पुरंदराचं तेजस्वी पातं!

Primary tabs

राघव's picture
राघव in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2

मुरारबाजींचं व त्यांच्यासमवेतच्या सर्व मावळ्यांचं अतुलनीय शौर्य म्हणजे एक दीप्तीमान तुरा आहे स्वराज्यगाथेतला!
त्यातून प्रेरणा न मिळालेला मराठी माणूस विरळाच. त्याच शौर्याचं वर्णन करायचा एक अल्प प्रयत्न. त्यांना शत-शत नमन. _/\_

कफन बांधुनी आलेला.. कफनातच गेला..
शत्रूचा आवेशही गळला.. कफनातच मेला..
संख्येची ना तमा तयाला..आता वज्राघात!
हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं!

असंख्य शस्त्रं जेथे थकली.. ते शब्दांनी झालं
खानाच्या बोलांनी काळीज अंगारून आलं..
उफाळला तो त्वेष पुरंदरी.. अवघा निमिषांत..
हट्टानं अन् पेटून उठलं तलवारीचं पातं!

कडाडून जणू वीज उमटली शस्त्राघातातुनी..
प्रलयभयंकर शब्द उतरला गडमाथ्यावरुनी..
अगणित शत्रूंमध्ये घुसला जळता प्रपात!!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!

तलवारींचं रुद्रभैरवी तांडव गरजत रणी..
चिरफाळला जो उभा राहिला त्यांच्या अंगेजणी..
खानाच्या वेधानं सुटला तो लोळ रोरावत!!
हट्टानं ते पेटून उठलं तलवारीचं पातं!

वेगाचा तो नाद गूंजला.. गरजूनच गेला!
खान वाचला जरी.. आसुरी माज शांत झाला!
"नरडीचा त्या घोट गिळाया [उरले] अंतर चार हात!"
नि:श्वासातून जणू म्हणालं हट्टाचं पातं!

तेजस्वी तो प्रताप केवळ.. त्याला उपमा नाही..
संक्षेपानं बचावल्याच्या पराभवाची ग्वाही!
त्या हट्टानं धडकी भरली शत्रू काळजांत!!
स्वराज्याच्या शिरपेचातील तेजस्वी पातं!!

Footer

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 8:35 am | पाषाणभेद

सुंदर रचना.
कुसूमाग्रजांच्या 'सात' (वेडात मराठे वीर) या कवितेची आठवण झाली.

सस्नेह's picture

23 Oct 2017 - 12:14 pm | सस्नेह

आवेशपूर्ण !

पद्मावति's picture

19 Oct 2017 - 5:00 pm | पद्मावति

सुरेख!

यशोधरा's picture

19 Oct 2017 - 5:24 pm | यशोधरा

सुरेख काव्य!

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2017 - 6:40 pm | स्वाती दिनेश

वीररसातलं सुंदर काव्य!
स्वाती

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

प्रेरणादायी काव्य ! छानच !

वीररसातलं काव्य आवडलं.

पैसा's picture

30 Oct 2017 - 6:22 pm | पैसा

आवडली

रेवती's picture

30 Oct 2017 - 6:29 pm | रेवती

छान.