✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 06/07/2011 - 09:45  ·  लेख
लेख
१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे, २) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो. ३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे. तरीही असे लिहावेसे वाटते की, पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. अन्यथा पोलिस लहानमुलांना आणि बायकांना फटकावताहेत, हे चित्र कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर नक्कीच दिसले असते; कारण प्रत्येकच वाहिनी मध्यरात्रीची ती प्रत्यक्ष दृष्ये दाखवत होती. अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे.. तरीही पोलिस हरकत में आ गई आणि केवळ शक्तिप्रदर्शनाकरता जमवलेल्या ५०००० च्या त्या गर्दीला तेथून रातोरात हाकलले ते एका अर्थी बरेच झाले. त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते..! बाकी सांगायचे म्हणजे एकूणच रामबाबाच्या ह्या आंदोलनात त्याने **अत्यंत ढोबळ अन् बेफाट** मागण्यांच्या निमित्ताने केलेले राजकीय (?) शक्तिप्रदर्शनच अधिक होते. ** १) आत्ताच्या आत्ता परदेशात जा अन् तेथील बँकातील काळा पैसा घेऊन या..! - म्हणजे पोतीच्या पोती घेऊन परदेशात गेले आणि तेथील सारा काळा पैसा घेऊन पुढच्याच विमानाने भारतात परत आले इतके हे सोप्पे आहे का? **२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..! - अहो पण याला काही अन्य पर्याय..? **३) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत द्या.. - पण तुमच्याकडे तसा अभ्यासक्रम तयार आहे का? तसे शिक्षक आहेत का? तश्या काही ठोस योजना तयार आहेत का? वगैरे वगैरे.. ** योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे. त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला. त्यातच अण्णांच्या आंदोलनाला सार्‍या देशाने आणि आंतरजाल जगताने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे रातोरात ष्टार झालेले अण्णा, हे पाहून रामबाबाही अंमळ खुळावला असावा, किंबहुना त्याचा जळफळाटच अधिक झाला असावा. आणि त्यामुळेच अण्णांचे हे आंदोलन तो काहीही करून हायजॅक करू पाहू लागला. मिडियाचे आपल्याकडे लक्ष जाऊन आपण सतत प्रकाशाच्या झोतात कसे राहू हे तो पाहू लागला. अण्णांच्या आंदोलनाला/उपोषणाला जशी काही एक भक्कम वैचारीक बैठक आहे तशी काहीही बैठक रामबाबाची नाही. शिवाय अण्णांच्या मागे अरविंद केजरीवाल नामक एक चाणक्यही आहे जो अत्यंत हुशार मनुष्य आहे, काही एक चांगले करू पाहणारा आहे. अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का? रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? (तिला सारेजण 'साध्वी' ऋतंबरा असे संबोधतात. परंतु तिच्याबद्दल कुठलीही व्यक्तिगत माहिती मला नसताना मला व्यक्तिश: तिला 'साध्वी' असे संबोधणे उचित वाटत नाही. मनुष्यप्राणी हा जबर स्खलनशील आहे असा माझा ठाम विश्वास आहे. असो..!) :) दिल्लीहून हुसकून हरिद्वारला पाठवलेला रामबाबा तिथे गेल्यावर अजूनही काही वाट्टेल ते बरळतो आहे. म्हणे ५००० माणसे बेपत्ता आहेत, मला ठार मारण्याचा सरकारचा डाव होता वगैरे वगैरे.. अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात पुलं म्हणाले होते की सन्याशाची वस्त्र ही भयंकर असतात, ती सारे अंग भाजून काढतात. रामबाबा, तूर्तास तुझीही नेमकी तशीच अवस्था झाली आहे. लेका, तुझ्यासारख्या योग्यापेक्षा आठवड्याला एक-दोनदा क्वार्टर अन् मच्छीचं जेवण जेवणारे, सुंदर-आकर्षक आणि कमनीय बायकांकडे पाहून मनातल्या मनात पाघळणारे आमच्यासारखे भोगी बरे की रे..! :) तेव्हा रामबाबा, जागा हो. आजही तू एक मोठा योगाचार्य आहेस. तेव्हा तू आपला तुझी योग्यविद्याच आम्हा सार्‍या भारतीयांना शिकवून सोड कसा..! जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ;) काय बोल्तो..? :) तुझा, तात्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47970 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

