२९ किंवा ३० डिसेम्बर रोजी किल्ले रायगडावर एक छोटी सहल करण्याचा इरादा आहे. आम्ही एकून ८ मोठी जण असून एक लहान मुलगा आहे. या आधी घाई गडबडित एकदा हा किल्ला पहिला आहे, पण समाधान झाले नाही.
हेतु हाच आहे की, स्वराज्याची राजधानी आणि इतिहास अनुभवता येइल, थोड थ्रिल म्हणून रोपवेत बसता येइल. यापूर्वी कधीही किल्ल्यावर वस्ती केली नाहीये, त्यामुळ तो ही अनुभव घ्याचय. अगदी सकाळी उजडताना तो किल्ला आणि आजुबाजुचे सौन्दर्य पहायचे आहे.
शोधाशोध केली असता, रायगडावर MTDC च रिसोर्टवजा होटल आणि रोपवेवाल्यांचे एक छोटे होटल असल्याचे समजले.
MTDC च्या बुकिंग वेब्साईट वर रायगड किल्ल्याच्या निवासचा कुठलाही उल्लेख नाही. रोपवेवाल्यांना संपर्क करून इमेल केला असता आम्ही एक महिना आधी बुकिंग सुरु करतो असे उत्तर दिले. ८५० रुपयात नॉन एसी रूम किल्ल्यावर मिळेल असे त्यानी सांगितले.
MTDC मधे मुक्काम करावा की रोपवेवाल्यांच्या खाजगी होटेलात? स्वच्छ रूम, अंघोळ करण्यासाठी गरम पाणी आणि रुचकर नाश्ता जेवण . एवढ्याच माफक अपेक्षा आहेत. वरील दोन्ही पर्याय जर योग्य नसतील तर किल्ल्याच्या पायथ्याशी देखील रहायची तयारी आहे. स्थानिक घर वेगैरे मिळाले तर उत्तम.
वाचने
7292
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
२९/३० डिसेंबर रोजी गडावर
एक सुधारणा
In reply to २९/३० डिसेंबर रोजी गडावर by प्रचेतस
तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
बापरे !!
29,30 डिसेम्बरला गड़वार जाऊ
29,30 डिसेम्बरला गड़वार जाऊ
ऑनलाईन बुकिंग MTDC चे होते पण
३० डिसेम्बरला सकाळी लवकर
वर अनेक प्रतिसादात
गडावरचे एम टी डी सी सध्या एका
धन्यवाद ..
रायगड पेक्षा पाचाड
माहिती बद्दल धन्यवाद ...
MTDC मध्ये उत्तम सोय होईल.
धन्यवाद ...