिसादात मी सुस्पष्ट लिहिलं आहे कि
१. "धर्माधारित" हिंदूद्वेष, भारतद्वेष केवळ मुसलमानांत आहे. (वंशाधारित भारतद्वेष ईशान्य भारत नि काही प्रमाणात दक्षिण भारतात आहे.)
२. याचा अर्थ तो सर्व मुसलमानांत आहे असा होत नाही!!! तो फक्त काही मुसलमानांत आहे. तो फक्त काही मुसलमानांत आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे वा बाकिचे मुसलमान दुखावले जातील म्हणून दुर्लक्ष करणे हा विचित्रपणा असेल.
३. माझ्या पाहिलेल्या, ऐकिव नि मिडियात, माध्यमांत, सोशल मिडीयावर पाहिलेल्या भारतीय मुसलमानांत साधारणतः २-३% लोकांत हा द्वेष मी "खुला" पाहिला आहे. अगदी अहमहमिकेने देशप्रेम व्यक्त करणारे मुसलमान, चहुबाजूंनी इतकी टिका होत असतानाही, केवळ २०-३०% आहेत. बाकीच्यांना रस नाही. अशा नि पाकिस्तान बनल्याच्या पार्श्वभूमिवर बर्याच (४०-५०%) हिंदूंना भविष्यात मुस्लिमांचे वर्तन कसे असेल याबद्दल नेहमी शंका येत राहते असे पाहिलेले आहे. यात पाकिस्तान गेलेले मुस्लिम आणि भारतात राहिलेले मुस्लिम यांचे वर्गीकरण विशिष्ट भौगोलिक भागांतले मुसलमान असेच जास्त आहे आणि "हिंदूंसोबत राहू न शकणारे" आणि "प्रेमाने हिंदुंसोबत राहू इछ्छिणारे" असे नाही असेच अधिकतर हिंदूंना वाटते. जग बदलत आहे तसं हिंदू अधिक लिबरल होत आहेत नि मुस्लिम आपली कट्टरता राखून आहेत हि गोष्ट देखिल अनेक हिंदूंना असुरक्षिततेची वाटते असं माझं जनरल निरिक्षण आहे. लोक हे सगळं विसरू इच्छितात पण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा इस्लामिक टेररीझम हे विसरणे अवघड करतो.
४. सुशिक्षित मुसलमांनांत धार्मिक कट्टरता (निरुपद्रवी कट्टरता) ५०-६०% लोकांत आढळते. मंजे राम हा एक देव आहे हे मान्य आहे का म्हटलं कि शांत राहणे, उत्तर न देणे, किंवा हमारा नही तुम्हारा है म्हणणे किंवा देव तर एकच असतो असं म्हणणे वा काहीही खुस्पट काढणे पण त्या प्रश्नाचं उत्तर नि:संदिग्ध हो असं न देणे.
५. माझं असं व्यक्तिगत निरिक्षण आहे कि हिंदूंचा जो मुसलमान विरोधी विखार आहे तो थेट मुस्लिमविरोधी द्वेष या प्रकारात सहसा मोडत नाही. धार्मिक कारणांनी मुस्लिमांचा सरसरकट द्वेष करणारे हिंदू मी हजारात एक इतके देखील पाहिलेले नाहीत. जो द्वेष आहे तो मुस्लिमांच्या हिंदूद्वेषाचा द्वेष आहे. थेट धर्मद्वेष न के बराबर. मंजे एखादा मुसलमान हिंदाळलेला, भारताळलेला इ इ असेल तर याच मुस्लिम द्वेष्ट्या हिंदूंना तो अतिशय प्रिय असतो. उदा. डॉ. हेडगेवारांच्या साधारण वाक्यावर एखाद्या मुसलमानाने पॉझिटिव कमेंट दिला तर एरवी मुस्लिमविरोधी कमेंट टाकत असणारे लोक सोशल मिडियावर त्याला खूप जास्त लाईक देतात. जणू काही ते त्यांच्या बाजूने असणार्या मुसलमानाच्या शोधातच होते. त्यालाच खरा इस्लाम डिक्लेर करून टाकतात. याच्या उलट हिंदूद्वेष्ट्या मुस्लिम कँपमधे असं आढळत नाही. उदा. ओवैसींना मी २-३ वर्षे फॉलो केलं. मी (एका हिंदूने) केलेल्या काही गोष्टींचं कौतुक त्यांच्या फॅनांना काही भावलं नाही.