कुंदनला बसवा रे उपोषणाला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/08/2011 - 11:28 नवीन
बाकी, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-याचे कुठे शिक्षण तपासू लागले राव. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधिक धारदार केला पाहिजे. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

कुणाच्याच

विकास
Wed, 06/08/2011 - 16:31 नवीन
तसेच मंत्री वगैरेंचे शिक्षण किती आहे याचीही उठाठेव करू नये असे वाटते*. मला माहीत आहे तुम्ही "वगैरे" हा शब्द घातला आहे :-)... तरी देखील, कुणाच्याच शिक्षणाची उठाठेव करू नये असे म्हणले तर जास्त योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

राहूल गांधी यांचे शिक्षण

अजातशत्रु
Wed, 06/08/2011 - 11:40 नवीन
सोनीया गांधी बद्दल माहिती नाहि, राहूल गांधी यांनी केंब्रीज विद्यापिठातून एम.फिल केले आहे, राहिला मुद्दा शिक्षणाचा तर कुणाच्याहि शिक्षणावरुन कुणाची योग्यता ठरत नसते* रामदेव बाबाचा आलेला शिक्षण विषयक उल्लेख हा त्या अल्पपरिचयाचा भाग होता , असे कृत्य जर अण्णा हजारें कडून घडले असते तर त्यांच्या अल्प परिचयातहि तो मुद्दा आलाच असता आणी दिलेली उपाधी त्यांनाहि मिळाली असती निदान आमच्या कडून तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

शक्य आहे

विकास
Wed, 06/08/2011 - 16:35 नवीन
रामदेव बाबाचा आलेला शिक्षण विषयक उल्लेख हा त्या अल्पपरिचयाचा भाग होता , शक्य आहे आणि मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाही अथवा आरोपही करू इच्छित नाही. मात्र त्यांच्याबद्दल शिक्षणावरून हेडलाईन देऊन अत्यंत सहजतेने जनतेच्या मनात भरवण्याचे उद्योग आधी माध्यमात पाहीले होते, ते लक्षात असल्याने हा मुद्दा स्पष्ट करणे गरजेचे वाटले... अवांतरः राहूल गांधी यांनी केंब्रीज विद्यापिठातून एम.फिल केले आहे, बरोबर. त्याआधी त्यांनी देखील (गेट्स प्रमाणे) हार्वर्ड सोडले होते. कारण होते ते सुरक्षा आणि ते फ्लोरीडात होते... तेथे त्यांचे शिक्षण हे सुरक्षेच्याकारणासाठी "राहुल विंचि" नावाने झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अगंबाबो!

धमाल मुलगा
Wed, 06/08/2011 - 17:25 नवीन
साहेब, तुम्ही ब्लॉग लिहिता का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

त्यात आर एस एस/भाजपवालेही होतेच

चिंतामणी
गुरुवार, 06/09/2011 - 00:33 नवीन
अंगाशी आता गाडी रूळावर आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

एक

तिमा
Tue, 06/07/2011 - 20:51 नवीन
एक बाबासाठी मिपावरची किती डोकी खपली! लई भारी!!!
  • Log in or register to post comments

अनेक भोंदू लोक पदोपदी समाजात

आदिजोशी
Tue, 06/07/2011 - 21:21 नवीन
अनेक भोंदू लोक पदोपदी समाजात आपल्याला दिसतात. लोकांना खुल्लमखुल्ला गंडवतात. आपण त्यांचे काय करतो? रामदेवबाबांमुळे अथवा कोणामुळेही सरकारवर भ्रष्टाचाराबाबत दबाव येणार असेल तर हरकत काय आहे? रामदेवबाबांवर टिका करणार्‍यांपैकी कुणी तिथे असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जे आपल्याला दाखवण्यात आलं त्यावरून किती बोलायचं हा सुद्धा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments

तात्याच्या आयुष्यातला पहीला बिनडोक लेख...

