लेखक :- ब्रिटिश
अभिवाचन :- अंशुमन विचारे
विशेष आभार :- किरण माने, अमोल उदगिरकर आणि छोटा डॉन
'कोणती तरी गोष्ट करायचीच म्हटलं की सगळी कायनात तुमच्या मदतीला येते' असं शाहरुख म्हणून गेलाय. ते खोटं नाहीये! दिवाळी अंकात अभिवाचन करताना "ते एक कॅरेक्टर नाही का? मिपावर फार भारी कथा असतात बघ त्याच्या.. ती कथा घ्यायचीच" इतक्या सॉल्लीड माहितीवर ह्या धाग्याचा मुहूर्त केला गेला. अनेकांना हे अत्यंत मुद्देसूद वर्णन देऊन "आठवतेय का कोणाच्या कथा होत्या ह्या?" असे प्रश्न विचारले गेले. एका रम्य क्षणी मिपा उचकत फिरताना अचानक कायनात प्रसन्न झाली आणि "मिथून काशीनाथ भोईर" हे नावं लख्खं आठवलं! ही आगरी कथा घ्यायची ह्यात डौट नव्हताच, पण लेखकूची परवानगी? त्याचं काय? मग पुन्हा जुन्या मिपाकरांना साकडं घालून ब्रिटिश म्हणजे नक्की कोण हे शोधलं, त्यांना गाठून परवानगी सुद्धा मिळवली. पण पुन्हा पुढचा प्रश्न.. वाचणार कोण? आता हा सर्वात कळीचा प्रश्न होता. आगरी भाषेत विनोदी कथा वाचणारा माणूस सापडता सापडेना. अमोल उदगीरकरांना सहज विचारलं, तर म्हणाले, "किरण मानेंना विचारा. मराठीतले मोठे कलाकार आहेत. नक्कीच रेफरन्स देतील." मिपावरच्या कुणालाही काहीही विचारायला हरकत नसते पण तारांकित लोकांना बोलायला नाही म्हणलं तरी जरा बिचकायलाच होतं. घाबरत घाबरत त्यांना विचारलं, तर त्यांनी अगदी आनंदाने अंशुमन विचारेंचा नंबर दिला. भीड जरा चेपली! मग अंशुमनला मेसेज केला. हाच तो क्षण जेव्हा आख्खी कायनात सोबत होती, तिने बरोब्बर माणसापाशी आणून सोडलं होतं. अंशुमनने ह्या कथेचं अक्षरशः सोनं केलंय!


वाचने
10962
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
धमाल!
जबरी!!!
वाचताना जेवढी मजा आली होती,
मजा आली...
झक्कास..धमाल आली वाचताना..
मस्त
बाला, कं आवाज लागराय रं...
बाला, कं आवाज लागराय रं...
In reply to बाला, कं आवाज लागराय रं... by आदूबाळ
परत परत हसलोय ऐकून हे.
काय खरं नाही राव!
एकच नंबर!!
ऑडिओ कुठल्याही ब्राउझरवर प्ले
आयफोन का? क्रोमवर व्हायला
In reply to ऑडिओ कुठल्याही ब्राउझरवर प्ले by अभिजीत अवलिया
आयफोन नाही, नोट ४ आहे. लॅपटॉप
In reply to आयफोन का? क्रोमवर व्हायला by पिलीयन रायडर
मी युट्युबवर ऑडीओ टाकला आहे.
In reply to आयफोन नाही, नोट ४ आहे. लॅपटॉप by अभिजीत अवलिया
धन्यवाद. मजा आली ऐकताना.
In reply to मी युट्युबवर ऑडीओ टाकला आहे. by पिलीयन रायडर
मस्त!
कं लिवलंय अन कं मनलंय! _/\_
सुंदर झालीय कथा!
मस्त!