साऊंड डिझाईनिंग
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
क्षमायाचना: साऊंड डिझाईनिंग बद्दल माहिती मिळेल या आशेने जर धागा उघडला असेल तर आपली निराशा झाली असेल. हा लेख सदर विषयासंदर्भात अज्ञानमूलक असा आहे.
स्लम डॉग मिलिओनेरसाठी रसूल पुलकुट्टीला साऊंड डिझाईनिंगचे ऑस्कर मिळूपर्यंत सिनेमासंदर्भात अशी काही गोष्ट असते हे मलातरी ठाऊक नव्हते. कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, निर्माता, डान्स डायरेक्टर, पोस्टर लावणारे, मशीन ऑपरेटर, पडदे ओढून अंधार करणारे आणि उशिरा येणाऱ्यांना कुठे तरी अंधारात सोडून देणारे टॉर्च बेअरर एवढीच सिनेमा संदर्भात माझी माहिती. यात खालील घटनांनुसार माझ्या ज्ञानात भर पडत गेली:
- द्वारका दिवेचा यांनी शोलेची अफलातून अशी फोटोग्राफी केली तेंव्हा नुसते भिंगातून बघायचे आणि शूट करायचे यापेक्षा हा काही तरी वेगळा प्रकार आहे हे समजले.
- गांधी साठी भानू अथैय्या यांना ड्रेस डिझाईनिंगचे ऑस्कर मिळाले तेंव्हा कपडेपट हा काही तरी कौशल्याचा प्रकार आहे हे समजले.
- टायटॅनिक मधला समुद्राच्या तळाशी असलेली आणि गंजलेली बोट शोधणे आणि त्यातील जुनाट तिजोरी वर आणल्यानंतर साठून राहिलेले चिखलाचे पाणी बाहेर येणे आणि शेवाळ साठलेले चित्र बाहेर काढणे हा नेहमीच्या प्रॉडकशन डिझाईनिंगपेक्षा उच्च प्रकार आहे हे समजले.
प्रतिक्रिया
खरंच साऊंड डिझाईनिंग बद्दल
आजकालच्या हिंदी चित्रपटात