हा पण चांगला लेख...
थोडक्यात: मला वाटते महाराष्ट्रात भाजप-सेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशाच निवडणूका लढवल्या जातील... मनसेबद्दल कमी विचार केला आहे. पण धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशीच मनसेने शिवसेनेची अवस्था केलेली आहे.
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मुंबई हल्ला आता सर्वजण विसरून गेलेत. वास्तवीक तो महत्वाचा (राजकारण म्हणून नाही) विषय आहे. पण "जन पळभर म्हणतील हाय हाय" अशीच अवस्था त्याची झाली आहे. असो.
गुजराथ मधे शतप्रतिशत... असणार हे नक्की असल्यासारखे वाटते.
बाकी सर्वचनिकाल मतदारांच्या मतदानावर अथवा उदासीनतेवर अवलंबून आहेत हे स्पष्ट आहे.
वा क्लिंटन साहेब!
हा लेख सुद्धा आवडला. मप्रला फारच थोडक्यात गुंडाळल्या सारखे वाटले. तसेही तिथे जास्त किचकटपणा नाहीये.
मुंबई-कोकण-पुणे-नाशिक या भागांवर चांगला प्रकाश टाकलात. तसाच विदर्भ-मराठवाड्यवर सुद्धा टाकयला हवा होता असे वाटते. मुंडे, विलासराव, चव्हाणांसारखे दिग्गज मराठवाड्यात आपापली शक्ती पणाला लावतील तर विदर्भात रणजित देशमुखांपासून ते गडकर्यांपर्यंत सर्वांना आपापले महत्व टिकवून ठेवण्यासाठी/वाढवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करायला लागतील. त्यावर जास्त भर दिला असता तर महाराष्ट्राचे विश्लेषण अधिक परिपूर्ण वाटले असते.
पण एकंदरित लेख मस्त जमला आहे यात दुमत नसावे. आपल्या व्यासंगाला सा. दंडवत! :)
आपला,
(वाचक) भास्कर
>>मुंबई-कोकण-पुणे-नाशिक या भागांवर चांगला प्रकाश टाकलात. तसाच विदर्भ-मराठवाड्यवर सुद्धा टाकयला हवा होता असे वाटते.
हो मलाही तसेच वाटते. उत्तर प्रदेशात आता काँग्रेस-समाजवादी पक्ष युती संकटात आहे अशा बातम्या आहेत. त्याकडेही अधिक लक्ष द्यायला हवे. या सर्व सुधारणा वेळ मिळेल तशा करीनच. आपल्यालाही काही सुधारणा सुचवायच्या असतील किंवा महाराष्ट्राच्या किंवा दुसर्या राज्याच्या एखाद्या विभागाविषयी माझ्याकडून राहिलेले मुद्द्यांवर लिहायचे असेल तर त्याचे स्वागतच आहे.
>>पण एकंदरित लेख मस्त जमला आहे यात दुमत नसावे. आपल्या व्यासंगाला सा. दंडवत
व्यासंग वगैरे म्हणून घाबरवू नका . बाकी अंदाज कितपत बरोबर येणार हे काळच ठरवेल.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
अत्यंत चिकित्सक पद्धतीने केलेले विश्लेषण आवडले. महाराष्ट्राबद्दल थोडा जास्त (अगदी जिल्हानिहाय उहापोह) आवडला असता.
२६/११ चा फारसा प्रभाव मतदानावर पडेल असे वाटत नाही. तसेही राजस्थान आणि दिल्लीतील विधानसभेचे मतदान मुंबई हल्ल्यानंतर आठवड्याभरातच झाले होते. काय फरक पडला?
अवांतर - आपण शक्यता ह्या मराठी शब्दाऐवजी संभावना हा शब्द वापरलेला खटकला, तो केवळ त्या शब्दावर हिंदीची छाया आहे म्हणून नव्हे, तर संभावना ह्या शब्दाचा मराठीत एक वेगळाच अर्थ होतो म्हणून.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>>अत्यंत चिकित्सक पद्धतीने केलेले विश्लेषण आवडले. महाराष्ट्राबद्दल थोडा जास्त (अगदी जिल्हानिहाय उहापोह) आवडला असता.
