अहमदाबाद ला ऑफिस च्या कामानिमित्त बऱ्याच वेळा जायचा योग येतो, मग वेळ मिळाला कि जवळपासच्या प्राचीन ठिकाणांना भेट देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, अशीच एक भेट मोढेरा येथील प्राचीन सूर्य मंदिराची.
माझ्या कामाचे ठिकाण हे अहमदाबाद - मेहसाणा हायवे वरच होते, दुपारी १२ ला काम आटोपल्या नंतर छात्राल GIDC मधून मेहसाणा साठी इको गाडीने मेहसाणा गाठले. मेहसाणा मध्ये मोढेरा चौक येथून मोढेरा साठी गुजरात महामंडळाची बस मिळाली, मेहसाणा पासून मोढेरा अंदाजे २५ किमी आहे, पण एकंदरीत रस्त्यांची व्यवस्थित असलेली अवस्था, त्यामुळे प्रवास महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक गतीने होतो (अपवाद मुंबई-पुणे, मुंबई - सातारा, आणि नॅशनल हायवे चा काही भाग ).
रविवार किंवा सुट्टीचा दिवस नसल्यामुळे आणि भर दुपारी रखरखीत उन्हात मी पोचल्यामुळे संपूर्ण मोढेरा सूर्य मंदिरात कोणीच नव्हते, पण नंतर लक्षात आले कि मंदिराच्या मागे असलेल्या उद्यानात एक प्रेमी युगल त्याच एकांताचा लाभ घेत आहे.
मोढेरा येथील सूर्य मंदिर हे इसवी सन १०२६ मध्ये सोळंकी राजवंशातील भीमदेव सोळंकी या राजाने बनवले होते, सोळंकी राजवंश हा चालुक्य राजवंशाचीच एक शाखा होती.
पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर कर्कवृत्तावर आहे, मंदिराची रचना हि ३ विभागात केली गेली आहे, सूर्यकुंड, सभामंडप आणि गृहमंडप. सभामंडप हा कलाकुसर केलेल्या ५२ खांबावर तोलून धरला आहे, हे ५२ खांब एका वर्षातील ५२ आठवडे दर्शवतात असे गाईड ने सांगितले, तसेच सूर्यकिरणे सभामंडपामधून गर्भगृहातील मुख्य देवता असलेल्या सोन्याच्या मूर्तीवर पडत असत आणि मुकुटामध्ये बसवलेल्या हिऱ्यामुळे संपूर्ण गर्भगृह उजळत असे हि सांगितले.
सभामंडप हा रामायण महाभारतातील विविध प्रसंगाने अलंकृत केलेला आहे, अतिशय सुंदर कलाकुसरीने तोरण बनवलेले आहेत, संपूर्ण मंदिर परिसर हा मूर्तिभंजकांनी केलेल्या विध्वंसानंतर प्राचीन भारतीय शिल्पकलेची आणि वास्तुशास्त्रात असलेल्या उत्तुंग प्रगतीची साक्ष देत होता.

वाचने
7871
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता लेख जमला. फोटो आवडले.
गेली ४-५ वर्षे नियमित पणे
In reply to आता लेख जमला. फोटो आवडले. by कंजूस
उत्तम
आवडले. छायाचित्रे छान काढली
छान...!
खुपच उत्तम फोटो
जाणार..
थेट गाड्या आहेत
In reply to जाणार.. by चौकटराजा
सहकुटुम्ब ...
In reply to थेट गाड्या आहेत by कंजूस
असं कुणीही नसताना मंदिर
मस्तं फोटो!
अप्रतिम.
सुंदर फोटो.
मस्तय हो, फोटो पण छान काढलेत
मस्त!!
छान लेख
छान लेख
सुरेख! मस्त फोटो.