
दीपोत्सवा, आज तरी तुझं इथे स्वागत अजून तरी इथे फुटतायत फटाकेच - निरपराध मस्तकं नाहीत - म्हणून सहर्ष स्वागत अजून तरी इथे ठिणग्या उडतायत आतशबाजीतूनच - रोखलेल्या बंदुकांतून नाहीत- म्हणून मन:पूर्वक स्वागत अजून तरी इथे भिरभिरतायत भुईचक्रच - बाँबस्फोटानंतरची धूळवादळं नाहीत- म्हणून सानंद स्वागत अजून तरी इथे अंगावर काटा आणतेय गुलाबी थंडीच - मनमानी अटकेची भीती नव्हे – म्हणून हार्दिक स्वागत अजून तरी इथला प्रकाश उत्सवी दिव्यांचा आहे – उन्मादी मशालींचा भेसूर उजेड त्याची जागा घेण्यापूर्वी हे दीपोत्सवा, तुझं (कदाचित) शेवटचं, सहर्ष, मन:पूर्वक, सानंद, हार्दिक वगैरे स्वागत!!

वाचने
4358
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
परखड! आवडलीच.
पद्मावति,
आवडली.. फक्त
बाजीप्रभू,
वा ! अप्रतिम !
कडक!
गुड वन.
___/\___
चांगली आहे
परखड
दिनेश५७