धन्यवाद. मला शक्य आहे तितक्या खोलीत जाऊन उहापोह करायला मला आवडेलच.
>>२६/११ चा फारसा प्रभाव मतदानावर पडेल असे वाटत नाही. तसेही राजस्थान आणि दिल्लीतील विधानसभेचे मतदान मुंबई हल्ल्यानंतर आठवड्याभरातच झाले होते. काय >>फरक पडला?
हो. तसा खूप जास्त फरक पडणार नाही. मुंबई परिसरात थोडासा फरक पडेल असे वाटते.बाकी महाराष्ट्रात मतदान स्थानिक प्रश्नांवरून होईल असे वाटते.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
वा परत एकदा मस्त विश्लेषण क्लिंटन साहेब,
एक शंका
मी बेलापूर मतदार संघात येतो. इतके दिवस आमचा भाग ठाणे लोकसभेत येत होता
आपल्या वरील विवेचनात तो कल्याण लोकसभेचा भाग म्हणून दाखवला आहे.
मतदार संघाच्या पुनर्रचनेत तो कल्याण ला जोडला आहे का ?
कृपया आपल्यास माहिती असल्यास सांगावे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
>>मी बेलापूर मतदार संघात येतो. इतके दिवस आमचा भाग ठाणे लोकसभेत येत होता आपल्या वरील विवेचनात तो कल्याण लोकसभेचा भाग म्हणून दाखवला आहे.
>>मतदार संघाच्या पुनर्रचनेत तो कल्याण ला जोडला आहे का ?
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी आणि डहाणू-पालघर हे चार लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेचे तब्बल २४ मतदारसंघ झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जिल्ह्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. बेलापूरचा समावेश ठाणे मतदारसंघात करावा की कल्याणला याविषयी पुनर्रचना आयोगापुढे वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. त्यातून बेलापूर कल्याणला जोडला गेला आहे. माझ्याकडून चूक झाली असल्यास ती लक्षात आणून द्यावी ही विनंती.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबई अजुनही ठाणे लोकसभा मतदार संघाशी संलग्न आहे.
अर्थात हा काही वादाचा मुद्दा नाही
कल्याण मधे युतीचा उमेदवार कोण असेल ? ( ही जागा भाजपा कडे आहे की शिवसेनेकडे ?)
(संभ्रमीत ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
धन्यवाद अमोल केळकर,
हो. बेलापूर अजुनही ठाणे लोकसभा मतदारसंघातच आहे. आपला प्रतिसाद बघताच मी मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या संकेतस्थळावरून महाराष्ट्राची फाईल उतरवून घेतली. म्हणजे ती माहिती अधिकृत आहे यात शंका नाही. ही फाईल http://www.delimitation-india.com/ वरून उतरवून घेता येईल. त्याप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा-भाईंदर, ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे,ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण (पूर्व), डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्याचबरोबर माझ्याकडून आणखी एक चूक झाली होती. ती म्हणजे पूर्वी कोकणात राजापूर आणि रत्नागिरी असे दोन लोकसभा मतदारसंघ होते. आता तिकडे एकच रत्नागिरी -सिंधुदुर्ग असा एकच लोकसभा मतदारसंघ आहे. पूर्वीच्या कुलाबा मतदारसंघाचे नाव बदलून रायगड केले आहे हे मला पक्के माहित होते आणि ते बरोबर आहे.
कधीकधी माहितीच्या बाबतीत अति आत्मविश्वास आणि स्वतःच्या स्मरणशक्तीवर वाजवीपेक्षा असलेला विश्वास नडतो तसे आता झाले. आणि त्यामुळे अशी चूक झाली. मिपाकरांनी मोठ्या मनाने ती पोटात घालावी ही विनंती. पूर्व भारतावरील लेख प्रकाशित करण्यापूर्वी आधीच्या लेखामधील माहिती पुन्हा एकदा तपासून बघणार आहे. त्यात चूक आढळली तर मी ती मिपावर जाहिर करेनच. आपल्यालाही अशी काही चूक आढळली तर ती जरूर सांगावी ही विनंती. एक भगवंत सोडला तर कोणीही 'परफेक्ट' नसते आणि प्रत्येकाकडून कधीनाकधी चुका होतच असतात. आणि अशा चुकांचे लक्षात आणून दिल्यावरही समर्थन करायचा दुराग्रह माझ्याकडे नाही. माझ्या अंदाजांविषयी मतेमतांतरे असू शकतात आणि असावीत. त्यावर चर्चा व्हावी. पण अशा काही चुका आढळल्यास आणि त्या लक्षात आणून दिल्यास त्याचे स्वागतच आहे.