खादाड_बोका
Tue, 06/07/2011 - 22:09 नवीन
तात्याच्या आयुष्यातला पहीला बिनडोक लेख वाचु आता पटले की भारताचे काहीच होवु शकत नाही. रामदेव बाबाच्या बद्दल टीक करणार्या लोकां करीता............स्वत: काही करनार नाही...आणी दुसरा काही करत असेल तर त्याच्या *डीत बोट टाकतील.
  • Log in or register to post comments

साला बाकी काय आसो नासो पण

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/08/2011 - 11:19 नवीन
साला बाकी काय आसो नासो पण आमच्या तात्यानी चार ओ़ळी खरडल्या रे खरडल्या की अनेक पिशाच्चे थडग्यातुन बाहेर येतात आणि प्रतिक्रिया देउन जातात ;)
  • Log in or register to post comments

पर्‍या मेल्या, मला पिशाच्च

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/08/2011 - 22:57 नवीन
पर्‍या मेल्या, मला पिशाच्च म्हणतोस होय. दिली ना तुला ओवरी कर की निवांतपणे पुनर्लेखन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पुप्या मेल्या तु जिवंतच असतोस

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/09/2011 - 11:04 नवीन
Image removed. Image removed. पुप्या मेल्या तु जिवंतच असतोस रे. मी महिनोन महिने थडग्यात पडलेल्या आणि तात्याचा किंवा खास लोकांचा लेख आल्यावर जाग्या होणार्‍या पिशच्चांविषयी बोलत होतो. बाकी ते ओसरी दिली म्हणजे? च्यायला वाडा आमच्याच राजाचा पैशानी बांधलेला आणि आम्हालाच भिक दिल्यागत करतो होय रे ? थांब आता एक सशस्त्र ब्रिगेडच उभी करतो मी. बाबा परादेव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

अतिशय खेद्जनक लिखाण. -१०००

महेश_कुलकर्णी
Wed, 06/08/2011 - 11:20 नवीन
अतिशय खेद्जनक लिखाण. -१०००
  • Log in or register to post comments

अर्धशिक्षित आणि अशिक्षित

हुप्प्या
Wed, 06/08/2011 - 11:45 नवीन
शिक्षणाच्या बाबतीत अण्णा हजारे, लता मंगेशकर आणि कुण्या अडाणी गणंग मंत्र्याची तुलना करायचा अभद्रपणा करु नये. लता मंगेशकरांचे कर्तृत्व आकाशाएवढे आहे. त्याबद्दल काहिही लिहायची गरज नाही. अण्णा हजारेंचे राळेगणशिंदीतले काम लखलखीतपणे समोर उभे आहे. नि:स्वार्थीपणाने, जिद्दीने, नेटाने त्यांनी काम केले आहे हे उघड दिसते आहे. कुण्या गणंग मंत्र्याची योग्यता तो केवळ अण्णा वा दीदींप्रमाणे अर्धशिक्षित आहे म्हणून त्यांच्या बरोबरीची होत नाही. अजून काही मुद्दे शिक्षणमंत्र्याने अंगूठाछाप असून चालेल का? आजच्या काळात आधुनिक संगणकीकृत शस्त्रास्त्रे असतात. ती विकत घ्यायची सत्ता असणार्‍या संरक्षणमंत्र्याला अर्धशिक्षित असून कसे चालेल? तीच गोष्ट अर्थमंत्री वगैरेचीही. अन्य कर्तृत्व असेल शिक्षणाकडे दुर्लक्ष करता येईल पण तसे काही नसेल तर शिक्षणही विचारात घेतले पाहिजे.
  • Log in or register to post comments