या विधानांना माझ्या व्यक्तिगत निरीक्षणांची मर्यादा आहे. आणि व्यक्त होणारांस ही काही सामाजिक संवादाच्या मर्यादा आहेत. पण असला काहीतरी प्रकार आहे खरा.
===============================
आणि मी तुम्हाला व्यक्तिशः "स्वतःवर ओढवून घेऊ नका" असं म्हटलेलं नाही. तुम्हाला म्हणायचं असतं तर तुम्हालाच उत्तर दिलं असतं. तरी तुम्ही या धाग्यावर येउन टिपिकल भारतीय मुसलमानाचं प्रतिनिधीत्व केलंत हि आनंदाची गोष्ट आहे. लेखकाला वा प्रतिसादकांना सरसकटीकरण अभिप्रेत नसलं तरी कुंपणावरचा वाचक स्वतः ते काम करू शकतो. म्हणून कोणीतरी चार गोष्टी सांगीतलेल्या बर्या. पण तुम्हाला तो किल्ला लढवायची वैगेरे काही गरज नाही कारण आपला देशच असा आहे कि त्यात एखाद्या स्वतःला कट्टर मानणार्या मुसलमानाला तो किती हिंदाळलेला आहे (मंजे हिंदूंसारखं वागतो, विचार करतो) सांगीतलं तर त्यालाही नवल वाटेल फिर संगीत किस चिडिया का नाम है?
==========================
आणि व्यक्तिगत रित्या तुम्ही आमच्यासारख्या संस्कृतीपासून दूर गेलेल्या नामधारी हिंदू ब्राह्मणांना देखिल नकळतपणे किती कॉप्लेक्स देता हे मी विसरलो असेन का? एकनाथांचं भारुड (नक्की हेच का हे पण मी विसरलोय) शाळेच्या / लहानपणीच्या काळातून उद्धृत करून त्यातल्या रचनेवर स्वतः मुसलमान असून गहन भाष्य करणार्या व्यक्तिला "स्वतःवर ओढवणे न ओढवणे" शिकवायला आमची काय मति मारी गई है क्या? काय राव, तुमी पन ना ...
तोहफा कबूल करो..
In reply to मति by arunjoshi123
तोहफा कबूल करो..
हारुन शेख याचे उत्तर द्या
https://m.maharashtratimes.com/india-news/muslim-women-can-go-gym-with-…२०
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधली ही बातमी आहे.
या बातमीनुसार देवबंदने असा फतवा काढलेला दिसतोय की मुस्लिम महिला व्यायामशाळेत व्यायाम करत असताना संगीत वाजवले जाऊ नये. हारुन शेख मला आता उत्तर द्या, की देवबंद देखील आपण पूर्वी एके कमेंटीत म्हणालात त्याप्रमाणे अहमदिया लोकांचीच संघटना आहे की सुंन्नी लोकांची संघटना आहे ? नक्की गौडबंगाल काय आहे ?आम्हाला पण कळू द्या की जरा !
आणि जर सुन्नी संघटना असून संगीताला ते विरोध करत असतील तर त्याला आधार कुठला ? आशा देवबंदचा उघड निषेध तुम्ही करणार का ? आपली एकंदर भाषाशैली पाहून मला आपण सुशिक्षित वाटलात .निदान सुशिक्षित लोकांनी तरी इस्लामचे चौदाशे वर्ष जुने जोखड झुगारण्याची हिंमत दाखवायला हवी, त्याशिवाय हे फालतू ते थांबणार नाहीत जिहादीयांचे
दुसरा धागा काढा न सर तुम्ही,
In reply to हारुन शेख याचे उत्तर द्या by दासबोध.कॊम
दुसरा धागा काढा न सर तुम्ही,
तुम्ही धागा सवाईवर काढलाय न ?
मग आता फाटे नका फोडू....
पगला तो पगलाच
In reply to दुसरा धागा काढा न सर तुम्ही, by पगला गजोधर
अहो पगला गजोधर ! विषय काय तुम्ही बोलताय काय ! लेखाचा विषय इस्लामचा संगीताला विरोध असा आहे .वर दिलेल्या दुव्यामध्ये देखील संगीताला विरोध करणारा फतवा देवबंद इस्लामने काढल्याबद्दल उल्लेख आहे .स्वतः ला सावरा . जंतुसंसर्ग फार आहे सध्या .