आता यामुळे अंदाजांमध्ये काय बदल होतील हा प्रश्न उभा राहतो. सुरवात करू या कोकणापासून. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कणकवली हा नारायण राण्यांच्या मालवण जवळचा भाग. पूर्वी कणकवलीचा समावेश मालवण विधानसभा मतदारसंघात होता. पण आता कणकवली स्वतंत्र मतदारसंघ आहे आणि त्यात आजूबाजूचा भाग (उदाहरणार्थ देवगड) समाविष्ट आहे. तसेच पूर्वीच्या मालवण मतदारसंघातील कणकवली वगळता उरलेला प्रदेश कुडाळ विधानसभा मतदारसंघात आहे. कणकवली आणि मालवण भागात नारायण राण्यांनी शिवसेनेची अनामत रक्कम जप्त करवू असे आधीच जाहिरपणे सांगितले आणि तसे करूनही दाखवले. तसेच राजापुरातही झाले. चिपळूणमध्ये भास्कर जाधव सोडून गेल्यानंतर शिवसेनेची परिस्थिती फारशी सशक्त नाही. रत्नागिरीत राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती. तेव्हा कोकणात शिवसेना गेल्या अनेक वर्षांत नव्हती एवढी कमजोर आहे. आणि तिकडे सेनेला विजय मिळणे खूप कठिण दिसते.
रायगड लोकसभा मतदारसंघात पेण,अलिबाग,श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर मतदारसंघांचा समावेश आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यातील ४ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. श्रीवर्धनमध्ये शाम सावंतांनी नारायण राण्यांबरोबर शिवसेना सोडली पण नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचाच उमेदवार तिथून निवडून आला.तसेच गुहागरमध्ये युतीची परिस्थिती बरी आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात खेड तालुक्याचा काही भाग समाविष्ट आहे. जर रामदास कदम असंतुष्ट असतील तर त्याचा सेनेवर थोडा परिणाम नक्कीच होईल. महाड, पेण भागात शेकाप-काँग्रेसचे वर्चस्व आहे. तरीही अंतुले काँग्रेसचे उमेदवार असतील तर त्यांना रायगड जिल्ह्यात नक्कीच मताधिक्य मिळेल. तेव्हा या जागी पण काँग्रेसच बाजी मारेल असे वाटते.
ठाण्यात मात्र शिवसेनेची कोंडी व्हायची शक्यता आहे. मागच्या वेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे,बेलापूर,कल्याण,मुरबाड,उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. शिवसेनेच्या प्रकाश परांजपेंची बेलापूर,मुरबाड आणि उल्हासनगर भागातून पिछेहाट झाली होती. तरीही ठाणे आणि डोंबिवली-कल्याण भागातून त्यांना आघाडी मिळाली आणि त्यांना २५ हजार मतांनी विजय मिळाला. त्यांच्या निधनानंतर मे २००८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे यांनी ८५-९० हजारांची आघाडी मिळाली. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातून डोंबिवली-कल्याण हा युतीला मताधिक्य देणारा हक्काचा भाग गेला आहे तर बेलापूर-ऐरोली हा नव्या मुंबईतील राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला प्रदेश मात्र आहे. शिवसेनेला ठाणे आणि कोपरी-पाचपाखाडीतून मताधिक्य नक्की मिळेल. बर्याच अंशी माजीवड्यातून शिवसेना पुढे असेल. पण बेलापूर-ऐरोलीतून पिछेहाट होईल असे दिसते. तरीही ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, माजीवडा या भागात मिळणार्या मताधिक्याने शिवसेनाच बाजी मारेल असे वाटते.
कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगेल अशी चिन्हे आहेत. ह्या मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. उल्हासनगर आणि मुंब्रा-कळवा भागात युतीची पिछेहाट नकी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथमधून शिवसेनेचे साबीर शेख पराभूत झाले होते आणि राष्ट्रवादीचा विजय झाला होता. कल्याण-डोंबिवलीत जरी युतीला आघाडी मिळाली तरी ती उल्हासनगरमधून कलानींच्या कृपेने राष्ट्रवादीच्या डावखर्यांना आघाडी मिळेल ती भरून काढायला पुरेशी ठरेल का? बहुदा त्यामुळे कल्याणमधून युतीचा पराभव होईल असे वाटते.
तेव्हा महाराष्ट्रात माझ्या चुकीचा माझ्या अंदाजात खूप फरक पडेल असे वाटत नाही. आपले काय मत आहे?
---विल्यम जेफरसन क्लिंटन
अभद्र राष्ट्रवादी व सेना ही अनिष्ट युती होण्याची शक्यता संपुष्टात आली आणि आमचा जिव भांड्यात पडला.
तुमच्या लेखातील महाराष्ट्राच्या निकालाच्या बाबतीतली पहिलीच शक्यता योग्य वाटते.सेनाभाजपाच्या पारड्यात अजुन एका जागेची भर पडु शकली तर उत्तमच.
अतिशय सखोल विश्लेषण आहे आपले.
केळकरांना पडलेला प्रश्न मला देखिल पडलाय?
आणि जर दोन भागात मतदारसंघ दुभागला गेला असेल तर परांजपे यांच्या व्यतिरिक्त दुसरा युतीचा उमेदवार कोण असेल ह्या विचारात पडलेली?
"अनामिका"
>>अभद्र राष्ट्रवादी व सेना ही अनिष्ट युती होण्याची शक्यता संपुष्टात आली आणि आमचा जिव भांड्यात पडला.
हो मलाही ती अनैसर्गिक युती झाली नाही म्हणून चांगलेच वाटले.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
नमस्कार मंडळी,
थोड्या वेळापूर्वी मी दक्षिण भारताविषयीचा लेख मिपावर प्रकाशित केला आहे. हा लेख खूपच मोठा असून तो लिहायला बराच वेळ लागला. आज दिवसभरात 'पेशंटल' भेटायला अनेक लोक आले त्यामुळे मला या लेखावरील प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळाला नाही. दिवसभर एका जागी बसल्यामुळे जखमेच्या जागी जरा पाय आखडल्यासारखे झाले आहे तेव्हा प्रतिक्रिया उद्या देतो. तेव्हा कृपया समजून घ्यावे ही विनंती.
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मी त्या सर्व वाचल्या आहेत. त्यावर माझी उत्तरे उद्या.
संपादकांना विनंती करतो की संभावना हा शब्द बदलून शक्यता हा करावा. तो बदल मला करता येत असल्यास तो मी उद्या करेन. सुधारणेबद्दल धन्यवाद.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
आपल्या लेखात असे बदल आपण करता येतात असा माझा तरी अनुभव आहे. तेव्हा उद्या तुम्हीच करा... बिचारे संपादक काय्-काय म्हणून करावे त्यांनी.
आणी हो, आपल्याला लवकर चांगला आराम पडावा यासाठी शुभेच्छा!
क्लिंटनसाहेब, वाचन सुरू आहे. (पण अनेक गोष्टींप्रमाणे याही विषयाची समज नसल्यामुळे लेखाप्रमाणे अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देता येत नाही.) पण पुढच्या लेखाचीही वाट पहात आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
क्लिंटनसाहेब विष्लेश्ण आवड्ले, मस्तचं.
पुण्यातुन खालील मुख्य उमेदवार रिंगणात असतील :-
A] सुरेश कलमाडी
B] डी.एस.कुलकर्णींना
C] अरुण भाटीया
D] भा.ज्.पा (जोशी, मटकरी)
आपल्याला काय वाटते ?
कोण बनेगा खासदार ?
A.......B......C........ का ..D......?
प्रतिक्रिया
मला वाटते...
छान लेख
सुधारणा
चिकित्सक विश्लेषण
उहापोह
कोणतेही
वा परत
मतदारसंघाची पुनर्रचना
माझ्या
चूक मान्य
अतिशय सखोल विश्लेषण आहे आपले.
>>अभद्र
निवेदन
शक्यता
क्लिंटनसा
मस्तचं