सु'शिक्षित' असणे आणि

प्यारे१
Wed, 06/08/2011 - 12:26 नवीन
सु'शिक्षित' असणे आणि सु'संस्कृत' असणे यात फरक आहे आणि असावा असे वाटते. लादेन ला 'लादेनजी' म्हणणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण असू शकते असे नम्रपणे सुचवू इच्छितो. बाकी, 'अ जात' ( हे इंग्रजी आहे का?)शत्रूंच्या क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे ज्ञान संपादनाची सु'वर्ण' संधी हे पुन्हा एकदा नम्रपणे सुचवू इच्छितो. चालू द्या.
  • Log in or register to post comments

फरक कळतो हे ही नसे थोडके..

अजातशत्रु
Wed, 06/08/2011 - 16:44 नवीन
बाकी लादेन ला 'लादेनजी' म्हणल्यामुळे तो पुन्हा जिवंत तर होणार नाहिना.. या भितीने काहिंनी दिग्गी राजांना टार्गेट केले असावे.. बाकी हा माणूस खरेच जाम फाटक्या तोंडाचा आहे,आयमीन कोट्या करण्यात जाम हुशार आहे, बाबाचे आंदोलन चिरडल्यामुळे हर्षवायु झाल्यामुळे की दु:खाने? (साधारणपणे दु:खात माणुस नाचत नसावा) सुषमा स्वराज आणी पार्टि यांनी दिल्लीला राजघाटवर जिथे प.पु.बापुंची समाधी आहे तिथे बेफाम डॉन्स केला, तेव्हा श्री.दिग्विजयसिंग म्हणाले भारतिय जनता पार्टि नचनियोकी पार्टि कबसे बन गयी, म्हणजे भारतिय जनता पार्टि हि नाच्यांची पार्टि केव्हा पासून झाली.. या माणसाचा काहि नेम नाहि.. बाकि डॉन्स भारि होता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अहो

तिमा
Wed, 06/08/2011 - 18:29 नवीन
तो बाबा आता सशस्त्र ब्रिगेडच्या गोष्टी करतोय! तरी त्याला पाठिंबा देणार का ? कुठल्याही सशस्त्र क्रांतिला आपला विरोध आहे. जे काही करायचे ते गांधीबाबाच्या मार्गाने करा.
  • Log in or register to post comments

बाबांचे मानसिक

निल्या१
गुरुवार, 06/09/2011 - 02:03 नवीन
बाबांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सशस्त्र सेना उभी करणार म्हणे. अशा उथळ माणसांना पाठिंबा न देणेच हितकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बाबांचे मानसिक संतुलन बिघडले

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/09/2011 - 10:52 नवीन
बाबांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सहमत आहे. त्यांचे आदोलन धाकधपटशाने दडपल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडल्यासारखे वाटत आहे. सशस्त्र सेना उभी करणार म्हणे. कशाला अशा गोष्टी मूर्खासारख्या बोलायच्या? उगाच गरजेल तो बरसेल काय याची पुष्टी होते. काय ती सशस्त्र सेना गूपचूप उभी करायची. दडपशाहीचा प्रयत्न झालाच तर डिग्गी, सिब्बी, चिदू सारखे १-२ लोक द्यायचे उडवून चूपचाप. शेवटी हक्क हा झगडूनच मिळवायला लागतो तो भिक मागून मिळत नाही. अशा उथळ माणसांना पाठिंबा न देणेच हितकर. सहमत आहे मी पण. तरीही सध्या आमचा पाठींबा चालू राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निल्या१

+

नितिन थत्ते
गुरुवार, 06/09/2011 - 11:33 नवीन
>>उगाच गरजेल तो बरसेल काय याची पुष्टी होते. सहमत आहे. पूर्वी एकदा स्थापन झालेल्या लष्कर - ई- शिवबा ची उगाच आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मला वाटते

विकास
गुरुवार, 06/09/2011 - 04:30 नवीन
कुठल्याही सशस्त्र क्रांतिला आपला विरोध आहे. जे काही करायचे ते गांधीबाबाच्या मार्गाने करा. १००% सहमत. मला वाटते, रामदेवबाबा ९५% म्हणाले असतील असे वाटते आणि त्याला माझा विरोध आहे. उरलेले ५% मिडीया, यु नो! पण जर रामदेवबाबा १००% खरच असे म्हणाले असले तर आता ते अण्णा हजार्‍यांच्या ऐवजी अरुंधती रॉय यांच्याशी पब्लीसिटी स्पर्धा करत असावेत.
Either way, change will come. It could be bloody, or it could be beautiful. It depends on us. – Arundhati Roy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

तात्याकडून अशा लेखाची अपेक्षा

जगड्या
Wed, 06/08/2011 - 19:13 नवीन
तात्याकडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती. अतिशय खेद्जनक लिखाण. "+" आणि "-" ची सोय चालू असती तर नक्कीच -१००० दिले असते.
  • Log in or register to post comments

सर्कसचा खेळ चालू आहे सगळा.

प्राजु
Wed, 06/08/2011 - 22:48 नवीन
सर्कसचा खेळ चालू आहे सगळा. प्रत्येक जण दुसर्‍याच्या दोरीवर कसरत करता नाही आली की आपापली दोरी बांधून नविन कसरत सुरू करतो आहे.!!
  • Log in or register to post comments

५०० आणि १००० .....पण याला काही अन्य पर्याय..?

कुंदन
Wed, 06/08/2011 - 23:52 नवीन
>>>**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..! - अहो पण याला काही अन्य पर्याय..? तात्या , ओन लैन ट्रांस्फर विसरलास होय ? बरोबर आहे , विसरणारच तु.
  • Log in or register to post comments

गल्लत होतीय का?

सहज
गुरुवार, 06/09/2011 - 08:55 नवीन
कुंदनसेठ तुमची अफरातफर आणी भ्रष्टाचारात गल्लत होते आहे का? बॅकेत ट्रान्सफर पारदर्शक आहे त्यामुळे भ्रष्टाचारी नकोच म्हणेल पण अफरातफरीवाल्याला चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

रामदेव बाबा

वेताळ
गुरुवार, 06/09/2011 - 11:06 नवीन
हे संसारी संन्याशी आहेत का बालब्रम्हचारी संन्यासी? त्याना इतक्या मोठ्या मालमत्तेची गरजच काय? संन्यासी माणसाला कपड्याची तरी हाव का असावी? त्यासाठी बायाचे कपडे घालुन पळुन जाण्याची गरज नव्हती.
  • Log in or register to post comments

हे संसारी संन्याशी आहेत का

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/09/2011 - 12:13 नवीन
हे संसारी संन्याशी आहेत का बालब्रम्हचारी संन्यासी? त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात काय फरक पडणार आहे? त्याना इतक्या मोठ्या मालमत्तेची गरजच काय? कोणालाही मोठ्या मालमत्तेची काय गरज असते? तीच संन्याश्याला पण असते. गाडगेबाबांना गोरगरीबांसाठी धर्मशाळा स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पैशाचीच गरज पडली नुसत्या वैराग्यावर आणि झाडलोटीवर धर्मशाळा उभ्या राहील्या नाहीत. जर ही मालमत्ता वैध मार्गानं मिळवली असेल तर त्यात काय गैर आहे. संन्यासी माणसाला कपड्याची तरी हाव का असावी? सन्यासी असला तरी त्याने देहरक्षणापुरते कपडे घालावेच असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे संन्यासी हा शब्द गाळावा. संन्याश्याने कपडे घालू नयेत असे कुठेही सांगितलेले नाही. बादवे रामदेवबाबा या मनुष्यास आताच्या आंदोलनातले बायकांचे कपडे सोडले तर मी तरी कायम एक भगवी लुंगी आणि भगवे उपरणे या वेषातच पाहीले आहे. वेगवेगळे २ पीस ३ पीस सूट घालून फोटोसेशन करताना पाहीलेले नाही. असो. त्यासाठी बायाचे कपडे घालुन पळुन जाण्याची गरज नव्हती. हे तुम्ही कसे काय म्हणू शकता? जर त्यांना असे वाटत असेल की ते स्थानबद्ध झाले किंवा मारले गेले तर आंदोलन संपेल आणि आंदोलन चालू राहणे गरजेचे आहे तर त्यांनी स्वतःचे रक्षण केले असेल त्या उद्देशाने तर त्यात वावगे काय? का त्यांनी त्यांचे स्वबळावर उभे केलेले आंदोलन कसे चालवावे हे देखील इतरांनी ठरवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

बाबा कि जय हो

वेताळ
Fri, 06/10/2011 - 10:51 नवीन
१) पहिला मुद्दा ते संसारी संन्यासी असले कि परत त्याच्या पुढच्या पिढ्या आपल्या डोक्यावर मिरे वाटायला तयारच असतील.बालब्रम्हचारी म्हटले कि जरा समाधान मिळते कि ह्याला मिळवुन काय फायदा नाही.आता भारतात जेव्हढे बाबा,बुवा किंवा बापु आहेत त्याची लग्ने झालेली आहेत व त्याची मुले त्याच्या संस्था चालावायला तयार झाली आहेत. २)गाडगेबाबांच्या खेटराची सर रामदेव ला यायची नाही. गाडगेबाबा मिळालेला पैसा समाज कार्यासाठी वापरत असत.त्यानी त्याचा वापर वातानुकुलीत गाड्या,पंचतारांकित हाटीलात राहणे किंवा विमानातुन फिरणे ह्या करिता कधीच केला नाही.बाबा जनतेचा पैसा स्वःताच्या व्यवसाय वृध्दी करिता वापरत आहे. ३)सत्याग्रह आंदोलन करताना बाबाला सर्व गोष्टींची कल्पना असायला हवी होती. त्यात ते संन्यासी असल्यामुळे त्याना सर्व कामविकारांवर ताबा मिळवलेला असावा असे ग्रहित धरले तर त्यांना त्याच्या नग्नतेची लाज वाटली नसती.पण तुमच्या म्हणण्यानुसार स्त्रीवेष धारण करण्यापेक्षा ते लंगोटवर देखिल पळुन जावु शकले असते. पंरतु सत्याग्रहाचा मुलमंत्रच असा आहे कि कोणत्याही दडपशाहीला न घाबरता शांततेच्या मार्गाने त्याला विरोध करणे हेच ते विसरले व आपल्या अनुयायाना तिथेच टाकुन स्त्रीवेष करुन ते पळुन गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

१) पहिला मुद्दा ते संसारी

llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/10/2011 - 11:06 नवीन
१) पहिला मुद्दा ते संसारी संन्यासी असले कि परत त्याच्या पुढच्या पिढ्या आपल्या डोक्यावर मिरे वाटायला तयारच असतील.बालब्रम्हचारी म्हटले कि जरा समाधान मिळते कि ह्याला मिळवुन काय फायदा नाही.आता भारतात जेव्हढे बाबा,बुवा किंवा बापु आहेत त्याची लग्ने झालेली आहेत व त्याची मुले त्याच्या संस्था चालावायला तयार झाली आहेत. गांधीबाबांना, लोकमान्य, सावरकर या सर्वांना मुलेबाळे होती, त्यांनी ते चालवत असलेल्या संस्थांसाठी बर्‍यापैकी धनसंचय केला होता म्हणून ते या संशयास पात्र ठरतात का? २)गाडगेबाबांच्या खेटराची सर रामदेव ला यायची नाही. गाडगेबाबा मिळालेला पैसा समाज कार्यासाठी वापरत असत.त्यानी त्याचा वापर वातानुकुलीत गाड्या,पंचतारांकित हाटीलात राहणे किंवा विमानातुन फिरणे ह्या करिता कधीच केला नाही.बाबा जनतेचा पैसा स्वःताच्या व्यवसाय वृध्दी करिता वापरत आहे. जर त्यांची व्यवसायवृद्धी सन्मार्गाने होत असेल तर त्यात इतरांनी जळण्याचे कारण काय? बाबांनी त्यांची मालमत्ता ११०० कोटींची आहे हे जाहीर केलेले आहे आणि ती सगळी कायदेशीररीत्या वैध आहे असेही म्हटले आहे. मग त्यांनी मालमत्ता मिळवली आहे त्यात काही गैर वाटत नाही. ३)सत्याग्रह आंदोलन करताना बाबाला सर्व गोष्टींची कल्पना असायला हवी होती. त्यात ते संन्यासी असल्यामुळे त्याना सर्व कामविकारांवर ताबा मिळवलेला असावा असे ग्रहित धरले तर त्यांना त्याच्या नग्नतेची लाज वाटली नसती.पण तुमच्या म्हणण्यानुसार स्त्रीवेष धारण करण्यापेक्षा ते लंगोटवर देखिल पळुन जावु शकले असते. पंरतु सत्याग्रहाचा मुलमंत्रच असा आहे कि कोणत्याही दडपशाहीला न घाबरता शांततेच्या मार्गाने त्याला विरोध करणे हेच ते विसरले व आपल्या अनुयायाना तिथेच टाकुन स्त्रीवेष करुन ते पळुन गेले. सत्याग्रह हा आंदोलनाचा एक मार्ग आहे. जर रामदेवबाबांच्या स्थानबद्धतेमुळे जर आंदोलन संपेल असे त्याना जर वाटले असेल तर ते योग्य आहे. म्हणून स्वतः आंदोलनासाठी का होईना जिवंत राहणे त्याना आवश्यक वाटले असेल तर ते योग्यच आहे. मग त्या उद्दीष्टासाठी कोणताही अभिनिवेष न बाळगता ते स्त्रीवेष घालून तिथून निसटण्याच्या प्रयत्नात असतील तर ते विवेकीपणाचे आणि म्हणूनच कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अपेक्षाभंग...

योगप्रभू
गुरुवार, 06/09/2011 - 12:47 नवीन
या धाग्याच्या निमित्ताने तात्यास्वामींचे समर्थक आणि टीकाकार यांच्यात जंगी कुस्ती होईल, या अपेक्षेने वाट बघत बसलो होतो, पण पब्लिक काही रामदेवबाबाचे झाड सोडायला तयार नाही. अरेरे! रामदेवबाबा बायकांचे कपडे घालून पळून गेले, यावर इतकी चर्चा करण्याचे कारण काय? आमचे परमपूज्य बाबा काही नेहमी नेहमी बायकांचे कपडे घालत नाहीत. जीव वाचवण्यासाठी एखाद्यावेळी घातले, तर काय बिघडले? बालगंधर्व चार दशके रंगभूमीवर बायकांचे कपडे घालून वावरले तर त्यांचे इतके कौतुक. अहो १०० वर्षांनीसुद्धा ही कौतुकाची परंपरा कायम आहे. ('अशी ही बनवाबनवी'मधल्या सचिननंतर आता 'बालगंधर्व'मधल्या सुबोधपर्यंत 'कित्ती क्युट दिसतो नै' ही महिलावर्गाची प्रतिक्रिया आहे.) मग आमच्या गुरुदेवांनीच काय घोडे मारले आहे. टीकाकारांनी आपापल्या चड्डीत राहावे, असा इशारा 'स्नेहांजली चिकित्सालया'च्या वतीने आम्ही देऊ इच्छितो. सन्यासी माणसाला कपड्यांची हाव का असावी? असा प्रश्न कुणीतरी विचारला आहे. परमपूज्य बाबांना कपड्यांचे हाव/आकर्षण नाही. कमरेला भगवे वस्त्र आणि खांद्यावरती एक वस्त्र याखेरीज बाबा अन्य कपडे वापरत नाहीत. खरे तर ते निव्वळ लंगोटावरही वावरु शकतात, पण जनसमूहाला लाज वाटू नये म्हणून कमरेला धोतरासारखे वस्त्र घालतात. हा काळ्या पैशांचा मुद्दा मध्येच आला म्हणून. अन्यथा आमच्या गुरुदेवांना 'योगा'खेरीज दुसर्‍या कशातही रस नाही. कपालभाती, प्राणायाम, भस्त्रिका याखेरीज दुसरी भाषा नसते त्यांच्या तोंडात. बाबा ब्रह्मचारी असोत किंवा नसोत, पण नित्यानंद स्वामी, रजनीश यांच्यासारखे बदनाम तर नाहीत. बाबांच्या पॉवरला कमी लेखण्याचे कारण नाही. त्यांच्या अकरा हजार राष्ट्रसैनिकांना शस्त्रच काय, पण लाठ्याही हाती घेण्याची गरज नाही. त्यांच्याकडे आणखी एक अहिंसेचे शस्त्र आहे. सध्याचे उपोषण थांबवून बाबांनी आपले ११ हजार सैनिक आणि ५० हजार अनुयायी यांना दिल्लीत जाऊन दोन्हीवेळा भरपेट खाण्याचा आदेश द्यावा आणि रोज रात्री त्यांना आपल्या कंपनीतर्फे त्रिफळाचूर्णाचे मोफत वाटप करावे. मग बघाच काय चमत्कार होतो ते? सरकारही घाईला आल्याशिवाय राहणार नाही.
  • Log in or register to post comments

सुपरलाईक!!!!!

सविता
गुरुवार, 06/09/2011 - 13:40 नवीन
सुपरलाईक!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

...

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 06/09/2011 - 19:00 नवीन
तिरशिंगराव माणूसघाणे >>कुठल्याही सशस्त्र क्रांतिला आपला विरोध आहे तुझ्या विरोधाला जुमानतो कोण
  • Log in or register to post comments

सहमत.

जयनीत
गुरुवार, 06/09/2011 - 21:50 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments

आपला भारत देश म्हणजे

अविनाशकुलकर्णी
Fri, 06/10/2011 - 11:07 नवीन
आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे.. आई शप्पत...टाळीचे वाक्य.... जगी या खास वेड्यांचा पसारा मातला सारा. ..
  • Log in or register to post comments

आपला भारत देश म्हणजे

arunjoshi123
Fri, 12/15/2017 - 16:24 नवीन
आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे..
हे वाक्य आपण बंगालच्या उपसागरात दोन्ही पाय ठेऊन म्हणत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

हा हा हा ..!!

विशुमित
Fri, 12/15/2017 - 16:26 नवीन
हा हा हा ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

उपोषणानंतर...

सुनील
Wed, 06/15/2011 - 12:56 नवीन
सरकरकडून संपूर्ण दुर्लक्षित करण्यात आल्यानंतर रामदेव बाबांनी श्री श्री रवीशंकर ह्यांच्या सांगण्यावरून उपोषण अवघ्या ९ व्या दिवशी मागे घेतले. आणि आता तर त्यांच्या योगशास्त्राच्या ज्ञानाबद्दलच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत!
  • Log in or register to post comments

..

मनिम्याऊ
Fri, 12/15/2017 - 16:06 नवीन
..
  • Log in or register to post comments

कुठे जुनी पोष्ट शोधायला गेलात

nishapari
Sat, 12/16/2017 - 12:54 नवीन
कुठे जुनी पोष्ट शोधायला गेलात .... आता सगळीच परिस्थिती बदलली आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

जमल्यास तुझ्या

arunjoshi123
Fri, 12/15/2017 - 16:40 नवीन
जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) )
तुझीच का नाही देत?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा